Sunday 31 May 2020

प्रसिध्द लेखक गो.नी. दांडेकर

गोपाल नीलकंठ तथा गो.नी. दांडेकर (ज्यांना गोनीदा असेही म्हणतात)त्यांचा जन्म ८ जुलै, १९१६ रोजी झाला. हे एक अनुभवसंपन्न, सृजनशील, रसिक वृत्तीचे कलावंत आणि लेखकही होते. .तसेच गो.नी.दा. हे परिभ्रामक, कुशल छायाचित्रकार आणि दुर्गप्रेमीसुद्धा होते. गो. नी. दांडेकर ह्यांचा जन्म परतवाडा (विदर्भ) येथे झाला. त्यांचे वडील शिक्षक होते. वयाच्या १२ व्या वर्षी गोनीदांनी (गो. नी. दांडेकर यांनी) स्वातंत्र्यलढय़ात भाग घेण्यासाठी पलायन केले. त्यासाठी त्यांनी सातव्या इयत्तेमध्ये शाळा सोडली.

सोनाझरीका मिन्झ - पहिल्या भारतीय आदिवासी महिला कुलगुरू

आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी आजही पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत. परंतु तरीही आदिवासी समाजातील विद्यार्थी उच्च स्थानावर जात आहेत. अशा विद्यार्थ्यांसाठी प्राध्यापक सोनाझरीका मिन्झ आदर्श ठरल्या बनल्या आहेत. आदिवासी म्हटले की अजूनही एका संकुचित वृत्तीने पाहिले जाते, परंतु त्यावरही आदिवासी विद्यार्थी मात करतात. असाच प्रकार प्राध्यापक सोनाझरीका मिन्झ यांच्या बाबत पण घडला. इंग्रजी माध्यमातून प्रवेश नाकारल्यामुळे हिंदी माध्यमातून शाळा शिकणाऱ्या आणि पुढेही “तुला गणित जमणार नाही” असे शाळेत गणिताच्या शिक्षकांनी अपमान केल्यावर गणितातच उच्च शिक्षण घेणाऱ्या सोनाझरीका मिन्झ या आदर्श ठरल्या आहेत.

सुंदर सुंदर विचार

1) स्वातंत्र्याचा वृक्ष ताजातवाना ठेवून त्याला देशभक्तांच्या घामाचे व कष्टाचे खतपाणी करावे.-थॉमस जेफरसन
2) पृथ्वीवरील घनदाट वृक्षांच्या छायेपेक्षा विवेकरूपी वृक्षांची छाया अधिक शीतल असते.-गौतम बुद्ध
3) अन्यायाचा व द्वेषाचा विजय कधीच होत नसतो.-यशवंतराव चव्हाण
4) विशुद्ध कलेच्या सर्जनासाठी कलाकाराचे अंतःकरण निर्दोष असले पाहिजे.-प्लेटो
5)आपल्या प्रभावी वक्तव्याने शत्रूचेदेखील मत बदलवू शकतो, तोच महापुरुष होय.-स्वामी विवेकानंद

Saturday 30 May 2020

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर

भारताच्या कॅथरीन द ग्रेट, एलिझाबेथ, मागार्रेट म्हणून इंग्रजी लेखकाने प्रशंसा केलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची आज जयंती. इंग्रजी लेखक लॉरेन्स यांनी अहिल्याबाई यांची तुलना रशियाची राणी कॅथरीन, इंग्लंडची राणी एलिझाबेथ तसेच डेन्मार्कची राणी मागार्रेट यांच्याशी केली आहे. एक अतिशय दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून अहिल्याबाई होळकर हे नाव मराठय़ांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे.

वाढवा आपले सामान्य ज्ञान


वाढवा सामान्यज्ञान
१) आयबीआरडीचे विस्तारित रूप काय?
२) जगातील सर्वांत उंच शिखर माऊंट एव्हरेस्ट कोठे आहे?
३) मदर तेरेसांची जन्मभूमी कोणती?
४) ब्रिटनमध्ये कोणती शासन पद्धती अस्तित्वात आहे?
५) रडारचा शोध कोणी लावला?
उत्तर : १) इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट  २) नेपाळ ३) अल्बानिया ४) संसदीय शासन पद्धती ५) अल्बर्ट टेलर आणि लिओ सी यंग

Thursday 28 May 2020

थोरा-मोठ्याचे सुविचार

1)आपण हे जग बदलू शकतो असा वेडसर विचार करणारेच जगात आमूलाग्र बदल घडवतात.-स्टीव्ह जॉब्ज
2)पर पिडा, पर निंदा। हे खरे पाप तयाचे।।-संत तुकाराम महाराज
3)माणूस मारता येतो, मात्र त्याचे विचार मरत नाहीत.-महादेव गोविंद रानडे
4)निर्धारशक्ती पराकोटीला पोहचल्यावाचून मन जिंकता येत नाही.-प्र. के.अत्रे

थोरांचे सु-विचार

1)आळसावर मात करून जीवनाच्या मैदानात निश्चयाचा झेंडा जो रोवतो तोच यशस्वी होतो.-यदुनाथ थत्ते
2)इच्छाशक्ती सर्वाधिक शक्तिमान आहे,तिच्यासमोर प्रत्येक वस्तू झुकते-स्वामी विवेकानंद
3)कोणताही भार आनंदाने स्वीकारला की तो हलका होतो.-ओवीड
4)प्रसन्नता ही आत्म्याची शक्ती आहे.-सॅम्युअल स्माईल्स
5)आनंदी मनुष्य दीर्घायुष्यी असतो.-शेक्सपिअर

