Saturday 31 October 2020

बार्बी डॉल: मानसी जोशी


मानसी जोशी सध्याची वर्ल्ड चॅम्पियन पॅराबॅडमिंटनपटू आहे. ती टाईम मासिकाच्या  ऑक्टोबर 2020 च्या मुखपृष्ठावर विराजमान झाली. तिचा जगभरातील '14 नेक्स्ट जनरेशन लीडर' म्हणजे नवीन पिढीला आपल्या कामगिरीने दिशा दाखवू शकतील अशा युवा वर्गांमध्ये  समावेश केला आहे.  मुंबईस्थीत मानसी ही या यादीतील  एकमेव पॅराअॅथलिट आहे. तसेच 'टाईम' मासिकावर झळकलेली ती आतापर्यंतची एकमेव पॅराअॅथलिट आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमेरिकेच्याच 'बार्बी डॉल' बनवणाऱ्या बाहुल्यांच्या कंपनीने मानसीला रोल मॉडेल मानून तिच्यासारखी एक बाहुलीदेखील बाजारात आणली आहे. मानसीसारखा या बाहुलीला प्रोस्थेटिक लेग म्हणजे कृत्रिम पाय आहे. अशा बाहुलीमुळे पॅराअॅथलिटच्या व्यथा आणि समाजाने त्यांना ते आहेत तसं स्वीकारण्याची गरज अधोरेखित होईल, असं ही बाहुली बनवणाऱ्या मॅटेल या अमेरिकन कंपनीने म्हटलं आहे. 

पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या मानसीचा 2011 च्या डिसेंबरमध्ये चुकीच्या दिशेनं आलेल्या एका लॉरीमुळे अपघात झाला आणि त्यात तिला डावा पाय गमवावा लागला. पण तिने हार मानली नाही. मेहनत, प्रयत्न आणि कोर्टवरची कामगिरी यामुळे ती पुढे पुढे जात राहिली. तिच्याकडे आता वर्ल्ड चॅम्पियनशिपमधली तीन पदकं आहेत. गेल्यावर्षी तिने सुवर्ण पदक पटकावलं आहे तर आशियाई स्तरावरची दोन पदकं आहेत. वयाच्या 9 व्या वर्षांपासून ती बॅडमिंटन खेळते आहे. तिचा तिच्या स्वत:वरचा आणि मेहनतीवर प्रचंड विश्वास आहे. त्यामुळेच आठ वर्षांपूर्वी रस्ते अपघातात पाय गमावल्यावरही तिने सहा वर्षांत जागतिक पॅरा बॅडमिंटन स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं. सध्या तिने ऑलिम्पिकची तयारी सुरू ठेवली आहे. तिच्या सारख्या अँथलीटसाठी कठीण असं ब्लेड-रनिंगचं कौशल्य ती शिकली आहे. धावणं आणि सायकल चालवणं हे व्यायाम तिच्या खेळासाठी पोषक आहेत. ती पुन्हा सायकल चालवू लागली आहे. 2020 मध्ये पॅराअॅथलिटसाठी असलेले टॉयसा आणि इंडियन स्पोर्ट्स लिजंडसारखे पुरस्कार तिने पटकावले. बीबीसी इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ दि ईयर या पुरस्कारासाठीही अंतिम पाच नामांकनामध्ये तिचा समावेश होता. अपघाताकडे संकट म्हणून बघण्यापेक्षा त्यात संधी शोधण्याच्या मानसिकतेमुळे संकटावर मात करणं शक्य झालं असं मानसी सांगते.मानसी जोशी आता भारतातच नाही तर आशियाई स्तरावर पॅराबॅडमिंटन खेळांची रोल मॉडेल बनली आहे. हे मानसीच्या खेळाचं आणि स्वभावाचं मोठं यश आहे. मानसी पूर्वीही पॅरा बॅडमिंटनमध्ये भारताने विश्वविजेतेपद पटकावलेलं होतं. पण, मानसीने सुस्पष्ट विचार आणि कोर्टवरची कामगिरी यामुळे पॅरा बॅडमिंटनकडे लोकांचं लक्ष वेधलं आणि त्याला प्रसिद्धी मिळवून दिली. मानसीमुळे पॅराबॅडमिंटन आणि त्यातल्या अडचणींकडे भारतीयांचं लक्ष गेलं. पॅरास्पोर्ट्स आणि अपंगत्वाकडे बघण्याचा देशाचा दृष्टिकोन बदलावा, असं तिला वाटतं. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि.सांगली

स्मरणशक्ती वाढविण्याचे तंत्र


1.शांत आणि स्थिर राहा.

2.दररोज खोल श्वास आणि ध्यानयोग करा.

3. आपण जागे झाल्यावर आपल्या मोबाईल फोनला स्पर्श करणे टाळा.

5. रात्री किमान सात तास झोपायला पाहिजे.

6. वाहन चालवताना दुकाने, हॉटेल, रस्ते आणि जंक्शनची नावे सांगण्याचा प्रयत्न करा आणि त्यांचा क्रम आठवा.

7. आपण ज्याला कॉल करू इच्छित आहात, तो मोबाईल नंबर सांगण्याचा प्रयत्न करा.

8. रात्री झोपायच्या आधी सकाळपासून रात्रीपर्यंतची सर्व कामे आठवा. शक्य असल्यास मोठ्याने बोला.

9. आपण दिवसभर केलेल्या चांगल्या गोष्टींची सूची बनवा. आपला मौल्यवान वेळ वाया घालविलेल्या कार्याची नोंद घ्या.

10.'रुविक्स क्यूव' सोडवा. आपण ते कसे सोडवावेस हे माहीत नसल्यास एक विशिष्ट रंग संयोजन मिळविण्याचा प्रयत्न करा.

11.सामान्यतः आपण नेहमी पुढच्या दिशेने चालत आहात, मागे न पाहता ५ मिनिटे मागच्या दिशेने चालत राहिल्यास मेंदूचे संतुलन वाढते. वरील नियमांचे दररोज अनुसरण करण्याचा प्रयत्न करा. आपण निश्चितपणे आपल्या स्मरणशक्तीमध्ये सुधारणा कराल आणि विसर पडणे टाळण्याची मोठी शक्यता आहे. All the Best !!!


Friday 30 October 2020

गावातला पैसा गावातच फिरतो

 


✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

मागील आठवड्यात गाडीचे टायर बदलले तेही ऑनलाईन पेक्षा स्वस्तात आणि वर दुकानात बोलावून एक कप चहा देखील!जेव्हा तुम्ही गावात खरेदी करता तेव्हा ते पैसे गावातच ३४ वेळा फिरतात. लोकल मार्केटमध्ये पैसे फिरले नाही तर गावाची भरभराट कशी होईल? जेव्हा तुम्ही दुकानात जाता आणि खरेदी करता तेव्हा तो दुकानदार नाही तर तेथील सेल्सचा व्यक्ती, सफाईवाला, अकाउंटंट यांचे पगार होतात आणि ते देखील गावातच खरेदी करतात जसे की किराणा ते दैनंदिन गोष्टी. जवळच्या दुकानातुन खरेदी करा. हेच धोरण हवे! महाऑनलाईन सेलच्या आमिषाला बळी न पडता गावातील दुकानातून खरेदी करा. आज स्वतःच्या गावात खरेदी केलेले पैसे गावातच परत फिरतात. कसले ग्लोबल आणि कसले ऑनलाईन!!

●●●●●●●

गैरसमजुतीचा फक्त एकच क्षण खूप धोकादायक ठरू शकतो कारण... काही मिनीटांमध्येच आपण 'एकत्र घालवलेल्या' 'शंभर सुखाच्या क्षणांचा' तो विसर पाडतो...! म्हणून गैरसमज टाळा. जर प्रत्येकाने आपला विचार करताना दुसऱ्यांच्या मानाचा व मनाचा विचार केला तर नात्यात किंवा मैत्रीत कधीच दुरावा किंवा वाईटपणा येणार नाही.

●●●●●●●

सोनू : चिंटू, जगाचा नकाशा नाही घेतलास?

चिंटू : नाहीरे, पप्पा सांगतात की, जग झपाट्याने बदलतयं. म्हणून मी म्हटले जग स्थिर झाल्यावर घ्यायला काय हरकत आहे. घेऊ आरामात बदलल्यानंतर! काय घाई आहे आतापासून?

😂😆😂😅😅😂😆😅😂😆😆

*संकलन-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली*

🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲

समाधान जे आहे त्यात


 🐝🐝🐝🐝🐝🐝🐝🐝🐝🐝🐝

एकदा एक भुंगा गुंजारव करत फिरत होता. तेव्हा त्याला एक चिमणी म्हणाली, 'मूर्खा, तू जो एकसारखा एकच आवाज काढत बसतो तो  कशासाठी? वसंत ऋतूत गाणारी कोकिळा, हिरव्यागार झाडाच्या फांदीवर बसून गाणारा  बुलबुल यांची बरोबरी तुला कधीतरी करता येईल  का? तसे जमत नाही तर भिकार सूर एकसारखा  काढून तू लोकांना कंटाळा का आणतोस?' भुंगा म्हणाला, 'अगं चिमणे, परमेश्वराने या जगात प्रत्येक व्यक्तीत निराळेपणा ठेवला आहे. वैचित्र्य असणे हा जगाचा नियम आहे, दुसऱ्याचा हेवा न करता ज्याने त्याने आपापल्या शक्तीचा उपयोग केला तर त्यात वाईट काय? जेव्हा कोकिळेचे गाणे बंद पडते किंवा बुलबुल मुका होतो तेव्हा एखाद्या सुंदर बागेत निर्जनता भासू न देण्यात माझ्या गरीबाचा उपयोग  होतो.'

तात्पर्य : सर्व मनासारखे होत नाही, तर जे  असेल त्यात समाधानी असावे.

●●●●●●●●

 'घराच्या तुलनेने दरवाजा लहान असतो. दरवाजाच्या तुलनेने कुलूप लहान असते. कुलपाच्या तुलनेत चावी लहान असते, परंतु तीच छोटीशी चावी संपूर्ण घर उघडते. त्याच प्रमाणे आपले आज छोटे वाटणारे विचार मोठ्या यशाचा दरवाजा उघडणार, हे मात्र नक्की...

●●●●●●●●

प्रत्येकाच्या वयाप्रमाणे आदर केलाच पाहिजे, मान दिला पाहिजे. बोलताना शब्दांचा जपून वापर केला पाहिजे.

●●●●●●●●

शब्द दुवा आहे. शब्द दवा आहे, शब्द दावा आहे, शब्द माणुसकीचा ठेवा आहे.

●●●●●●●●

आपल्याला किती लोक ओळखतात याला महत्त्व नाही, तर ते आपल्याला का ओळखतात, याला महत्त्व आहे.

●●●●●●●●

गुरुजी : मुलांनो, पाण्याचा अपमान कसा कराल ?

बंड्या : पाणी गरम करायचं आणि अंघोळच नाही

करायची...

😆😅😆😅😆😅😂😅😆😂😅

*संकलन-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली*

🐰🐰🐰🐰🐰🐰🐰🐰🐰🐰🐰

रेहेकुरी अभयारण्य


नगर जिल्ह्यात कर्जत तालुक्यात  रेहेकरी काळवीट  आहे. हरणांच्या कुरंग गटातील काळविटांसाठी ते आरक्षित आहे. काळवीट रक्षणाचा कायदा झाल्यानंतर १९८०मध्ये या अभयारण्याची स्थापना झाली. याचे क्षेत्रफळ २.१७ चौरस किलोमीटर इतके आहे.येथील माळरानात लावलेल्या विविध प्रकारच्या गवतात शेकडो काळवीट  बागडत आहेत. खुरटी झुडपं आणि गवताळ  प्रदेशात राहणारा काळवीट हा अॅटलोप वर्गातील  आहे. काळविटाखेरीज येथे माळठिसकी,  म्हणजे चिंकारा (इंडियन गझेल) हा तांबूस  पिंगट रंगाचा प्राणी दिसतो. गवतात चरणारे,  खुल्या माळरानावरून धावणारे काळवीट आणि  चिंकारा पाहणे आनंददायी असते. वेगाने धावणारे व दुडुदुडु उड्या मारणारे  हरीण सर्वांना आवडते. हरणांमध्ये दिसायला  सुंदर, वेगवान आणि चपळ अशी काळविटाची  ओळख आहे. या अभयारण्याचा बहुतांश भाग  गवताळ कुरणे आणि बाभळीच्या झाडांनी  व्यापला आहे. रेहेकुरी अभयारण्य काळविटांमुळे  पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनले आहे.  महाराष्ट्रासह अन्य राज्यांतील पर्यटकही येथे काळवीट पाहण्यासाठी येतात. पर्यटकांना  काळविटाबरोबरच कोल्हा, लांडगा, चिंकारा, साळिंदर, लांडगा,  तरस, मुंगूस, खोकड आदी वन्यप्राण्यांचेही दर्शन घडते. वनस्पतींमध्ये कडुनिंब, बोर, तरवड, खैर, हिवर, बोर, बाभूळ, मारवेल, डोंगरी, कुसळी, पवन्या आदी झाडांबरोबरच अभयारण्यात झाडे आणि झुडपांच्याही विविध प्रजाती आहेत.प्रमुख पक्ष्यांमध्ये घार, भारद्वाज, चंडोल, सुतार, तितर,  माळढोक, कापशी, सातभाई इत्यादींचा समावेश आहे. अभयारण्याच्या परिसरात १९८०मध्ये काळविटांच्या संख्येत कमालीची घट होऊन केवळ १५ ते २० काळवीट उरले होते. त्यामुळे काळविटांचे संरक्षण करण्याच्या खास हेतूने हा परिसर अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आला आहे.

रेहेकुरी अभयारण्य हे शुष्क काटेरी वन या प्रकारामध्ये येते. या अभयारण्याचा परिसर प्रामुख्याने गवताळ असल्याने या परिसरातून चालण्याचा वेगळाच आनंद पर्यटकांना घेता येतो. त्याचप्रमाणे पर्यटक येथे दुर्बिणीद्वारे काळवीट व इतर प्राणी पाहण्याचाही आनंद घेतात. शिवाय रेहेकुरी अभयारण्याजवळ भेट देण्यासारखी इतरही ठिकाणे आहेत. अभयारण्याजवळच असलेल्या भिगवण येथील तलावावर विविध फ्लेमिंगोंसह स्थलांतरित व मूळ रहिवासी असलेले विविध जलपक्षी पाहण्याचा अनुभव घेता येतो. सिद्धटेक येथे अष्टविनायकांपैकी एक असलेले सिद्धिविनायकाचे मंदिर आहे. रेहेकुरी अभयारण्याचे क्षेत्रफळ कमी आहे. सुरुवातीला काळविटांची संख्या कमी असल्याने फारशी अडचण येत नव्हती. मात्र, काळविटांची संख्या वाढत असल्याने अभयारण्य त्यांच्यासाठी अपुरे पडत आहे.


महान व्यक्ती कशी असते?


महान व्यक्ती काय करतात? सामान्य व्यक्ती ज्या गोष्टींमध्ये आपला वेळ दवडतात त्या गोष्टींमध्ये महान लोकं कधीच अडकत नाहीत. काही लोक जे करायचंय ते क्षणात करतात आणि जे नाही करायचंय ते लगेच नाकारतात. उगीच चिंता करत नाहीत. असं केलं असतं तर बरं झालं असतं, तसं नसतं केलं तर बरं झालं असतं असं काही त्यांच्या डोक्यात नसतं. एक सामान्य माणूस त्याचा सगळा वेळ फक्त चिंता करण्यातच व्यर्थ घालवत असतो. कोणत्याही क्षेत्रामध्ये शिखर गाठणे सोपे नाही. साहित्य, संस्कृती, कला, व्यवसाय आणि समाजसेवा आणि इतर कोणत्याही क्षेत्रात जर शिखर गाठायचं असेल तर संघर्ष अनिवार्य आहे. त्यासाठी महानता प्राप्त करण्यासाठी काही गुण अंगभूत असणं गरजेचं आहे. काही लोकं कोणतंही कार्य करण्याआधी स्वत:चा स्वार्थ पाहत असतात. त्यामुळे समाजाचे हित होईल का, इतरांचे भलं होईल का, याचा ते विचारच करत नाहीत. समाजाचे, राष्ट्राचे नुकसान होत असेल, पण आपला फायदा होत असेल तरीसुद्धा ती लोकं हे कार्य करतात. महान लोक स्वत:चे नुकसान होत असेल तरीही समाजाचे, राष्ट्राचेही हित साधतात. स्वार्थाची संकुचित विचारसरणी ठेवत नाहीत. उत्साहींचा एक शेर महान लोकांमधील त्यागाच्या गुणाचे वर्णन करतो-ऐ हवाओं के झकोरों कहां आग लेके निकले, मेरा गांव बच सके तो मेरी झोपडी जलादो. हा विचार, ही भावनाच माणसाला महान बनवते. जगाचं हित साधण्याचा जोश आपल्यामध्ये असायला हवा. स्वत:वर प्रेम करायला भाग पाडणारा मोह माणसाला कधीच महान बनवत नाही. महान लोकांच्या स्वभावात एक साधेपणा असतो. आपल्या विरोधकांनाही आपलेसे करण्याची ताकद महान लोकांमध्ये असते. आपण एखाद्या गोष्टीची, व्यक्तीची अवहेलना केली, तर ती आपल्याकडे का येईल? ती निश्‍चितच येणार नाही. आपण जर दुसर्‍यांच्या संपत्तीचा, गुणांचा द्वेष करायला लागलो तर ते कधीच आपल्याशी चांगले वागणार नाहीत. म्हणून महान लोकं सगळ्यांशी चांगले वागतात. कोणालाच दुखवत नाहीत. सामान्य माणसं आपली सगळी ऊर्जा दुसर्‍यांची टर उडवण्यात वाया घालवतात. महान माणसं मात्र त्याच ऊर्जेचा योग्य वापर करतात. ती सत्कारणी लावतात. महान लोकांचे हे गुण अंगी बाणले तर आपणही निश्‍चित आयुष्यात यशस्वी होऊ शकतो.

