Sunday 30 September 2018

गजानन दिगंबर माडगूळकर


अद्वितीय प्रतिभा व शब्दप्रभुत्वाच्या साहाय्याने गीतरामायणा सारखा दर्जेदार नजराणा महाराष्ट्राला पेश करणारे व आजही मराठी रसिकांच्या मनांत अढळ स्थान असलेले श्रेष्ठ कवी म्हणजे गजानन दिगंबर माडगूळकर. कवी, गीतकार, पटकथालेखक, कादंबरीकार, गीतरामायणकार अशा विविध स्वरूपात त्यांची ओळख मराठी साहित्य क्षेत्रात आहे. घरातील परिस्थिती चांगली नसल्यामुळे त्यांनी सुरुवातीच्या काळात चरितार्थासाठी चित्रपटांच्या कथा, संवाद, गीतलेखनाचे काम केले. त्यातही त्यांची प्रतिभा, सहज सोपे शब्द, भावसंपन्न आणि मराठी मनाला सदैव मोहिनी घालणारी रचना यामुळे ते श्रेष्ठ ठरले.
आरंभी ते वि.स. खांडेकर यांचे लेखनिक म्हणून काम करत होते. त्यांचे हस्ताक्षर खूप छान होते. तिथेच असताना त्यांना वाचनाची, लेखनाची गोडी लागली. पुढे त्यांची स्वत:ची सुगंधी-वीणा (१९४९), जोगिया (१९५९), चार संगीतिका (१९५६), गीतरामायण (१९५७), काव्यकथा (१९६२), चैत्रबन (चित्रपटगीते) (१९६२), गीतगोपाल (१९६७), गीतसौभद्र (१९६ ८)-अशी काव्यनिर्मिती झाली. 'वैशाखी' या नावाचा त्यांनी लिहिलेल्या चित्रपटगीतांचा संग्रह प्रसिद्ध आहे. याशिवाय कथा, कादंबरी, आत्मचरित्र या वाड्मय प्रकारांतही त्यांनी लेखन केले. त्यांनी सुमारे १५ लघुकथा लिहिल्या; आकाशाची फळे, उभे आडवे धागे या कादंबर्‍या व युद्धाच्या सावल्या हे नाटक, इत्यादी स्वरूपाचे लेखनही त्यांनी केले. गदिमांनी सुमारे १४५ मराठी चित्रपटांची गीते लिहिली, ८0 पटकथा, ४४ मराठी चित्रपटांच्या कथा व ७६ चित्रपटांचे संवादलेखन त्यांनी केले. तसेच २३ हिंदी पटकथा, १0 हिंदी चित्रपट कथा, ५ हिंदी चित्रपटांचे संवाद, यांचेही लेखन त्यांनी केले. त्यांनी सुमारे २५ (२४ मराठी व १ हिंदी) चित्रपटांत अभिनयही केला. गीतरामायण ही गदिमांनी संपूर्ण महाराष्ट्राला दिलेली एक साहित्यिक देणगीच म्हणावी लागेल.गदिमांना भारत सरकारने पद्मश्री (१९६९) हा किताब बहाल केला. ते संगीत नाटक अकादमी व विष्णुदास भावे गौरवपदक या पुरस्कारांचे मानकरी ठरले. १९६२ ते १९७४ अशी सुमारे १२ वर्षे ते महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्यही होते. १९७३ साली यवतमाळ येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

पेट्रोल आणि डिझेल कार 2030 पर्यंत बंद करणार

 भारतासह 14 देशांचा समावेश
पुढच्या दोन दशकात भारतासह 14 देश पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या कारची (वाहनांची) विक्री थांबविण्याच्या तयारीत आहेत. इलेक्ट्रिक कार किंवा स्वच्छ इंधन कार त्यांच्या जागा घेतील. जागतिक सर्वेक्षणाने  बीएनईएफमध्ये हा दावा केला आहे.
या अहवालानुसार पहिल्या 2025 मध्ये ऑस्ट्रिया आणि नॉर्वे जीवाश्म-इंधन कारची विक्री थांबवणार आहेत. ऑस्ट्रियन पर्यावरण संस्थेने आपल्या अहवालात  असा दावा केला आहे की 2025 नंतर देशामध्ये जीवाश्म ईंधन वाहनांची विक्री करण्याची परवानगी देण्यात येणार नाही. असे घडल्यास ऑस्ट्रिया हा पहिला देश असेल जो पेट्रोल-डिझेल कारांवर बंदी आणेल. ऑस्ट्रियाबरोबर नॉर्वे देखील हे लक्ष्य साध्य करण्यास सज्ज होत आहे.  2030 पर्यंत भारत, चीन, फिनलँड, आयर्लंड, जर्मनी आणि स्लोव्हेनिया ही गोष्ट साध्य करतील. लंडन, लान्स एजेंटिलिस, पॅरिस, रोम, केप टाऊन, ब्रुसेल्ससह 20 शहरात पेट्रोल-डिझेल कार चालवण्यास प्रतिबंध केला जाणार आहे. या  अहवालानुसार या देशांद्वारे विविध प्रसंगी अनेक  घोषणा करण्यात आल्या आहेत. लवकरच भारत सरकार लवकरच ई-वाहन धोरण जाहीर करेल, असे चित्र आहे.

Saturday 29 September 2018

हवेच्या प्रदूषणामुळे नागरिकांचे सरासरी वय दीड वर्षांनी कमी

हवेच्या प्रदूषणामुळे भारतीय नागरिकांचे सरासरी वय दीड वर्षांनी कमी होत असल्याचा दावा एका ताज्या संशोधनात करण्यात आला आहे. वायू प्रदूषण आणि वायू प्रदूषण आणि आयुष्यकाळ यांच्यातील संबंधाची पाहणी करणारे हे पहिलेच संशोधन होय. जोशुआ आपटे यांनी या संशोधनाचे नेतृत्व केले असून एन्व्हायर्मेंट सायन्स अँड टेक्नॉलॉजी लेटर्स या नियतकालिकात ते प्रसिद्ध झाले आहे.
अमेरिकेतील ऑस्टिन येथील टेक्सास विद्यापीठाच्या संशोधकांनी हे संशोधन केले आहे. या संशोधकांनी वातावरणात आढळणार्‍या २.५ मायक्रॉनपेक्षा छोट्या कणांमुळे (पीएम) होणार्‍या वायू प्रदूषणाचा अभ्यास केला. हे सूक्ष्म कण फुफ्फुसांमध्ये प्रवेश करू शकतात आणि यामुळे हृदयाघात, अपस्मार यांसारखे तसेच कर्करोगासारखे आजार होऊ शकतात. पीएम २.५ प्रदूषण वीजनिर्मिती प्रकल्प, कार व ट्रक, आग, औद्योगिक उत्सर्जनातून होते.
या प्रदूषणामुळे भारतातील व्यक्तींचे सरासरी वय १.५३ वर्षांनी कमी होते, असे संशोधकांना आढळले. त्या तुलनेत बांग्लादेशात १.८७ वर्ष, इजिप्तमध्ये १.८५, पाकिस्तानात १.५६, सौदी अरेबियात १.४८, नायजेरियात १.२८ आणि चीनमध्ये १.२५ वर्षांनी आयुष्य कमी होत असल्याचेही त्यांना आढळले. वायू प्रदूषण रोखण्यासाठी नवी दिल्ली, हैदराबाद, बंगळुरू यासारख्या मोठय़ा शहरांमध्ये तर सजग नागरिक मास्कचा वापर करताहेत. पण, सर्वसामान्यांसाठी ही बाब अजूनही सरावाची झालेली नाही. त्यामुळे वायू प्रदूषणाला अटकाव करणे हा एकमेव पर्याय प्रशासन आणि नागरिकांसमोर राहतो. त्यातही वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी कसे करता येईल यासाठी शासन स्तरावर विचार होणे गरजेचे आहे.

प्रभाकर पंडित

ज्येष्ठ संगीतकार प्रभाकर पंडित यांचा जन्म ३0 सप्टेंबर १९३३ रोजी झाला. त्यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण सातार्‍याला झाले. संगीताची आवड बालपणापासून असल्याने त्यांनी गायनाचे मार्गदर्शन मटंगेबुवा; तसेच पेंढारकरबुवा यांच्याकडे घेतले. व्हायोलिनचे शिक्षण त्यांना जे.वाय. पंडित यांच्याकडून मिळाले. संगीतात कारकिर्द घडविण्यासाठी ते मुंबईला आले. मुंबई आकाशवाणी केंद्रावर १५ वर्षे ते काम करत होते. मुंबई विद्यापीठाच्या सुगम संगीत विषयाचे ते अभ्यागत व्याख्याते; तसेच परीक्षकही होते.संगीत क्षेत्रात सुमारे ४५ वर्षे कार्यरत असलेल्या पंडितांनी ध्वनिफीती, चित्रपट, नाटक, संगीतिका, संगीत नाटक यांसाठी संगीत दिले. संगीतबद्ध केलेल्या गाण्यांच्या ध्वनिफितींमुळे (सुमारे तीनशे) प्रभाकर पंडित नावाजले गेले.
याखेरीज दहा चित्रपट, वीस नाटके, संगीतिका, संगीत नाटके यांकरताही त्यांनी संगीत दिले. तसेच जाहिरातींच्या जिंगल्सचीही निर्मिती त्यांनी मोठ्या प्रमाणावर केली.त्यांनी संगीतबद्ध केलेल्या ह्लदेवाचिये द्वारीया अजित कडकडे यांच्या आवाजातील ध्वनिफितीने अत्यंत दुर्मिळ अशा डबल प्लॅटिनम डिस्कचा बहुमान मिळवला होता. मंगेशकरांसह सुरेश वाडकर, सुमन कल्याणपूर, कविता कृष्णमूर्ती, साधना सरगम ते स्वप्नील बांदोडकर पयर्ंत सुमारे ७८ विविध गायकांचे आवाज त्यांनी आपल्या ध्वनिफितींच्या माध्यमातून लोकांसमोर आणले. भावगीते, भक्तिगीते, लोकगीते, अभंग, आरत्या, संतरचना, बालगीते असे अनेक गीतप्रकार त्यांनी संगीतबद्ध केले.

अँनी बेझंट

अँनी बेझंट (१ ऑक्टोबर १८४७ ते २0 सप्टेंबर १९३३). विख्यात थिऑसॉफिस्ट आणि भारतीय राजकारण, धर्म, शिक्षण, समाजसुधारणा आदी क्षेत्रांत महान कार्य केलेली एक ब्रिटीश महिला. त्यांचा जन्म लंडनमध्ये झाला. त्यांची आई एमिली ही आयरिश होती आणि वडील विल्यम पेजवुड हेही मातृवंशाकडून आयरीशच होते. आई धार्मिक, कष्टाळू व मानी आणि वडील विद्वान, तत्त्वज्ञ व बहुभाषी होते. बेझंट या पाच वर्षांच्या असताना त्यांचे वडील वारल्यामुळे (१८५२) या कुटुंबापुढे अनेक अडचणी निर्माण झाल्या. परंतु, त्यांच्या आईच्या मॉरिएट नावाच्या एका श्रीमंत मैत्रिणीने त्यांना शिक्षणासाठी आपल्याकडे ठेवून घेतले व त्यांना र्जमन, फ्रेंच आदी भाषा व संगीत यांचे शिक्षण दिले तसेच समाजसेवेचीही आवड त्यांच्या ठिकाणी निर्माण केली. या काळात त्या वृत्तीने धार्मिक बनल्या. पुढे रेव्हफ्रँक बेझंट या ख्रिस्ती धर्मोपदेशकाशी त्यांचा विवाह झाला (१८६७). त्यांना दिग्बी हा मुलगा व मेबेल ही मुलगी अशी दोन अपत्ये झाली. परंतु, मुलांच्या आजारपणामुळे त्या नास्तिक बनल्याने आणि पतीच्या इच्छेपुढे शरणागती पत्करणे हा त्यांचा स्वभाव नसल्यामुळे त्यांना पतीपासून अलग व्हावे लागले (१८७३). त्यानंतर त्यांना खूप हालअपेष्टा सोसाव्या लागल्या. त्यांच्या आईलाही या घटनेचा धक्का बसला व तिचा मृत्यू झाला (१८७४). नॅशनल रिफॉर्मर पत्राच्या वाचनाने प्रभावित होऊन त्या सुप्रसिद्ध नास्तिक चार्ल्झ ब्रॅडलॉ (१८३३-९१) यांच्या 'नॅशनल सेक्युलर सोसायटी' मध्ये दाखल झाल्या (१८७४). पुढे त्या सोसायटीच्या उपाध्यक्षा आणि सोसायटीचे मुखपत्र असलेल्या नॅशनल रिफॉर्मरच्या सहसंपादिका बनल्या. त्या काळात नास्तिकता, संततिनियमन, महिलांचा मतदानाचा हक्क आदींचा प्रचार केल्यामुळे त्यांचा खूप सामाजिक छळ झाला व त्यांच्यावर खटलेही भरले गेले. १८८५ साली त्या 'फेबिअन सोसायटी'च्या सभासद बनल्या. जॉर्ज बर्नार्ड शॉ व इतर समाजवादी विचारवंतांच्या सान्निध्यात आल्यावर त्यांनी समाजवादाचा प्रचार केला. लंडनमधील पहिल्या ट्रेड युनियन्स स्थापन करण्यास त्याच कारणीभूत झाल्या. त्यांनी काड्यापेट्यांच्या कारखान्यात काम करणार्‍या ७00 मुलींचा संप घडवून आणला (१८८८) आणि अकुशल कामगार संघटित होऊ शकतात, हे दाखवून दिले. या काळातील समाज सुधारणांसाठी त्यांनी लेखनभाषणादी मार्गांनी भरीव कार्य केले. थिऑसॉफिकल सोसायटीच्या संस्थापिका मॅडम हेलेना ब्लाव्हॅट्स्की (१८३१-९१) यांचा द सीकेट डॉक्ट्रिन हा दोन खंडांत प्रसिद्ध झालेला ग्रंथ त्यांच्याकडे परीक्षणार्थ आला (१८८९). त्यांच्या प्रभावाने त्यांनी ब्लाव्हॅट्स्की यांचे शिष्यत्व पत्कारले आणि सोसायटीचे सभासदत्व स्वीकारून त्या पुन्हा आस्तिक बनल्या. १८९३ साली त्यांनी अमेरिकेस भेट दिली आणि तेथे त्यांनी शिकागोच्या सर्वधर्मपरिषदेत अत्यंत प्रभावी भाषण करून र्शोत्यांची हृदये हेलावून सोडली. त्या १८९३ साली भारतात आल्या आणि पुढे आयुष्याच्या अखेरपर्यंत त्या भारतातच राहिल्या. येथे त्यांनी प्रथम धर्म, शिक्षण व समाजसुधारणा या क्षेत्रांकडे लक्ष दिले. त्यांनी हिंदू धर्म व संस्कृतीचे सखोल अध्ययन केले. आपण पूर्वजन्मी हिंदू होतो आणि या जन्मातही जन्माने नाही, तरी र्शद्धेने हिंदू आहोत, असे त्या मानू लागल्या. त्यांनी भारतभर प्रवास करून रामायण, महाभारत, उपनिषदे आदींवर अनेक व्याख्याने दिली. १९0५मध्ये त्यांनी गीतेचे इंग्रजीत भाषांतर केले .