Wednesday 27 May 2020

स्वातंत्र्यवीर सावरकर

उत्कट देशभक्त, जहाल क्रांतीकारक, तेजस्वी लेखक, कुसुमकोमल कवी, नाटककार, इतिहासकार, प्रभावी वक्ता, क्रियाशील समाजसुधारक असा एक माणूस या पृथ्वीतलावर होता. हे कुणाला खरे वाटणार नाही इतका स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर म्हणजे इंद्रधनुष्यासारखा शोभिवंत चमत्कार होता. नाशिक जिल्ह्यातील भगूर येथे त्यांचा २८ मे १८८३ रोजी जन्म झाला. वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी १८९८ मध्ये त्यांनी मातृभूमीला पारतंत्र्यापासून मुक्त करण्यासाठी देवीपुढे सशस्त्रक्रांतीची शपथ घेतली. जयोस्तुते हे स्वातंत्र्य देवीचे स्तोत्र वयाच्या २0 व्या वर्षी लिहिले.

माहिती जाणून घ्या

● जनस्थान पुरस्कार दर किती वर्षांनी दिला जातो?-दोन वर्षांनी
● भारतीय रिझर्व्ह बँकेचे प्रथम अध्यक्ष कोण होते?- ओस्बर्न स्मिथ
● नेपोलियन बोनापार्ट सम्राट कधी बनला?-1804
● आंतरराष्ट्रीय वाणिज्य मंडळाचे सचिवालय कोठे आहे?-पॅरिस
● वेरूळचे कैलासनाथ मंदिर कोणी बांधले? -राष्ट्रकूट राजा कृष्ण

Tuesday 26 May 2020

राजकीय जागृतीचे जनक : पं. नेहरू..!

फारच थोड्या महापुरुषांच्या वाट्याला पंडित नेहरुंसारखी उत्तुंग लोकप्रियता आली. साऱ्या अशिया खंडाच्या राजकीय जागृतीचे नेहरू हे प्रतीक होऊन बसले होते. आधुनिक जगातील वैचारिक संघर्षाचे ते सुवर्णमध्य' होते. भारतीय स्वातंत्र्याच्या प्रश्नाला राष्ट्रीय पातळीवरून उचलून आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या पंक्तीत बसविण्याचा चमत्कार त्यांनीच केला.
भारताची अर्थिक प्रगती झाल्यावाचून लोकशाहीच्या मार्गावर भारताची प्रगती होणे अशक्य आहे.

विलासराव देशमुख

विलासराव दगडोजीराव देशमुख हे मराठी, भारतीय राजकारणी होते. इ.स. १९७४ साली बाभळगाव ग्रामपंचायत च्या सरपंच पदापासून आपली राजकीय कारकीर्द सुरू करणारे विलासराव १८ ऑक्टोबर, इ.स. १९९९ ते १६ जानेवारी, इ.स. २00३ व १ नोव्हेंबर, इ.स. २00४ ते ४ डिसेंबर, इ.स. २00८ या कालखंडांदरम्यान ते दोन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांचा जन्म २६ मे, १९४५ ला बाभळगांव, जिल्हा लातूर येथे झाला.

Monday 25 May 2020

विजापूरचे गोलघुमट

विजापुरातील गोलघुमट म्हणजे आदिलशाही  घराण्याचे सातवे शासक महंमद आदिलशहा  यांची कबर असलेलं स्थळ. ही जगप्रसिद्ध वास्तू विजापूरचं मुख्य आकर्षण आहे. तिथं शेजारीच वस्तुसंग्रहालय आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या या धुमटाचा व्यास ४४ मीटर आणि उंची ५१ मीटर आहे. याच्या चारही बाजूच्या कोपऱ्यात अष्टकोनी आकाराचे सातमजली मनोरे आहेत. या धुमटाच्या वरच्या भागात गोलाकार आकारात कमान बनवलेली आहे.

Sunday 24 May 2020

तोरणमाळ

फिरायला गेल्यावर गर्दी, गजबजाट नकोसा वाटतो. प्रसिद्ध पर्यटनस्थळांवर लोकांची गर्दी झालेली असते. त्यामुळे एखाद्या अपरिचित, ऑफबीट ठिकाणाचा शोध घेतला जातो. असंच एक थंड हवेचं ठिकाण म्हणजे तोरणमाळ. तोरणमाळ हे नंदुरबार जिल्ह्यातलं सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेलं निसर्गरम्य पर्यटनस्थळ आहे. इथे गोरक्षनाथाचं प्रसिद्ध मंदिर आहे. तोरणमाळच्या आसपास पहाण्यासारखं बरंच काही आहे. इथून दीड किलोमीटर अंतरावर सीता खाई आहे. इथे काही काळ घालवता येईल. ही दरी लक्ष वेधून घेते. इथला धबधबा हे पर्यटकांचं मुख्य आकर्षण आहे. 

संगीतकार लक्ष्मीकांत

लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर हे त्यांचे पूर्ण नाव. त्यांचा जन्म ३ नोव्हेंबर १९३७ रोजी झाला. ते मॅन्डोलिन वादनात ख्यातनाम. चित्रपट मिळविणे ही त्यांची जबाबदारी. प्यारेलाल रामप्रसाद शर्मा ट्रम्पपेंटर म्हणून ख्यातनाम. आपल्या वडिलांकडून त्यांच्याकडे संगीत वारसा आला. बांधणीत चाल व वाद्यवृंद यांचा मेळ घालणे गरजेचे असते, दोघेही दोन्हींत मातब्बर. बर्‍याचदा लक्ष्मीकांतजींना चाल लावण्यास विशेष आनंद वाटे, सोपी चाल हे त्यांचे वैशिष्टय.