●●●●●

जर आपत्तींचा विचार केला तर तो येईल. जर तुम्ही  मृत्यूबद्दल गांभीर्याने विचार करत असाल  तर तुमचा  आपल्या मृत्यूच्या दिशेने वाटचाल सुरू झाली समजा.जेव्हा आपण सकारात्मक आणि स्वेच्छेने विचार करतो, तेव्हा आपला विश्वास  आणि निष्ठा यांच्याबरोबर  तुमचे जीवन सुरक्षित होऊन जाईल.

●●●●●●●●

आपल्या किंमतीचा आणि हिंमतीचा अंदाज कधीच कोणाला सापडू द्यायचा नसतो. कारण समोरचा नेहमी आपल्या या दोनच गोष्टी शोधत असतो.

●●●●●●

राहूल : पप्पू .....! काय करतो रे तू आज काल ?

पप्पू : मी MBBS करतोय 

राहूल (हसुन) : तुला बघलं तेंव्हा तू शेतात

असतोस अन् MBBS कधी करतोयस ....?

पप्पू : MBBS म्हणजे " म्हशी बघत बघत शेती

Thursday 29 October 2020

गिधाडे:निसर्गातील सफाई कामगार


गिधाडे हे निसर्गातील सफाई कामगार असतात. त्यांना स्वच्छतादूत म्हटलं जातं. गिधाडे ही अन्न साखळीतील महत्त्वाचा दुवा आहेत.  निसर्गाची जीवनसाखळी एकमेकांवर अबलंबून आहे. या साखळीत गिधाडांचेही महत्त्वाचे स्थान आहे.गिधाडांचे मुख्य खाद्य हे मृतदेहांचे मांस असते. उत्क्रांतीमध्ये  त्यांच्या शरीरात अनेक बदल झाले आहेत. त्यांची ठेवण इतर शिकारी पक्ष्यांसारखी  जरी असली तरी त्यांना शिकार करण्याचे कौशल्य फारच कमी असते. त्यांच्या डोक्यावरची पिसे नसतात. डोक्यावर पिसे नसल्याने मृतदेहाच्या आतमध्ये डोकावून मांस खाणे सोपे जाते. राज्यात प्रामुख्याने पांढरे शुभ्र, लांब आणि बारीक चोच असलेल्या प्रजातीची गिधाडे आढळतात. मात्र आता त्यांची संख्या घटली आहे. राज्यात गडचिरोली जिल्ह्यात सर्वाध‌िक गिधाडे असून नाशिक, पेंच, चंद्रपूर, रोहा, कोल्हापूर येथेही त्यांची नोंद आढळते.  १९९० ते २००९ या काळात जगभरात ९९ टक्के गिधाडे नष्ट झाली. रॉयल सोसायटी आॅफ प्रोटेक्शन आॅफ बर्ड (इंग्लंड), पेरिग्रीन (इस्रायल), बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (भारत) या संस्थांनी सर्वेक्षण केले. हा पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे लक्षात येताच आंतरराष्ट्रीय पातळीवरील काही संस्था आणि इंग्लंडच्या हॉक कॉन्झर्व्हेटरी ट्रस्ट यांनी संयुक्तपणे ५ सप्टेंबर २००९ रोजी ‘आंतरराष्ट्रीय गिधाड जनजागृती दिवस’ सुरू केला.
 सध्या देशात साधारण १९ हजार, तर राज्यात केवळ ८०० गिधाडे आहेत. त्यामुळे रामायणात सीतेला वाचविण्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या गिध कुळातील जटायूला मिळालेला सन्मान आज पुन्हा मिळवून देण्याची गरज आहे. गुरांना देण्यात येणाऱ्या डायक्लोफ‌िनॅक औषधामुळे गिधाडांचा मृत्यू होत आहे. त्यापेक्षाही धक्कादायक म्हणजे मलेरियामुळे राज्यात गिधाडांचा मृत्यू झाल्याचे एनएडब्ल्यूएआरने आपल्या एका संशोधनात मागे उघड केले होते. त्याचबरोबर अधिवासाची कमतरता, खाद्याचा अभाव तसेच प्रदूषणयुक्त अन्न पाण्यामुळेही अनेक गिधाडांचा मृत्यू होत असल्याची माहिती समोर आली आहे.  निसर्गाचे स्वच्छतादूत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिधाडांची संख्या दिवसेंदिवस कमी होऊ लागल्याने जैवसाखळी तुटण्याचा धोका निर्माण झाला असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे मानवी अस्तित्वासमोरही प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले असून यासाठी ठोस पावले युद्धपातळीवर राबविण्याची गरज आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

सर्वात लांबीचा समुद्रावरील पूल


जगातील सर्वात लांब असलेला सागरी पूल चीनमध्ये आहे. चीनची मुख्य भूमी आणि हाँगकाँग यांना जोडणारा हाँगकाँग-झुहाई-मकाऊ हा जगातील सर्वात लांब सागरी पूल असून तो ऑक्टोबर २०१८ मध्ये वाहतुकीस खुला करण्यात आला. पर्ल नदीच्या मुखापाशी लिंगडिंगयांग उपसागरात बांधलेला हा पूल ५५ कि.मी. लांबीचा असून, त्याचे काम डिसेंबर २००९ मध्ये सुरू झाले होते.अब्जावधी डॉलर खर्च करून बांधलेल्या या पुलामुळे हाँगकाँग व झुहाई या दोन शहरांमधील प्रवासाचा वेळ तीन तासांऐवजी अवघ्या ३० मिनिटांत करता येईल जेणेकरून पर्ल खोऱ्यातील ही दोन प्रमुख शहरे अधिक जवळ आली आहेत. ही दोन शहरे सोडली तरी चीनमधील आणखी ११ शहरांमधून हा पूल जातो.

हा पूल भूकंप, वादळ आणि माल वाहतूक करणाऱ्या बोटींपासूनही सूरक्षित राहू शकतो. चीनच्या ग्रेटर बे परिसरात हा पूल असून जवळपास ५६ हजार ५०० चौरस किलोमीटरचा परिसर हा पूल व्यापतो.

या पूलाच्या बांधणीसाठी ८ अब्ज डॉलरचा खर्च आला आहे. हाँगकाँग- झूहाई-मकाऊ या पूलाचं वैशिष्ट्य म्हणजे यात समुद्राखालील बोगदा असणार आहे.  या पूलाच्या बांधणीसाठी ४ लाख २० टन स्टीलाचा वापर केला आहे. तर भूयारी मार्गासाठी ८० हजार टन पाईप वापरले आहेत. यापूर्वीही चीनमध्ये आणखी दोन सर्वात लांबीचे समुद्र पूल बांधण्यात आले आहेत. लांबीच्या बाबतीत या दोन्ही पुलांचा विक्रम या बनविण्यात हाँगकाँग-झुहाई-मकाऊ या पुलाने मोडला आहे. यापूर्वी उभारण्यात आलेला  समुद्रातील पूल अत्याधुनिक तत्रंज्ञानाने बांधला आहे. 'किंगडाओ-जियाओझोऊ बे' असे पुलाचे नाव असून तो आठ पदरी बांधण्यात आला आहे. या पुलाची एकूण लांबी ३६.४८ किलोमीटर एवढी आहे. या पुलाला २.३ अब्ज डॉलर खर्च आला आहे. या पुलाचे काम मे २००७ पासून चालू होते.

किंगडाओ शहराचे हा पुल झाल्यामुळे शेजारील हुआंगडाओ जिल्ह्याला जोडणार आहे. याच्यापूर्वी पूर्व चीनमधील झियांग प्रांतातील झियांगजिंग व निंग्बो शहराला जोडणारा ३६ किलोमीटर लांबीचा हांगझोऊ येथे सागरी सेतू (पुल) दुनियाचा सर्वात मोठा मानला जात होता. त्यानंतर  चीनमध्येच ३६.४८ किमीचा सागरी सेतू बनवून चीनने आपला विक्रम मोडत जगातील सर्वात लांब सागरी पुल उभारण्याचा विक्रम नोंदवला होता. आता तिसऱ्यांदा हा विक्रम चिननेच मोडला आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

भीमाशंकर अभयारण्य


भीमाशंकर हे सह्याद्री पर्वतरांगांतल्या 'उत्तुंग शिखरावर पसरलेले घनदाट अभयारण्य. बारा ज्योतिर्लिंगांपैकी  सहावे ज्योतिर्लिंग येथे आहे. त्यामुळे येथे देशभरातून भाविक दर्शनासाठी येतात. खारीच्या कुळातील दिसणारी मोठी खार म्हणजे शेकरू ही या जंगलाची ओळख आहे. शेकरूच्या रक्षणासाठीच  खास या अभयारण्याची स्थापना झाली आहे. भीमा नदीचा 
उगमही इथून झाला आहे.  भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यातील एकमेव अभयारण्य  आहे. पुणे, अलिबाग, ठाणे येथील वनक्षेत्राचा अभयारण्यात समावेश होतो. येथे सदाहरित जंगल  आहे.  पुणे  जिल्ह्यात खेड व आंबेगाव तालुक्यांच्या हद्दीवर हा  परिसर आहे. भीमाशंकरचे मंदिर कोरीव काळ्या  दगडामध्ये बाराव्या शतकाच्या मध्यकाळात बांधलेले आहे. या मंदिराची रचना हेमाडपंती शैलीची असून, सुंदर कोरीव मूर्ती येथे पाहावयास मिळतात.  भीमाशंकर हे ठिकाण तीर्थक्षेत्राबरोबरच पर्यटन  क्षेत्र म्हणून लोकांना आकर्षित करते. निसर्गाची  मुक्त उधळण या परिसरात पाहावयास मिळते.  जंगलात प्राणी, पशू, पक्षी, रंगीबेरंगी फुलपाखरे  आढळतात. या जंगलात अनेक औषधी वनस्पती  आहेत. पावसाळ्यात सतत धुक्याने हा परिसर  व्यापलेला असतो. येथील अभयारण्य १३०.७८  चौरस किलोमीटरमध्ये पसरलेले आहे. येथील  जंगल सदाहरित गर्दहिरव्या झाडांनी पसरलेले आहे.  भीमाशंकर हे ठिकाण समुद्रसपाटीपासून सुमारे तीन  हजार तीनशे फूट उंचावर आहे. त्यामुळे पावसाळी  प्रदेश, थंड हवेचे ठिकाण व कड्यावरून नजरेच्या  टप्प्यात येणारा सभोवतालचा परिसर पर्यटकांना  आकर्षित करतो.
भीमाशंकर मंदिर व जंगल परिसरात अनेक ऐतिहासिक वास्तू व ठिकाणे आहेत. यामध्ये  मंदिराबाहेर असलेली पोर्तुगीज काळातील घंटा,  घंटेला लागून असलेले शनी मंदिर, मंदिराजवळचे  गोरक्षनाथ मंदिर, पायऱ्यांच्या सुरुवातीला असलेले कमलजादेवी मंदिर ही प्राचीन मंदिरे आहेत. तसेच, भीमाशंकर अभयारण्यात हनुमान तळे या ठिकाणी हनुमान व अंजनी मातेचे मंदिर आहे. जंगलात गुप्त भीमाशंकर हे ठिकाण असून, येथे साक्षी विनायकाचे मंदिर आहे. भोरगड हे ठिकाण भीमाशंकर जंगलात असून, येथे जुन्या काळातील लेण्या आहेत. भोरगडाच्या पायथ्याला कोटेश्वराचे मंदिर आहे. हे मंदिरही प्राचीन काळातील असून, येथे अनेक देवदेवतांच्या मूर्ती आहेत. भीमाशंकर परिसरात कुठेच किल्ले नाहीत व लेण्या आढळत नाहीत. मात्र, भोरगड हा एकमेव किल्ला व या किल्ल्यावर लेण्या आहेत.
या ठिकाणांबरोबरच कोकणकडा, वनस्पती पॉइंट, नागफणी, भाकादेवी, भट्टीचेरान, कोथरने, मंदोशी, पोखरी, कोंढवळ परिसरातील धबधबे ही ठिकाणे पाहण्यासारखी आहेत. पावसाळ्यात देवदर्शन व पर्यटन, असे दोन्ही उद्देश सफल होत असल्याने लाखोंच्या संख्येने पर्यटक भीमाशंकरकडे येत असतात. येथे आल्यानंतर पावसाचा मनमुराद आनंद घेतात.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

सरदार पटेल


भारतीय स्वातंत्र्य-आंदोलनातील एक ज्येष्ठ नेते व स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल जन्म ३१ ऑक्टोबर १८७५ रोजी लेवा पाटीदार शेतकरी कुटुंबात करमसद (खेडा जिल्हा) येथे झाला. त्यांच्या आईचे नाव लाडबाई. विद्यार्थिदशेतच त्यांनी विद्यार्थ्यांची संघटना उभी करून एका कठोर शिक्षकाविरुद्ध तीन दिवसांचा यशस्वी संप घडवून आणला. प्राथमिक शिक्षण करमसद येथे घेऊन पुढील शिक्षण त्यांनी पेटलाड, बडोदा व नडियाद येथे घेतले. विद्यार्थिदशेतच जव्हेरबाई यांच्याबरोबर त्यांचा विवाह झाला (१८९१). १८९७ साली नडियादहून ते मॅट्रिक झाले. घरच्या गरिबीमुळे त्यांना महाविद्यालयीन शिक्षण घेता आले नाही. त्यांचे वडीलबंधू विठ्ठलभाई बॅरिस्टर होण्यासाठी १९0५ मध्ये इंग्लंडला गेले. त्यानंतर ते बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंडला गेले. या परीक्षेत त्यांचा पहिला क्रमांक आला व ५0 पौडांचे पारितोषिक मिळाले. १९१३ साली ते परत आले व अहमदाबादला त्यांनी वकिली सुरू केली. प्रारंभी ते लोकमान्य टिळकांच्या जहाल पक्षात सामील झाले. त्यांचे प्रारंभीचे जीवन काहीसे विलासी व चैनीचे होते. क्लब, पत्ते खेळण्यात उरलेला वेळ घालवत. महात्मा गांधी अहमदाबादला येईपर्यंत त्यांची ही दिनचर्या चालू होती; पण गांधीच्या सहवासाने ते पूर्णत: बदलले (१९१७). महात्मा गांधी गुजरात सभेचे अध्यक्ष व वल्लभभाई चिटणीस झाले. त्यांनी १९१७-१८ सालच्या खेडा सत्याग्रहात हिरिरीने भाग घेतला आणि तो यशस्वी करून दाखविला. अहमदाबाद नगरपारिकेत ते याच वर्षी निवडून आले. पुढे तर १९२४-२८ दरम्यान ते नगरपालिकेचे अध्यक्ष झाले. त्यांनी अनेक सुधारणा करून अहमदाबाद शहर स्वच्छ व सुंदर केले. रौलट कायद्याचे वेळी त्यांनी आक्षिप्त राष्ट्रीय साहित्य विकले व सार्वजनिक निदर्शनांत भाग घेतला. गांधींच्या असहकारितेत्या चळवळीत वल्लभभाई आघाडीवर होते. त्यांनी सुखासीन राहणीमानाचा त्याग केला व तत्काल वकिली सोडली. या सुमारास दहा लाखांचा निधी गोळा करून गुजरात विद्यापीठाची स्थापना केली (१९२0). १९२१ साली ते गुजरात प्रांतिक काँग्रेसचे अध्यक्ष झाले आणि लवकरच अहमदाबाद काँग्रेस अधिवेशनाचे ते स्वागताध्यक्ष बनले. 

१९२३ सालच्या नागपूर झेंडा सत्याग्रहात त्यांच्याकडे नेतृत्व होते. त्यांनी तो सत्याग्रह यशस्वी केला. बोरसद सत्याग्रहातही ते यशस्वी झाले. १९२७ साली ते नगरपालिकेचे अध्यक्ष असताना गुजरातमध्ये जलप्रलय झाला. पूरग्रस्तांना मदत करण्याच्या कामी त्यांनी केलेली कामगिरी अविस्मरणीय आहे.