   

स्वामी रामानंद तीर्थ

स्वामी रामानंद तीर्थ (व्यंकटेश भगवानराव खेडगीकर) यांचा जन्म ३ ऑक्टोबर १९0३ रोजी झाला. संन्यासी व हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे नेतृत्व करणारे चळवळकर्ते होते. त्यांचा जन्म विजापूर जिल्हय़ातील सिंदगी या ठिकाणी झाला. त्यांचे शिक्षण सोलापूर येथील सरकारी शाळेत झाले. उस्मानाबाद जिल्हय़ातील हिप्परगा या गावी गुरुकुलात ते कार्यरत होते. १९३0 मध्ये स्वामी नारायण तीर्थ यांनी रामानंदांना दीक्षा दिली व ते स्वामी रामानंद तीर्थ झाले. अंबेजोगाई या ठिकाणी त्यांनी योगेश्‍वरी नूतन विद्यालयाचे नूतनीकरण केले.
हैदराबाद येथील निजामाचा सेनापती कासीम रझवी याच्या 'रझाकार' या दहशतवादी संघटनेने मराठवाड्यातील हिंदू जनतेवर अत्याचार सुरू केले होते. याचा विरोध करणे आवश्यक झाले होते. यासाठी काम करणार्‍या महाराष्ट्र परिषदेचे चिटणीस म्हणून स्वामी काम पाहत होते. यासाठीची चळवळ अनेक वर्षे चालली होती. २७ ऑक्टोबर १९३८ रोजी स्वामी रामानंद सत्याग्रहासाठी कार्यकर्त्यांसह हैदराबाद शहरातील राजमार्गावर आले. त्यांना अटक झाली होती. ते सुमारे चार महिने कारावासात होते. यानंतर निजामाने जातीय दंगली घडवल्या व जनतेवर अत्याचारांना प्रोत्साहन दिले. सुटका होताच स्वामीजींनी भूमिगतपणे काम केले. याचा निजामाला इतका त्रास झाला की त्याने तडजोड मान्य करून संघटनेवरील (कोणत्या?) बंदी हटवली.
हैदराबाद संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करून लोकशाही मान्य करा व संस्थानाचे स्वतंत्र अस्तित्व संपवा, अशी हाक रामानंद तीर्थ यांनी सरकार आणि जनतेला दिली. याचा परिणाम होऊन लोक या संग्रामात सामील झाले. मुक्तिसंग्रामात आपल्या विचारांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी 'व्हिजन' हे साप्ताहिक चालवले होते. यामार्फत ते भारतीय स्वातंत्र्याच्या विचारांचा प्रचार करत. माणिकराव पहाडे, शंकरभाई पटेल, बाबासाहेब परांजपे. गोविंदभाई र्शॉफ हे तरुण स्वातंत्र्यसैनिक होते. हैदराबाद मुक्तिसंग्राम चळवळीत स्वामी रामानंद तीर्थ यांचे ते प्रमुख सर्मथक होते. तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी सशस्त्र पोलिस कारवाई करून निजामाला शरण आणले. हैदराबाद संस्थान १७ सप्टेंबर १९४८ रोजी भारतात विलीन झाले. लोकसभेच्या लागोपाठच्या दोन निवडणुकांत गुलबर्गा व औरंगाबाद येथून रामानंद तीर्थ हे निवडून गेले होते. १९७२ साली त्यांचे हैदराबाद येथे निधन झाले. एस. एम. जोशींनी 'प्रादेशिक ऐक्य व लोकशाहीसाठी स्वामीजींचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहावे लागेल' असा त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. स्वामींच्या स्मृतिप्रीत्यर्थ नांदेड येथील विद्यापीठाला स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ असे नाव दिले आहे. व्यंकटराव डावळे प्रतिष्ठान व राज्य सरकार यांच्यातर्फे अंबाजोगाई येथील महाविद्यालयाला स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय असे नाव दिले आहे.

महात्मा गांधी

राष्ट्रपिता महात्मा गांधी (२ ऑक्टोबर १८६९ मृत्यू ३0 जानेवारी १९४८) ऊर्फ मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म गुजरातमधील पोरबंदर येथे एका सुसंस्कृत व प्रतिष्ठित कुटुंबात झाला. गांधी हे वैष्णव वाणी. कस्तुरबा आणि मोहनदास यांचे वय सारखेच होते. या दोघांचा विवाह वयाच्या तेराव्या वर्षी झाला. १८८७ साली ते मॅट्रिकच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. १८८५ मध्येच करमचंद यांचे निधन झाले. त्यांना बॅरिस्टर होण्याकरिता इंग्लंडला पाठवावे असे वडील बंधूंनी ठरविले. ते १८८८ मध्ये इंग्लंडला गेले. यावेळी कस्तुरबाई गरोदर होत्या. अठराव्या वर्षीच हिरालालचा जन्म झाला. रामदास व देवदास नंतर काही वर्षांच्या अंतराने झाले. इंग्लंडमध्ये असताना गांधींनी शाकाहारी मंडळ स्थापन केले. ते १0 जून १८९१ रोजी बॅरिस्टर झाले. गांधीजी आफ्रिकेत २0 वर्षे राहिले. दक्षिण आफ्रिकेत प्रसिद्ध तत्त्वज्ञ, सेनापती व सत्ताधारी जनरल स्मट्स यांच्याशीच गांधींनी अनेक वेळा सत्याग्रही संग्राम केला. गांधीजींनी स्वत: अनेक वेळा असा अपमान व मारहाण सोसली. हिंदू लोकांच्या काही सवलती काढून घेणारे अपमानकारक बिल तेथील विधिमंडळात १८९४ मध्ये आले. गांधी त्यावेळी आफ्रिका सोडून स्वदेशी परतणार होते. परंतु, आयत्या वेळी परत येण्याचा बेत रहित करून तेथेच राहून लढा देण्याचा संकल्प त्यांनी सोडला. नाताळ इंडियन काँग्रेस नावाची संस्था त्याकरिता स्थापन केली. 'इंडियन ओपिनियन' हे वृत्तपत्र सुरू केले. १८९६ च्या जून महिन्यात गांधीजी भारतीयांना तेथील परिस्थिती समजावून सांगण्यासाठी तात्पुरते भारतास परतले. काही महिने भारतात राहून येथील वृत्तपत्रांत तेथील परिस्थितीबद्दल हृदयविदारक हकिकती त्यांनी प्रसिद्ध केल्या व दक्षिण आफ्रिकेत ते पुन्हा गेले. बोअर युद्धानंतर गांधींनी भारताला भेट दिली. १९0३ साली गांधी आफ्रिकेस पुन्हा परत गेले. तेथील दडपशाहीच्या कायद्याविरुद्ध त्यांनी सत्याग्रहाची चळवळ उभारली. काळ्या कायद्याविरुद्ध कायदेभंगाच्या चळवळीला १९0७ मध्ये उग्र रूप आले. १९0८ मध्ये शेकडो हिंदी लोकांना कारावासाच्या शिक्षा झाल्या. १९१२ साली गोपाळकृष्ण गोखले हे जनरल स्मट्सने काळा कायदा रद्द करावा, म्हणून आफ्रिकेत गेले. तेव्हापासून गांधी व गोखले यांचा स्नेह जमला. ९ जानेवारी १९१५ रोजी मुंबईस परत आले. नामदार गोखले यांनी, भारतात गेल्यावर एक वर्षपर्यंत सार्वजनिक चळवळीत न पडता केवळ तटस्थपणे परिस्थिती समजावून घ्या, असे त्यांना बजावून सांगितले होते. अहमदाबाद येथे साबरमती तीरावर २५ मे १९१५ रोजी सत्याग्रहार्शम स्थापन केला. आर्शमात राहणार्‍या एका अस्पृश्यामुळे अहमदाबाद येथील व्यापार्‍यांनी आर्शमास देणग्या देण्याचे बंद केले. आर्शम बंद पडण्याची वेळ आली. परंतु, गांधींनी अस्पृश्यांना आर्शमात ठेवण्याचा आग्रह चालू ठेवला. गांधींनी १९१७ मध्ये शेतकर्‍यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी बिहारमधील चंपारण्यास भेट दिली. पहिल्या जागतिक युद्धात भारतीयांनी मित्र राष्ट्रांना मदत करावी, म्हणून १९१७ साली व्हाइसरॉय लॉर्ड चेम्सफर्ड याने भारतीयांची परिषद बोलाविली. त्या परिषदेत गांधींनी हिंदीमध्ये भाषण करून सैन्यभरतीला पाठिंबा दिला. र्जमनांचा पराभव होऊन पहिले जागतिक युद्ध १९१८ साली संपले; ब्रिटन विजयी झाले. ब्रिटिश राज्यकर्त्यांनी मुसलमानांची खिलाफत तोडून तिचे अनेक भाग केले. भारतातील मुसलमान त्यामुळे संपप्त झाले. न्यायमूर्ती रौलट याच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या शिफारशींप्रमाणे दडपशाहीचा कायदा केंद्र सरकारने मंजूर केला. या कायद्याच्या विरुद्ध गांधींनी सत्याग्रहाची चळवळ उभारली. गांधींनी भारतभर दौरा सुरू केला. ६ एप्रिल १९१९ रोजी देशभर हरताळ पाळण्यात आला. हिंदू व मुसलमान यांच्यामध्ये प्रचंड एकजूट घडून आली. सरकारने पंजाबमध्ये शिरण्याची गांधींना मनाई केली.