Saturday 23 May 2020

राम गणेश गडकरी

राम गणेश गडकरी यांचा जन्म २६ जून १८८५ मध्ये गुजरातमध्ये नवसारी जवळ गणदेवी येथे झाला.. गोविंदाग्रज या नावाने काव्यलेखन. काव्य, विनोद व नाटक यांचा त्रिवेणी संगम. बाळकराम म्हणून विनोदी लेखक. किलरेस्कर नाटकातुन नाटकातुन नाटकी जीवनाचा प्रारंभ, गर्व निर्वाण पहिले नाटक.

ताजमहल

ताजमहल हे भारतातील आग्रा नगरात यमुनानदीकाठी असलेले एक स्मारक असून हे जगातील सात आश्‍चर्यांपैकी एक गणले जाते. ताजमहाल हा मोगल स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. त्याची आर्किटेरल शैली पर्शियन, ओट्टोमन, भारतीय आणि इस्लामिक आर्किटेरच्या घटकांची एक अनोखी संमिर्शता आहे. १९८३ मध्ये, ताजमहाल युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ बनले. यासह, हे जागतिक वारसामध्ये प्राप्त झालेल्या सर्वोत्कृष्ट मानवी कार्यांपैकी एक म्हणून वर्णन केले गेले आहे.

कचोरीचा इतिहास

भारतीयांना तिखट खायला खूप आवडते. यामुळेच आपल्याकडे प्रत्येक गल्लीत एक प्रसिद्ध स्ट्रीट फूडचे दुकान असते. भारतीयांचे असे एक लोकप्रिय स्ट्रीट फूड म्हणजे कचोरी. याला देशातील प्रत्येक कोपर्‍यात खाल्ले जाते. आज आपण कचोरीच्या इतिहासाबद्दल जाणून घेऊया.

मजरुह सुलतानपुरी

भारतीय चित्रपटसृष्टीतील जुन्या काळातील आघाडीचे प्रमुख गीतकार मजरुह सुलतानपुरी यांचा जन्म १ आक्टोबर १९१९ रोजी झाला. आझमगड गावात एक तरुण हकिमीचा व्यवसाय करायचा. याला शायरीची मनापासून आवड. अडल्यानडल्या रुग्णांची सेवा करताना याची शायरी सुरूच असायची. याच्या शायरीच्या जादूने रुग्णाचा निम्मा आजार कमी व्हायचा. या शायरीच्या वेडातूनच हसरालूल हसन पुढे मजरुह सुलतानपुरी झाला. मजरुह म्हणजे जखमी किंवा घायाळ करणारा. मजरुहच्या गीतांनी रसिकांना प्रेमळ जखमा दिल्या. त्याच्या गीताच्या जादूने कर्णसेनांना घायाळ केले. प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक ए. आर. कारदार यांनी एका मुशायर्यात हसन यांची शायरी ऐकली.

Friday 22 May 2020

राजा राममोहन रॉय

बालविवाह, सती प्रथेच्या जोखडातून भारतीय स्त्रीला मुक्त करण्याकरता आंदोलन उभारणारे व भारतात उदारमतवादी आधुनिक सुधारणांचा पाया रचण्यात मोलाची भूमिका बजावणारे राजा राममोहन रॉय २४६व्या जयंतीनिमित्त गुगलने खास डुडल साकारून त्यांच्या कार्याला सलाम केला होता.
२२ मे १७७२ साली पश्‍चिम बंगालमधील हुगळी जिल्हातील राधानगरी या गावी त्यांचा जन्म झाला. त्यांचे बंगाली, फार्सी व संस्कृत या तीन भाषांचे प्राथमिक अभ्यास घरीच झाला.

Thursday 21 May 2020

वाढवा आपले सामान्य ज्ञान


वाढवा सामान्य ज्ञान
१) देशात डाळींचे सर्वाधिक उत्पादन घेणारे राज्य कोणते?
२) पश्‍चिम घाटात किती किलोमीटर लांबीचा पर्वत आहे?
३) 'बॉर्न अगेन ऑन द माउंटन' पुस्तकाचे लेखक कोण?
४) धातुशास्त्रावर संशोधन करणारी झारखंडमधील संस्था कोठे आहे?
५) देशातील पहिले अणुशक्ती केंद्र कोठे उभारण्यात आले?
उत्तर : १) मध्य प्रदेश २) १७00 कि.मी ३) अरुणिमा सिन्हा  ४) जमशेदपूर ५) तारापूर

राजीव गांधी

राजीव गांधी यांचा जन्म २0 ऑगस्ट इ.स. १९४४ रोजी झाला. ते भारताचे सातवे पंतप्रधान होते. इंदिरा गांधी आणि फिरोज गांधी यांचे ते ज्येष्ठ पुत्र होते. राजीव गांधी हे नेहरू घराण्यातले तिसरे पंतप्रधान होते. इंदिरा गांधीच्या निधनानंतर ३१ ऑक्टो. इ.स. १९८४ ते २ डिसेंबर इ.स. १९८९ पयर्ंत ते भारताचे पंतप्रधान होते. जेव्हा राजीव गांधीनी पंतप्रधान पदाची सूत्रे हातात घेतली तेव्हा ते भारताचे सर्वांत तरुण पंतप्रधान बनले.
राजीव गांधी राजकारणात येण्यापूर्वी इंडियन एअरलाइन्समध्ये वैमानिक होते. आई इंदिरा गांधी या भारताच्या पंतप्रधान असल्या तरी त्यांनी मात्र राजकारणातून दूर राहणे पसंत केले होते.