स्मार्ट मोटारगाड्या


सध्या मोबाईल फोनप्रमाणेच मोटारागाड्याही स्मार्ट व स्वयंचलित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञान विकसित केले जात आहे. इस्त्रायलबरोबर अनेक देश-कंपन्या पुढे सरसावल्या आहेत. शेवटी हा सगळा उद्योग माणसाला आरामदायी प्रवास करता यावा,यासाठी चालला आहे. रस्ता अपघातात मृत्यूचे प्रमाण आणि जायबंदी होण्याचे प्रमाण चिंता करण्यासारखे आहे. खरे तर मोटारगाड्या चालवताना चालकाला सदैव सावध राहावे लागते. गाडीखाली कुणी येणार नाही,गाडीची अन्य वाहनाशी टक्कर होणार नाही.कुठेतरी जाऊन कार आदळणार नाही. अनावधानाने लाल सिग्नल ओलांडून कार पुढे जाणार नाही. वगैरे काळज्या चालकाला घ्याव्या लागतात. पण ही सर्व कामे स्वतःहून व्हायला लागली तर कुणाला नको आहे. आणि खरोखर तसाच प्रयत्न आज जगभर चालला आहे. गुगलने चालकविरहीत मोटारगाडी तयार केली, पण तिला अपघात झाला. पण तरीही प्रयत्न सुरूच आहे. इस्त्रायलमध्ये चालकाला गाडी चालवताना फार कष्ट घ्यावे लागू नयेत किंवा चालकाला मदत व्हावी, अशी स्वयंचलित यंत्रणा तयार केली जात आहे. यासाठी रडार,लेसर,ब्लुटूथ तंत्राचा वापर होतोय, शिवाय मोटारगाड्या विजेवर चालाव्यात यासाठीही हे स्टार्टअप प्रयोग करत आहेत. मोटारगाडीचा अपघात होण्याच्या हजारावर शक्यतांचा अभ्यास करून ते टाळण्याचे उपाय शोधण्यात येत आहेत. मोटारागाडीच्या आसपास येणारी वाहने ,माणसे , आसपासचे विजेचे खांब,झाडे, अन्य अडथळे, समोरून येणारी वाहने, मागून येणारी वाहने, त्यांचा वेग, ओव्हरटेक करताना होणारे अपघात हे सर्व टाळण्यासाठी नवे तंत्रज्ञान वापरून गाडया स्मार्ट बनवल्या जात आहेत. परंतु तेवढ्यावरच न थांबता अचानक, अकस्मात व अनपेक्षित पद्धतीने होणारे अपघात कसे टाळावेत यावरही स्टार्टअप्स अधिक संशोधन करत आहेत. म्हणजे समोरून अचानक पाण्याचा किंवा पुराचा लोंढा आला तर मोटारगाडी स्वतः या संकटाचे विश्लेषण करून  गाडीला अपघातापासून वाचवू शकेल. दरी, बर्फ पडून रस्ता झाकला गेला असेल तर मोटार त्यातून मार्ग काढू शकेल का, वाहनांसमोर येणारे खड्डे, अन्य अडथळे यांचे एकदम विश्लेषण करून गाडी स्वतःहून निर्णय घेऊन संभाव्य अपघात टाळू शकेल का, यावरही संशोधन चालू आहे.  कारच्या विश्वात मोठे क्रांतिकारी बदल दिसत आहेत. सध्याच्या घडीला कारमध्ये बिल्ट इन आणि एक्सेसरीजसारख्या काही उपयोगी फिचर्स जोडले जात आहेत. उपयोगी गॅझेट्स इंस्टॉल करून कारला सुपर स्मार्ट कारमध्ये परिवर्तन करता येऊ शकते. क्यूएनएक्स, टेक्सास इन्स्ट्रूमेंट्स, डेलफी आणि एनवीडियासारख्या कार कंपन्या अशा गॅझेट्सचा वापर करत आहेत. आणखी संशोधने टप्प्याटप्प्याने गाड्यांमध्ये येतील आणि वाहन चालवणेदेखील सुलभ होऊन जाईल. अशी प्रगती कुणाला नको आहे? -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

झाडाची सोबत


शेती सुरक्षित राखायची असेल तर यावर्षी शेतात प्रती एकर कमीतकमी २० झाडे लावा. अन्यथा हवामान बदलामुळे शेती बरबाद होईल, एक झाड ५० वर्षांत ३५ लाख रूपये किंमतीचे वायु प्रदूषण टाळते. एक झाड १५ लाख रुपये किंमतीचे ऑक्सिजन उत्पादन करते. एक झाड ४० लाख रूपये किंमतीचे पाण्याचे रिसाइक्लिंग करते. एक झाड १ वर्षांत ३ किलो कार्बनडाय ऑक्साईडचा नाश करते. एक परिपूर्ण झाड १००० हजार माणसांचे जेवण शिजवण्यासाठी उपयोगी येते. एक झाड आसपासच्या परिसरातील तापमान २ अंशाने कमी करते. एक झाड १२ विद्यार्थ्यांना वह्या व पुस्तके तयार करण्यासाठी उपयोगी पडते. एका झाडापासून कुटूंबासाठी लाकडी सामान तयार होते. एका झाडावर १०० पक्षी घरटे बांधून राहू शकतात व त्याच्यावर त्यांच्या २५ पिढ्या जन्माला येतात आणि मधमाश्यांचे पोळे झाडावर असल्यास तीच संख्या लाखावर जाते. एक झाड १८ लाख रूपये किंमतीचे जमिनीची धूप थांबवते.

एक झाड माणसाला लहानपणीच्या पांगुळगाड्या पासुन ते आराम खुर्ची पर्यंत तसेच वार्धक्यातील हातातील काठी पासुन स्मशानातील लाकडा पर्यंत साथ देते. एक झाड आपल्या पालापाचोळयाची भर टाकून जमिनीची कस वाढवते. एक झाड फळ, फुल, बिया आपल्यासाठी देते.

●●●●●●●●

★ डोळे बंद केले म्हणून, संकट जात नाही. आणि संकट आल्याशिवाय डोळे उघडत नाहीत. राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं, तर जगातल्या सर्व समस्या दूर होतात.

●●●●●●●●

गुरुजी : काय समजले नसेल तर विचारा...

बंड्या : गुरुजी फळा पुसल्यावर फळ्यावरील अक्षरे कोठे जातात?

*संकलन-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि.सांगली*

तांब्याच्या भांड्यातील पाण्याचे सेवन आरोग्याला लाभदायी


पूर्वीच्या काळी घरोघरी तांब्याच्या घागरी, हंडे, तांब्या, जग अशी भांडी हमखास दिसायची. काळ बदलला तसे तांब्याची भांडी घरातून कमी झाली. वास्तविक तांब्याच्या भांड्यात पाणी साठवून ठेवणे, आरोग्याच्या दृष्टीने लाभकारक आहे. आज ज्या कुटुंबांना तांब्याच्या भांड्यांचे महत्त्व माहीत आहे,त्या घरात मात्र आपल्याला तांब्याची भांडी दिसून येतात. आता संपूर्ण तांब्याची भांडी दिसत नाही, तर वरून स्टील आणि आतून तांबे असलेली भांडी बाजारात दिसून येतात.  कारण तांब्याची भांडी महाग आहेत. असे असले तरी काही घरात आपल्याला हमखास तांब्याची भांडी दिसून येतात. तांब्याच्या भांड्याचा उपयोग म्हणजे त्यामध्ये पाणी साठवून ते पिणे. तांब्याच्या भांड्यातून पाणी पिणे शास्त्रीयदृष्ट्या आधार आहे. तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी साठवून ते प्यायल्याने पाण्यामधील रोगकारक सूक्ष्मजंतू कमी होतात, असे आढळून आले आहे. या प्रक्रियेला  'ऑलिगोडायनॅमिक इफेक्ट' असे म्हटले जाते. हा धातूंचा  प्रभाव, विशेषतः जड धातू, अगदी कमी तीव्रतेमध्ये देखील होतो. पाणी तांब्याच्या भांड्यात किंवा बाटलीत साठवले जाते, तेव्हा काही प्रमाणात त्यातील रेणू किंवा 'कॉपर आयर्न' पाण्यामध्ये उतरतात. ते पाण्यामधील जंतूंना बांधले जातात आणि ते सूक्ष्मजंतूंच्या पेशींचे आवरण नष्ट करतात व परिणामी पाण्यातील जंतू नष्ट होतात. एका अभ्यासानुसार, तांब्याचा हा मानवी उपयुक्त प्रभाव पाण्यात असण्याऱ्या ई. कोलाई, व्ही. कॉलरा आणि एस. फ्लेक्सनेरी अशा अनेक जंतूंवर होतो हे सिद्ध झालेले आहे. एका अभ्यासात हे जिवाणू पाण्यामध्ये मिसळून ते १२ तास तांब्याच्या भांड्यात ठेवण्यात आले व १२ तासांनंतर त्याची वाढ होते का, हे तपासण्यात आले. तांब्याच्या भांड्यात ठेवण्यात आलेल्यापाण्यामध्ये जिवाणूंची वाढ दिसली नाही. म्हणजेच, तांब्याच्या भांड्यात साठवल्या गेलेले पाण्यामध्ये जंतू नष्ट होण्यास किंवा त्यांची वाढ रोखण्यात मदत होते.

पाणी किती वेळ साठवावे?

पाण्यातल्या जिवाणूंवर प्रभाव होण्यासाठी १२ ते २४ तास ते पाणी तांब्याच्या भांड्यात साठवावे, असे अभ्यासात आढळले. पाणी ६ तासांपेक्षा कमी ठेवल्यास त्याचा ऑलिगोडायनॅमिक परिणाम खूप कमी होतो व त्याचा जास्त उपयोग होत नाही. कॉपर शरीराला जास्त प्रमाणातही चांगले नाही. तांब्याच्या भांड्यात साठलेल्या पाण्यात तांब्याचे प्रमाण जागतिक आरोग्य संघटनेच्या परवानगी मर्यादेत असावे. तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवल्यास त्याचा पीएच वाढतो; म्हणजेच ते पाणी थोडे अल्कलीधर्मीय किंवा कमी आम्लधर्मीय होते. शुद्ध पाण्याचा सरासरी पीएच ७ असतो, जो आम्ल आणि अल्कलीचा मध्य मानला जातो. अल्कली पाणी पिण्याने शरीराला अनेक फायदे होतात, असे मानले जाते.

चांदीच्या भांड्यात काय होते?

तांब्याबरोबर चांदीच्या भांड्यात पाणी साठून त्याचा जिवाणूंवर होणाऱ्या परिणामाचाही अभ्यास केला गेला. प्रसिद्ध झालेल्या शोधनिबंधामध्ये जिवाणू असलेले पाणी तांब्याच्या व चांदीच्या भांड्यात ठेवून ते ६, १२ व २४ तासांनी तपासण्यात आले. प्रत्येक वेळी किती टक्के जिवाणू तुलनेत किती कमी होतात, हे तपासले गेले. त्यानुसार चांदीचे भांडेतांब्याच्या भांड्याच्या तुलनेत पाण्यातील जिवाणू सरासरी १० टक्के कमी नष्ट करते, असे आढळून आले.



हिटलरचा मृत्यू...


असं  म्हणतात  की,  जर्मनीमध्ये  एक ज्यू  ज्योतिषी  फार  प्रसिद्ध  होता. भूत-वर्तमान-भविष्याचे अचूक ज्ञान त्याला   होते.   तो   अनेक   नाझी अधिकार्‍यांना आणि सेनाधिकार्‍यांना भविष्य  सांगायचा,  त्यामुळे  त्याची जर्मनीतून   सुटकाही   होत   नव्हती आणि   तो   ज्यू   असूनही   त्याची कॉन्सन्टरेशन    कॅम्पमध्ये    रवानगी झाली नव्हती. त्याची ख्याती हिटलरपर्यंत पोहोचली आणि त्याला एक दिवस  हिटलरचे  बोलावणे  आले.  एका  सहायकाला  बरोबर  घेऊन  तो हिटलरकडे  गेला.  हिटलरने  त्याला  एकच  प्रश्‍न  विचारला,  माझा  मृत्यू कधी  होणार?  त्याने  उत्तर  दिले,  माझा  मृत्यू झाल्यानंतर  तीन  दिवसांनी  तुमचा  मृत्यू होणार.  हिटलर  म्हणाला,  आणखी  काही सांगता    येणार    नाही    का    माझ्या मृत्यूदिनाबद्दल.    ज्योतिषी    म्हणाला, तुमचा मृत्यू ज्यूंच्या एका पवित्र दिवशी होईल. परतीच्या वाटेवर सहाय्यकाने विचारले, तुम्ही आज काही वेगळीच उत्तरे  दिलीत.  ती  का?  ज्योतिषी म्हणाला, हिटलरचा मृत्यू माझ्या मृत्यूनंतर तीन दिवसांनी होणार, असे मी एवढ्यासाठीच सांगितलं की, आता हिटलरचे लोक मी ज्यू असूनही माझा मृत्यू होऊ नये, यासाठी प्रयत्नशील राहतील. सहायक म्हणाला, आणि तो ज्यूंचा पवित्र दिवस कोणता? ज्योतिषी म्हणाला, अरे गधड्या, हिटलर कोणत्याही दिवशी मेला, तरी तो ज्यूंसाठी पवित्र दिवसच नसेल का?

●●●●●●●●

आयुष्यात कितीही समस्या येवू द्या .त्यांच्या कडे पाहताना सकारात्मक दृष्टीकोनातून  "गंभीर " होऊन नव्हे तर " खंबीर " होऊन आव्हानात्मक दृष्टीने पहा. त्याच्या कडे " "गंभीर " होऊन पाहील्या तर समस्या या लांबून जड वस्तूने भरलेल्या पोत्यासारख्या वाटतात.  आणि " खंबीर " होऊन पाहील्या तर कापसाने भरलेल्या पोत्या सारख्या वाटतील. फरक फक्त दृष्टिकोनाचा आहे तुम्ही त्याकडे कोणत्या दृष्टिने पाहता, त्याप्रमाणे त्याचा अर्थ बदलतो.

●●●●●●●●

समुद्राने झर्‍याला हिणवून विचारले,  'झरा बनून किती दिवस राहणार, तुला समुद्र नाही का बनायचं?'

त्यावर झर्‍याने शांततेत उत्तर दिले, 'मोठे होऊन खारे बनण्यापेक्षा, लहान  राहून  गोड  बनणे  कधीही चांगले.  कारण  तिथे वाघ  पण वाकुन पाणी पितो.'

●●●●●●●●

सहा   मित्रांनी   शरद   पवारसाहेबांना किडनॅप   केलं.   किडनॅपनंतर   त्यांना अर्धा  तासानंतर  कळलं,  आपल्यातले चार  जण  पवार  साहेबांबरोबर  आहेत.

उरलेल्या  दोन  जणांना  कळून  चुकलं आपण किडनॅप झालोय.

●●●●●●●●

राहूल्या : जर  मी  या  नारळाच्या झाडावर चढलो तर       मला इंजिनीयरींग कॉलेजच्या मुली दिसतील का रं?

आज्या : हो ..कि लेका आणि जर हात सुटला    तर    मेडिकल कॉलेजच्या पण दिसतील.

संकलन-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

Wednesday 28 October 2020

घामाचा पैसा


एका शेठजींचा मुलगा, अजू खूप आळशी होता. घरात गडगंज संपत्ती आणि एकुलता एक म्हणून लाडका, काम त्याला कधी करावे लागलेच नाही. असे करत करत तो एकवीस वर्षांचा झाला. शेठजींना लागली काळजी. साठवलेला पैसा किती दिवस पुरणार? दुसऱ्याच दिवशी त्यांनी मुलाला बोलावले, बाहेर पडायला सांगितले. पैसा कमावून आणला तर जेवायला मिळेल ही अट ठेवली. अजूला काहीच कळेना. त्याने बहिणीकडून एक रूपया मागितला आणि दिला जाऊन शेठजींना. पण तो त्यांना विहीरीत फेकला. दुसऱ्या दिवशी पुन्हा हीच अट ठेवली. आता अजू आईकडे गेला. तोही पैसा वडिलांनी फेकला. आता मात्र आला तिसरा दिवस. अजू दिवसभर काम शोधत फिरला. पण काम काही मिळेना. हताश होऊन गेला. काहीच सुचेना. पोटात लागले कावळे कोकलायला. शेवटी स्टेशनवर एक माणूस हमालाची वाट पहात असलेला दिसला. हे पाहताक्षणीच अजू धावत सुटला आणि बॅग त्याने डोक्यावर उचलून त्याच्या घरी पोहचवली. एवढे करेपर्यंत घामाघूम झाला. पण त्या माणसाने अजूच्या हातावर टेकवले फक्त आठ आणे. शेठजींच्या हातावर आठ आणे ठेवताच त्यांनी ते विहिरीत फेकले. वडिलांच्या या कृतीने अजू संतापला. म्हणाला, बाबा तुम्हाला जाणीव नाही की ते आठ आणे मिळवायला मला किती वणवण करावी लागली. शेठजी हसत हसत म्हणाले, हेच मला हवे होते. आज तुला खऱ्या कष्टाची किंमत कळली.

तात्पर्य : स्वकष्टाची कमाई तीच खरी कमाई.

●●●●●●●

★एखाद्या गोष्टीचा अपमान वाटणे आणि नंतर तिचाच अभिमान वाटणे हे काळ सापेक्ष आहे. लहान असताना पायाचे अंगठे पकडणं हा अपमान असतो. चाळीशी नंतर (हे जमल्यास) याचा अभिमान वाटू लागतो!

●●●●●●●●

★लोक गरजेनुसार आपला वापर करून घेतात आणि आपल्याला वाटते लोक आपल्याला पसंत करतात . हाच तर आयुष्यातील सर्वात मोठा भ्रम आहे.

●●●●●●●●●

★चणे जेव्हा गूळासोबत असतात तेव्हा त्याला " प्रसाद " म्हणतात  आणि चणे जेव्हा दारू सोबत असतात  तेव्हा त्याला " चकणा " म्हणतात . शेवटी संगत महत्त्वाची . तुम्हाला वाया घालवणारे नाही तर तुम्हाला घडवणारे मित्र शोधा . झीजून गेलात तरी चालेल पण गंजून जाऊ नका.