Friday 28 September 2018

कविता महाजन

मृद्ध लेखणीच्या सहाय्याने आपले जगणे, अनुभव जगासमोर मांडणार्‍या मराठीतील संवेदनशील लेखिका आणि कवयित्री म्हणून, कविता महाजन यांची ओळख होती. त्यांनी आपली ओळख पुढे र्मयादीत न ठेवता आपल्या लेखणीतून त्यांनी स्त्रीयांच्या विविध प्रश्नांना नेहमीच वाचा फोडली. लेखन करत असतानाच त्यांनी समाजकार्यही तितक्याच तळमळ3ीने केले. कविता महाजन यांचा जन्म ५ सप्टेंबर १९६७ रोजी नांदेड येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण नांदेडच्या प्रतिभा निकेतन माध्यमिक विद्यालयामध्ये झाले.त्यानंतर नांदेडच्या पीपल्स महाविद्यालयात आणि औरंगाबादच्या शासकीय कला महाविद्यालयात त्यांनी उच्च शिक्षण घेतले. त्यांनी मराठी साहित्य विषयात एम.ए. केले होते. भिन्न आणि कुहू या कादंबर्‍याने कविता महाजन यांना विशेष ओळख मिळाली होती.
कविता महाजन यांचे 'तुटलेले पंख','आग अजून बाकी आहे','आगीशी खेळताना','आबा गोविंदा महाजन-बालसाहित्य आकलन आणि समीक्षा','कुमारी माता'अनुवादित पुस्तक तसेच त्यांचा 'कुहू' हा लेखसंग्रहही खूप गाजला. तसेच 'ग्राफिटीकॉल', 'बकरीचं पिल्लू',' जंगल गोष्टी'पाच पुस्तकांचा संग्रह,'जोयानाचे रंग', त्पुरुष काव्यसंग्रह 'तुटलेले पंख ' भारतीय लेखिका पुस्तक मालिका, हे लेखसंग्रह गाजले. बायकांचे पाय भुतासारखे उलटे असतात. कुठेही जात असले, तरी ते घराकडेच वळतात, कविता महाजन यांच्या गाजलेल्या 'ब्र'या कादंबरीतील हे वाक्य बरंच काही सांगून जाते.२00८ मध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा उत्कृष्ट वाड्मय निर्मितीचा राज्यस्तरीय पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. त्यानंतर कवयित्री बहिणाई पुरस्कार,साहित्य अकादमीचा भाषांतरासाठीचा पुरस्कार, रजई या इस्मत चुगताई यांच्या लघुकथांच्या अनुवादाला २0११साली पुरस्कार मिळाला होता.२0१३ मध्ये मुख्याध्यापिका शशिकलाताई आगाशे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणारा राज्यस्तरीय बालवाड्मय पुरस्कार 'जोयनाचे रंग'या कथासंग्रहासाठी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कविता महाजन यांना गेल्या महिन्याभरापासून फुफ्फुसाचा त्रास जाणवत होता. काही दिवसांपासून न्यूमोनियाने आजारी असल्यामुळे त्यांना बाणेर येथील चेलाराम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रकृतीशी लढतालढता त्यांची अखेर दीपज्योत मालवली. त्यांच्या अचानक जाण्याने एक हरहुन्नरी लेखिका गमावल्याची प्रतिक्रिया साहित्य, कला, समाजविश्‍वातून येत आहे.

हमीद उमर दलवाई

हमीद उमर दलवाई हे मुस्लीम समाजसुधारक व मराठी साहित्यिक होते. समाजसुधारणेच्या उद्देशाने त्यांनी १९७0मध्ये मुस्लीम सत्यशोधक मंडळ स्थापले. समाजाच्या शिक्षणाचा व भाषा माध्यमाचा प्रश्न, मुस्लिमांचे मराठी साहित्य, समाजात आधुनिक विचार प्रण्याचे प्रयत्न अशा अनेक प्रश्नांवर हे सत्यशोधक मंडळ काम करते. दलवाई यांनी १९६६मध्ये सात मुस्लीम महिलांना घेऊन मुंबईतील कौन्सिल हॉलवर मोर्चा काढला. समाजातील साचलेपणा दूर व्हावा, आचार-विचारात उदारता यावी, तसेच प्रबोधनाचे प्रवाह सुरू व्हावेत यासाठी दलवाईंनी आपले आयुष्य वेचले. त्यांच्या शेवटच्या आजारातही त्यांनी स्वस्थ न बसता राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान नावाचे पुस्तक लिहिले.

आजच्या काही ठळक बातम्या

1)राम-लक्ष्मण यांना यंदाचा लता मंगेशकर पुरस्कार- संगीत क्षेत्रात दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ संगीतकार विजय पाटील ऊर्फ राम-लक्ष्मण यांना यंदाचा 'लता मंगेशकर पुरस्कार' जाहीर झाला आहे.
५ लाख रुपये, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.  राम-लक्ष्मण यांनी मराठीसह हिंदीतही आपल्या संगीताची वेगळी छाप सोडली आहे. त्यांनी मराठीत 'पांडू हवालदार' या सिनेमापासून संगीत द्यायला सुरुवात केली होती. १९७६ पर्यंत राम कदम व विजय पाटील ही जोडी 'राम-लक्ष्मण' या नावाने संगीत द्यायचे. १९७७ मध्ये राम कदम यांचे निधन झाल्यानंतरही विजय पाटील यांनी 'राम-लक्ष्मण' या नावानेच संगीत देणे सुरू ठेवले. 'हम से बढकर कौन' चित्रपटातले 'देवा हो देवा गणपती देवा' या गाण्याने त्यांना प्रसिद्धी मिळाली. राम-लक्ष्मण यांनी देवानंद, मनमोहन देसाई, महेश भट्ट, दादा कोंडके यांच्यासारख्या दिग्गजांबरोबर काम केले आहे. 'मैने प्यार किया' या सिनेमातील उत्कृष्ट संगीत दिग्दर्शनाबद्दल त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी पत्थर के फूल, सातवा आसमान, हम आपके है कौन, हम साथ साथ है आदी सिनेमांना संगीत दिले होते. त्यांनी आजवर ७५ हिंदी, मराठी आणि भोजपुरी सिनेमांना संगीत दिले आहे. अंजनीच्या सुता तुला, खेळ कुणाला दैवाचा कळला, जीवन गाणे गातच रहावे, झाल्या तिन्ही सांजा करून, पिकलं जांभूळ तोडू नका या त्यांच्या गाण्यांनी मराठी मनावर अधिराज्य निर्माण केलेले आहे.

2)शबरीमाला मंदिरात महिलांनाही प्रवेश- केरळमधील शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश महिलांना प्रवेशबंदी करणे घटनाबाह्य असल्याचे सांगत सुप्रीम कोर्टाने सबरीमला मंदिरात महिलांनाही पूजा करण्याचा अधिकार दिला आहे. शबरीमला हे केरळमधील प्रसिद्ध मंदिर असून या मंदिरात १0 ते ५0 वर्षांच्या महिलांना प्रवेशबंदी होती. रजोनवृत्ती झालेल्या महिलांना प्रवेश दिला जातो. याविरोधात इंडियन यंग लॉयर्स असोसिएशनने महिलांच्या प्रवेशबंदीविरोधात सुप्रीम कोर्टात २00६ मध्ये याचिका दाखल केली होती. गेल्या १२ वर्षांपासून हे प्रकरण प्रलंबित होते. अखेर शुक्रवारी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश दीपक मिर्शा यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाने निर्णय दिला. घटनापीठात न्या. आर. एफ. नरिमन, न्या. ए. एम. खानविलकर, न्या. डी. वाय. चंद्रचूड, न्या. इंदू मल्होत्रा यांचा समावेश होता. चार विरुद्ध एक अशा फरकाने सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला.
शबरीमला हे केरळमधील प्रसिद्ध मंदिर असून या मंदिरात महिलांना प्रवेशबंदी आहे. रजोनवृत्ती झालेल्या महिलांना प्रवेश दिला जातो. इंडियन यंग लॉयर्स असोसिएशनने महिलांच्या प्रवेशबंदीविरोधात सुप्रीम कोर्टात २00६ मध्ये याचिका दाखल केली होती. गेल्या १२ वर्षांपासून हे प्रकरण प्रलंबित आहे. नोव्हेंबर २0१६ मध्ये केरळ सरकारने सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केले होते. शबरीमला मंदिरात सर्व वयोगटाच्या महिलांना प्रवेश द्यावा, असे केरळ सरकारने प्रतिज्ञापत्रात म्हटले होते. विशेष म्हणजे डाव्या आघाडीच्या सरकारनेच २00७ साली दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात बंदीच्या सर्मथनार्थ भूमिका मांडली होती. यावरून सुप्रीम कोर्टानेही केरळ सरकारला फटकारले होते. मंदिरात प्रवेशाला आमचा पाठिंबा आहे, असे केरळ सरकारने न्यायालयात सांगितले. तुम्ही प्रतिज्ञापत्र वेळोवेळी बदलत आहात, हे योग्य नाही, असे ताशेरे सुप्रीम कोर्टाने केरळ सरकारवर ओढले.
गेल्या वर्षी १३ ऑक्टोबरला सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण घटनापीठाकडे वर्ग केले होते. महिलांना मंदिरात बंदी करण्याच्या मुद्द्याची कायदेशीरता तपासण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते.मंदिर व्यवस्थापनाच्या दाव्यानुसार गेल्या १५00 वर्षांपासून या मंदिरात महिलांना प्रवेशबंदी असल्याचे सांगण्यात आले. जुलै महिन्यात सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने महत्त्वपूर्ण मत मांडले होते. या मंदिरात पुरुषांच्या बरोबरीने महिलांनाही प्रार्थनेचा समान अधिकार असून तो कुठल्याही कायद्यावर अवलंबून असता कामा नये, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले होते. तसे करण्यासाठी कुठल्याही कायद्यावर विसंबून राहण्याची गरज नाही, असे मत न्या. चंद्रचूड यांनी म्हटले होते.

3)  फिल्मफेअरमध्ये 'रिंगण'ने पटकावले पाच पुरस्कार- राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पुरस्कारास पात्र अशा दर्जेदार चित्रपटांची निर्मिती आणि प्रस्तुती करणार्‍या विधि कासलीवाल यांच्या लॅन्डमार्क फिल्म्सच्या शिरपेचात, आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. कारण, यंदाच्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात लॅन्डमार्कच्या रिंगण या सिनेमाने तब्बल पाच सर्वोत्कृष्ट पुरस्कारांवर आपले नाव कोरले. ज्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा क्रिटीक्स अवॉर्ड शशांक शेंडे यांना देण्यात आला असून, साहील जोशीला सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा आणि दिग्दर्शकीय पदार्पणासाठी व कथेसाठी मकरंद माने यांना गौरविण्यात आले. तसेच आदर्श शिंदेला सर्वोत्कृष्ट पार्श्‍वगायकासाठी सन्मानित करण्यात आले.
नुकत्याच पार पडलेल्या या पुरस्कार सोहळ्यातील अंतिम नामांकन यादीत लॅन्डमार्क फील्म्सला एकूण १६ नामांकने प्राप्त झाली होती. ज्यात गच्ची या सिनेमाच्या दोन नामांकनाचादेखील समावेश आहे. गच्ची सिनेमातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी प्रिया बापटला आणि सर्वोत्कृष्ट ध्वनीमुद्रणसाठी मनोज मोचेमाडकर यांना नामांकन प्राप्त झाले होते.
रिंगण सिनेमाला १४ नामांकने जाहीर झाली होती. ज्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट (क्रिटिक्स), सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठी कल्याणी मुळे, सर्वोत्कृष्ट गीतलेखनासाठी दासू वैद्य आणि वैभव देशमुख, सर्वोत्कृष्ट पार्श्‍वगायकासाठी अजय गोगावले, सर्वोत्कृष्ट छायाचित्रकारासाठी अभिजित अब्दे, सर्वोत्कृष्ट संवादासाठी मकरंद माने, सर्वोत्कृष्ट पार्श्‍वसंगीतासाठी गांधार आणि सर्वोत्कृष्ट ध्वनीमुद्रणसाठी महावीर सब्बनवर यांचा समावेश होता.
अश्याप्रकारे, विविध पुरस्कार सोहळ्यात दजेर्दार कामगिरी करणार्‍या लॅन्डमार्क फिल्मच्या चित्रपटांची मालिका अशीच पुढे कायम राहणार आहे. लॅन्डमार्क संस्थेअंतर्गत सादर होणार्‍या या आशयसमृध्द चित्रपटांच्या यादीत आता नशीबवान हा सिनेमादेखील नव्याने दाखल झाला आहे. अमोल वसंत गोळे यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटामध्ये भाऊ कदमची प्रमुख भूमिका असणार आहे. उदय प्रकाश लिखित दिल्ली कि दिवार कथेवर आधारित असलेला हा चित्रपट ११ जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अभिलाष टॉमी