Tuesday 19 May 2020

मल्हारराव होळकर

मल्हारराव होळकर यांचा जन्म १६ मार्च १६९३ला झाला. हे मूळचे महाराष्ट्रातील धनगर जमातीतील होते.ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्याच्या मावळ प्रांताचे पहिले सुभेदार होते. बाळाजी विश्‍वनाथ यांनी मराठय़ांचे उत्तर भारतात वर्चस्व प्रस्थापित करण्यात मोठा वाटा असलेल्या मल्हाररावांना इंदूर संस्थानाची जहागिरी दिली. मल्हाररावांचा जन्म भटक्या धनगर मेंढपाळ कुटुंबातला होता. त्यांच्या वडिलांचा, खंडोजी वीरकर चौगुला यांचा, अशाच भटकंतीत पुणे जिल्ह्यातल्या बारामती तालुक्यातील होळ या गावी मुक्काम पडला होता.

Monday 18 May 2020

नाटककार, दिग्दर्शक आणि कलाकार गिरीश कर्नाड

गिरीश कर्नाड हे कन्नड भाषेतील आधुनिक भारतीय नाटककार, दिग्दर्शक आणि कलाकार होते. त्यांचा जन्म मे १९ मे १९३८ रोजी माथेरान येथील एका कोकणी कुटुंबात झाला. गिरीश कार्नाडांच्या आई कृष्णाबाई मानकीकर या विधवा होत्या. त्यांना एक अपत्य होते. नर्स म्हणून ट्रेनींग घेत असताना त्यांची ओळख बॉम्बे मेडिकल सर्विसेस मधल्या डॉ. रघुनाथ कर्नाड यांच्याबरोबर झाली. विधवा पुनर्विवाह च्या त्यावेळच्या पूर्वग्रहांमुळे त्यांना पाच वर्षे लग्न करता आले नाही. त्यानंतर आर्य समाजाच्या रितीनुसार त्यांनी लग्न केले. गिरीश कर्नाड हे चार पैकी तिसरे अपत्य होत.

साहित्यिक नाटककार रत्नाकर मतकरी

ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, दिग्दर्शक, निर्माते, बालनाट्य चळवळीचे अध्वयरु, स्तंभलेखक रत्नाकर मतकरी यांचे काल रात्री निधन झाले. कला, साहित्य क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान होते. १९५५ मध्ये वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी वेडी माणसं ही एकांकिका लिहिली. तेव्हा ते एल्फिन्स्टन कॉलेजला पहिल्या वर्षांला होते. त्यापूर्वी त्यांनी शाळेत असताना वर्गाच्या हस्तलिखितासाठी पन्नादाई ही एकांकिका लिहिली होती आणि टागोरांच्या लिव्हिंग ऑर डेड या गूढकथा सदृश कथेचा अनुवाद कदम्बिनी या नावाने केला होता.

मराठी भाषेतील आद्य पत्रकार-बाळशास्त्री जांभेकर

बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर हे मराठी भाषेतील आद्य पत्रकार होते. दर्पण हे मराठीतले पहिले वृत्तपत्र त्यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी सुरू केले. जांभेकरांनी बालपणी वडिलांकडे घरीच मराठी व संस्कृत भाषांचा अभ्यास आरंभला. इ.स. १८२५ साली त्यांचे मुंबईमध्ये आगमन झाले. मुंबईस येऊन ते सदाशिव काशीनाथ ऊर्फ बापू छत्रे आणि बापूशास्त्री शुक्ल यांच्याकडे अनुक्रमे इंग्रजी व संस्कृत शिकू लागले. या दोन विषयांबरोबरच गणित आणि शास्त्र या विषयांत त्यांनी प्रावीण्य मिळविले. बॉंबे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या विद्यालयात अभ्यास करून त्यांनी विशीच्या आत कोणाही भारतीयाला तोवर न मिळालेली प्राध्यापक म्हणून नियुक्ती मिळवण्याइतपत ज्ञान कमवले. इ.स. १८३४ साली एल्फिन्स्टन कॉलेजात पहिले एतद्देशीय व्याख्याते म्हणून जांभेकरांची नियुक्ती झाली.

Sunday 17 May 2020

सिक्कीम सर्वार्थानं समृद्ध राज्य

सिक्कीम हा पूर्व उत्तराज्यातला अतिशय सुंदर आणि विलोभनीय असे एक छोटे राज्य आहे. सिक्कीमचा अर्थ 'तांदळा समान शुभ्र' असा अर्थ होतो. तिथे लेपचा,नेपाळी आणि हिंदी भाषा बोलली जाते. देशाच्या मुख्य धारेत येण्यासाठी सिक्कीम सज्ज झाला आहे. २00८मध्ये केंद्रीय विश्‍व विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. पुढे शिक्षणाची गुणवत्ता दिवसेंदिवस वाढतच गेली आहे. सध्या तिथे १५विद्यालये आणि १२ महाविद्यालय अस्तित्वात असून साप्ताहिक आणि हिंदी वृत्त प्रकाशित केली जात आहेत. सिक्कीमची लोकसंख्या ६,00,000( सहा लाख) असून नेपाळ,चीन आणि भुटानला जोडणार्‍या सीमा रेखा संलग्नित आहेत.