●●●●●●●●●

★ मंदिरात जाऊन देवाला प्रसाद चढवण्यापेक्षा मंदिरा बाहेरील गरजूंना तो खाऊ घाला . मंदिरातील प्रसाद देवा पर्यंत पोहोचणार नाही पण त्या गरजूंना दिलेला प्रसाद मात्र देवापर्यंत नक्कीच पोहोचेल .कारण देव देवळात नाही तर मानवतेत आहे . जो मूळ सोडून फांद्यांचा शोध घेतो तो सदैव भटकत राहतो.

●●●●●●●

*वाचा विनोद*

साहेब : काय रे? ऑफिसमध्ये दुपारच्या वेळी झोपतोयस की काय?

बंड्या : नाही सर, लंचला चायनीज खाल्लं ना आज, त्यामुळे डोळे जरा बारीक झाले आहेत...बस्स!

संकलन-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

Tuesday 27 October 2020

जपायचं नातं म्हणून...


जपायचं नातं म्हणून. निर्माण केला ग्रुप..

सगळेच आपले म्हणून,भावना जपा खूप..

कोणी दिला रिप्लाय, म्हणून हुरळून जायचं नाही..

आणि नाही दिला रिप्लाय, म्हणून खंत मानायची नाही...

सर्वांची मतं कायम, एकसारखी असतील कशी?

नकारार्थी, सकारार्थी, प्रत्येकाची वेगळी अशी!

राखायची असेल अबाधित, एकमेकांची साथ..

तर द्यावाच लागतो सर्वांना, प्रेमाचा हात..

प्रत्येकाचं मत, वेगळं असायलाच हवं..

तरच घडेल इथे, रोज काहीतरी नवं..

काय बरं होईल, नावडत्या जोकवर हसलं तर..

मनातल्या भावना झाकून, थोडसं फसलं तर..

फक्त एकच करा मित्रांनो, वेळ काढा थोडा..

प्रत्येक जण असावा, दुसऱ्यासाठी वेडा..

कधी गडबड, कधी बडबड, कधी बरीच शांतता..

दाखवून द्या ना एकदा, अंतरंगातील एकात्मता..

दुरावलेल्या दोन मनांत, एक पूल बांधणारा..

एखादा असतोच ना, निखळणारे दुवे सांधणारा..

ग्रुप असो नात्यांचा, वा असो तो मित्रांचा..

आपल्या हजेरीने बनवा, स्वप्नांमधल्या चित्रांचा..

●●●●●●●●●

गैरसमजुतीचा फक्त एकच क्षण खूप धोकादायक ठरू शकतो कारण... काही मिनीटांमध्येच आपण 'एकत्र घालवलेल्या' 'शंभर सुखाच्या क्षणांचा' तो विसर पाडतो...! म्हणून गैरसमज टाळा. जर प्रत्येकाने आपला विचार करताना दुसऱ्यांच्या मानाचा व मनाचा विचार केला तर नात्यात किंवा मैत्रीत कधीच दुरावा

किंवा वाईटपणा येणार नाही.

●●●●●●●●●

बायको : माझी एक अट आहे!

नवरा : काय?

बायको : तुम्ही या दिवाळीत सोडायला आलात तरच मी माहेरी जाणार.

नवरा : माझी पण एक अट आहे?

बायको : काय?

नवरा : मी घ्यायला आलो तरच परत यायचे?

©©©©©©©©©©©©©©©©©©©

संकलन-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

Monday 26 October 2020

यशाची अष्टसूत्रे


अनेक यशस्वी मुलांना यशही मिळत नाही.कारण मुले शेवटी मुलेच असतात.ते पालक जे करतात,त्याच्या बरोबर उलटे करतात.तर काही वेळा पालकच आपल्या मुलांना बिघडवतात.उदाहरणार्थ काही जणांनी शून्यातून केवळ अपार मेहनतीने आणि मी उल्लेखलेल्या आठ गुणवैशिष्ट्यांच्या जोरावर यश मिळवलेले असते.पण स्वतः पालक बनल्यावर, आपल्याला ज्या खस्ता खाव्या लागल्या, त्या आपल्या पाल्याला खाव्या लागू नयेत,असा विचार ते करतात आणि मुलांना ऐशौरामी आयुष्य देतात.यात त्यांचा हेतू वाईट नसतो,पण ते नकळत आपल्या मुलांमध्ये यशासाठी आवश्यक गुणवैशिष्ट्ये विकसित होण्यासाठी संधीच देत नाहीत.

आपल्याला आपल्या आयुष्यात जर यश मिळवायचे असेल तर काही गोष्टींकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायला हवे. *यशाची अष्टसूत्री* या *लेखक रिचर्ड सेंट जॉन* यांच्या पुस्तकात  यशाची अष्टसूत्रे दिलेली आहेत. तुम्ही ती आत्मसात केल्यास नक्कीच यशस्वी व्हाल.

1)झपाटलेपणा-यशस्वी व्यक्तींसाठी, ते जे काम करतात, ते अतिशय प्रिय असते.

2)काम -ते खूप काम करतात.

3)केंद्रित लक्ष -ते अनेक गोष्टींपेक्षा एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करतात.

4)जोर-एखादे काम पूर्ण करण्यासाठी ते सतत स्वतःला आतून ढकलत राहतात.

5) कल्पना-ते कायम चांगल्या कल्पना लढवतात.

6)सुधारणा-ते स्वतः मध्ये आणि कामात सातत्याने सुधारणा घडवत राहतात.

7)सेवा -ते इतरांना कायम मूल्यवर्धन होईल, अशी सेवा देतात.

8)चिकाटी -अपयश आणि दुष्कर परिस्थितीतही ते टिकून राहतात.

●●●●●●

कष्टामुळे येणाऱ्या घामाचा वास नकोसा वाटत असला तरी ,हा परिश्रमाचा घाम असल्याने हा यशाचा सुवास असल्याची खात्री बाळगा.

●●●●●●●●

वर्षातले दोन दिवस तुम्ही काहीही करु शकत नाहीत. "कालचा दिवस" आणि, "उद्याचा दिवस" जीवनात जर तुम्हाला..काही करायचे असेल तर ते आजच करा. कारण, आजचा दिवस खुप महत्वाचा आहे..!

★★★★★★

मंदिर या शब्दाचा अर्थ काय? मंदिर हा शब्द ‘मन‘ आणि ‘दर‘ या दोन शब्दांची संधी आहे. ’मन’ म्हणजे अर्थातच आपलं ’मन’ आणि ’दर’ म्हणजे दार! जिथे आपण मनाचे दरवाजे खुले करतो ते स्थान म्हणजे मंदिर! ’मन’चा अर्थ- ’म’ म्हणजे मी आणि ’न’ म्हणजे नाही. अर्थात जिथे ’मी’ नाही असे स्थान म्हणजेच मंदिर!

●●●●●●●

आई वडिलांचा ‘हात‘ पकडून ठेवा. लोकांचे ‘पाय‘ पकडण्याची गरज नाही पडणार. ज्यांनी आपल्याला आपल्या लहानपणी राजकुमारा सारखं संभाळलं , त्यांना त्यांच्या म्हातारपणी, राजा सारख सांभाळा. ना मंदिर, ना मशीद, ना चर्च , ना गुरुद्वारा, ना गंगेच पाणी. ते घरच मंदिर आहे ज्या घरात आई-वडिलांचा सत्कार आणि सन्मान होता

●●●●●●●●

गण्याने फेसबुक वर स्टेटस अपडेट केलं ‘शुक्र करो, की मेरी कोई मुमताज नही.. वरना, हर गली मे एक एक ताजमहल होता.‘ त्यावर बाळ्याची कॉमेंट आली. ‘घरच्या पत्र्यावर तुराट्या टाक आधी.’

*संकलन-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि.सांगली*

ऐश्वर्या श्रीधर:श्रेष्ठ फोटोग्राफर


वन्य जीव आणि जंगल फोटोग्राफीसाठी जगातील श्रेष्ठ फोटोग्राफर म्हणून भारताच्या ऐश्वर्या श्रीधर हिला घोषित करण्यात आलं आहे. 23 वर्ष वयाच्या ऐश्वर्याला 2020 मधला  ‘वाइल्ड लाइफ फोटोग्राफर ऑफ द ईयर अवॉर्ड’ मिळाला आहे. हा पुरस्कार जिंकणारी ती पहिली भारतीय मुलगी आहे. वयाच्या 11 व्या वर्षांपासून फोटोग्राफीला सुरुवात करणाऱ्या ऐश्वर्याला 'सेंक्चुरी एशिया यंग नेचुरलिस्ट अवॉर्ड’ आणि ‘इंटरनेशनल कॅमेरा फेयर अवॉर्ड’सुद्धा मिळाला आहे.नवी मुंबईत राहणारी ऐश्वर्या वन्य जीवांवर आधारित असलेल्या माहितीपटाची निर्मातादेखील आहे. 2020 मधील  ‘वाइल्ड लाइफ फोटोग्राफर ऑफ द ईयर अवॉर्ड’ साठी ‘लाइट्स ऑफ पॅशन’ शीर्षक असलेल्या तिच्या फोटोला 80 पेक्षा अधिक देशांतील 50 हजारहून अधिक सहभाग घेतलेल्या लोकांमधून तिची पहिल्या क्रमांकाने निवड करण्यात आली आहे. ऐश्वर्याने ‘बिहेवियर इनवर्टीब्रेट्स श्रेणी’ मध्ये हा पुरस्कार जिंकला आहे.

ऐश्वर्या सांगते की, तिला लहानपणापासूनच वन्य जीव फोटोग्राफीचा छंद होता.तिचे वडील  ‘बॉम्बे नॅचुरल हिस्ट्री सोसायटी’ चे सदस्य आहेत. त्यांच्यासोबत अनेक ठिकाणी जायची संधी मिळाली. तिच्या वडिलांनी तिला फोटोग्राफीसाठी प्रेरित केलं.पदवी शिक्षण मिळवल्यावर ती वन्य जीव फोटोग्राफर बनली. तिला जंगलात फोटोग्राफी करताना अजिबात भीती वाटत नाही. ज्या छायाचित्रासाठी तिला पुरस्कार मिळाला, तो तिने मागच्या वर्षी जूनमध्ये काढला होता. ती सांगते, मी एक असे झाड बघितले, जे पुष्कळ अशा काजव्यांनी भरलेले होते.ते पाहिल्यावर मला असं वाटलं की, आकाशातल्या चांदण्या धरतीवर उतरल्या आहेत. तेव्हा तिने ते छायाचित्र काढले.

वयाच्या 11 व्या वर्षी तिने फोटोग्राफीला सुरुवात केली. आई-वडिलांची तिला साथ होती. खरं तर वन्य जीव फोटोग्राफरचा विचार केला तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते,ती म्हणजे या क्षेत्रात यायला मुली किंवा महिला तयार होत नाहीत. कचरतात. त्यांच्यासाठी ऐश्वर्या संदेश देते की, एक महिला म्हणून आपली स्वप्नं आणि पॅशन पूर्ण करण्यापासून मागे हटू नका.आपली मेहनत शिकण्यात घालवा. जर तुम्ही योग्य प्रकारे शिकलात तर फोटोग्राफीमध्येही परिपूर्णता दिसून येईल.आपला आत्मविश्वास कोणत्याही परिस्थितीत ढळू देऊ नका.ज्यावेळेला तुम्ही तुमच्या इच्छाशक्तीच्या जोरावर आयुष्यातील अडथळे दूर करता, त्यावेळेला प्रत्येक काम सोपं होऊन जातं. ऐश्वर्या म्हणते की, खरं तर जंगलातल्या नैसर्गिक वातावरणात राहायला मला खूप आवडतं. पण इथूनच मी जीवनाचे काही धडे घेतले आहेत. एकदा मी जंगलात पक्ष्यांचे फोटो काढत होते. मी त्यात इतकी गढून गेले होते की, मला कळलंच नाही की मी जिथे उभी आहे, ती दलदल आहे. फोटो काढल्यावर मला एक पाय देखील उचलता येत नव्हता. त्यावेळेला एक धडा घेतला की, फोटोग्राफीबरोबरच आजूबाजूच्या परिस्थितीकडेही लक्ष ठेवणं गरजेचं आहे. कारण त्यामुळे आपण सुरक्षित राहू शकू. आयुष्यात संयम राखणंदेखील महत्त्वाचं आहे. ऐश्वर्या आपल्या आदर्शांबाबत सांगताना म्हणाली की, अशा काही 'वाइल्ड लाइफ फोटोग्राफर' आहेत, ज्यांना मी आपला रोल मॉडेल मानते, यात राधिका रामासामी, लतिका नाथ, अश्विका कपूर आणि कल्याण वर्मा यांचा समावेश आहे.यांच्या फोटोग्राफी मला प्रेरित करतात.सध्या ती माकडांवर एक डॉक्यूमेंट्रीबनवत आहे. तिला भविष्यात वाइल्ड लाइफ टीव्ही प्रजेंटेटर बनायचं आहे. त्याचबरोबर ती 'डिस्कवरी’ और ‘एनिमल प्लेनेट’ सारख्या माध्यमांच्या माध्यमातून संपूर्ण जगातील वन्य जीव क्षेत्रांची सहल करण्याची मनीषा बाळगून आहे. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


बिनधास्त जगा


आयुष्य बिनधास्त जगायचे. कुणाचे वाईट करायचे नाही. कुणाचे वाईट चिंतायचे नाही. कुणाच्या मागे वाईट बोलायचे नाही. फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं. काही कमी पडत नाही आणि फरक तर अजिबात पडत नाही. कुणासाठी वाईट वाटून घ्यायचं

नाही. लोकांची विविध रूपे असतात. सकाळी गोड बोलतात आणि रात्री कुणी काही डोक्यात भरवले की

तोंड पाडून बसतात किंवा कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज होऊन बसतात. ज्याच्याशी तुमचा काही संबंध पण नसतो.

आजकाल लोक देवावर पण नाराज होतात तर तुम्ही कोण? कुणी कितीही वाईट बोलो किंवा वाईट करण्याचा प्रयत्न करो, आपण त्याच्या विषयी तसेच इतरांविषयी चांगलेच बोलायचे आणि चांगलेच वागायचे. बोलण्यात स्पष्ट वक्तेपणा ठेवायचा. कुणाच्या आयुष्यात डोकवायचे नाही आणि कुणाविषयी मागे वाईट चर्चा करायची नाही. फक्त स्वतः बरोबर दुसऱ्याचे हीत चिंतायचे. कुणाच्या पुढेपुढे करायचे नाही. "जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची.'

थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात, तसेच शांत डोके आणि ऊबदार मन आयुष्यातील चिंता घालवतात.

●●●●●●●

कासवाच्या गतीने का होईना; पण रोज थोडी थोडी प्रगती करा. खूप ससे आडवे येतील. बास ! त्यांना हरवायची हिंमत ठेवा. जर तुम्हाला तुमची श्रीमंती

मोजायची असेल तर नोटा मोजू नका ! कधी चुकून डोळ्यांत दोन अश्रू आले, तर ते पुसायला किती जण येतात, ते मोजा ! आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला किंमत द्या. 'कारण' जे चांगले आहेत ते साथ देतील व जे वाईट असतील ते अनुभव देतील !

●●●●●●●●

शांत स्वभावाचा माणूस हा कधीही कमजोर नसतो. कारण या जगात पाण्यापेक्षा मऊ असे काहीच नाही. पण जर त्याचे पुरात रुपांतर झाले तर, भले भले डोंगरही फोडून निघतात.

●●●●●●●

चांगल्या लोकांना मिळणारा मान कधी कमी होत नाही. शुद्ध सोन्याचे शंभर तुकडे केले, तरीही त्याची किंमत कमी होत नाहीं, चुकणं ही  प्रकृती, मान्य करणं ही संस्कृती, आणि सुधारणा करणं ही प्रगती  आहे.

●●●●●●●

 जगायचे तर दिव्या प्रमाणे, जो राजाच्या महालात आणि गरीबांच्या झोपडीत एक सारखा प्रकाश देतो.

●●●●●●●●

विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी काही चांगलं करत असतो, तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही चांगल घडतं असतं. इतकच की ते आपल्याला दिसत नसतं.

●●●●●●●

एकदा तुरुंगातला एक कैदी दहा वर्षांनंतर तरुंगातून पळून जाण्यात यशस्वी होतो. पोलिस त्याला शोधण्याच्या मागे लागले. कसाबसा लपतछपत एकदाचा तो घरी पोहोचला. कैद्याच्या बायकोनं दरवाजा उघडला.

कैद्याची बायको : काय हो, टीव्हीवर दाखवत होते, तुम्ही आठ तासांपूर्वी पळून गेलायत. इतका वेळ कुठे होतात?

*संकलन-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

Sunday 25 October 2020

विश्वास ठेवायला शिका


पूजा करायच्या आधी, विश्वास ठेवायला शिका, बोलायच्या आधी ऐकायला शिका. खर्च करायच्या आधी कमवायला शिका. लिहायच्या आधी विचार करायला शिका. हार मानण्याआधी प्रयत्न करायला शिका. आणि मरायच्या आधी जगायला शिका. 