भारतीय नौदलातील जिगरबाज कमांडर अभिलाष टॉमी यांनी तब्बल तीन दिवस समुद्रात भरकटले असतानाही नौकेत एकट्याने बचाव करून आपल्या धैर्याचे प्रदर्शन केले. ते सुखरुप परतल्यामुळे त्यांच्याविषयी भारतीयांना आनंद झालाय सोबतच त्यांनी घालून दिलेला आदर्श भविष्यात संघर्ष करण्यासाठी बळ देणारा ठरणार आहे. त्यांच्या बचावासाठी प्रयत्न करणारे प्रशंसेस पात्र आहे.
गोल्डन ग्लोब रेस या पृथ्वी पालथी घालणार्‍या सागरी नौकानयन स्पधेर्ला फ्रेंच किनार्‍याजवळ एक जुलैला सुरूवात झाली तेव्हा १३ देशांचे १८ खलाशी उतरले होते. भारतीय नौदलातील जिगरबाज कमांडर अभिलाष टॉमी हे त्यातले एक. मात्र, एव्हाना सात खलाशांनी या स्पधेर्तून विविध कारणांनी माघार घेतली. अभिलाष तिसर्‍या क्रमांकावरून आगेकूच करत असताना ऑस्ट्रेलियाच्या पर्थपासून १९00 सागरी मैल अंतरावर त्यांची ह्यतुरिया ही नौका पाच दिवसांपूर्वी वादळात सापडली. ताशी १३0 किलोमीटर वेगाने वारे वाहात होते. लाटांची उंची होती दहा मीटरहून जास्त. तरीही याआधी एकट्याने नॉनस्टॉप पृथ्वी प्रदक्षिणा करणार्‍या अभिलाष यांनी जिद्द सोडली नाही. पण अचानक त्यांच्या नौकेची डोलकाठी तुटली तिचा जबर फटका बसून अभिलाष जायबंदी झाले. पाठीला मार लागला. त्यातच सॅटेलाइट फोनही बंद पडला. मग टेक्स्टिंग युनिट वापरून त्यांनी या संकटाची कल्पना दिली. भराभर सगळीकडे संदेश गेला. पण प्रत्यक्ष मदत मिळेपयर्ंत अभिलाष यांनी ७२ तास जिद्दीने तग धरला. खोल समुद्रात मासेमारी करणारे ओसायरिस हे फ्रेंच जहाज अभिलाष यांच्या त्यातल्या त्यात जवळ होते. या जहाजावर अभिलाषना घेण्यात आले. तोवर, भारतीय नौदल आणि इतर देशांनी त्यांच्या मदतीसाठी मोहीम सुरू केली. याही स्थितीत अभिलाष अतुलनीय धैर्य दाखवत मी ठीक आहे, असे संदेश पाठवत राहिले. ऑस्ट्रेलियन जहाजावर उपचार होऊन ते आता एका बेटावरच्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. शिडाच्या जहाजातून पृथ्वीप्रदक्षिणा करणारे पहिले भारतीय कॅप्टन दोंदे यांचे अभिलाष हे चेले. त्यामुळे, दोंदे यांनाही अभिलाष यांच्या जिद्दीची खात्री होती. अभिलाष यांनी सुखरुप परतावे यासाठी केलेली प्रार्थना फळास आली आहे. शिवाय या निमित्ताने भारतीय नौदलाचे जवान जिगरबाज आहेत याची खात्रीही पटली. त्यांच्या परतण्याचा प्रवास जितका थरारक आहे. तितकाच तो रंजकही आहे.

भगतसिंह

भगत सिंग महान क्रांतिकारक होते. त्यांचा जन्म १९0७ साली तत्कालीन पंजाब प्रांतातील ल्यालपूर जिल्ह्यातील बंगा गावात झाला. ९ सप्टेंबर १९२५ रोजी भगतसिंगांच्या पुढाकाराने व आग्रहाने क्रांतिकारकांच्या गुप्त संघटनेचे नाव हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन असे ठेवण्यात आले. असोसिएशनचे कार्य समाजप्रबोधन, माहितीपत्रके, साहित्य सामुग्रीची जमवाजमव, भूमिगतांना आर्शय देणे होते. हुतात्मा चंद्रशेखर आझाद हे मुख्य समन्वयक व सेनेचे मुख्य सेनापती तर भगतसिंग यांच्यावर संघटनेचे समन्वयक व दोहोंचे सदस्य व नियंत्रक अशी कामगिरी सोपविली गेली. डिसेंबर १९२८ मध्ये, भगत सिंग आणि त्याचे सहकारी, शिवराम राजगुरू यांनी २१ वर्षीय ब्रिटिश पोलिस अधिकारी जॉन साँडर्सला लाहोर, ब्रिटिश भारत येथे गोळ्या घालून ठार मारले. जेम्स स्कॉटला ठार मारण्याचा हेतू असताना चुकून साँडर्स बळी पडला. पोलिस अधीक्षक जेम्स स्कॉट याने हिंदुस्थानातील लोकप्रिय राष्ट्रवादी नेते लाला लजपत राय यांच्यावर लाठीचार्जचा आदेश दिल्याने यात त्यांचा मृत्यू झाला.याचा बदला म्हणून भगतसिंगांनी स्कॉटला मारण्याचा बेत केला होता. या कटात चंद्रशेखर आझाद व राजगुरू सहभागी होते. त्यानंतर भगतसिंग व राजगुरू यांचा शोध घेत असल्याचे पाहून चंद्रशेखर आझाद यांनी चानन सिंघ नावाच्या भारतीय पोलिस अधिकार्‍याला मारले.

काही महत्त्वाच्या ठळक घडामोडी


1)पंतप्रधान मोदी ठरले 'चॅम्पियन्स ऑफ अर्थ'-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संयुक्त राष्ट्र संघाने पर्यावरण क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान समजल्या जाणार्‍या 'चॅम्पियन्स ऑफ अर्थ' या पुरस्काराने गौरव केला आहे. 'पॉलिटिकल लीडरशीप' या विभागात त्यांना हा पुरस्कार देण्यात आला असून त्यांच्यासह फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रोन यांनादेखील हा पुरस्कार देण्यात आला आहे.
नरेंद्र मोदींना २0२२ पर्यंत देशात प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद करण्याचा निधार्राबद्दल हा पुरस्कार दिला आहे. केरळमधील कोच्ची आंतरराष्ट्रीय विमानतळालाही पुरस्कार देण्यात आला आहे. अक्षय ऊर्जेच्या दिशेने पावले टाकल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला. पर्यावरणा संदर्भात जागतिक स्तरावर प्रभावी नेतृत्व म्हणून नरेंद्र मोदींनी काम केले आहे.

2)व्याभिचार गुन्हा नव्हे-
व्याभिचार हा गुन्हा ठरवणारे कलम ४९७ रद्द करण्याचा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. पती हा पत्नीचा मालक नसल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. व्यभिचार हा गुन्हा ठरु शकत नाही. पण जर एखाद्या व्यक्तीने जोडीदाराच्या विवाहबाह्य संबंधांमुळे आत्महत्या केली तर ते आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा ठरतो, असे कोर्टाने स्पष्ट केले.
अनिवासी भारतीय असलेले जोसेफ शाइन यांनी वकील सुविदुत सुंदरम यांच्या मार्फत कलम ४९७ च्या वैधतेला आव्हान दिले होते. यात गुन्हेगारी दंडसंहिता कलम १९८(२) चाही समावेश आहे. व्याभिचारात केवळ पुरुषांनाच दोषी ठरवून शिक्षा केली जाते, याबाबत स्त्रियांचाही विचार समान पातळीवर करावा, अशी मागणी त्यांनी केली होती. जानेवारीला सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिर्शा यांच्या तीन सदस्यीय पीठाने ही लोकहिताची याचिका घटनापीठाकडे सुनावणीसाठी दिली होती. १९५४, १९८५ व १९८८ या तीन निकालात कलम ४९७ वैध ठरवण्यात आले होते.
सरन्यायाधीश दीपक मिर्शा यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाने गुरुवारी या याचिकेवर निर्णय दिला. न्या. ए एम खानविलकर, न्या. आर एफ नरिमन, न्या. डी वाय चंद्रचूड, न्या. इंदू मल्होत्रा यांचा घटनापीठात समावेश होता. सुप्रीम कोर्टाने व्याभिचाराला गुन्हा ठरवणारे आयपीसीतील कलम ४९७ रद्द करण्याचा निर्णय दिला. व्याभिचार हा घटस्फोटासाठी कारण म्हणून गृहित धरता येईल, मात्र तो गुन्हा ठरत नसल्याचे कोर्टाने स्पष्ट केले. जगातील बहुतांशी देशांमध्ये व्याभिचाराला गुन्हा ठरवणारे कलम रद्द करण्यात आले. भारतीय दंड विधानातील हे कलमच असंवैधानिक असल्याचे कोर्टाने सांगितलेभादंवि कलम ४९७ नुसार एखाद्या व्यक्तीने दुसर्‍या पुरुषाच्या पत्नीशी त्याच्या संमतीशिवाय लैंगिक संबंध ठेवले तर तो बलात्कार ठरत नाही, तर त्याला व्याभिचाराचा गुन्हा म्हणतात. यात पाच वर्षे तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा होते, पण यात जी स्त्री असे लैंगिक संबंध ठेवते तिला दोषी धरले जात नाही किंवा शिक्षाही दिली जात नाही. यात केवळ विवाहित महिलेशी लैंगिक संबंध ठेवणे हा व्याभिचार ठरतो. विधवा, वेश्या किंवा अविवाहित महिलांना हे कलम लागू होत नाही, असे दिल्ली उच्च न्यायालयाने ब्रिज लाल विरुद्ध राज्य सरकार (१९९६) खटल्यात स्पष्ट केले होते.

3)महाराष्ट्रातील शहरी गरिबांसाठी २२,२६५ घरे मंजूर-
केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत महाराष्ट्रातील शहरी गरिबांसाठी २२,२६५ घरे मंजूर झाली आहेत. देशात एकूण ६ लाख २६ हजार ४८८ घरे मंजूर करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातील विविध शहरांतील गरिबांसाठी २२,२६५ घरे मंजूर करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातील एकूण ४७ प्रकल्पांसाठी ही घरे मंजूर झाली असून त्यासाठी एकूण ७0९.९ कोटी खर्च येणार आहे, पैकी केंद्राकडून ३२८.९ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. राज्यातील भागीदारी तत्त्वानुसार (एएचपी) करण्यात येणार्‍या बांधकामांच्या २७ प्रकल्पांसाठी एकूण १८ हजार ३00 घरे मंजूर झाली असून याकरिता ५0४.८ कोटी खर्च येणार आहे पैकी २७४.५ कोटींचा निधी केंद्र शासनाकडून मंजूर झाला आहे. लाभार्थ्यांकडून वैयक्तिकरित्या करण्यात येणार्‍या बांधकामाच्या (बीएलसी) १७ प्रकल्पांसाठी एकूण २ हजार ९४६ घरे मंजूर झाली असून याकरिता १६९.२ कोटी खर्च येणार आहे, पैकी ४४.२ कोटींचा निधी केंद्र शासनाकडून मंजूर झाला आहे. तसेच, झोपडपट्टी पुनर्विकास कार्यक्रमांतर्गत (आयएसएसआर) राज्यातील ३ प्रकल्पांसाठी एकूण १ हजार १९ घरे मंजूर झाली असून याकरिता ३५.९ कोटी खर्च येणार आहे पैकी १0.२ कोटीचा निधी केंद्राकडून मंजूर झाला आहे. प्रधानमंत्री आवास योजना (शहरी )अंतर्गत आतापर्यंत महाराष्ट्राला २७३ प्रकल्पांसाठी ६ लाख १२ हजार घरे केंद्राकडून मंजूर झाली आहेत.

! साहित्यिकांची टोपणनावे !