Saturday 16 May 2020

वराह गुफा मंदिर

भगवान विष्णूच्या नऊ अवतारातील तिसरा अवतार वराह. याच वराह अवताराचे एक अतिशय सुंदर मंदिर तामिळनाडूच्या कांचीपुरम जिल्ह्यात महाबलीपुरम पासून ८ किमी अंतरावर आहे. ही गुफा मंदिर म्हणजे अखंड खडकात कोरून काढलेले मंदिर असून शिलालेख आणि ऐतिहासिक कागदपत्रांवरून ते सातव्या शतकातील आहे. १९८४ साली हे मंदिर युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत सामील केले आहे.

वाढवा आपले सामान्य ज्ञान

वाढवा सामान्य ज्ञान
१) माजी दिवंगत इलेक्शन कमिशनर टी. एन. शेषन यांचे संपूर्ण नाव काय?
२) मराठी लेखन कोशाचे संपादक कोण?
३) सी. आर. दास कुठल्या टोपणनावाने ओळखले जात?
४) मराठीतील पहिला ग्रंथ कोणता?
५) आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख होतो?
६) जगातील पहिली टेस्ट ट्युब बेबी केव्हा व कोठे जन्माला आली?
उत्तर : १) तरूनल्लाई नारायणन अय्यर शेषन २) अरूण फडके ३) देशबंधू ४) विवेकसिंधु, लेखक मुकुंदराज ५) केशवसुत ६) १९७८, इंग्लंड

Friday 15 May 2020

संत मुक्ताबाईंनी दिली मोठय़ा भावांना मायेची पाखर

ज्ञानदेवाच्या भगिनी मुक्ताबाई हिचा जन्म इंद्रायणीतीरी वसलेल्या आळंदीच्या गावाजवळील सिद्धबेटावर अश्‍विन शुद्ध प्रतिपदा शुक्रवार शके १२0१ म्हणजेच इ. सन. १२७९ मध्ये झाला. त्यांच्या आई-वडिलांचे मूळ गाव औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील आपेगाव हे होय. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई या भावंडांमध्ये मुक्ताबाई या सर्वात लहान होत्या. पोरवयातच नवृत्तीनाथ आणि त्यांच्या भावंडांना स्वजातीयांनी संन्याशाची पोर म्हणून वाळीत टाकून त्यांची विटंबना केली. पण हे सारे भोग सोसत ह्या चारही बहीण-भावंडांनी ब्रह्मविद्येची अखंड उपासना केली.

रमजान महिन्याचे पावित्र्य

मुस्लीम बांधवांच्या उपवासाचा महिना सुरू आहे. यालाच रमजानचा अर्थात बरकतीचा महिना म्हणतात. मनामनातील दरी कमी करून परस्परांमध्ये स्नेहभाव, सद्भाव वाढविणारा हा महिना. संयम, त्याग, शांती, सहिष्णुता, चांगुलपणा, प्रामाणिकपणा माणसांच्या ठायी रुजविणारा हा महिना. माणसाला वाईटापासून, वासनेपासून शेकडो मैल दूर ठेवणारा हा महिना. या महिन्याचे महात्म्य, पावित्र्य सांगावे तेवढे थोडेच.

सुगम गायिका माणिक वर्मा

माणिक वर्मा, पूर्वार्शमीच्या माणिक दादरकर यांचा जन्म १६ मे, इ.स. १९२६ ला झाला. या हिंदुस्तानी संगीत व सुगम संगीत या संगीतप्रकारांत गायन करणार्‍या मराठी गायिका होत्या. त्या हिंदुस्तानी संगीतातील किराणा घराण्याच्या शैलीत गायन करत. मराठी भाषेतील गाजलेली भावगीते, नाट्यगीते व चित्रपटगीते त्यांनी गायली आहेत. किराणा घराण्याच्या गायिका हिराबाई बडोदेकर यांच्याकडे त्या हिंदुस्तानी संगीत शिकल्या. संगीतक्षेत्रातील योगदानाबद्दल इ.स. १९७४ साली पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आले.

उपेक्षितांची कैफियत देवापुढे मांडणारे संत चोखामेळा

चोखामेळा (चोखोबा) हे यादव काळातील नामदेवांच्या संतमेळ्यातील वारकरी संतकवी होते. चोखोबांचा जन्म विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात देऊळगाव राजा तालुक्यातील मेहुणा किंवा मेहुणपुरी या गावी झाला. संत चोखामेळांचे (जन्म : अज्ञात वर्ष; मृत्यू : इ. स. १३३८) कुटुंब हे जातीने महार होते. त्यांची पत्नी सोयरा, बहीण निर्मळा, मेहुणा बंका व मुलगा कर्ममेळा हे सर्व प्रपंचाचे काबाडकष्ट उपसत असतानाच नित्यनेमाने व भक्तिभावाने पांडुरंगाचे नामस्मरण व गुणसंकीर्तन करीत होते. त्यांचा मृत्यू गावकुसाच्या कामात दरड कोसळून झाल्याचे सांगितले जाते. त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या हाडांतून विठ्ठल नामाचा गजर ऐकू येत होता, यावरून नामदेवांनी चोखोबांची हाडे ओळखून ती गोळा केली. पंढरपूरला विठ्ठल दिरासमोर त्यांची समाधी बांधली असे चरित्रकार सांगतात.