●●●●●●●

उपवास करून जर देव खूश होत असेल तर या जगात

कित्येक दिवस उपाशी पोटी असणारा भिकारी हा सर्वात जास्त सुखी राहिला असता.

●●●●●●●

देवाने आपल्या शरीराची रचनाच अशी केलेली आहे की ..... आपण स्वतःची पाठही थोपटू शकत नाही आणि स्वतःला लाथही मारू शकत नाही. म्हणूनच.. माणसाच्या जीवनात "हितचिंतकांची' आणि 'निंदकांची आवश्यकता आहे..

●●●●●●●

आयुष्यात असे लोक जोडा, जे वेळ येईल तेव्हा तुमची

सावली आणि वेळेला तुमचा आरसा बनतील. कारण आरसा कधी खोटे बोलत नाही आणि सावली कधी साथ सोडत नाही.

●●●●●●●

पुणेरी पाटी

एका गृहस्थाला सपाटून भूक लागली. म्हणून तो हॉटेल

शोधत होता. तेवढ्यात त्याला पाटी दिसली. त्यावर लिहिले होते.- 'जेवणाची उत्तम सोय'

 जवळ गेल्यावर त्याला दोन हॉल दिसले.एकावर लिहिलं होतं,'शाकाहारी' आणि दुसऱ्यावर लिहिलं होतं,'मांसाहारी'.तो मांसाहारी हॉलमध्ये शिरला. आतमध्ये आणखी दोन हॉल होते. डावीकडे पाटी होती

'भारतीय बैठक' तर उजवीकडे 'डायनिंग टेबल'

तो टेबलच्या हॉलमध्ये शिरला. आतमध्ये पुन्हा दोन हॉल एकावर पाटी होती 'रोख' तर दुसरी 'उधार'

तो फुकट्या असल्याने अर्थातच उधारीच्या हॉलमध्ये शिरला. पुढे गेल्यावर वाहनांची वर्दळ त्याला समोर दिसली. तो अचंबीत झाला. त्याने मागे वळून पाहिले, तर तिथे एक पाटी होतीच त्याला खिजवायला,

'फुकट्या, मागे वळून काय बघतोस.? हा बाहेरचा रस्ताच आहे. 

(संकलन-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि.सांगली)


गाढव आणि कुत्रा यांची पैज


 🦄🦮🦄🦮🦄🦮🦄🦮🦄🦮🦄

एकदा कुत्र्यात अन गाढवात पैज लागते की, जो लवकरात लवकर पळत जाऊन २ गावं पलीकडच्या

सिंहासनावर बसेल तोच त्या सिंहसिनाचा मानकरी ठरेल.... ठरल्याप्रमाणे दोघे तयार झाले, कुत्र्याला वाटले मीच जिंकेन कारण गाढवापेक्षा मी जोरात धावू शकतो, पण कुत्र्याला पुढे काय होणार ते नक्की माहिती नव्हते... शर्यत सुरु झाली. कुत्रा जोरात धावू लागला, पण थोडसं पुढं गेला नसेल की लगेच पुढच्या गल्लीतील कुत्र्यांनी त्याला हुसकून लावयला सुरवात केली, असेच प्रत्येक गल्लीत, प्रत्येक चौकात, घडत राहिले, कसा बसा कुत्रा धावत धावत सिंहासनाजवळ

पोहचला, बघतो तर काय गाढव त्या आधीच पोहचले होते... अन् त्यांनी शर्यत जिंकून ते राजा झाले होते.

अन ते बघून निराश झालेला कुत्रा बोलला की, जर माझ्याच लोकांनी मला मागे ओढले नसते तर आज गाढव सिंहासनावर बसले नसते....

तात्पर्य :१. आपल्यांना विश्वासात घ्या. २. आपल्यांना पुढे जाण्यास सहकार्य करा, त्यांना प्रोत्साहन द्या. ३. नक्की विचार आणि आत्मपरिक्षण करा.

●●●●●●●

आयुष्याचा वेग असा करा की, आपले शत्रु पुढे गेले तरी चालतील!! पण आपला एकही मित्र पाठिमागे राहता कामा नये!! मी दुनियेबरोबर लढू शकतो पण आपल्या माणसांबरोबर नाही, कारण आपल्या माणसांबरोबर मला जिकांयचे नाही तर जगायचे आहे....

●●●●●●●●●

जितके मोठे मन तितके सुंदर जीवन. वादाने अधोगती तर संवादाने प्रगती होते. जग काय म्हणेल याचा विचार करू नका. लोकं फार विचित्र असतात. अपयशी लोकांची थट्टा करतात तर यशस्वी लोकांची निंदा करतात. म्हणून आपल्या मनाप्रमाणे जीवन जगा.

●●●●●●●●>

शाळेतले एक सर  पैसे काढायला एटीएम केंद्रात गेले. एटीएम मशीन खराब होतं. चेकबुक जवळच असल्यानं ते बँकेत गेले आणि एक हजार रुपयांचा चेक भरून कॅशियरकडे दिला.

कॅशियर म्हणाला, 'सर, पाच हजारांहून कमी रकमेला चार्ज लागेल.' मास्तरांनी दुसरा चेक सहा हजारांचा लिहिला. कैशियरनं सहा हजार मास्तरांना दिले.

मास्तरांनी त्यातले एक हजार खिशात ठेवले आणि पाच हजार रूपये पुन्हा खात्यात भरण्यासाठी कॅशियरकडे दिले. कॅशियर चिडला होता. 

सर म्हणाले, 'हा नियम बनवणारा तुमचा साहेब आहे ना, तो माझ्याच वर्गात शिकत होता. त्याला सांगा, तुझे सर आले होते.'

😅😂🤣😅😂🤣😅😂🤣😅😂

*संकलन-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली*

Saturday 24 October 2020

कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिर


कोल्हापूर येथे करवीर निवासिनी महालक्ष्मी (अंबाबाई) चे मंदिर आहे. हे मंदिर महाराष्ट्रात असलेल्या मंदिरांच्या साडेतीन पीठांपैकी एक आहे. पुराणात उल्लेखलेल्या १0८ पीठांपैकी एक, व महाराष्ट्रात असलेल्या देवीची साडेतीन पीठांपैकी एक आहे. मंदिराच्या मांडणीवरून ते चालुक्यांच्या काळात इ.स. ६00 ते ७00 मध्ये बांधले असण्याची शक्यता आहे. मंदिराचे पहिले बांधकाम राष्ट्रकूट किंवा त्या आधीचा शिलाहार राजांनी सुमारे आठव्या शतकात केले असावे.

कधी काळी मोगलांनी या देवळाचा विध्वंस केला तेव्हा देवीची मूर्ती पुजार्‍याने अनेक वर्षे लपवून ठेवली होती असे म्हणतात. पुढे संभाजी महाराज यांच्या कारकीर्दीत इ.स. १७१५ ते १७२२ या कालखंडात मंदिराचे पुनरुज्जीवन करण्यात आले. उत्तम कोरीव काम असलेल्या भिंती व अगदी साधे वरचे शिखर हा कारागिरीतला फरक त्यामुळेच पडला असावा.

मूर्तीच्या जवळील सिंह व शिरावरील मातुलिंगामुळे देवी अनेकांच्या मते जगदंबाचे रूप आहे. देवीची मूर्ती दगडी असून तिचे वजन ४0 किलोग्रॅम आहे. मूर्तीमागे दगडी सिंह आहे. डोक्यावर मुकुट आहे आणि त्यावर नागमुद्रा आहे. अकराव्या शतकातील शिलालेखात लिंगशैषाघौषहारिणी असा देवीचा उल्लेख आहे. देवीच्या संस्कृत आरतीमध्येही तिच्या मस्तकावरील नागाचे वर्णन केले जाते. करवीर माहात्म्य ग्रंथात १३ व्या अध्यायातील सातव्या श्लोकात असे म्हटले आहे की, पन्नागांकित मस्तकाम म्हणजे नागांनी आपला फणा देवीच्या मस्तकावर पाहिला आहे असा उल्लेख आहे. हेमाडपंथी मंदिर प्रणालीचा प्रणेता हेमाद्री यांनी रचलेल्या हेमाद्री वीरचित चतुर्वर्गचिंतामणी या व्रतखंडात मस्तकावर नाग असे वर्णन असलेली मूर्ती करवीरनिवासिनीच आहे असे नमूद केले आहे.नाग, लिंगयोनी, पानपात्र आणि म्हाळुंग अशी महत्त्वाची चिन्हे हीच ज्या देवीची महत्त्वाची ओळख आहे.

कोल्हापूरमधील महालक्ष्मीचे हे मंदिर पश्‍चिमाभिमुख असून महाव्दार पश्‍चिमेकडे आहे. पारंपारिक मराठा शैलीचा, लाकडी सुरूच्या खांबांचा व इस्पिदार कमानी असलेला, सभामंडप प्रवेश केल्यावर दिसतो. गेल्या दहा शतकांत मंदिराची अनेकदा वाढ झाली. मंदिराचे चार महत्त्वाचे भाग आहेत. पूर्व भागातील गाभारा व रंगमंडप हा सर्वात पुरातन भाग आहे. देवीचा गाभारा येथेच आहे. उत्तरेकडे महाकालीचा गाभारा तर दक्षिणेकडे महासरस्वतीचा गाभारा असून या तीन अंगांना जोडणार्‍या सभामंडपास महानाटमंडप असे नामाभिमान आहे.

देवळाच्या भिंतीवर नर्तकी, वाद्ये वाजविणार्‍या स्त्रिया, मृदंग, टाळकरी, वीणावादी, आरसादेखी, यक्ष, अप्सरा, योद्धे व किन्नर कोरलेले आहेत. माघ शुद्ध पंचमीला सूर्यास्ताचे किरण बरोबर देवीच्या मुखावर पडतील असे उत्तम दिग्साधन, विनाचुन्याचे जोडीव-घडीव दगडी बांधकाम, व नक्षत्रावर अनेक कोनाचा पाया ही मंदिराचे वास्तुवैशिष्ट्ये होत. देवळाच्या प्राकारात शेषशायी, दत्तात्रेय, विष्णू, गणपती वगैरे अनेक देवतांची देवळे आणि काशी व मनकर्णिका कुंडे आहेत.

महालक्ष्मीचे देवालय कोणी बांधले याबद्दल निश्‍चिती झालेली नाही. देवस्थान समितीच्या माहितीनुसार मंदिर कर्णदेव नावाच्या राजाने बांधले. ख्रिस्तोत्तर नवव्या शतकापूर्वीच देवीचे माहात्म्य प्रस्थापित झाले होते असे दिसते. हे देवालय आकाराने एखाद्या फुलीसारखे आहे. प्रसिद्ध हेमाडपंती स्थापत्यशैली वास्तुशिल्प पद्धतीने या देवळाची बांधणी, दरजा न भरता एकमेकांवर ठेवलेल्या अशा मोठमोठया चौकोनी किंवा आयताकृती दगडात करण्यात आलेली आहे. देऊळ पश्‍चिमाभिमुख असून मुख्य प्रवेशद्वारावर नगारखाना आहे. पश्‍चिमेला असलेल्या मुख्य दरवाजाशिवाय उत्तर, पूर्व आणि दक्षिणेला प्रवेशद्वारे आहेत. उत्तर दरवाजाला एक मोठी घंटा असून दिवसातून पाच वेळा ती वाजविली जाते. या दरवाजाला घाटी दरवाजा असे म्हणतात. देवळात वारा येण्याला कोठेही गवाक्षे नाहीत. पूर्वेकडे असलेल्या मोठया घुमटाखाली महालक्ष्मीची मूर्ती आहे व उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे असलेल्या दोन छोटया घुमटांखाली महाकाली आणि महासरस्वतीच्या मूर्ती आहेत. महालक्ष्मीची मूर्ती १.२२ मीटर उंच असून ती एका 0.९१ मीटर उंच असलेल्या दगडी चौथर्‍यावर उभी करण्यात आलेली आहे. देवळाच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर जो मंडप लागतो त्या मंडपाला प्रवेश मंडप किंवा गरूड मंडप असे म्हणतात. आश्‍विन नवरात्रोत्सवात महालक्ष्मीची चांदीची प्रतिमा त्या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या दगडी चौथर्‍यावर ठेवून तिची पूजा करतात.

प्रवेशद्वारानंतर मुख्य मंडप दृष्टीस पडतो. या मंडपाच्या दोन्ही बाजूला कोनाडे असून त्यामध्ये अतिशय सुंदर कोरीव काम असलेल्या मूर्ती बसविलेल्या आहेत. यापैकी प्रमुख मूर्ती म्हणजे तथाकथित भरत आणि शत्रुघ्न यांच्या होय. या मूर्तीबद्दल विद्वानांमध्ये मतभेद आहेत. या मंडपातून मणि मंडपाकडे जाता येते. या मंडपाच्या पाठीमागील भिंतीच्या दोन्ही बाजूला द्वारपालाच्या दोन सुंदर मूर्ती आहेत. या द्वारपालांना जय आणि विजय अशी नावे असून त्या मूर्ती लढाऊ पवित्र्यामध्ये कोरण्यात आलेल्या आहेत. मणि मंडपामधून महालक्ष्मीची मूर्ती ज्या आतील गाभार्‍यात आहे त्या ठिकाणी जाता येते. त्या ठिकाणी बंदिस्त केलेला मार्ग असून पूर्वी तेथे काळोख होता. देवीला प्रदक्षिणा घालणार्‍या भाविक लोकांना त्रास होऊ नये म्हणून विजेचे दिवे लावलेले आहेत. गाभार्‍यात व मणि मंडपात संगमरवरी फरशी बसविलेली आहे. 

बिरबलाने दिलेली दहा सर्वश्रेष्ठ प्रश्नांची उत्तरे


☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

बिरबलाने दिलेली दहा सर्वश्रेष्ठ प्रश्नांची उत्तरे 

१) प्रश्न : विश्वातली सर्वात सुंदर निर्मिती कोणती?

उत्तर: माता

२) प्रश्न : सर्वश्रेष्ठ फूल कोणते आहे?

उत्तर : कापसाचे फूल

३) प्रश्न : सर्वश्रेष्ठ सुगंध कोणता आहे?

उत्तर : पावसाने भिजलेल्या भूमिचा सुगंध..

४) प्रश्न : सर्वश्रेष्ठ गोडवा कोणता?

उत्तर : वाणीचा

५) प्रश्न : सर्वश्रेष्ठ दूध?

उत्तर : मातेचे...

६) प्रश्न : सर्वात काळे काय आहे?

उत्तर : कलंक

७) प्रश्न : सर्वात वजनदार काय आहे?

उत्तर : पाप

८) प्रश्न : सर्वात स्वस्त काय आहे?

उत्तर : सल्ला

९) प्रश्न : सर्वात महाग काय आहे?

उत्तर : सहयोग

१०) प्रश्न : सर्वात कडू काय आहे?

उत्तर : सत्य

११) आयुष्य म्हणजे काय?

उत्तर : माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याला 'नाव' नसतं पण'श्वास' असतो आणि... ज्यावेळी तो मरतो तेव्हा फक्त 'नाव' असतं पण 'श्वास' नसतो. 'नाव' आणि 'श्वास' यांच्या मधील अंतर म्हणजे 'आयुष्य'...

●●●●●●●

कितीवेळा मागितलं तरी सुख उसनं मिळत नाही

एखाद्या जागी बसून कधीच ध्येयाचं शिखर गाठता येत नाही आपल्या देवावर नेहमी नि:संकोच विश्वास ठेवा. योग्य वेळी तो इतकं देतो की मागायला काहीच उरत नाही.

●●●●●●●

तो : प्रिये, सांग ना मी तुझ्यासाठी काय करू?

ती : काय करशील?

तो : तू सांगशील ते करील!

ती : मग आधी नोकरी कर.

तो : का?

ती : म्हणजे एकदाचं लग्न तरी करता येईल!

🤣😂😅🤣😂😅🤣😂😅😂🤣

Friday 23 October 2020

धनुष्य बाण कोणी मोडला?


धनुष्य बाण कोणी मोडला?

शाळेत इन्स्पेक्टर साहेब आले त्यांनी एका मुलाला प्रश्न विचारला,'शिवधनुष्य कोणी मोडले?'

मुलगा घाबरून म्हणाला,'मी नाही मोडले.'

साहेब चकित झाले.

त्यांनी गुरूजींना विचारले,'असे काय म्हणतो हा मुलगा?' 

गुरूजी म्हणाले, 'परिस्थितीने गरीब आहे बिचारा, तो अशी तोडफोड करेल असे वाटत नाही. 

साहेब रागात मुख्याध्यापकांकडे गेले आणि म्हणाले,

'मी शिवधनुष्य कोणी मोडले? असे विचारले तर विद्यार्थी म्हणतो की, मी नाही मोडले. हा काय प्रकार आहे?' 

मुख्याध्यापकांना प्रचंड राग आला ते म्हणाले, 'कोण

नाही म्हणतो? छडी घेऊन गेलो ना की, सगळे कबूल करतील. मीच मोडले म्हणून!' 

प्रकरण शिक्षणमंत्र्यापर्यंत गेले. शिक्षणमंत्री म्हणाले, "हे पहा, आता मोडले ना धनुष्य? मग गप्प बसा. आधीच खूप गोष्टी अंगाशी आल्या आहेत, त्यात ही एक नको.

 येत्या अंदाज पत्रकात निधी मंजूर करतो. नवीन घ्या २-३, आता चर्चा नको!'