■ टोपणनाव --------------- लेखक ■

अनंत फंदी-------शाहीर अनंत घोलप
अनंततनय-------दत्तात्रय अनंत आपटे
अनिरुध्द पुनर्वसू-------नारायण गजानन आठवले
अनिल-------आत्माराम रावजी देशपांडे
अमरशेख-------मेहबूब पठाण
अज्ञातवासी-------दिनकर गंगाधर केळकर
आनंद-------वि.ल.बर्वे
आरती प्रभु-------चिंतामण त्र्यंबक खानोलकर
काव्यविहारी-------धोंडो वासुदेव गद्रे
कुंजविहारी-------हरिहर गुरुनाथ कुलकर्णी
कुमुद-------स.अ.शुक्ल
कुसुमाग्रज-------वि.वा.शिरवाडकर
कृष्णकुमार-------सेतू माधव पगडी
केशवकुमार-------प्र.के. अत्रे
करिश्मा-------न.रा.फाटक
केशवसुत-------कृष्णाजी केशव दामले
गदिमा-------ग.दि.माडगुळकर
गिरीश-------शंकर केशव कानेटकर
ग्रेस-------माणिक शंकर गोडघाटे
गोल्या घुबड-------विष्णुशास्त्री चिपळूणकर
गोविंद-------गोविंद त्र्यंबक दरेकर
गोविंदाग्रज-------राम गणेश गडकरी
चंद्रिका /चंद्रशेखर-------शिवराम महादेव गो-हे
चारुता सागर-------दिनकर दत्तात्रय भोसले
छोटा गंधर्व-------सौदागर नागनाथ गोरे
बालगंधर्व-------नारायणराव राजहंस
जीवन-------संजीवनी मराठे
ठणठणपाल/अलाणे-फलाणे-------जयवंत दळवी
तुकडोजी महाराज-------माणिक बंडोजी ब्रम्हभट्ट
संत तुकाराम-------तुकाराम बोल्होबा अंबिले
तुकाराम शेंगदाणे-------ज्ञानेश्वर नाडकर्णी
दत्त (कवी)-------दत्तत्रय कोंडदेव घाटे
द्या पवार (कवी)-------दगडू मारुती पवार
जागल्या (कथालेखक)-------दगडू मारुती पवार
दक्षकर्ण-------अशोक रानडे
दादुमिया-------दा.वि.नेने
दासोपंत-------दासोपंत दिगंबर देशपांडे
दिवाकर-------शंकर काशिनाथ गर्गे
दिवाकर कृष्ण-------दिवाकर कृष्ण केळकर
धनुर्धारी-------रा.वि.टिकेकर
धुंडिराज-------मो.ग.रांगणेकर
नागेश-------नागेश गणेश नवरे
नाथमाधव-------व्दारकानाथ माधवराव पितके
निशिगंध-------रा.श्री.जोग
नृसिंहाग्रज-------ल.गो.जोशी
पद्मा-------पद्मा विष्णू गोळे
पराशंर-------लक्ष्मणराव सरदेसाई
पी.सावळाराम-------निवृत्ती रावजी पाटील
पुष्पदंत-------प्र.न.जोशी
प्रफुल्लदत्त-------दत्तात्रय विष्णू तेंडोलकर
प्रभाकर (शाहीर)-------प्रभाकर जनार्दन दातार
फडकरी-------पुरूषोत्तम धाक्रस
फरिश्ता-------न. रा. फाटक
बाकीबा-------बाळकृष्ण भगवंत बोरकर
बाबा कदम-------वीरसेन आनंद कदम
बाबुराव अर्नाळकर-------चंद्रकांत सखाराम चव्हाण
बाबुलनाथ-------वि.शा.काळे
बालकवी-------त्र्यंबक बापूजी ठोंबरे
बाळकराम (विनोदासाठी)-------राम गणेश गडकरी
बी-------नारायण मुरलीधर गुप्ते
बी रघुनाथ-------भगवान रघुनाथ कुलकर्णी
बंधुमाधव-------बंधु माधव मोडक (कांबळे)
भटक्या-------प्रमोद नवलकर
भाऊ पाध्ये-------प्रभाकर नारायण पाध्ये
भानुदास-------कृष्णाजी विनायक पोटे
भानुदास रोहेकर-------लीला भागवत
भालचंद्र नेमाडे-------भागवत वना नेमाडे
मकरंद-------बा.सी.मर्ढेकर
मंगलमूर्ती-------मो.ग.रांगणेकर
मनमोहन-------गोपाळ नरहर नातू
लोककवी श्री मनमोहन-------मीनाक्षी दादरकर
माधव ज्युलियन-------माधव त्र्यंबक पटवर्धन
माधवानुज-------डॉ. काशिनाथ हरि मोडक
मामा वरेरकर-------भार्गव विट्ठल वरेरकर
मधू दारूवाला-------म.पा.भावे
मिलिंद माधव-------कॅ. मा कृ. शिंदे
मुक्ताबाई (संत)-------मुक्ताबाई विठ्ठल कुलकर्णी
मोरोपंत-------मोरेश्वर रामचंद्र पराडकर
मंडणमित्र-------द.पा.खंबिरे
यशवंत-------यशवंत दिनकर पेंढारकर
यशवंत दत्त-------यशवंत दत्ताजी महाडिक
रघुनाथ पंडित-------रघुनाथ चंदावरकर
रमाकांत नागावकर(गंधर्व)-------बळवंत जनार्दन करंदीकर
रसगंगाधर-------गंगाधर कुलकर्णी
राजा ठकार-------नारायण गजानन आठवले
राजा मंगळवेढेकर-------वसंत नारायण मंगळवेढेकर
राधारमण-------कृष्ण पांडुरंग लिमये
रा. म. शास्त्री-------वि.ग कानिटकर
रूप-------प्रल्हाद वडेर
रे. टिळक-------नारायण वामन टिळक
लता जिंतूरकर-------लक्ष्मीकांत तांबोळी
लक्ष्मीनंदन-------देवदत्त टिळक
लोकहितवादी-------गोपाळ हरि देशमुख
वनमाळी-------वा.गो.मायदेव
वसंत बापट-------विश्वनाथ वामन बापट
वसंत सबनीस-------रघुनाथ दामोदर सबनीस
वामन पंडित-------वामन नरहर शेखे
विजय मराठे-------ना.वि.काकतकर
विंदा करंदीकर-------गोविंद विनायक करंदीकर
विनायक-------विनायक जनार्दन करंदीकर
विनोबा-------विनायक नरहर भावे
विभावरी शिरुरकर-------मालतीबाई विश्राम बेडेकर
विष्णुदास-------नरहर सदाशिव जोशी
वशा-------वसंत हजरनीस
विष्णुबुवा ब्रम्हचारी-------विष्णु भिकाजी गोखले

Wednesday 26 September 2018

सलग सातव्यांदा मुकेश अंबानीच सर्वाधिक श्रीमंत


भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखल्या जाणार्या मुकेश अंबानी यांनी मागील वर्षभराच्या कालावधीमध्ये दिवसाला 300 कोटी कमावले आहेत. तर कंपनीचे शेअर 48 टक्क्यांनी वाढल्याने सलग सातव्या वर्षी ते देशातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. वित्तीय क्षेत्रातील कंपनी असणार्या ब्रिटनमधील बार्कलेज हूरून या वित्तीय क्षेत्रात कार्यरत असणार्या कंपनीने 2018 मधील भारतातील श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. याच यादीबरोबर जाहीर केलेल्या अहवालात त्यांनी मुकेश अंबानींच्या संपत्तीबद्दलचा तपशीलही दिला आहे. या अहवालानुसार रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष असणार्या मुकेश अंबानींची एकूण संपत्ती 3 लाख 71 हजार कोटी इतकी आहे. एवढेच नव्हेत तर भारतातील श्रीमंत व्यक्तींच्या या यादीमध्ये मुकेश अंबानींच्या खालोखाल असणार्या दुसर्या, तिसर्या आणि चौथ्या क्रमांकावरील व्यक्तींची संपत्ती एकत्र केली तरी ती अंबानींच्या संपत्तीपेक्षा कमीच आहे. श्रीमंत व्यक्तींच्या यादीत एस. पी. हिंदूजा आणि परिवार (1 लाख 59 हजार कोटी), एल. एन. मित्तल आणि परिवार (1 लाख 14 हजार 500 कोटी) आणि अझीम प्रेमजी (96 हजार 100 कोटी) या तीन उद्योजकांचा क्रमांक लागतो. तर मागील वर्षी दुसर्या स्थानावर असणार्या दिलीप सांघवी यांच्या संपत्तीमध्ये घट झाल्याचे दिसून आले आहे. या वर्षी सांघवी हे 89 हजार 700 कोटींच्या एकूण संपत्तीसहीत या यादीत पाचव्या स्थानी आहेत. या यादीत सहाव्या स्थानी कोटक महिंद्रा बँकचे उदय कोटक आहेत. त्यांची एकूण संपत्ती 78 हजार 600 कोटी इतकी आहे. त्याखालोखाल सातव्या क्रमांकावर सायरस पुनावाला (73 हजार कोटी), गौतम अदानी आणि परिवार (71 हजार 200 कोटी), सायरस मिस्त्री आणि शापूर मिस्त्री हे 69 हजार 400 कोटींच्या संपत्तीसहीत संयुक्तरित्या नवव्या स्थानावर आहे.

2016 मध्ये हृदयविकाराने 1.7 दशलक्ष नागरिकांचा मृत्यू


हृदयविकाराने भारतात मृत्यू ओढवण्याचे प्रमाण आजही मोठे आहे. ग्लोबल बर्डन ऑफ डिसीजच्या अहवालानुसार, 2016 मध्ये हृदयविकाराने 1.7 दशलक्ष भारतीयांचा मृत्यू झाला आहे. जागतिक हृदय दिनाच्या (29 सप्टेंबर) निमित्ताने जागतिक आरोग्य संघटनेने हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या विकाराचे प्रमाण चिंताजनकरित्या वाढत असल्याच्या मुद्द्याकडे लक्ष वेधले आहे. याबाबत असलेले गैरसमज आणि भीती दूर व्हावी यासाठी जनजागृती महत्त्वाची आहे. ’माय हार्ट, फॉर युवर हार्टही यंदाच्या जागतिक हृदय दिनाची मुख्य संकल्पना आहे. त्यामुळेच हृदयविकाराच्या वाढत्या प्रमाणाला आळा घालण्याच्या दृष्टीने वर्षभर विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. कार्डीओव्हस्क्यूलर डिसीज (सीव्हीडी) म्हणजेच हृदयाशी निगडीत आजार. यात हृदयविकाराचा झटका आणि मेंदूच्या रक्तवाहिन्यांसबंधी विकार हे सार्वत्रिक आढळतात. बदलती जीवनशैली, धूम्रपान, मद्यपान, अनारोग्यकारक आहार आणि शारीरिक व्यायामचा अभाव ही सीव्हीडीचे प्रमाण सार्वत्रिक होण्यामागची मुख्य कारणे आहेत.

२0 टक्के महिलांनाही तंबाखूचे व्यसन

अनेक आजाराला आमंत्रण देणार्‍या तंबाखू सेवनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून स्त्री पुरुष यांच्यामध्ये तंबाखू सेवनाचे प्रमाण पाहिले तर भारतात ४८ टक्के पुरुष तर २0 टक्के स्त्रिया तंबाखूचे सेवन करीत असल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालावरुन निदर्शनास येते.  तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे हृदयरोग, फुफ्फुसाचे आजार, कर्करोग यासह अनेक गंभीर आजाराचे प्रमाण वाढत आहे. या पदार्थाच्या सेवनामुळे शरीरावर होणार्‍या दुष्परिणामाची माहिती शेवटच्या व्यक्तीपयर्ंत पोहचविण्यासाठी आरोग्य विभागामार्फत ही मोहिम हाती घेण्यात आली आहे. आरोग्य विभागाने केलेल्या पाहणीत भारतात तंबाखूचे सेवन करणारे ४८ टक्के पुरुष आहेत. यात धुम्रपान करणारे १५ टक्के, धुम्रपान आणि धुम्ररहित तंबाखूचे सेवन करणारे ५ टक्के तर धुम्ररहित तंबाखू पदार्थाचे सेवन करणारे २४ टक्के पुरुष आहेत. हे प्रमाण महिलांमध्ये कमी असले तरी चिंताजनक आहेत. धुम्रपान करणार्‍यांमध्ये महिलांचे प्रमाण १ टक्का, धुम्रपान आणि धुम्ररहित तंबाखूचे सेवन करणार्‍या महिला २ टक्के तर धुम्ररहित तंबाखू पदार्थाचे सेवन करणार्‍या महिलांचे प्रमाण १७ टक्के आहे. केसांना दुर्गंधी, तोंडाची दुगर्ंधी, तंबाखूजन्य पदार्थ सेवनामुळे दात सडतात, हिरड्यांना इजा होऊन दात निकामी होतात. त्यांची मजबुती नष्ट होते. दातांवर चॉकलेटी-पिवळे डाग पडतात, वास घेण्याची क्षमता कमी होते, चेहर्‍यावर सुरकुत्या पडतात. शरीरात अशक्तपणा जाणवतो, हाडे ठिसूळ होतात. रोगप्रतिकारक शक्यता कमी होऊ लागते. डोळ्यामध्ये जळजळ होते, डोळ्यातून पाणी येते, डोळ्याभोवती काळी वतरुळे येतात. निकोटीनच्या प्रभावामुळे मेंदूचे कार्यावर विपरित परिणाम होते. विचार करण्याची क्षमता कमी होते. चित्त एकाग्र करणे कठीण जाते. तंबाखूमुळे तोंड, स्वरयंत्र, फुफ्फुस, गळा, अन्ननलिका, मूत्राशय मूत्रपिंड, नाक, पोट, गर्भाशय मुख्याचा कॅन्सर होतो. गॅगरीन, क्षयरोग, दमा, हृदयविकार, उच्च रक्तदाब, लकवा, मधूमेह, मोतीबिंदू, पुरुषांच्या शुक्राणूंची संख्या कमी होत जाते व पुरुष नपूंसक बनतो. ज्या स्त्रिया तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करतात त्यांची प्रजनन शक्ती कमी होते. स्त्रियांमध्ये वंध्यत्व: निर्माण होते.
आरोग्यसंपन्न जीवन, शारीरिक क्षमतेत वृध्दी व वृध्दत्वाची लक्षणे कमी होतात. आत्मविश्‍वासात वाढ, व्यसन आणि उपचारावर होणार्‍या खर्चाची बचत, घरातील सदस्य आणि आजूबाजूच्या मित्रपरिवारास, पॅसिव्ह स्मोकिंगमुळे होणार्‍या आजाराचा धोका कमी होतो. आपले कुटूंब आनंदी बनते, पर्यावरण आणि राष्ट्रीय संपत्तीचे संरक्षण होते.