Thursday 14 May 2020

संत जनाबाई

संत जनाबाई यांचा जन्म इ.स. १२५८ ला गंगाखेड येथे झाला. जनाबाई या संत नामदेवांच्या समकालीन वारकरी संत-कवयित्री होत्या. जनाबाईंचा जन्म परभणी येथील गंगाखेड येथील दमा नावाच्या विठ्ठलभक्ताच्या घरी झाला. जनाबाईंच्या एका अभंगातील माझ्या वडिलांचे दैवते तो हा पंढरीनाथ या ओळींवरून त्यांचे वडील दमा हेदेखील वारकरी असावेत, अशी शक्यता दिसते. त्यांच्या आईचे नाव करुंड. त्याही भगवद्भक्त होत्या. संत जनाबाई या संत कवयित्री म्हणून जनमानसात लोकप्रिय आहेत.

फेसबुक संस्थापक मार्क झुकरबर्ग

मार्क इलियट झुकरबर्ग चा जन्म १४ मे १९८४ रोजी झाला. हा एक अमेरिकन उद्योजक असून फेसबुक या लोकप्रिय सोशल नेट्वकिर्ंग संकेतस्थळाचा सहसंस्थापक म्हणून प्रसिद्ध आहे. हार्वर्ड विद्यापीठात शिकत असताना मार्कने आपले वर्गमित्र डस्टिन मोस्कोविट्ज, एड्युअडरे सार्विन आणि ख्रिस ह्युजेस यांच्या सोबत फेसबुकची स्थापना केली. सध्या मार्क जगातील सगळ्यात लहान वयाचा अब्जाधीश आहे. त्या बरोबर माउंटन व्ह्यू ह्या शहरामध्ये मुख्यालय असलेल्या व्हॉट्सअँपला २0१४ साली फेसबुक कंपनीने विकत घेतले. इन्स्टाग्राम आणि ऑकुलस व्ही आर पण फेसबुकच्या नावाखाली आले आहेत.

Tuesday 12 May 2020

लेखक आर. के. नारायण

रासीपुरम कृष्णस्वामी अय्यर नारायणस्वामी यांचा जन्म १0 ऑकटोबर १९0६ रोजी आर. के. नारायण यांचा जन्म तामिळनाडू राज्यातील मद्रास (आताचे चेन्नई ) या ठिकाणी झाला. ते आठ भावंडांपैकी ( सहा मुले आणि दोन मुली ) एक होते. नारायण यांचे वडील हे स्कूल टीचर होते. नारायण यांच्या वडिलांची सतत बदली होत असल्यामुळे ते त्यांची आजी पार्वती जवळ राहिले. या काळामध्ये त्यांचे जवळचे मित्र आणि सवंगडी हे मोर आणि काही खोडकर माकडे होती.

नाइटिंगेल फ्लॉरेन्स

नाइटिंगेल फ्लॉरेन्स यांचा जन्म १२ मे १८२0 रोजी झाला. फ्लॉरेन्स नाइटिंगेल या इंग्रज परिचारिका आणि आधुनिक रुग्ण परिचर्या शास्त्राच्या (शुर्शूषा) संस्थापिका होत. त्यांनी सार्वजनिक आरोग्य विज्ञानात मोलाची भर घातली. तसेच त्यांनी समाज सुधारणेसाठी संख्याशास्त्राचा (सांख्यिकी) वापर करण्याचे विशेष कार्य केले. त्यात स्वत: काढलेल्या रंगीत रोझ रेखाकृती किंवा तक्ते यांद्वारे त्यांनी संख्याशास्त्रीय आधारसामग्रीचे आलेखीय निदर्शन केले.

जनरल नॉलेज जाणून घ्या

१) युनेस्कोद्वारे जगातील किती स्थळांचा समावेश 'जागतिक वारसा स्थळा'त करण्यात आला आहे?
- १०९२
२) देशातील किती स्थळांचा समावेश 'जागतिक वारसा यादीत' करण्यात आला आहे?-३७
३) जगात कोणत्या देशात वाघाची संख्या सर्वाधिक आहे? - भारत
४) सिक्कीममध्ये पहिले विमानतळ कोठे सुरु करण्यात आले? -- पाक्योंग

राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस

11 मे 1998 रोजी भारताने एरोस्पेस अभियंता आणि मृत माजी राष्ट्रपती डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्या मार्गदर्शनाखाली राजस्थान येथील भारतीय लष्कराच्या पोखरण चाचणी क्षेत्रात शक्ती-I या आण्विक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वीपणे पार पाडली. दोन दिवसानंतर लगेचच, पोखरण-II / ऑपरेशन शक्ती पुढाकारचा एक भाग म्हणून यशस्वीपणे आणखी दोन आण्विक चाचण्या घेतल्या. पूर्वी पोखरन-I हे 1974 साली 'स्माईलींग बुद्ध' क्षेपणास्त्राच्या सहाय्याने उडवण्यात आले होते.

Monday 11 May 2020

आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन

१२मे हा दिवस जगभर आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस म्हणून साजरा केला जातो. १२मे१८२० हा  फ्लोरेन्स नाईंटीगेल यांचा जन्म दिवस. त्यांचा जन्म इटली येथे  झाला होता. त्यांनी या  आधुनिक परिचारिका व्यवसायाचा पाया रचला. १८५४च्या क्रिमियन युध्दात फ्लोरेन्स नाईंटीगेल या हातात दिवा घेऊन युध्दात जखमी झालेल्या सैनिकांची काळजी घेत असत म्हणून त्यांना "लेडी विथ द लँप" असे संबोधले जाते.