 साहेब हताश होऊन घरी आले. बायकोला म्हणाले, 'मी एक प्रश्न विचारला, शिवधनुष्य कोणी मोडले? तर कोणालाही माहिती नाही, तुला तरी माहीत आहे का?'

 बायको म्हणाली, 'हे बघा, सकाळपासून काम करून मी दमले आहे. त्यात तुम्ही काहीतरी फालतू प्रश्न विचारत आहात. मला काय माहिती कोणी मोडले ते? तुमचे नेहमीचेच आहे. स्वत: मोडायचे आणि दुसऱ्यावर ढकलायचे!"

●●●●●●●

★एकटे राहणे जमलेच नाही, माणसांना टाळणे जमलेच नाही,कष्टाची भाकरी गोड लागली, लुटावे कुणाला कधी जमलेच नाही.

चेहरा आरशासारखा स्वच्छ होता. मुखवटा लावणे जमलेच नाही.जे लाभले ते आनंदाने स्वीकारले कष्ट नाकारणे जमलेच नाही. जिंदगी साधी सरळ आहे,भूलथापा मारणे जमलेच नाही

हरघडी तुमच्यासारख्या प्रेमळ माणसांची मोट बांधली, आजपर्यंत काही कमी पडलेच नाही.

●●●●●●●

★ शरीर जितके फिरते राहील तेवढे स्वस्थ राहते आणि मन जितके स्थिर राहील तेवढे शांत राहते.

●●●●●●●

★ सगळ्या भानगडी एका झटक्यात आठवतात ज्यावेळी बायको म्हणते - या बसा... तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे.-


Thursday 22 October 2020

डॉ. जाजिनी वर्गीस


काही लोक उंच झेप घेतात. पण, त्यांचे पाय जमिनीवरच असतात. डॉ. जाजिनी वर्गीस त्यापैकीच एक. ईएमईटी शिष्यवृत्तीद्वारे भारतातील ग्रामीण भागातही डॉक्टर्स जावेत यासाठी डॉ. जाजिनी वर्गीस यांनी १७ वर्षांपूर्वी प्रयत्न केले. त्यामुळे महिला डॉक्टरांना ग्रामीण भागात दोन वर्षे आंतरवासीयता करण्यास प्रोत्साहन मिळाले. भारतातून वैद्यकक्षेत्रात पदवी घेतल्यानंतर डॉ. जाजिनी वर्गीस यांना केम्ब्रिज विद्यापीठाची विद्यावृत्ती मिळाली. त्यांच्या अभ्यासाचा विषय होता, स्तनाच्या कर्करोगाचे जनुकशास्त्र. स्तनाच्या कर्करोगाशी कुठले जनुक संबंधित असतात हे त्यांनी शोधून काढले. हार्वर्ड विद्यापीठ व मेयो क्लिनिक यांच्या संशोधन पथकासह त्यांनी झेडएनएफ ३६५ या कर्करोगकारक जनुकाचा विशेष अभ्यास केला. त्यांचा हा शोधनिबंध नेचर जेनेटिक्स या नियतकालिकात प्रसिद्ध झाला होता. कर्करोगनिदान जर नंतरच्या टप्प्यात झाले तर स्तन काढून टाकावे लागतात. त्यावर वर्गीस यांनी ऑन्कोप्लास्टिक शस्त्रक्रियेचा पर्याय शोधला. 

स्त्रियांमधील कर्करोगाचे प्रमाण जीवनशैली व जनुकीय कारणांमुळे वाढत आहे. इ. स. २0२0 मधील आकडेवारीनुसार, भारतात दर २९ महिलांत एकीला स्तनाच्या कर्करोगाची शक्यता असते. दर चार मिनिटाला एका महिलेला कर्करोग झाल्याचे निदान होते. या कर्करोगाचे प्रमाण १४ टक्के आहे. या कर्करोगावर मात करणार्‍या डॉक्टरांपैकी एक म्हणजे डॉ. जाजिनी वर्गीस. त्यांना अलीकडेच एका स्वयंसेवी संस्थेचा आउटस्टँडिंग यंग पर्सन ऑफ दि इयर २0२0 हा पुरस्कार मिळाला. भारतीय वंशाच्या जाजिनी यांना यापूर्वीही अनेक महत्त्वाचे पुरस्कार मिळाले होते. पण पुरस्कारांपेक्षा या क्षेत्रात त्यांनी केलेले काम मोठे आहे. त्यांची ओळख म्हणजे स्तनाच्या कर्करोगाचे निदान व नंतरची शस्त्रक्रिया यात त्या तज्ज्ञ आहेत. वयाच्या अवघ्या ३९व्या वर्षी त्यांनी अनेक कर्करोगग्रस्त महिलांचे जीवन सुखकर केले आहे. स्तनाच्या कर्करोगात काहीवेळा स्तन काढून टाकल्याने स्त्रियांना मोठा मानसिक धक्का बसतो. त्यावर मात करण्यात त्यांनी मदत केली. कर्करोगाशी लढण्याची स्त्रियांची जिद्द वाढवण्यास त्यांनी पाठबळ दिले आहे. लंडनमध्ये वास्तव्यास असलेल्या जाजिनी या मूळ केरळमधील मट्टम हरिपादच्या. त्यांचे आईवडील जॉर्ज व जॉली वर्गीस अजूनही तेथे राहतात. ब्रिटनमध्ये आल्यानंतर त्या रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्समधून शल्यविशारद झाल्या. युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन येथे त्या प्लास्टिक सर्जरीच्या प्राध्यापक व परीक्षकही आहेत. मूळच्या केरळच्या असल्याने देशवासियांना त्यांच्याबद्दल अभिमान आहे. परदेशात त्या काम करीत असल्या तरी भारताचे नाव त्यांनी रोशन केले आहे.

सामान्य ज्ञान जाणून घ्या


वाढवा सामान्यज्ञान

१) कोणते वर्ष अरब जगतातील लोकशाही आंदोलनाचे वर्ष म्हणून  ओळखले जाते?
२) भारतात एकूण किती व्याघ्र प्रकल्प आहेत?
३) खाजगीकरण आणि जागतिकीकरण धोरण कोणत्या पंतप्रधानांनी जाहीर केले?
४) स्त्री भ्रूणहत्येसंबंधी चळवळ सुरू करणारी महिला खासदार कोण?
५) कोणता दिवस जागतिक अभियंता दिन म्हणून साजरा होतो?
उत्तर : १) २0११ २) ५0 ३) पी.व्ही. नरसिंहराव ४) सुप्रिया सुळे ५) १५ सप्टेंबर
वाढवा सामान्य ज्ञान
१) स्टेथोस्कोपचा शोध कोणी लावला?
२) भूकंपाची तीव्रता मोजणार्‍या उपकरणाला काय म्हणतात?
३) समुद्राच्या पाण्यात प्रवाळ किटकांच्या अवशेषांपासून बनलेल्या  लहान खडकांच्या समूहाला काय म्हणतात?
४) कॅप्युऊस, बशिटो या नद्या कोणत्या देशात आहेत? 
५) मादागास्कर या देशात कोणती शासन पद्धती अस्तित्वात आहे?
उत्तरे : १) विल्यम स्टॉक्स २) भूकंपमापी ३) कोरल रीफ ४) इंडोनेशिया ५) प्रजासत्ताक शासन पद्धती
 वाढवा सामान्य ज्ञान
१) इ.स. १९२७ या वर्षी महाड येथे 'चवदार तळे' सत्याग्रह  कोणी सुरू केला?
२) 'डेक्कन सभा' या संस्थेचं स्थापना वर्ष कोणतं?
३) 'एनआयडीसी'चं विस्तारित रूप काय?
४) डिझेल इंजिनाला आवश्यक असणारे लागणारे भाग
निर्मित करणारा कारखाना कोठे आहे?
५) भारतात एकूण किती प्रमुख बंदरे आहेत?
उत्तर : १) १) डॉ. बाबासाहेब आंबेडकर २) १८९५ ३) नॅशनल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ४) पतियाळा ५) १८३
वाढवा सामान्य ज्ञान
१) धूमकेतूचा पुच्छभाग सूर्याच्या कोणत्या दिशेला असतो?
२) पहिली सार्क परिषद कुठे भरली होती?
३) जगातील पहिले तिकीट कोठे छापले गेले?
४) 'बहुरूपी' या पुस्तकाचे लेखक कोण?
५) महाराष्ट्रातील प्रमुख लाकूड व्यापार केंद्र कोठे आहे?
उत्तर : १) विरुद्ध दिशेला २) ढाका ३) इंग्लंड 
४) नारायण धारप ५) परतवाडा
वाढवा सामान्य ज्ञान
१) सिंगापूरच्या विमान वाहतुकीचे नाव काय?
२) राष्ट्रपती राज्यसभेवर किती सदस्य नेमू शकतात?
३) इराणमधील सर्वात मोठे सरोवर कोणते?
४) कोणत्या गोलमेज परिषदेला महात्मा गांधी हजर होते?
५) कोणत्या देशात भारतीयांची लोकसंख्या अधिक आहे?
उत्तर-१) सिंगापूर एअरलाईन्स २) १२ ३) उर्मया ४) दुसर्‍या ५) मॉरिशस

Tuesday 20 October 2020

वाढवा आपले सामान्य ज्ञान


वाढवा सामान्य ज्ञान

१) सम्राट अशोकाने बांधलेला सिंह-स्तंभ कोठे आहे?

२) सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून श्री. एस. मुखर्जी यांचा कार्यकाल कोणता?

३) कांगो, गनी या नद्या कोणत्या देशात आहेत?

४) ब्राझीलमध्ये कोणती शासन पद्धती आहे?

५) तुवालू या देशाची राजधानी कोणती?

उत्तर-१) सारनाथ २) १८ डिसेंबर १९८९ ते २५ डिसेंबर १९९0 ३) अंगोला ४) प्रजासत्ताक शासन पद्धती ५) फोंगाफेल

वाढवा सामान्य ज्ञान

१) 'वेलिंग वॉल' कोठे आहे? 

२) 'एशियन ड्रामा'चे लेखक कोण? 

३) स्वतंत्र दर्जा असणारे सर्वांत कमी क्षेत्रफळाचे राष्ट्र कोणते?

४) क्युबाची राजधानी कोणती?

५) फलीपाईन्समधील प्रमुख नद्या कोणत्या?

उत्तर : १) जेरुसलेम २) गुन्नार र्मदाल ३) व्हॅटिकन 

४) हवाना ५) कागायान, पंपांगा

     वाढवा सामान्य ज्ञान

१) थर्मास फ्लाक्सचा शोध कोणी लावला?

२) व्हिएतनाममध्ये कोणती खनिजे सापडतात? 

३) ग्रिनीचवरुन जाणार्‍या काल्पनिक रेखावृत्ताला काय म्हणतात? 

४) थायलंडमधील नद्या कोणत्या?

५) डमी, नो ट्रम्प, ग्रँड स्लिॅम, रिव्होक,रफ या संज्ञा कोणत्या खेळाशी  संबंधित आहेत?

उत्तर : १) जेम्स देवार २) लोह, कोळसा ३) मूळ रेखावृत्त ४) मेकाज, चाओ, प्याहा, मेनाम मुन ५) ब्रिज

सामान्यज्ञान

१) 'अल हलाल' हे वृत्तपत्र कोणी सुरु केले? 

२) १९२४ मध्ये पुणे येथे 'कौटुंबिक उपासना मंडळाची' स्थापना  कोणी केली? 

३) संयुक्त राष्ट्र संघटनेच्या साधारण सभेने 'मानवी अधिकारांचा  जागतिक जाहीरनामा' कधी संमत केला? 

४) समाजसुधारक व्ही. आर. शिंदे यांचे जन्मस्थान कोणते? 

५) बृहदीश्‍वर मंदिर कोठे आहे?

उत्तर : १) मौलाना अबुल कलाम आझाद २) महर्षी विठ्ठल रामजी शिंदे ३) १0 डिसेंबर १९४८ ४) जमखिंडी ५) तंजावर

वाढवा सामान्य ज्ञान

१) कशाच्या प्रसारावर नियंत्रण रहावं यासाठी 'ऑस्ट्रेलिया ग्रुप'ची स्थापना झाली? 

२) भारतातील किती राष्ट्रपती बिनविरोध निवडून आले आहेत? 

३) वैयक्तिक ऑलम्पिक प्रकारात पदक मिळवणारा स्वतंत्र भारतातील पहिला खेळाडू कोण? 

४) जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा केला जातो? 

५) शरीरात लोहाची कमतरता असेल तर कोणता त्रास उद्भवतो?

उत्तर : १) रासायनिक आणि जैविक शस्त्रांवर २) दोन ३) खाशाबा जाधव ४) ११ जुलै ५) अँनिमिया

वाढवा सामान्य ज्ञान

१) सुनिल गावसकर २) बीजिंग ३) कोलकाता ४) ३,२१४ क.मी. ५) विल्यम व्हॉन रॉन्टेजन

१) 'सनी डेज' या पुस्तकाचे लेखक कोण?

२) १९९0 मध्ये आशियाई क्रिडा स्पर्धा कोठे पार पडल्या?

३) पश्‍चिम बंगालमधील प्रमुख बंदर कोणते?

४) भारताची उत्तर-दक्षिण लांबी किती आहे?

५) एक्स रे चा (क्ष किरणांचा) शोध कोणी लावला?


Sunday 18 October 2020

गुहागरचे निसर्गसौंदर्य

रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरला सुरुचे बन असलेला अत्यंत सलग आणि सुरेख असा समुद्रकिनारा लाभलेला आहे. त्याचबरोबर श्री व्याडेश्‍वर आणि श्री दुर्गादेवीची नितांत रमणीय मंदिरे या परिसराची शोभा अजूनच वाढवतात. इथे मिळणारे अगदी खास कोकणी पद्धतीचे पदार्थ पर्यटकांना या प्रदेशाची भुरळ पाडतात. समुद्रकिनार्‍याला समांतर जाणारा एकमेव रस्ता या गावाला लाभलेला आहे. व्याडेश्‍वराचे पुरातन मंदिर गावाच्या अगदी मधोमध वसले असून त्यामुळे गावचे भौगोलिकदृष्ट्या दोन भाग पडतात. एक म्हणजे खालचा पाट आणि दुसरा वरचा पाट.

गुहागर हे आंबा, फणस, काजू, सुपारी आणि नारळ या फळांसाठी सुप्रसिद्ध आहे. गुहागरच्या उत्तरेकडे असलेल्या अंजनवेल या गावाशी दाभोळ हे गाव फेरी बोटीने जोडले गेल्यामुळे गुहागरचे महत्त्व अजून वाढलेले दिसते. तसेच दक्षिण दिशेला हेदवीवरून जयगड हे गावसुद्धा फेरी बोटीने जोडल्यामुळे गुहागर हे रत्नागिरी तालुक्याशी जोडले गेलेले आहे. गुहागरला आल्यावर समुद्रात होणारा सूर्यास्त पाहणे यासारखी दुसरी रमणीय गोष्ट नाही. हा नयनरम्य सूर्यास्त पाहणे सुखकर व्हावे म्हणून स्थानिक प्रशासनाने पर्यटकांना बसण्यासाठी उत्तम सोय किनार्‍यावर केलेली आहे.

गुहागरचा पेशवे घराण्याशी फार पूर्वीपासून संबंध आलेला आहे. थोरले माधवराव पेशव्यांचे काका राघोबादादा यांची पत्नी आनंदीबाईचे माहेर या गुहागरचेच. इथून १५ कि.मी. वर असलेल्या कोतुळक या गावी असलेल्या ओक घराण्यात आनंदीबाईचा जन्म झाला होता. दगडी बांधणीचे व्याडेश्‍वर हे शिवमंदिर गुहागरचे ग्रामदैवत होय. अनेक चित्पावन ब्राह्मण कुटुंबीयांचे हे कुलदैवत आहे. त्याचप्रमाणे नुकताच जीर्णोद्धार झालेले दुर्गादेवीचे मंदिरसुद्धा अत्यंत रमणीय ठिकाणी वसलेले आहे. गुहागरमध्ये अजून एक प्राचीन मंदिर असून ते उफराटा गणपतीचे आहे. इथे गणपतीचे तोंड पश्‍चिम दिशेला केलेले आढळते.

गुहागर हे अतिप्राचीन म्हणजे भगवान परशुरामांच्या काळापासून अस्तित्वात आहे असे मानतात. गुहागरची खरी प्रसिद्धी आहे ती श्री व्याडेश्‍वर या सुंदर देवस्थानामुळे. गुहागर हे अतिशय सुंदर गाव आहे. पूर्वेकडच्या डोंगराला पाठ टेकवून समोरच्या अथांग सागरतीरावर नारळी पोफळीच्या दाट झाडीत गुहागर लपले आहे. 

बामणघळ, हेदवीला जाऊन तिथला जलस्तंभ न पाहाता परत येणे म्हणजे एका निसर्गनिर्मित चमत्काराला मुकणे होय! हेदवीची बामणघळ हा निसर्गाचा एक रौद्र आविष्कार आहे. हेदवीच्या गणेश मंदिराजवळ तीन किलोमीटर अलीकडे समुद्रकिनार्‍याच्या काळ्या कातळातील भेगेमधून चाललेला समुद्राच्या लाटांचा हा खेळ बघण्यासारखा असतो. ऐन भरतीचा वेळी गेल्यास उंच तुषार उडवत उसळणारा जलस्तंभ आपले लक्ष वेधून घेतो.