डॉ.रंगनाथन

शियाळि रामामृत रंगनाथन हे भारतीय गणितज्ञ आणि पुस्तकालयतज्ञ होते. भारतीयांमध्ये वाचनसंस्कृती अधिकाधिक रुजावी यासाठी त्यांनी ग्रंथालयशास्त्र आणि त्याच्या विकासात मोलाचे योगदान दिले. त्यांचा जन्म मद्रास प्रांतातील (सध्याचे चेन्नई) तंजावर जिल्ह्यातील शियाली या छोट्याशा गावात १२ ऑगस्ट १८९२ साली झाला. त्याचे प्राथमिक शिक्षण शियाली येथील हिंदू हायस्कूलमध्ये झाले. मद्रास येथील ख्रिश्‍चन कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन इंग्रजी विषयात बी.ए.ची पदवी प्राप्त केली. अध्यापनशास्त्राची एल. टी. परीक्षा उत्तीर्ण केली आणि गणिताचे प्राध्यापक झाले. नंतर प्राध्यापकाची नोकरी सोडून ते मद्रास विद्यापीठात ग्रंथपाल म्हणून काम पाहू लागले.ग्रंथालय शास्त्राच्या शिक्षणाकरिता मद्रास विद्यापीठाने आपल्या स्वखर्चाने त्यांना स्कूल ऑफ लायब्ररीयनशिपसाठी लंडनला पाठविले होते. तेथील एक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करून ते पुन्हा मायदेशी परतले. सार्वजनिक ग्रंथालयाची गरज ओळखून ३0 जानेवारी १९२८ रोजी त्यांनी मद्रास ग्रंथालय संघाची स्थापना केली. नंतर ग्रंथालयांची झपाट्याने प्रगती झाली. सुसंस्कृत समाजनिर्मितीसाठी शालेय शिक्षणासोबतच निरंतर शिक्षणदेखील किती आवश्यक असते, याची महत्त्व डॉ. रंगनाथन यांनी सर्वप्रथम पटवून दिले. त्याकरिता ग्रंथालयांचा विकास, प्रसार होऊन देशातील सर्वसामान्याना ज्ञानाची कवाडं विनामूल्य खुली करून द्यायला हवी, यासोबत वाचनसंस्कृती रुजवण्यासाठी जनतेला करण्याकरिता प्रवृत्त केले पाहिजे, हा विचार त्यांनीच सर्वप्रथम देशात रुजवला.

वाढवा सामान्य ज्ञान

१) 'वन लाइफ' चे लेखक कोण?
२)'विधवा विवाहोत्तेजक मंडळा'चे स्थापना वर्ष कोणते?
३) रशियाच्या विमान वाहतुकीचे नाव काय?
४) जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते?
५) 'एफबीआय' चे विस्तारित रूप कोणते?

उत्तर : १) ख्रिस्टीन बर्नाड २) १८९३ ३) एरोफ्लोट ४) सहारा, उ.आफ्रिका ५) फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेिस्टगेशन

१) नरनाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
२) होल्गा, लेना, अंगारा, दवना, कामा या नद्या कोणत्या देशात आहेत?
३) माली या देशात कोणती शासनपद्धती अस्तित्वात आहे?
४) ऑस्ट्रिया या देशामध्ये कोणती भाषा बोलली जाते?
५) लोलकातून प्रकाशकिरण जात असताना कोणती क्रिया घडते?


उत्तर : १) अकोला २) रशिया ३) राष्ट्रपती शासनपद्धती ४) र्जमन ५) रंगांचे विकिरण

रक्तदान

रक्तदान हे श्रेष्ठदान आहे असं आपण म्हणतो. पण हे दान करताना काही काळजीही घ्यायला हवी. रक्तदान केल्यामुळे दात्याला कोणत्याही प्रकारच्या आरोग्यविषयक अडचणींचा सामना करावा लागू नये याविषयी दक्ष रहायला हवं. त्या तत्त्वानुसारच सर्दी, पडसं, खोकला किंवा ताप यासारख्या कोणत्याही रोगजंतूंच्या उपसर्गाची लक्षणं दिसत असतील तर ती नाहशी होईपर्यंत रक्तदान करता येत नाही. त्या आजारांवरील उपचारासाठी प्रतिजैविकांसारखी काही औषधं दिली असतील तर त्यांचा परिणाम नाहिसा होईपर्यंतही रक्तदानाला मनाई करण्यात येते. बाळंत झालेल्या स्त्रीला पुढचे सहा आठवडे रक्त देता येत नाही. एखादी शस्त्रक्रिया झाली आहे, स्त्रीला पाळी आलेली आहे, ज्या व्यक्तीने पुरुष अथवा स्त्री वेश्येशी समागम केला आहे, जिचा गर्भपात झाला आहे अशांनाही काही काळापुरतं रक्तदानाच्या बंदीला सामोरं जावं लागतं. काही व्यक्तंींना तर रक्तदानापासून कायमचं दूर ठेवण्यात येतं. यात रक्तवाहीनीवाटे नशिल्या पदार्थांचं सेवन करणार्‍यांचा समावेश होतो. एड्सला कारक असणार्‍या एचआयव्ही विषाणूंची बाधा झालेली आहे, अशांचंही रक्त घेतलं जात नाही.

देव आनंद

   
हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक देव आनंद यांचा जन्म २६ सप्टेंबर १९२३ रोजी पंजाबमधील गुरुदासपूर येथे झाला. सुमारे ६५ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत यांनी ११४ चित्रपटांमध्ये अभिनय केला. सरकारने त्यांना २00१ साली पद्मभूषण पुरस्कार, तर २00२ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन यांचे चित्रपटक्षेत्रातील योगदान गौरवले. १९४६ साली देव आनंद यांच्या कारकिर्दीला हम एक है या चित्रपटाने सुरुवात झाली. १९४९ मध्ये त्यांनी नवकेतन फिल्म कंपनी बनवली आणि ३५ हून अधिक चित्रपटांची निर्मिती केली. त्यानंतर गेली अनेक दशके त्यांनी बाँलिवूडवर ठसा उमटवला. गीता बाली, वहिदा रेहमान, मधुबाला अशा अनेक नामवंत अभिनेत्रींसोबत त्यांनी अनेक चित्रपट केले. हम दोनो, अमीर-गरीब, गाईड, पेइंग गेस्ट, बाजी, ज्वेल थीफ, सीआयडी, जॉनी मेरा नाम, वॉरंट, देस परदेस हे आणि असे त्यांचे अनेक चित्रपट गाजले आणि ते तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनले. त्यांच्या गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनावर गारुड केले. संगीतप्रधान हिंदी चित्रपटांतून रंगवलेल्या त्यांच्या अनेक भूमिका लोकप्रिय ठरल्या. केसांचा महिरपी तुरा, गुलछबू आणि देखणी चेहरेपट्टी यांमुळे उठून दिसणार्‍या त्यांच्या फॅशनदार व्यक्तिमत्त्वाने रसिकांच्या मनात स्थान मिळवले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे हॉलिवूडमधील ग्रेगरी पेक या अभिनेत्याशी तुलना होत असे.

Tuesday 25 September 2018

शास्त्रज्ञ - डॉ. कमला सोहोनी

आपल्या प्रखर बुद्धिमत्तेच्या जोरावर विज्ञान क्षेत्रात प्रवेश मिळवलाच आणि याच क्षेत्रात आपल्या नव्या संशोधनाने सर्वांची वाहवा मिळवत भारतातील महिला शास्त्रज्ञ बनण्याचा मानदेखील मिळवला. ही धडाडीची स्त्री अर्थातच ज्येष्ठ विदुषी लेखिका दुर्गाताई भागवत यांची बहीण डॉ. कमला सोहोनी. कमलाताईंचा जन्म 18 जुलै 1911 चा. इंग्रजांच्या अंकित राष्ट्रातली एक हिंदुस्थानी मुलगी म्हणून त्यांना आपल्या शिक्षणासाठी बराच संघर्ष करावा लागला. 1933 मध्ये रसायनशास्त्र विषय घेऊन त्या पहिल्या वर्गात बीएस्सी उत्तीर्ण झाल्या. वर्तमानपत्रातील जाहिरातींनुसार शास्त्रीय संशोधनासाठी बंगलोर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथे त्यांनी अर्ज केला. कमलाबाई प्रवेशासाठी पूर्णपणे पात्र होत्या. परंतु संस्थेचे प्रमुख नोबेल पारितोषिक विजेते सर सी. व्ही. रामन यांनी मुलगी असल्याने त्यांना प्रवेश नाकारला; परंतु कमला रामन यांना प्रत्यक्ष भेटल्या. मुलगी म्हणून अन्याय सहन करणार नाही असं ठामपणे सांगत ज्या काळात स्त्री शिक्षणासारख्या अत्यंत मूलभूत हक्कापासून वंचित होती. चार भिंतीमध्येच तिचं जगणं बंदिस्त होतं. अशा कठीण, कर्मठ काळात शिक्षणाची जबरदस्त इच्छा, आवड असणार्‍या एका स्त्रीने विज्ञान शाखेची पदवी प्राप्त केल्यानंतर शास्त्रज्ञ बनण्याची आणि याच क्षेत्रात संशोधन करण्याची मनीषा बाळगली. ही अनाकलनीयच गोष्ट होती. स्वाभाविकच महिला आणि शास्त्रज्ञ ही गोष्टच तत्कालीन पुरुषप्रधान समाजव्यवस्थेला आणि शिक्षण व्यवस्थेलाही रुचणारी नव्हती; परंतु याच स्त्रीने त्यांनी एमएस्सी करता प्रवेश मिळवला. त्यांनी बायोकेमिस्ट्री या विषयाचा झपाटून अभ्यास केला. वर्षाअखेर रामन त्यांना म्हणाले, तुझी निष्ठा आणि चिकाटी पाहून असे वाटते, की यापुढे या संस्थेत फक्त मुलींनाच प्रवेश द्यावा. याचाच अर्थ कमलाबाईंनी ही जिद्दीची परीक्षा पास केली होती. पुढे 1937 साली मुंबई विद्यापीठात स्प्रीमेंट रिसर्च आणि सर मंगलदास नथ्थुभाई या शिष्यवृत्त्या मिळवून त्या इंग्लंडला गेल्या. तिथे केंब्रिजमधील जगप्रसिद्ध सर विल्यम डन लायब्रोटरीचे डायरेक्टर नोबेल पारितोषिक विजेते सर फ्रेडरिक गॉल्डन हॉपकीन्स यांना भेटून त्यांनी मोठ्या कष्टाने प्रवेश मिळवला. याच विद्यापीठातून प्राणिमात्रांप्रमाणेच सर्व वनस्पतींनाही सार्‍या जीवनक्रिया सायटोक्रोन सीच्या मध्यस्थीने एन्झाईन्समुळे करता येतात या विषयावर संशोधन करून त्यांनी डॉक्टरेट मिळवली. पुढे इंग्लंडमध्ये आपल्या संशोधनाचा वापर न करता त्या मायदेशात परतल्या आणि मुंबईच्या रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेत संशोधन करतच निदेशक म्हणून निवृत्त झाल्या. आपल्या प्रखर बुद्धिमत्तेच्या जोरावर भारतातील पहिल्या महिला शास्त्रज्ञ बनण्याचा मान मिळवणार्‍या डॉ. कमला सोहोनी यांची ही संघर्षगाथा ऐकल्यानंतर त्यांच्या ठायी आजच्या काळातील देवी भवानीचंच रूप आपल्याला दिसतं.