Sunday 10 May 2020

स्वातंत्र्य सेनानी आणि वकील आसफ अली

प्रख्यात स्वातंत्र्यसेनानी आणि वकील असफ अली यांचा जन्म 11 मे 1888 रोजी झाला.  असफ अली यांनी दिल्लीतील स्टीफन्स कॉलेजमधून ग्रॅज्युएशन केले.  त्यानंतर 1909 मध्ये ते कायद्याचा अभ्यास करण्यासाठी लंडनला गेले.  असफ अली लंडनमध्ये असताना सय्यद अमीर अली यांनी लंडन मुस्लिम लीगची स्थापना केली.  1914 मध्ये उस्मानी साम्राज्यावर झालेल्या ब्रिटिश हल्ल्याचा भारतीय मुस्लिमांवर मोठा परिणाम झाला.  असफ अली यांनी तुर्कीच्या बाजूचे समर्थन केले आणि प्रीव्ही कौन्सिलचा राजीनामा दिला.  डिसेंबर 1914  मध्ये ते भारतात परतले आणि राष्ट्रीय चळवळींमध्ये पूर्णपणे भाग घेतला.

डॉ. रोनाल्ड रॉस

१८५0 ते १९३0 या कालखंडात मलेरियाच्या तापाने जगभरात थैमान घातले होते लक्षावधी लोकांचा बळी घेतला होता. अमेरिका, युरोपपासून ते थेट भारतापयर्ंत वैद्यक शास्त्रातील अनेक संशोधकांनी या रोगाचे कारण शोधण्याचा चंगच बांधला होता. संशोधनाच्या क्षेत्रातील चुरशीच्या चढाओढीत अथक प्रयत्नांती डॉक्टर रोनाल्ड रॉस हे अग्रेसर ठरले. यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अशी की या त्यांच्या प्रयोगाची कर्मभूमी असलेला भारत देश व त्या संशोधनाच्या प्रक्रियेत भारतवासीयांचा सहभाग या दोन्ही गोष्टी जगाच्या इतिहासात अत्यंत कौतुकाच्या व मानाच्या स्थानी आहेत.

जगदीश खेबुडकर

लावणीपासून बालगीत आणि गण-गवळणींपासून देशभक्ती, भक्तिगीतांपयर्ंत गीतलेखनाचे सर्वांत जास्त प्रकार वापरून गेली पाच दशके मराठी गीतरसिकांना मोहित करणारे असामान्य प्रतिभावंत कवी जगदीश खेबूडकर तथा मराठी चित्रसृष्टीचे नाना यांचा जन्म हळदी, ता. करवीर येथे सामान्य कुटुंबात झाला. त्यांचा जन्म १0 मे १९३२ रोजी झाला. त्यांचे वडील इंग्रजी राजवटीत १५ रुपये वेतनावर प्राथमिक शिक्षक होते, त्यामुळे मराठीचे बाळकडू घरीच मिळाले. बालपण छोट्याशा ग्रामीण भागात गेल्याने बारा बलुतेदारांची लोकप्रिय गीते ऐकल्याने ते काव्यबीज पुढे खेबुडकर यांनी आपल्या एकापेक्षा एक गीतांतून अजरामर केले.

सातारचे कंदी पेढे

सातारच्या कंदी पेढ्याला इतिहास आहे.ही गोष्ट आहे दीडशे वर्षापूर्वीची. भारतात ब्रिटीश राजवट सुरु होती. सातार्‍यात छत्रपतींच्या संस्थानावर देखील ब्रिटीश रिजंट बसवण्यात आले होते. हे अधिकारी इंग्लंडवरून आलेले होते. त्यांना गोड खाण्याची सवय होती. मग ते कायम वेगवगेळ्या मिठाईच्या शोधात असायचे. सातारा जिल्ह्यातील जो पाटणकडचा डोंगराळ भाग आहे तिथे त्याकाळात शेतीच प्रमाण कमी होतं.

मदर्स डे

जग भरात मदर्स डे मे च्या दुसर्‍या रविवारी साजरा केला जातो. तसं तर प्रत्यके दिवस आईचाच असतो पण आजच्या धावपळीच्या जीवनात आम्ही आमच्या आईला जास्त वेळ देऊ शकत नाही. मुलांच्या आनंदसाठी त्या आईने आपल्या सर्व त्रासांकडे दुर्लक्ष केले तर आज तिच्यासोबतच करू हा खास दिवस. पण काही देशांमध्ये वेग वेगळ्या तारखेत देखील साजरा करण्यात येतो हा दिवस. जाणून घ्या कशी झाली या दिवसाची सुरुवात!

Saturday 9 May 2020

वाढवा आपले सामान्य ज्ञान

वाढवा सामान्य ज्ञान
१) २0१६ ची एशिया पॅसिफिक इकॉनॉमिक को-ऑपरेशन परिषद कोणत्या देशात पार पडली?
२) विश्‍वनाथन आनंदला कोणत्या वर्षी अर्जुन पुरस्कार मिळाला?
३) आयसीसी क्रिकेट विश्‍वचषक स्पर्धेची सुरूवात कधी आणि कोठे झाली?
४) कोलोरॅडोचं पठार कोणत्या देशात आहे?
५) जागतिक ग्राहक दिन कधी असतो?
उत्त्त्तरं : १) पेरू २) १९८५ ३) १९७५-इंग्लंड ४) अमेरिका ५) १५ मार्च