शतकानुशतके इथे समुद्राच्या लाटांच्या आघाताने खडकामधे एक मीटरभर रुंद आणि १0 मीटर लांबीची एक घळ किंवा भेग निर्माण झाली आहे. ३ ते ५ मीटर खोलीच्या या घळीतून भरतीच्या लाटांचे पाणी खूप जोरात आत घुसुन तेथील खडकांवर आपटते आणि यातून निर्माण होतो १0 ते १५ मीटर उंचीचा अवर्णनीय जलस्तंभ! त्यावेळी कपारीत होणारी पाण्याची प्रचंड खळबळ, रोरावात घुसणार्‍या लाटांचा प्रचंड आवाज असा थरार अनुभवताना अंगावर रोमांच उभे राहतात. 

गुहागर तालुक्यातील एक अतिशय प्रसन्न व निसर्गसंपन्न ठिकाण म्हणजे वेळणेश्‍वर. इथल्या प्राचीन शिवमंदिरासाठी व सुंदर समुद्र किनार्‍यासाठी हे ठिकाण विशेष प्रसिध्द आहे. वेळणेश्‍वर मंदिर परिसरात पोहोचल्याबरोबर मंदिराबाहेर उभ्या असलेल्या अतिशय सुंदर व भव्य दीपमाळा लक्ष वेधून घेतात. मंदिराचा मूळ गाभारा खूप प्राचीन काळातील असून, सुमारे ४00 वर्षांपूर्वी हे आताचे मंदिर बांधून काढले असे म्हणतात. १२00 वर्षांपासून हे गाव या किनार्‍यावर वसले आहे. 

अशफाक उल्ला खान

अशफाक उल्ला खान (२२ ऑक्टोबर १९00, मृत्यू : १९२७) भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील एक प्रमुख क्रांतिकारक. त्यांनी काकोरी कांड या नावाने प्रसिद्ध असलेल्या घटनेमध्ये त्यांचा भाग होता. इंग्रज सरकारने त्यांच्यावर खटला चालवला आणि १९ डिसेंबर १९२७ रोजी त्यांना फैजाबाद जेलमध्ये फासावर लटकावण्यात आले. राम प्रसाद बिस्मिल प्रमाणेच अशफाक उल्ला खान हे उर्दू भाषेचे चांगले कवी होते. त्यांचे उर्दूमध्ये तखल्लुस, (टोपण नाव) हसरत हे होते. उर्दू व्यतिरिक्त ते हिंदीत व इंग्रजीतसुद्धा कविता लिहीत असत. त्यांचे पूर्ण नाव अशफाक उल्ला खान वारसी हसरत असे होते. भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या इतिहासात बिस्मिल आणि अशफाक यांची भूमिका निर्विवादपणे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे एक अनुपम उदाहरण आहे. अशफाक उल्ला खान यांचा जन्म उत्तर प्रदेशमधील शहीदगढ शाहजहानपूरमध्ये रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या कदनखैल जलालनगर मोहल्ल्यात २२ ऑक्टोबर १९00 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मोहम्मद शफीक उल्ला खान, तर मजहूरुन्निशाँ बेगम आईचे नाव होते. अशफाक यांनी स्वत: आपल्या डायरीमध्ये लिहिले आहे की, 'जेथे एकीकडे त्यांच्या वडिलांच्या खानदाणीत एकही जण पदवीधर होईपर्यंतचे शिक्षण प्राप्त करू शकला नाही आणि दुसरीकडे त्यांच्या आजोळी सर्व उच्चशिक्षित होते. त्यातील काही तर डेप्युटी कलेक्टर व एस. जे. एम. (सब ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट) पदावरही काम करत होते. १८५७ च्या गदरयुद्धात त्या लोकांनी (त्यांच्या आजोळच्यांनी) जेव्हा भारताची साथ नाही दिली, तेव्हा इतर जनतेने रागाच्या भरात त्यांचा आलिशान बंगला आगीत भस्म करून टाकला. तो बंगला त्या शहरात आजही जली कोठी (जळालेला बंगला) या नावाने प्रसिद्ध आहे. अशफाक यांनी आपले बलिदान देऊन त्यांच्या आजोळच्यांच्या नावावरील कुरूप डाग कायमचा धुवून टाकला.

अशफाक आपल्या भावंडांत सर्वात लहान होते. सर्व प्रेमाने त्यांना 'अच्छू' म्हणत असत. एके दिवशी त्यांचे मोठे भाऊ रियासत उल्ला यांनी अशफाक यांना बिस्मिल यांच्या बद्दल सांगितले की, ''ते एक सर्मथ व्यक्ती आणि उत्तम दर्जाचे कवीही आहेत. मात्र हल्ली मैनपुरी कांडामध्ये अटक झाल्या कारणाने शहाजहानपूरमध्ये दिसत नाहीत. देव जाणे कुठे आणि कोणत्या स्थितीत रहात असतील. बिस्मिल त्यांचा सर्वात उमदा क्लासफेलो आहे.'' अशफाक तेव्हापासूनच बिस्मिल यांच्या भेटीसाठी उतावळे झाले. काळ पुढे लोटला. १९२0मध्ये सार्वत्रिक माफीनंतर राम प्रसाद बिस्मिल आपल्या गावी शाहजहानपूरला आले आणि घराच्या कारभारात मग्न झाले. अशफाक यांनी कित्येकदा बिस्मिल यांची भेट घेऊन त्यांचा विश्‍वास मिळविण्याचा प्रयत्न केला, पण ते असफल राहिले. एके दिवशी रात्री खन्नौत नदीच्या किनारी एका सुनसान जागेवर बैठक चालू होती तिथे अशफाक पोहोचले. बिस्मिल यांच्या एका चारोळी (शेर) वर जेव्हा अशफाक यांनी 'आमीन' म्हटले तेव्हा बिस्मिल यांनी त्यांना जवळ बोलावून त्यांचा परिचय करून घेतला. बिस्मिल यांना समजले की, अशफाक हे त्यांचे क्लासफेलो रियासत उल्ला यांचे सख्खे लहान भाऊ आहेत, तसेच उर्दू भाषेचे शायर (कवी) आहेत, आणि बिस्मिल यांनी त्यांना आर्य समाज मंदिरात येऊन वैयक्तिक भेटीसाठी बोलाविले. घरच्यांचा विरोध असून देखील अशफाक आर्य समाजात पोहोचले आणि राम प्रसाद बिस्मिल यांच्याशी खूप वेळच्या चर्चेनंतर त्यांच्या पार्टीचे(मातृवेदीचे)सक्रिय सदस्य झाले. येथूनच त्यांच्या जीवनाची नवी कहाणी सुरू झाली. ते कवी तर होतेच, त्या बरोबरच ते देशभक्तही बनले.

सुप्रसिद्ध संशोधक थॉमस अल्वा एडिसन

सुप्रसिद्ध अमेरिकन संशोधक थॉमस अल्वा एडिसन (११ फेब्रुवारी १८४७ - १८ ऑक्टोबर १९३१) म्हणजे अनेक नव्या विद्युत, प्रकाश व ध्वनी उपकरणांचे जनक. त्यांचा जन्म मिलान, ओहायओ येथे झाला. त्यांचे शिक्षण मिशिगनमधील पोर्ट ह्यूरन येथील शाळेत केवळ तीन महिनेच झाले होते. वयाच्या बाराव्या वर्षापासून रेल्वेत संदेशवाहकाचे व त्यानंतर पंधराव्या वर्षापासून निरनिराळ्या शहरांत तारायंत्रावर काम करून त्यांनी आपला चरितार्थ चालविला. फावल्या वेळात ते अभ्यासात व प्रयोगकार्यात निमग्न असत. मत नोंदविणार्‍या त्यांच्या विद्युत यंत्राकरिता १८६८ मध्ये त्यांना पहिले पेटंट मिळाले. त्यानंतरच्या काही वर्षांत त्यांनी एकाच तारेवर दोन वा अनेक संदेश एकाच वेळी वाहू शकणार्‍या व स्वंयचलित तारायांत्रिक पद्धतीचा तसेच टंकलिखाणाच्या आवृत्त्या काढण्याकरिता विद्युत लेखणीचा (याचाच पुढे 'मिमिओग्राफ' या स्वरूपात विकास झाला) शोध लावला. कार्बन प्रेषकाचा (ध्वनितरंगांचे विद्युत प्रवाहात रूपांतर करणार्‍या साधनाचा) शोध लावून (१८७७-७८) ग्रॅहॅम बेल यांचा दूरध्वनी व्यवहारोपयोगी करण्यास त्यांनी मदत केली. एडिसन यांचा सर्वपरिचित व सर्वांत मूळचा शोध फोनोग्राफचा होय (१८७७). त्यांचा मूळचा नमुना हाताने फिरवावयाच्या टीनच्या पत्र्याच्या वृत्तचितीचा (नळकांड्याच्या आकाराचा) होता. दहा वर्षानंतर त्यांनी मोटरने चालणारा व मेणाची वृत्तचितीकार तबकडी उपयोगात आणणारा फोनोग्राफ तयार केला. त्यानंतर त्यांनी, सांगितलेला मजकूर लिहून घेण्यास मदत करणारे 'एडिफोन' या कचेर्‍यांच्या कामकाजास उपयुक्त असलेल्या उपकरणाचा शोध लावला. व्यवहारोपयोगी विजेचा उद्दीप्त (तापलेल्या तंतूपासून प्रकाश देणारा) दिवा तयार करण्यासाठी त्यांनी केलेले अनेक प्रयोग निष्फळ ठरले व त्यांकरिता त्यांना ४0,000 डॉलरपेक्षाही जास्त खर्च सोसावा लागला. परंतु, अखेरीस २१ ऑक्टोबर १८७९ रोजी काचेच्या निर्वात फुग्यात ठेवलेल्या कार्बनयुक्त कापसाच्या धाग्याचा उद्दीप्त दिवा तयार करण्यात त्यांना यश आले. नंतरच्या दहा वर्षांत त्यांनी विजेद्वारे प्रकाश, उष्णता व शक्ती यांच्या निर्मितीसाठी व वितरणासाठी तीन तारांच्या पद्धतीचा शोध लावला. विद्युत जनित्र (डायनामो) व मोटर यांत सुधारणा केल्या आणि विद्युत रेल्वेच्या विकासास मदत केली. १८९१-१९00 या काळात त्यांनी प्रामुख्याने लोह खनिजांची सांद्रता (दिलेल्या घनफळात असणारे खनिजाचे प्रमाण) चुंबकीय पद्धतीने वाढविण्यासंबंधी संशोधन केले. त्यानंतर त्यांनी शिशाच्या संचायक विद्युत् घटापेक्षा (विद्युत भार साठवून ठेवणार्‍या घटापेक्षा) बराच हलका असा एक नवीन प्रकारचा निकेल हायड्रेट , आयर्न ऑक्साईड व पोटॅशियम हायड्रॉक्साईड उपयोगात आणणारा संचायक विद्युत घट तयार केला. १८९१ मध्ये त्यांनी प्राथमिक स्वरूपाच्या चलचित्रपट कॅमेर्‍याचे (किनेटोस्कोपिक कॅमेरा) व नंतर चलचित्रपट पडद्यावर दाखविणार्‍या प्रक्षेपकाच्या पेटंटसाठी अर्ज केला. उद्दीप्त दिव्याच्या गोलकामध्ये एक धन विद्युत भारित धातूची पट्टी बसविल्यास दिव्यातील तप्त तंतूपासून धातूच्या पत्र्याकडे विद्युत प्रवाह वाहतो असा त्यांनी १८८३ मध्ये शोध लावला. ते ऑरेंज येथे मृत्यू पावले.

Saturday 17 October 2020

रांगोळीचा इतिहास


रांगोळीला अल्पना असं सुद्धा म्हटलं जातं. रांगोळी म्हणजेच अल्पना चिन्ह ही अगदी मोहंजदडो आणि हडप्पा संस्कृतीच्या खुणांमध्येही आढळली आहेत. अल्पनेचा समावेश हा कामसूत्राने वर्णन केलेल्या चौसष्ठ कलांमध्येही होतो. ही एक अतिप्राचीन लोककला आहे. अल्पना या शब्दाची उत्त्पत्ती ही संस्कृत शब्दातील ओलंपेन या शब्दातून झाली. याचा अर्थ लेप करणे असा आहे.  प्राचीन काळी लोकांचा असा विश्वास होता की, कलात्मक चित्रांनी शहर आणि गावं धनधान्याने समृद्ध राहतात आणि जादुई प्रभावापासूनही सुरक्षित राहतात. याच दृष्टीकोनातून अल्पना धार्मिक आणि सामाजिक समारंभांच्या वेळी काढण्याची प्रथा सुरू झाली. रांगोळीचा उल्लेख आर्य युगातही आढळतो.

रांगोळीचा उद्देश.

रांगोळी ही नेहमीच धार्मिक आणि सांस्कृतिकतेचं प्रतीक मानली जाते. प्रत्येक आध्यात्मिक कार्याचं रांगोळी ही एक महत्त्वपूर्ण अंग आहे. म्हणूनत प्रत्येक यज्ञाच्या किंवा पूजेच्या ठिकाणी वेदीसाठी आधी रांगोळी काढली जाते. फार पूर्वीपासून खेड्यापाड्यात तुळशी वृंदावनाजवळ रांगोळी काढण्याची प्रथा आहे. आजही शहरी भागात काही ठिकाणी गृहिणी आवर्जून रांगोळी काढतात. असं म्हणतात की, रांगोळी घरात येणाऱ्या अशुभ शक्तींना घराचा उंबरठा ओलांडू देत नाही. तसंच काहीसं शुभकार्याच्या बाबतीतही आहे. पण आता रांगोळी काढण्यामागे हे एकमेव कारण राहिलं आहे, असं नाही. तर महाराष्ट्रात नववर्षाच्या सणाला म्हणजेच गुढीपाडव्याला स्वागत यात्रांमध्ये रांगोळीचे गालिचे घातले जातात. या रांगोळीचं आयुष्य अगदी काही क्षणांचं असलं तरी त्यामागील भावना महत्त्वाची मानली जाते.

विविध प्रांतातील रांगोळी-रांगोळीचा जसा इतिहास मोठा आहे तसंच विविध प्रांतातील तिची ओळखही वेगवेगळी आहे. केरळमध्ये पुविडल, राजस्थानमध्ये मांडणा, बंगालमध्ये अल्पना, आंध्रप्रदेशमध्ये मुग्गु, तामिळनाडूमध्ये कोलम जी मुख्यतः तांदूळाने काढली जाते. मध्यप्रदेशमध्ये चौकपूरना अशी भारतातील विविध भागात रांगोळीला विविध नावांनी संबोधलं जातं. महाराष्ट्रातील काही आदिवासी जमातींमध्ये तर रांगोळी अशा पद्धतीने रेखाटली जाते की, त्याला वारली पेटींग म्हणून ओळखलं जातं. या वारली पेटींगमधील काही आकार लग्नघरात रेखाटणं हे शुभ मानलं जातं.

रांगोळीसाठी लागणारं साहित्य-पांढरी रांगोळीही मुख्यतः गारगोटीच्या दगडापासून बनवली जाते. जी रंगाला पांढरी आणि पावडरसारखी असते. पारंपारिक रांगोळ्यांमध्ये तांदूळाचा, कुंकूवाचा, हळदीचा किंवा अगदी गव्हाच्या पीठाचाही वापर करण्यात यायचा. फुलांच्या रांगोळीसाठी खास विविध फुलांच्या पाकळ्यांचा वापर केला जातो. आजकाल रांगोळीमध्ये रंग म्हणून रासायनिक रंगांचा वापर करण्यात येतो. इको फ्रेंडली रांगोळी साकारताना ती मुख्यतः तांदूळाच्या पीठाने, फुलांनी किंवा अगदी लाकडी भुस्स्याने ती साकारली जाते.

रांगोळीतील प्रमुख तत्त्व- रांगोळीमध्ये मुख्यतः स्वस्तिक, कमळाचं फूल, लक्ष्मीची पावलं, गोपद्म यांसारख्या समृद्धी आणि मंगल चिन्हांचा समावेश असतो. ही चिन्ह म्हणजे एक प्रकारे सांकेतिक भाषा आहे, असं म्हणायला हरकत नाही. आजही अनेक घरांमध्ये देव्हाऱ्यांसमोर नित्यनेमाने रांगोळी काढली जाते. ज्यांना हाताने रांगोळी काढणं शक्य नसतं ते रांगोळीच्या छाप्यांचा वापर करतात. आनंद आणि प्रसन्नतेचं प्रतीक म्हणजे विविध रंगी रांगोळी होय.

देवीची कृपा अभंग राहावी


आपल्याकडे प्रत्येक देवतेला अभिवादन करताना, आराधना, उपचारादी पूजन आणि स्तवन करताना निर्माण होणार्‍या मंगल लहरींची, उत्सवी वातावरणाची अनुभूती घेताना सलग काही दिवसांच्या उपचारांची परंपरा पहायला मिळते. या धर्तीवर आपण रामाचं, देवीचं, शाकंबरीचं, मल्हारी मार्तंडाचं नवरात्र साजरं करतो. या ठराविक काळात चराचरात त्या त्या देवतेचं तत्व प्रभावी असतं अशी कल्पना करुन तिचे आशीर्वाद घेण्याची परमसंधी असते, असंही धर्मशास्त्र सांगतं.