सुविचार संग्रह 1


1)   लहान मुलांमध्ये आढळणारी चौकसवृत्ती म्हणजे ज्ञानाची भूक होय.- अल्बर्ट आइनस्टाइन
2)   आपणच आपल्या कीर्तीचा फुगा नको तेवढा फुगवला,की तो केव्हा फुटतो हेही समजत नाही.-एम्मा कार्ले टोन
3)   उच्चासने नेहमीच गैरसोयीची असतात,तर काही मुकुटांच्या खाली काटे असतात.-जेम्स ब्रुक
4)   दुबळ्या रस्त्यातील अडसर बनलेला पाषाण हा बलवानाच्या मार्गातील एक यशाचा टप्पा ठरतो.-थॉमस कार्लेले
5)   त्याग हाच मैत्रीचा भक्कम पाया असतो.-महात्मा गांधी
6)   सत्य व न्याय याहून कोणताच धर्म मोठा नसतो.-महात्मा गांधी
7)   स्वयंप्रेरणा वा उत्साह यांसारखी दुसरी भेट पालक आपल्या पाल्यास देऊच शकत नाहीत.-ब्रूस बार्टोन
8)   माणसास मृत्यू कसा आला, यापेक्षा तो कसा जगला याला अधिक महत्त्व असते.-डॉ. सॅम्युअल जॉन्सन
9)   घरात खूप पुस्तके जमा करणारा व आपल्या पाल्याकडे भरपूर लक्ष देणारा पालक धनवानच असतो.-सॅम लेव्हनसन
10) श्रद्धा,ऊर्मी यांवर विसंबून वापरलेली संगोपनपद्धती सर्वात परिणामकारक असते.-केली वॉकर
11) सहिष्णुता ही खर्याखुर्या सुसंस्कृतपणाची एक महत्त्वपूर्ण खूण आहे.-सिसेरो
12) निर्वाणीचा क्षण-पाही कोण परिणाम? विसरावे देहभान-हाच धर्म!-माधव ज्युलियन
13) प्रार्थना म्हणजे देवाबरोबर केलेला संवाद होय.-जोसेफ केसी
14) जर तुम्ही स्वत:ला विसरू शकलात,तरच खर्या अर्थाने तुम्ही ईश्वराजवळ पोचू शकाल.-हेन्री धसे
15) अन्याय डोळ्यांनी पाहणे व सहन करणे हे महापाप होय.-संत तुकडोेजी महाराज
16) उद्याची ज्योत आजच लावा.-एलिझाबेथ ब्राऊनिंग
17) निर्भयता हे नैतिकतेचे पहिले लक्षण आहे.-महात्मा गांधी
18) तिरस्कारामुळे झालेली जखम स्मितामुळे भरून निघते.-शेक्सपीयर
19) योग्य वेळेची निवड करणे म्हणजे वेळेची बचत करणे होय.-अल बेकॉन
20) दुसर्याला न दुखवता, दुष्टापुढे न वाकता, सज्जनांनी मळवलेली वाट न सोडता, जे थोडेफार पदरी पडले त्याचे मोल मोठे असते. -बहिणाबाई चौधरी
21) एखादे नवे काम पुरते करायचे नसेल तर,हाती घेऊ नका आणि घेतले तर ते पूर्ण करा.-ओव्हिड



कमलाकर सारंग

सुप्रसिद्ध मराठी नाट्य-अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते, लेखक कमलाकर सारंग यांचा जन्म २९ जून १९३४ रोजी झाला. चाळीस एक वर्षांपूर्वी नाटककार सुरेश खरे यांनी 'आरोप' नाटक लिहिले होते. त्यात लालन सारंग आणि जयराम हर्डीकर यांच्या भूमिका होत्या. मराठी प्रमाणे गुजराती रंगभूमीवरही याचे प्रयोग झाले. कमलाकर सारंग यांनी 'आरोप' नाटक दिमाखात रंगभूमीवर आणले होते. त्यांनी दिग्दर्शिन केलेली घरटे आमुचे छान, बेबी व जंगली कबूतर इत्यादी नाटके गाजली. मराठी नाय़अभिनेत्री लालन सारंग या यांच्या पत्नी होत. सखाराम बाइंडर इत्यादी नाटकांतील या दोघांचा अभिनय विशेष नावाजला गेला. विजय तेंडुलकर लिखित 'सखाराम बाइंडर' हे नाटक प्रचंड वादग्रस्त व वादळी ठरले. लालन सारंग यांनी 'चंपा' आणि निळू फुले यांनी 'सखाराम' या भूमिका केल्या होत्या. या नाटकाने इतिहास घडविला. या नाटकाविरुद्ध दिग्दर्शक कमलाकर सारंग यांना लढा द्यावा लागला. नाटकाविरुद्ध खटला भरला गेला. हे नाटक म्हणजे विवाह संस्था संकटात सापडण्याचे भय आहे, असा आक्षेप घेण्यात आला होता. या संदर्भात सारंग सेन्सॉर बोर्डाविरुद्ध कोर्टात गेले. सहा महिने लढल्यावर नाटक एकही कट न करता हायकोर्टातून सुटलं आणि पुन्हा दिमाखानं प्रयोग सुरू झाले. सारंगानी सखाराम बाइंडर नाटकाच्या वेळच्या आठवणींवर 'बाइंडरचे दिवस' नावाचे पुस्तक लिहिले. आजच्या दिवशी (१९९८)प्रख्यात रंगकर्मी, दिग्दर्शक, निर्माते, लेखक कमलाकर सारंग यांचे निधन झाले.

Saturday 22 September 2018

महिलेशिवाय जग शक्य आहे काय?


     वॉल्टर बेसेंट यांचे द रिवॉट ऑफ मॅन हे पुस्तक 1882 मध्ये प्रकाशित झाले होते. या पुस्तकात त्यांनी भविष्यात इंग्लड कसा असेल, याची कल्पना केली होती. त्यात त्यांनी म्हटलं होतं की, एक काळ असा येईल की त्यावेळेला परंपरेनुसार जुन्या वस्तू पुन्हा वापरात येतील. मोठ्या बदलानुसार समाजातील सर्वश्रेष्ठ व्यक्ती सर्व शक्तीशाली पदांवर राज्य करेल.

     राजेशाही व्यवस्थेचा शेवट होईल आणि नवा राजधर्म उदयास येईल, ज्यात आदर्श महिलेची पूजा होईल. अर्थात असे अनंतकाळापासून चालत आले आहे. भविष्यात पुरुषांना आपल्या अकडूपणावर आवर घालावा लागेल किंवा त्यात सौम्यपणा आणावा लागेल. त्यांना सरळ व्यवहार स्वीकारावा लागेल.घरातल्या आपल्या मुलांची काळजी करावी लागेल.त्यांची देखभाल करावी लागेल. या पुस्तकातील एक भाग समकालिन कला प्रदर्शनाच्या दिशेने घेऊन जाते. यात सर्वात अधिक पेंटिंग एथलीट, रनर्स, रेसलर्स, जंपर्स आणि क्रिकेट प्लेयर्स यांची छायाचित्रे आहेत. मात्र महिलांचे फोटो अधिक दिसतात. या पुस्तकात असेही लिहिले आहे की, समाजाची अशी धारणा आहे, स्त्रियांनी वयाच्या 40 वर्षांपूर्वी लग्न करायला हवे. आपले करिअरदेखील बनवायला हवे. याचा अर्थ असा होतो की, महिला पुरुषांपेक्षा लवकर वृद्ध होतात?
     आपण असे ऐकले आहे किंवा पाहिले आहे की, पुरुष मोठ्या पदावर चिकटून राहण्यासाठी लांड्यालबाड्या करतो. कुरघोड्या करतो. अर्थात कटकारस्थान करतो. कारण मिळालेल्या पदाचा मुकूट कायम आपल्या डोक्यावर राहावा. महिला मात्र असे काही पाहिले की, उग्र रूप धारण करतात. त्यांच्या अंगी जगदंबा अवतरते. असे घडले तर एक क्रांतिकारी निर्णय जन्माला येतो. हा इतिहास आहे.
     इतिहास साक्षी आहे, महिलांनी ज्या क्रांतीची सुरुवात केली आहे, त्या त्याच्या शेवटापर्यंत पोहचल्याशिवाय राहत नाहीत. क्रांतीचा परिणाम असा होतो की, महिला नेतृत्व करतात तेव्हा, पुरुष तिला आपल्या अधिपत्याखाली आणण्याचा प्रयत्न करीत असतो. यातच महिला आणि पुरुषांचा संघर्ष होईल. संपूर्ण जग याला साक्षी असेल. पुस्तकाच्या शेवटी एक प्रश्न उपस्थित केला आहे, तो म्हणजे महिलेशिवाय या जगाची कल्पना केली जाऊ शकते काय? असा समाज बनेल काय? आणि नाही तर का नाही?

महाराष्ट्र पिछाडीवर


नुकतेच पंधराव्या वित्त आयोगाचे आकडे प्रसिद्ध झाले आहेत. यावरून महाराष्ट्र अनेक बाबतीत पिछाडीवर असल्याचे स्पष्ट होत आहे. सन 2013 ते 2017 दरम्यान राज्य सरकारन केलेल्या खर्चापैकी केवळ अकरा ते बारा टक्केच रक्कम भांडवली खर्चासाठी वापरली गेली. 2009-2013 दरम्यान महसुली उत्पन्न 17.69 टक्के होते. 2014 ते 2017 या कालावधीत ते 11.05 टक्क्यांवर घसरले आहे. अर्थात ही आकडेवारी कुणी विरोधकांनी दिलेली नसून पंधराव्या वित्त आयोगाकडून ती जाहीर करण्यात आली आहे. ही आकडेवारी पाहिल्यावर राज्याच्या पुढच्या वाटचालीबद्दल चिंता वाटावी अशी स्थिती दिसत असल्याचे स्पष्ट होते. करांच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न 2009 ते 2013 या काळात 19.44 टक्के होते. ते 8.16 टक्क्यांवर घसरले आहे. नव्या सरकारने राज्यातील सिंचनाचे क्षेत्र वाढल्याचे दावे केले. ते दावे वस्तुस्थितीपासून दूर असल्याचे वित्त आयोगाच्या अहवालामुळे स्पष्ट झाले आहे. मुंबई आणि राज्याच्या अन्य भागांत विकासाची दरी निर्माण झाल्याचे स्पष्ट निरीक्षण वित्त आयोगाच्या अहवालामध्ये नोंदविण्यात आले आहे. देशाच्या एकूण जीडीपीच्या अडीच टक्के तर एकूण करसंकलनाच्या 30.5 टक्के हिस्सा मुंबईतून मिळतो. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमुळे आसपासच्या परिसरातही विकासाची चाके वेगाने फिरू लागली, मात्र राज्यात अन्यत्र औद्योगिक केंद्रे अभावानेच निर्माण झाली. राज्यात शहरीकरणाचा वेग वाढत आहे. देशात शहरीकरणाचा वेग सरासरी 31 टक्के तर महाराष्ट्रात 45.23 टक्के आहे. राज्याची आर्थिक पत ढासळली असताना मानव विकास निर्देशांकाच्या बाबतीत सुद्धा महाराष्ट्र पिछाडीवर गेला आहे. मानव विकास निर्देशांकानुसार देशातील 351 विभाग सामाजिकदृष्ट्या मागास असून त्यापैकी 125 विभाग एकट्या महाराष्ट्रात आहेत.



वीर योद्धा राव तुलाराम


९ डिसेंबर १८२५ ला हरियाणातील रेवाडी जिल्ह्य़ातील यादव राजघराण्यात राव तुलाराम यांचा जन्म झाला. वयाचे १४ वे वर्ष न संपत तर त्यांच्या वडिलांचे देहावसान झाले आणि सत्तालोलूप ब्रिटिशांना आणखी एक राज्य खालसा करण्याची आयतीच संधी मिळाली.
रेवाडीला आपल्या अधिपत्याखाली आणून तेथील जनतेकडून कर जमा करण्याचे इंग्रजांचे कुटिल मनसुबे होते. जुन्या इतिहासातील पानांतील नोंदीनुसार राव तुलाराम यांच्या पूर्वजांकडे तेव्हा ८७ गावांचे वतन होते. त्यावेळी त्याची अंदाजे किंमत २0 लाख रुपये असावी. वडिलांच्या मृ्त्यूनंतर राज्यकारभार त्यांच्या आईकडे आला असला तरी राजगादीवर राव तुलाराम यांनाच बसविल्या गेले.
राव तुलाराम यांच्या रक्तात देशभक्ती भिनली असल्यानेच इंग्रजांशी मराठय़ांच्या झालेल्या लढाईत राव तुलाराम यांनी मराठय़ांना सहाय्य केले. परिणामी इंग्रजांचा तुलाराम यांच्यावरील रोष अधिक वाढला. इंग्रजांनी याचा सूड उगवण्यासाठी राव तुलाराम यांच्या वतनदारीत कपात करीत तो सरळ एक लाखांपर्यंत आणली. पर्यायाने इंग्रजांप्रती द्वेषाची बीजे रेवाडीतील जनतेमध्ये पेरल्या गेली. याच द्वेषभावनेचे रूपांतर १८५७ च्या राष्ट्रीय उठावादरम्यान होऊन राव तुलाराम आपल्या बंधूसह इंग्रजांविरुद्ध युद्धात उतरले. जिथे चरबी लावलेले काडतूस उघडण्यास भारतीय सैनिकांनी मनाई केल्याने इंग्रज यांच्या अत्याचार करायला लागले. तिथे राव तुलाराम सारख्या योद्धांनी इंग्रजांच्या नाकात नऊ आणायला सुरवात केली. मेरठमध्ये इंग्रजांना मात देत हे वीर दिल्लीकडे कूच करते झाले. दिल्लीतील ब्रिटिशांसोबत झालेल्या युद्धात ब्रिटीश सैन्यात हाहाकार माजल्याच्या नोंदी सापडतात. यानंतर आपल्याच प्रांतात जाऊन ब्रिटीशांना हुसकावून लावले. या उद्देशाने राव तुलाराम बेचैन झाले. १७ मे १८५७ रोजी ५00 यादवांचे सैन्य घेऊन राव तुलाराम यांनी तहसील मुख्यालयावर धावा बोलला. कार्यालयातील तहसीलदार तसेच ठाणेदारास बाहेर हाकलून तेथील खजिन्यावर व कार्यालयांवर कब्जा केला. या विजयासह राव तुलाराम यांनी रेवाडी, भोरा आणि शहाजहानपूरच्या ४२१ गावात स्वत:चे अधिपत्य जाहीर केले.
इंग्लंडमध्ये ब्रिटीश हुकूमतास ही बातमी कळताच ते हैराण झाले. लगेच मोठय़ा अधिकार्‍यांना हुकूम सोडले गेले की होईल तितक्या लवकर राव तुलारामला बंदी बनवावे. अन्यथा राव तुलारामने केलेला पराक्रम संपूर्ण देशाला माहिती होईल आणि ब्रिटीश सत्तेविरुद्ध वणवा पेटायला उशीर लागणार नाही याची जाणीव ब्रिटिशांना व्हायला लागली. यानंतर लगेच दोनदा राव तुलाराम यांच्यावर हल्ला केला. परंतु राव तुलाराम समोर ब्रिटीशसैनिकांची दानादान होऊन जीव मुठीत घेऊन पळण्यावाचून ब्रिटिशांना गत्यंतर उरले नाही. परंतु ब्रिटिशांवरील हा विजयाचा अनंदाचा राव तुलाराम यांना जास्त का उपभोग घेता अला नाही. यानंतर त्यांचे प्रकृतीस्वास्थ ढासळायला लागले. यातच झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या वीरगतीचे वृत्त त्यांना कळले त्यानंतर त्यांना अधिकच दु:ख झाले. या धक्क्य़ातून सावरायला त्यांना वेळच मिळाला नाही आणि २३ सप्टेंबर १८६३ रोजी भारतमातेचा हा सुपुत्र वयाची अगदी चाळीशीही पूर्ण न करता काळाच्या पडद्याअड झाला.