दादोबा पांडुरंग तर्खडकर

दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना मराठी व्याकरणाचे पाणिनी म्हणतात. त्यांचा जन्म ९ मे, १८१४ रोजी झाला. हे मराठी व्याकरणकार, लेखक आणि समाजसुधारक होते. तसेच ते मानवधर्मसभा, परमहंससभा आणि प्रार्थना समाज ह्या समाजसुधारणेसाठी प्रयत्न करणार्‍या संस्थांचे संस्थापक सदस्य होते. दादोबा पांडुरंग तर्खडकर ह्यांचे घराणे ठाणे जिल्ह्यातील वसई तालुक्यातील तरखड ह्या गावातील असून त्यांचे आजोबा मुंबईत स्थायिक झाले होते. दादोबांचा जन्म मुंबईत शेतवळी अर्थात खेतवाडी येथे झाला. त्यांच्या इतर भावंडांपैकी भास्कर पांडुरंग तर्खडकर आणि आत्माराम पांडुरंग तर्खडकर हेही आपापल्या क्षेत्रात कार्यरत होते.

Friday 8 May 2020

कवी आत्माराम रावजी देशपांडे

आत्माराम रावजी देशपांडे हे मराठी कवी होते. ते कवी अनिल या टोपण नावाने प्रसिद्ध होते. कवि अनिलांना मुक्तछंद ह्या काव्यप्रकाराचे प्रवर्तक समजले जाते. तसेच दशपदी १0 चरणांची कविता हा काव्यप्रकार अनिलांनी सुरू केला. कवी अनिलांचा जन्म सप्टेंबर ११, इ.स. १९0१ रोजी मुर्तिजापूर ह्या गावी झाला. तेथेच शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर ते इ.स. १९१९ पुणे शहरास आले. फग्यरुसन महाविद्यालय येथे कलाशाखेचा पदवी अभ्यासक्रम करीत असतानाच कुसुम जयवंत ह्या तरुणीशी परिचय, त्याचे पुढे प्रेमात रूपांतर आणि ऑक्टोबर ६, १९२९ ला विवाहात परिणती झाली.

Thursday 7 May 2020

सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतन

1. शासकीय कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतनाचे प्रकार कोणते ?
एकंदरीत निवृत्तीवेतनाचे आठ प्रकार आहेत. नियत वयोमान निवृत्तीवेतन, पूर्णसेवा निवृत्तीवेतन, रुग्णता निवृत्तीवेतन, भरपाई निवृत्तीवेतन, जखम किंवा इजा निवृत्तीवेतन, अनुकंपा निवृत्तीवेतन, कुटुंब निवृत्तीवेतन, असाधारण कुटुंब निवृत्तीवेतन असे हे प्रकार आहेत. नियत वयोमानानुसार म्हणजे वयाची 58 वर्ष पुर्ण झाल्यावर व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत वयाची 60 वर्ष पुर्ण झाल्यावर कर्मचारी निवृत्त होतो. स्वेच्छा निवृत्ती, रूग्णता आणि भरपाई हेही निवृत्तीचे प्रकार आहेत. अकार्यक्षमतेमुळे देण्यात येणारी निवृत्ती म्हणजे अनुकंपा निवृत्ती होय. निवृत्ती वेतन घेणारा जेव्हा मरण पावतो तेव्हा त्याच्या कुटूंबियांना मिळते ते कुटूंब निवृत्ती वेतन. एखादा सरकारी कर्मचारी हरवल्यास त्याच्या कुटूंबियांना त्रास होवू नये म्हणून असाधारण कुटूंब निवृत्ती दिल्या जाते.

Wednesday 6 May 2020

समतेचे अग्निस्त्रोत : गौतम बुद्ध

जगाला शांतीचा, अहिंसेचा व समतेचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांची वैशाख बुद्ध पौर्णिमा जगभरात विविध ठिकाणी साजरी केली जाते. याच पौर्णिमेला बुध्दांच्या जीवनात पाच अत्यंत महत्त्वाच्या घटना घडल्या, त्या म्हणजे १) राजपुत्र सिध्दार्थ गौतमचा जन्म, २) राजकन्या यशोधरेचा जन्म, ३) राजकुमार सिध्दार्थाचा मंगल परिणय, ४) ज्ञानप्राप्ती, ५) महापरिनिर्वाण. या पाच अतिशय लक्षणीय घटनांमुळे या पौर्णिमेला अलौकिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

रवींद्रनाथ टागोर

रवींद्रनाथ ठाकूर याचां जन्म ७ मे इ.स. १८६१ रोजी झाला. ज्यांना गुरुदेव असेही संबोधले जाते, हे एक ब्राह्मोपंथीय, चित्रकार, नाटककार, कादंबरीकार, बंगाली कवी, संगीतकार होते. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात व २0 व्या शतकाच्या प्रारंभी यांच्या कार्यामुळे बंगाली साहित्यात व बंगाली संगीतात एक आमूलाग्र बदल घडून आला. रवींद्रनाथ हे भारताचे व आशियातील पहिले नोबेलविजेते होते. कोलकात्याच्या पिराली ब्राह्मण कुटुंबात जन्म झालेल्या रवींद्रनाथांनी वयाच्या ८व्या वर्षी पहिली कविता लिहिली. वयाच्या १६व्या वर्षी त्यांनी भानुसिंह या टोपणनावाने बर्‍याचशा कविता लिहिल्या. शांतिनिकेतनाची उभारणी, विस्तृत व उच्च दर्जाच्या साहित्याची निर्मिती व रवींद्रसंगीताचे सृजन हे रवींद्रनाथांचे प्रमुख जीवनकार्य होय.