शक्तीपाशी अभय मागणं आणि समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी प्रार्थना करणं गरजेचं आहे. कारण यातून मिळणारी मानसिक शांतता आणि समाधानच आपल्या अंगी संकटांविरुद्ध लढण्याचं बळ प्रदान करेल. नवरात्रीत आपण आदिमायाशक्तीला आवाहन करतो, पूजा-अर्चनेच्या माध्यमातून तिला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतो आणि तिची आपल्यावरील कृपा अभंग रहावी अशी कामना व्यक्त करतो. मात्र हे सगळं करताना आधी आपल्या मनात स्त्रीशक्तीविषयी किती आदर, आत्मियता, आस्था आहे हे तपासून पाहण्याची गरज आहे. कारण कोणत्याही उत्सवापूर्वी घराची स्वच्छता आवश्यक असते, तशीच कधी तरी मनाची, वृत्तीची आणि प्रवृत्तीची स्वच्छताही व्हायला हवी. विशेषत: निर्भया प्रकरणानंतर समाजातल्या लिंगपिसाट प्रवृत्तींवर जोरदार प्रहार झाल्यानंतरही त्याच तीव्रतेचं हाथरस प्रकरण घडलं आणि पुन्हा तसाच माध्यमस्नेही पाठिंबा आणि राजकारणपुरस्कृत अश्रूपुराण पहायला मिळालं; त्यावरुन साफसफाईचं बरंच काम अजून बाकी आहे हे समजून घ्यायला हवं. चौकाचौकात देवीचे मांडव घालण्याची परवानगी मिळावी यासाठी भांडणारे लोक प्रत्यक्षात घरातल्या स्त्रीशक्तीचा मान ठेवतात का हे पहायला हवं. अन्याय झाल्यानंतर पीडितेला आणि तिच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी लढण्यापेक्षा असे अन्याय रोखण्याकडे सामाजिक प्रयत्नांचा कल रहायला हवा. नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर समाजाचं या अंगाने होणारं प्रबोधन स्त्रीशक्तीचा खरा जागर करणारं ठरेल असं म्हणता येईल.

एकीकडे असा सामाजिक आशय पहायला मिळत असताना धार्मिक अथवा आध्यात्मिक अंगाने नवरात्रीचं वेगळं महत्त्व सांगण्याची आवश्यकता नाही. दरवर्षीप्रमाणे सळसळता उत्साह नसला तरी आता नवरात्रीच्या तयारीचा जोर वाढतो आहे. नवरात्र सुरू होण्याच्या काही दिवस आधी गावाजवळील ओढ्यावर, नदीवर, तळ्याकाठी वा आपापल्या शेतात बहुतांश स्त्रिया एकत्र येतात.येताना घरातील सर्व कपडे धुण्यासाठी सोबत आणलेले असतात. वाहत्या, मोकळ्या पाण्यात सर्वजणी एकमेकींच्या सहकार्याने कपडे धुण्याचा कार्यक्रम पार पाडतात. धुतलेले कपडे काठावर वाळत घातले जातात. या ठिकाणी लवकर येणं, येताना जेवणाचा डबा बरोबर आणणं, एकत्र जेवण आणि थोडी विश्रांती, नंतर सायंकाळी धुवून वाळवलेले सर्व कपडे घेऊन घराकडे परतणं हा कार्यक्रम ठरलेला असतो. पुरेशी स्वच्छता झाल्याशिवाय नवरात्राचं पुरेपूर समाधान मिळत नाही, अशी अनेक स्त्रियांची भावना असते. 

नवरात्रात घरोघरी घट बसवले जातात. या घटाचं महत्त्व मोठं आहे. या घटासाठी पवित्र ठिकाणची माती आणून त्यात गहू, हरभरे, जोंधळे, भात, जवस, सातू, राळे, उडीद, मका अशी सात धान्यं पेरायची. त्यावर कलश ठेवायचा. कलशात सप्त नद्यांचं पाणी भरायचं. पाण्यात सोनं, चांदी, मोती, प्रवाळ, चांदीचं-तांब्याचं नाणं घालायचं. हळद-कुंकू, गंध, फूल, अक्षता, सुपारी वहायची. घटावर अंबेची प्रतिष्ठापना करायची. रोज नव्या फुलांची माळ देवीच्या मस्तकी रूळेल अशा पध्दतीने सोडायची. नऊ दिवस रोज नवी माळ… एकदा स्थानापन्न झालेल्या देवीला नऊ दिवस, नऊ रात्र हलवायचं नाही. रोज सवाष्ण जेवू घालायची. देवीचं वैशिष्ट्य असं की ती नऊ दिवस आणि नऊ रात्र झोपत नाही. अर्थातच भक्तानेही नव-रात्र जागरण करायचं, नऊ दिवस उपवास करायचा. परंपरेनुसार अहोरात्र तेलाचा वा तुपाचा नंदादीप देवीसमोर तेवत ठेवायचा. प्रत्येकाच्या चालीरितीनुसार यात थोडाफार फरक असेल. पण मुळात ही पूजा सृजनाची, निर्माणशक्तीची ! तिची तयारी सध्या घरोघर सुरू आहे.

ही देवी आदिमाता आहे. देवांनाही ‘त्राहि माम्’ करुन सोडणार्‍या महिषासुराचा वध करण्यास ती सिद्ध झाली आहे. तिचं रूपडं पहा. ती अष्टभुजा आहे. शिवाने दिलेलं त्रिशूळ, विष्णूने दिलेले सुदर्शन चक्र, वायुदेवाने दिलेले धनुष्य आणि बाणांचा भाता, अग्निदेवाने दिलेली गदा, महाकाळाने दिलेली तलवार, यमाने दिलेली ढाल, इंद्राने दिलेला अंकुश, वरूणदेवाने दिलेला नागपाश आणि विश्वकर्म्याने दिलेली कुर्‍हाड अशी आयुधं आपल्या आठ हातांमध्ये घेऊन ती असुराचा नाश करण्यास सिद्ध आहे. सर्व शक्तींचे प्रतीक असलेला सिंह हेच तिचं वाहन आहे. कोलकत्यातील ती दुर्गा किंवा कालीमाता आहे. गोव्यात शांतादुर्गा, म्हाळसा, कामाक्षी आहे. कोल्हापूरची महालक्ष्मी, रेणापूरची रेणुकामाता, तुळजापूरची तुळजाभवानी ही देवीची तीन शक्तीपीठं आणि वणीची सप्तशृंगनिवासिनी जगदंबा हे देवीचं अर्धं शक्तीपीठ आहे.


देवीची शक्तिपीठे


घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये आज घटस्थापना करून नवरात्रोत्सवाच्या मंगल सोहळ्यास सुरुवात झाली आहे. देवीच्या मूर्ती अथवा प्रतिमेसमोर घट मांडून धान्य पेरून नंदादीप लावून पूजन करण्यात येते.  नवरात्रीत प्रत्येकजण भक्तिभावाने मनापासून देवीची उपासना करतात. आपण ज्या देवीची पूजा करतो त्या नवदुर्गाचे महत्व आहे. नवरात्र ही आपल्याला विश्रांती आणि कायाकल्प प्रदान करते, या कालखंडात उपवास, ध्यान, प्रार्थना, आणि इतर अध्यात्मिक पद्धतींनी महत्त्व दिले जाते. नवरात्री दरम्यान केलेली प्रार्थना, जप आणि ध्यान यामुळे आपल्या मनाला शांतता लाभते. तसेच या गोष्टी आपल्यात सकारात्मक गुणधर्म आणते आणि आळस, गर्विष्ठपणा, ओझरतेपणा, क्रोध आणि अत्याचार यांसारख्या गोष्टींना नष्ट करते.

नवरात्रोत्सव आला की, राज्यातील देवीच्या साडेतीन पीठांकडे भाविकांचे पावले वळायला लागतात. राज्यातील कोल्हापूर, तुळजापूर, माहूर आणि नाशिक या ठिकाणी देवीची साडेतीन पीठे आहेत. या सर्वच तीर्थक्षेत्रांना मोठा मान असून त्यांच्याबद्दलच्या अनेक आख्यायिकाही आहेत. ही सर्वच स्थळे जागृत मानली जातात. त्यामुळे भाविक मनोभावाने या स्थळांना नेहमीच भेटी देतात. मात्र, नवरात्रोत्सवात इथे जास्त गर्दी बघायला मिळते. 

तुळजाभवानी - तुळजापूर

भारतातील शक्तीदेवताच्या पीठापैकी साडेतीन पीठे महाराष्ट्रात आहे. त्यातील श्री क्षेत्र तुळजापूर हे पूर्ण व आद्यपीठ मानले जाते. महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यात वसलेले तुळजापूर हे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असून त्याठिकाणी तुळजाभवानी देवीचे प्राचीन मंदिर आहे. तुळजाभवानी देवीची महती तशी हिंदू पुराणातून खूपच विस्ताराने सांगितली गेली आहे. त्या माहितीनुसार असुरांचा, दैत्यांचा संहार करून विश्‍वात नीती व धर्माचरण यांची पुनस्र्थापना करण्याचे महत्त्वाचे कार्य तुळजाभवानी देवीने प्रत्येक युगामध्ये केले आहे.

स्वराज्य स्थापना करणारे छत्रपती श्री शिवाजी महाराज, भोसले घराण्याची ही कुलदेवता आहे. तुळजाभवानी देवीच्या आशीर्वादाने शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली होती. देवीने महाराजांना दृष्टांत देऊन महाराष्ट्रावरील दुष्टचक्राचे निवारण करण्यासाठी भवानी तलवार दिली होती, अशी आख्यायिका आहे. देवीचे मंदिर बालाघाटातील एका डोंगरमाथ्यावर असल्याने अगदी जवळ गेल्यावर देखील या मंदिराचा कळस दिसत नाही. मंदिराच्या काही भागाची बांधणी हेमाडपंथी आहे. महाराष्ट्रात या देवीस विशेष महत्त्व असून नवरात्रीचा उत्सव जरी नऊ दिवसांचा असला तरी तुळजापूरला मात्र, हा उत्सव एकूण एकवीस दिवस चालतो.

रेणुकादेवी - माहूर

माहूर हे देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक असून येथील पीठाची देवता रेणुकादेवी आहे. रेणुकादेवी ही पतितांची देवी म्हणून पूजली जाते. ग्रामीण कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रात देवीचे उपासक आढळतात. भक्त तिला संपूर्ण जगाची आई किंवा जगदंबा मानतात. महाराष्ट्रातील अनेक परिवारांची ही कुलदेवता आहे. 

यल्लम्मा देवी हे कालीचेच रूप मानले जाते. यल्लम्मा देवीचा एक हात अहंपणाचा नाश करणारा आणि दुसरा हात हा भक्तांवर वरदहस्त दाखवणारा आहे. यल्लम्मा देवीची दक्षिण भारतात मुख्यत्वे पूजा होते आणि तिथे ती महाकाली, जोगम्मा, सोमालम्मा, गुंड्डम्मा, पोचम्मा, मायसम्मा, जगदम्बिका, होलियम्मा, रेणुकामाता, येल्लम्मा, मरिअम्मा आणि रेणुका देवी अशा विविध नावांनी ओळखली जाते. मंदिर हे भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या नांदेड जिल्ह्यातील माहूर या गावाजवळील गडावर आहे.

शिवाची पत्नी पार्वतीने कुब्ज देशाच्या रेणू नावाच्या राजाच्या घरी जन्म घेतला. रेणुची मुलगी ती रेणुका असे तिचे नाव रेणुका झाले. शंकराचे अवतार असलेल्या जमदग्नी समवेत तिचे लग्न झाले. त्यांचे आर्शमात कामधेनू गाय होती. त्या ठिकाणचा राजा सहस्रार्जुनाला ही गाय आपल्याकडे असावी असे वाटू लागले. जमदग्नी ऋषींनी त्याची मागणी अमान्य केली. त्याने जमदग्नींचा पुत्र परशुराम हा आर्शमात नाही असे बघून आर्शमावर हल्ला केला व जमदग्नींना ठार मारले. परशुरामाने कोरी भूमी म्हणून माहूरचे स्थान अंत्यविधीसाठी निवडले. त्यावेळेस रेणुका सती गेली. परशुरामास आईची खूप आठवण येऊ लागली. त्यावेळेस आकाशवाणी झाली की तुझी आई भूमीतून वर येऊन तुला दर्शन देईल, पण तू मागे पाहू नकोस. मात्र काही वेळाने परशुरामाने मागे पाहिले तेव्हा रेणुकेचे फक्त डोके जमिनीतून बाहेर आले होते; बाकी भाग जमिनीतच राहिला. या डोक्यास (शिरास) 'तांदळा' म्हणतात.

महालक्ष्मी - कोल्हापूर

कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर (अंबाबाईचे देऊळ) हे पुराणात उल्लेखलेल्या १0८ पीठांपैकी एक, व महाराष्ट्रात असलेल्या देवीची साडेतीन पीठांपैकी एक आहे. मंदिराच्या मांडणीवरून ते चालुक्यांच्या काळात इ.स. ६00 ते ७00 मध्ये बांधले असण्याची शक्यता आहे. मंदिराचे पहिले बांधकाम राष्ट्रकूट किंवा त्या आधीचा शिलाहार राजांनी सुमारे आठव्या शतकात केले असावे. पुराणे, अनेक जैन ग्रंथ, ताम्रपत्रे व सापडलेली अनेक कागदपत्रे यांवरून अंबाबाई मंदिराचे पुरातनत्व सिद्ध होते आणि कोल्हापूरची अंबाबाई खर्‍या अर्थाने अखिल महाराष्ट्राची कुलस्वामिनी ठरते. मंदिराच्या परिसरात जवळपास ३५ लहान-मोठी मंदिरे आहेत. 

कधी काळी मुसलमानांनी या देवळाचा विध्वंस केला तेव्हा देवीची मूर्ती पुजार्‍याने अनेक वर्षे लपवून ठेवली होती, असे म्हणतात. पुढे संभाजी महाराज यांच्या कारकीर्दीत इ.स. १७१५ ते १७२२ या कालखंडात मंदिराचे पुनरुज्जीवन करण्यात आले. उत्तम कोरीव काम असलेल्या भिंती व अगदी साधे वरचे शिखर हा कारागिरीतला फरक त्यामुळेच पडला असावा.

महालक्ष्मी ही विष्णूची भार्या व म्हणून समोर गरुडमंडपात विष्णुवाहन गरूडाची स्थापना केली आहे. तर मूर्तीच्या जवळील सिंह व शिरावरील शिवलिंगामुळे देवी अनेकांच्या मते पार्वतीचे रूप आहे. देवीची मूर्ती दगडी असून तिचे वजन ४0 किलोग्रॅम आहे. मूर्तीमागे दगडी सिंह आहे. डोक्यावर मुकुट आहे आणि त्यावर शेषनाग आहे. 

वर्षातूून मार्च व सप्टेंबर महिन्याच्या २१ तारखेस सूर्यास्तावेळी खिडकीतून सूर्यकिरणे मूर्तीच्या मुखावर पडतात. या योगास दुर्मीळ व लाभदायक मानण्यात येते. मावळतीच्या सोनेरी सूर्यप्रकाशात न्हाऊन निघणार्‍या मातेच्या दर्शनासाठी या दिवशी भक्तगण मंदिरात गर्दी करतात. त्यानिमित्त येथे किरणोत्सवही साजरा केला जातो.

सप्तश्रृंगीदेवी - नाशिक

महाराष्ट्रात देवीच्या साडेतीन पीठांपैकी अर्धे पीठ असलेली सप्तश्रृंगीदेवी नाशिकपासून ६५ किलोमीटरवरील ४८00 फूट उंचावरील सप्तश्रृंगगडावर वसलेली आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगेवरील सात शिखरांचा प्रदेश म्हणजे सप्तश्रृंगगड. एकीकडे खोल दरी, तर दुसरीकडे छाती दडपविणारे कडे आणि यात फुललेली नाजूक हिरवाई, असा निसर्ग घेऊन येथे उभी ठाकलेली देवी जणू या निसर्गाच्या रौद्र रूपाशीच नाते सांगणारी आहे, असे वाटते. आदिमायेच्या या गडावर वस्ती करण्याची आख्यायिकाही तिच्या या रूपातूनच जन्माला आली आहे. मातलेल्या महिषासुर राक्षसाच्या निर्दालनासाठी देवादिकांनी देवीची याचना केली अन् होमाद्वारे ती प्रकटही झाली. तिचे प्रकट रूप हेच सप्तश्रृंगीचे होते, असे सांगितले जाते. या देवीचे महात्म्य मोठे आहे. देवी भागवतात देवीची देशात १0८ शक्तीपीठे असल्याचा उल्लेख आहे. त्यांपैकी महाराष्ट्रात साडेतीन पीठे आहेत. त्यांपैकी सप्तश्रृंगीचे अर्धे पीठ आहे. याव्यतिरिक्त अर्धे पीठ असल्याचा कोणताही उल्लेख त्यात सापडत नाही. या देवीला श्री ब्रह्मस्वरूपिणी असेही म्हणतात. ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून निघालेल्या गिरिजा महानदीचे रूप म्हणजे सप्तश्रृंगीदेवी. महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वतीचे त्रिगुणात्मक स्वरूप म्हणजे सप्तश्रृंगीदेवी, असे मानले जाते. नाशिकच्या तपोवनात राम, सीता व लक्ष्मण वनवासासाठी आले असता, येथे येऊन गेल्याचीही आख्यायिका आहे.