वाढवा सामान्य ज्ञान

१) लाओसची राजधानी कोणती?
२) ऊझबेकिस्तान हे आंतरराष्ट्रीय नाणे निधीचे कितवे सदस्य राष्ट्र झाले?
३) तुर्कस्तान, पाकिस्तान, इराण, इराक आदी राष्ट्रांनी एकत्र येऊन स्वसंरक्षणासाठी स्थापन केलेली संघटना कोणती?
४) डर्बी कोर्स या खेळाच्या मैदानाचे माप किती?
५) १९५४ मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धा कोठे आयोजित केल्या गेल्या होत्या?

उत्तर : १) व्हिएन्टीन २) १७१ वे ३) साऊथ ईस्ट एशियन ट्रिटी ऑर्गनायझेशन ४) दीड मैल (२.४ कि.मी) ५) मनिला

प्रसिद्ध अभिनेत्री तनुजा

तनुजा मुखर्जी, पूर्वार्शमीची तनुजा सर्मथ ही अभिनेत्री तनुजा नावानेच प्रसिद्ध झाली. तिचा जन्म २३ सप्टेंबर १९४३ रोजी मुंबईत झाला. तिने हिंदी, मराठी, बंगाली भाषांमधील चित्रपटांत अभिनय केला. त्यांच्या आई शोभना सर्मथ या बोलपटांच्या प्रारंभिक काळातील हिंदी-मराठी चित्रपटांतल्या अभिनेत्री होत्या, तर काजोल व तनिशा या तिच्या दोन्ही मुलीही चित्रपटक्षेत्रातील नंतरच्या पिढीतल्या अभिनेत्री आहेत. थोरली बहीण नूतन हिच्या मुख्य नायिकेच्या भूमिकेतील पदार्पणाच्या हमारी बेटी या हिंदी चित्रपटाद्वारे १९५0 साली तनुजाने बालकलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. तरुण कलाकार म्हणून तिचे पदार्पण १९६0 साली पडद्यावर झळकलेल्या छबेली या हिंदी चित्रपटाद्वारे झाले. बहारें फिर भी आयेंगी (१९६६), ज्वेल थीफ (१९६७), अनुभव (१९७१) या चित्रपटांतील तिच्या भूमिका विशेष गाजल्या.२00८ मध्ये ह्यरॉक अँन्ड रोल फॅमिली या झी टीव्हीवरील रिअँलिटी नृत्य कार्यक्रमात मुलगी काजोल आणि जावई अजय देवगण यांच्यासोबत सह-परीक्षक म्हणून छोट्या पडद्यावर पदार्पण केले.२0१३ मध्ये नितीश भारद्वाज दिग्दर्शित ह्यपितृऋण या मराठी चित्रपटात एका प्रभावी भूमिकेत पुनरागमन केले. चित्रपटातील भूमिकेला न्याय देण्यासाठी त्यांनी केशवपन केले. चित्रपटाचे आणि त्यांच्या भूमिकेचे विशेष कौतुक झाले.

भारतातील तळीरामांची संख्या

भारतातील मद्यपींची संख्या २00५ च्या तुलनेत २0१६ मध्ये दुपटीने वाढल्याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने चिंता व्यक्त केली आहे. २00५ मध्ये देशात प्रतीव्यक्ती २.४ लिटर मद्याची विक्री होत होती, तर २0१६ मध्ये हे प्रमाण ५.७ लिटरवर पोहचले आहे. म्हणजेच या काळात मद्य विक्रीचे प्रमाण दुपटीने वाढले आहे. त्यात ४.२ लिटर मद्य पुरुष तर १.५ लिटर मद्य महिलांनी घेतले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात ही माहिती उघड झाली आहे.
२0२५ पर्यंत या प्रमाणात अधिक वाढ होण्याची शक्यताही या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. दक्षिण पूर्व आशियात मद्यपींच्या संख्येत सर्वाधिक वाढ होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. भारतातच ही वाढ प्रतिव्यक्ती २.२ लिटरने वाढण्याची शक्यता आहे. भारतात एक मोठा वर्ग आहे. त्यातील अनेकजण आरोग्याला हानीकारक असलेली तसेच अल्कोहोलचे प्रमाण जास्त असलेली दारु घेत असल्याचेही अहवालात म्हटले आहे. इंडोनेशिया आणि थायलंडमध्येही अशा प्रकारच्या मद्याची मोठय़ा प्रमाणात विक्री होते. तर चीनमध्येही प्रतिव्यक्ती 0.९ लिटर वाढ होण्याची शक्यता अहवालात व्यक्त केली आहे.
अल्कोहोलमुळे होणार्‍या मृत्यूच्या प्रमाणात वाढ झाल्याचेही या अहवालात म्हटले आहे. अल्कोहोलमुळे माता आणि बालकांचे आरोग्य, संक्रमणाने होणारे रोग, साथीचे रोग होतात. तसेच मानसीक आरोग्यावरही त्याचा विपरीत परिणाम होतो. जगात २0१६ मध्ये ५.३ टक्के म्हणजे सुमारे ३0 लाख लोकांचा मृत्यू अल्कोहोलमुळे ओढवला आहे. अल्कोहोलमुळे २00 पेक्षा अधिक रोग होण्याची शक्यता वाढत असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे अल्कोहोलचे प्रमाण जास्त असलेल्या मद्यापासून लांब राहण्याचा सल्लाही या अहवालात देण्यात आला आहे.

वाढवा सामान्य ज्ञान

1) 'एससी'चे विस्तारित रूप काय?
2) 'भिल्लसेवा मंडळ' या संस्थेची स्थापना कधी झाली?
3) भारतातील पहिल्या पेट्रोलियम तेलविहिरीसाठी
प्रसिद्ध असणारं ठिकाण कोणतं?
4) श्रीलंकेची राजधानी कोणती?
5) उत्तर ध्रुवासभोवतालच्या भू-भागाला काय म्हणतात?

उत्तर : 1) सिक्युरिटी कौन्सिल 2) 1922 3) दिग्बोई
5) कोलंबो 5) आक्र्टिक प्रदेश

कर्मवीर भाऊराव पाटील

कर्मवीर भाऊराव पाटील हे मराठी समाजसुधारक आणि शिक्षणप्रसारक होते. सर्वसामान्य जनतेपयर्ंत शिक्षणप्रसार करण्यासाठी त्यांनी रयत शिक्षण संस्था स्थापली. भाऊरावांनी मागास व गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून ह्यकमवा व शिका ही योजना सुरू करुन मोठे काम केले. ते जोतिबा फुले यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक समाजाचे एक महत्त्वाचे सदस्य होते. त्यांचा स्वातंत्र्यलढ्यातही सहभाग होता. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शिक्षणाचा प्रसार केला. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक भाऊराव पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी जैन कुटुंबात झाला. अन्यायाची त्यांना प्रचंड चीड होती. त्यांचे बालपण कुंभोजमधील अस्पृश्य मुलांच्यासोबत खेळण्यात गेले. अस्पृश्यतेबद्दल त्यांच्या मनात राग होता. अस्पृश्य समाजातील लोकांना पाणी दिले जात नाही म्हणून त्यांनी एका विहिरीचा रहाटच मोडून टाकला होता. त्यांचे प्राथमिक शिक्षण सांगली जिल्ह्यातील विटा आणि इतरही काही गावांत झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांना कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये दाखल करण्यात आले. याच काळात त्यांच्यावर राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा व कार्याचा प्रभाव पडला. महाराष्टाच्या जनतेने भाऊराव पाटलांचा कर्मवीर ही पदवी देऊन गौरव केला. तसेच भारतीय केंद्रशासनाने त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवले.

तुम्हाला माहित आहे का?


प्रश्1: देशाचे पहिले मुख्य न्यायाशीश कोण?
उत्तर: एच. जे. कानिया देशाचे पहिले मुख्य न्यायाधीश होते. त्यांनी 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या पदाची जबाबदारी स्वीकारली होती. कानिया यांनीच देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांना शपथ दिली होती. 1951 मध्ये वयाच्या 61 व्या वर्षी त्यांचे हृदयविकाराने निधन झाले. ते गुजरातच्या नवसारीचे राहणारे होते.
प्रश् 2: भारतीय रेल्वेचा सर्वात मोठा (लांब)मार्ग कोणता?
उत्तर: भारतीय रेल्वेचा सर्वात लांब किंवा मोठा मार्ग हा डिबूगढ ( आसाम) ते कन्याकुमारी असा आहे.हा मार्ग 4 हजार 286 किलोमीटरचा आहे. हा मार्ग पूर्ण करण्यासाठी 82 तास लागतात. विवेक एक्सप्रेस हे अंतर पूर्ण करते. हा जगातला नववा सर्वात लांब मार्ग आहे.
प्रश् 3- मोहिनी शर्मा-माने कोण आहेत?
उत्तर- मोहिनी शर्मा- माने मिसेज इंडिया वर्ल्ड 2016 च्या विजेत्या आहेत. 2016 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या मिसेज वर्ल्ड-2016 मध्ये त्या स्पर्धक होत्या. त्यांनी ब्रिटनच्या मिडिलसेक्स युनिव्हर्सिटी ऑफ लंडनमधून स्ट्रॅटजी एंड सोशल वेलफेयरमध्ये एमबीए केलं आहे.मुंबईमध्ये दोन प्री स्कूल चालवतात. त्याचबरोबर मुंबईबाहेरदेखील सेकेंडरी स्कूलचे संचालन करीत आहेत.या केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियान आणि महिला सबलीकरण अभियानसाठीदेखील काम करतात.  महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी काम करतात. महिला समाजात पुरुषांच्या बरोबरीने काम करू शकतील, असा प्रयत्न या माध्यमातून सुरू आहे.
प्रश् 4- टीचर्स डे (शिक्षक दिवस) चे जनक कोण?
उत्तर- भारताचे द्वितीय राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा 5 सप्टेंबर हा जन्मदिवस भारतात डिचर्स डे (शिक्षक दिवस) म्हणून साजरा केला जातो. 1965 मध्ये काही विद्यार्थी राष्ट्रपती राधाकृष्णन यांच्याकडे गेले आणि त्यांचा जन्म दिवस साजरा करण्याबाबत विचारणा केली. राधाकृष्णन म्हणाले की, त्यांच्या जन्मदिवसाच्या बदल्यात त्या दिवशी शिक्षक दिन साजरा केला तर आपल्याला फार आनंद होईल. तेव्हापासून हा दिवस शिक्षक दिवस म्हणून साजरा केला जातो.
प्रश् 5- सर्वात छोटे (लहान) राज्य कोणते?
उत्तर- क्षेत्रफळाच्यादृष्टीने भारतातील सर्वात छोटे (लहान) राज्य आहे, ते म्हणजे गोवा. याचे एकूण क्षेत्रफळ फक्त 3 हजार 702 चौरस किलोमीटर आहे. भारत ज्यावेळेला स्वतंत्र झाला,त्यावेळेला गोव्यावर पोर्तुगीजचे राज्य होते. सन 1961 मध्ये भारताने पोर्तुगीजना हाकलून देऊन गोव्याला आपल्या हिश्शाचा भाग बनवला. तेव्हा तो केंद्रशासित प्रदेश होता. 30 मे 1987  मध्ये गोवा भारताचा 25 वा राज्य बनला. गोवा आपल्या सुंदर समुद्री किनार्यासाठी प्रसिद्ध आहे. संपूर्ण जगभरातून पर्यटक गोव्यात सुट्टी साजरी करायला येतात.