Thursday 30 April 2020

डिस्टन्सिंग, क्वारंटाईनला इतिहास 700 वर्षांपासूनचा

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सध्या जगभरात लोकांना क्वारंटाईन केले जाते आहे. महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडणार्‍या लोकांना सोशल डिस्टंसिंगचा सल्ला देत आहे. २१ व्या शतकात व्हायरसपासून बचावासाठी असलेले हे सोशल डिस्टन्सिंग आणि क्वारंटाईन आता सर्वांनाच माहिती झाले आहे. मात्र याचे महत्त्व तब्बल ७00 वर्षांपूर्वी लोकांना समजले होते.

मंगल, पवित्र,महाराष्ट्र देशा

राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले त्यामुळे मराठी माणसे चिडली व असंतोष निर्माण झाला होता. सर्वत्र छोट्या मोठय़ा सभांमधून या निर्णयाचा निषेध होत होता. अशात कामगारांच्या एका विशाल मोर्चावर गोळीबाराचा आदेश देण्यात आला आणि यात १0६ आंदोलक हुतात्मे झाले. या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारने नमते घेऊन १ मे १९६0 रोजी मुंबईसह महाराष्ट्र राज्याची स्थापना केली.

Monday 27 April 2020

ओळख देशांची-बल्गेरिया


ऑटोमन वसाहत
बल्गेरिया देशाला खूप प्राचीन इतिहास लाभला आहे. अगदी मनुष्य जेव्हा अश्मयुगाच्या उत्तरार्धात पृथ्वीवर वावरत होता, त्या काळापासून या प्रदेशात मानवी वसाहती होत्या. या प्रदेशात थ्रासीयन, रोमन व ग्रीक लोक राज्य करत होते. संपूर्ण एकत्रित असा बल्गेरिया देशाचा उदय झाला तो सातव्या शतकात . तेव्हा हे राज्य बाल्कन प्रदेशांवर स्वतःचे वर्चस्व गाजवत होते. तसेच स्लाव्ह लोकांचे हे मध्ययुगीन काळातील सांस्कृतिक केंद्र होते.

Sunday 26 April 2020

माहिती जाणून घ्या

आपली सूर्यमाला कशी आहे?
सूर्य आणि त्या भोवती फिरणारे बुद्ध, शुक्र, पृथ्वी, गुरू, शनी, नेपच्यून आणि युरेनस यांसारखे ग्रह आणि ग्रहांभोवती फिरणारे उपग्रह या सर्वांची  मिळून सूर्यमाला तयार होते. त्याचप्रमाणे धूमकेतू, अस्टेरॉइड, धूळ आणि विद्युत भरीत धूळ यांचाही सूर्यमालेत  समावेश होतो. प्लूटोही सूर्यमालेचाच  भाग आहे.

शहामृग

शहामृग. दिसायला उंच, झुपकेदार मान, उंच पाय. पाहताना कुतूहल वाटणारा हा पक्षी. मोठ्या आकाराचा, उडू न शकणारा हा पक्षी आहे. हा मुख्यत्वे आफ्रिकेत आढळतो. पक्षी असूनही याला उडता येत नाही, हे याचे वैशिष्ट्य. पण उडता येत नसलं तरी लांब पायांमुळे हा ताशी 70 किलोमीटर वेगाने धावू शकतो.पाय लांब आणि मजबूत असतात, त्यामुळे एका पावलात १० ते १६ फूट अंतर ते कापू शकतात. या पायांच्या प्रहाराने तो सिंहासारख्या हल्लेखोरालाही तो ठार करू शकतो.

गायक अरजित सिंह

अरजित सिंह याचा जन्म 25 एप्रिल 1987 रोजी पश्चिम बंगालमधील मुर्शीदाबाद येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. अरजितला सुरुवातीला करिअर म्हणून संगीताची निवड करणे कठीण होते. त्याची आजी आणि आई चांगल्या गायिका आहेत. तर वडील एका खासगी जीवन विमा कंपनीचे एजंट आहेत. त्याचे शालेय शिक्षण मुर्शीदाबादमधील खासगी शाळेत झाले व त्यानंतर महाविद्यालयात शिक्षण सुरू असताना संगीताची ही साधना सुरू झाली. महाविद्यालयात तो गाण्यांच्या कार्यक्रमात सहभागी होत असे.

ज्ञानाची उजळणी करा


१. खालीलपैकी कोणत्या घटकाकडून व्हिटॅमिन 'ए' मिळत नाही -
 ए. गजर, बी.  बीट, सी. पपई, डी. चॉकलेट
 २. आपल्या शरीराचे सर्वात लहान हाड कोणत्या अवयवाशी संबंधित आहे?
 ए. जीभ, बी. नाक, सी.  कान, डी. डोळा
 3. जगातील सर्वात विषारी मासा कोणता आहे?
 ए .सील, बी. स्टोन फिश, सी. ब्लू हेल, डी. जेली फिश

ज्ञान वाटिका

देश मोठा, पण नदी नाही
 जगात असे अनेक देश आहेत, जिथे नदी नाही, अशा देशांमध्ये सौदी अरेबियादेखील सामिल आहे.या देशात मक्का आणि मदिना हे पवित्र धार्मिक क्षेत्र आहेत.  हा जगातील 13 वा आणि आशिया खंडातला पाचवा सर्वात मोठा देश आहे.  नदी नसल्यामुळे समुद्राचे पाणी पिण्यायोग्य करून लोकांपर्यंत पोहोचवले जाते.  तेलाच्या साठ्यामुळे या देशात पैशांची कमतरता नाही. त्यामुळे येथील लोकांना जवळपास मोफत पाण्याचा पुरवठा केला जातो.

Friday 24 April 2020

काझीरंगा राष्ट्रीय अभयारण्य

आसाम हे ईशान्य भारतातील राज्यांना जोडणारे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते. हा संपूर्ण प्रदेश सपाट असून ,नद्या आणि जंगलांनी समृद्ध आहे. यामुळे हा प्रदेश प्राण्यांसाठी नंदनवनच ठरतो. देशातील मोठ्या अभयारण्यांपैकी एक समजले जाणारे काझीरंगा अभयारण्य येथेच वसले आहे. जगात सापडणाऱ्या भारतीय एकशिंगी गेंड्यापैकी दोन तृतीयांश गेंडे या अभयारण्यात आढळतात.

लोणार सरोवर

बालमित्रांनो, मी महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यातील खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. उल्कापातामुळे माझी निर्मिती झाली. बेसॉल्ट खडकातील एकमेव मोठे आघाती विवर म्हणून मी जगप्रसिद्ध आहे. मित्रांनो, एव्हाना तुम्ही माझं नाव ओळखले असेलच! मो लोणार सरोवर. पृथ्वीच्या जडणघडणीचा इतिहास तुम्हाला जाणून घायचा असेल तर आघाती विवरांचा अभ्यास करणे गरजेचे आहे. यासाठीच आज मी माझी जन्मकथा तुम्हाला सांगणार आहे.
मित्रांनो, साधारणपणे 50 ते 55 हजार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे.

नर्मदा ब्रीज

लोखंडी 'गोल्डन' पूल!
भारतातील मोठ्या नद्यांमध्ये नर्मदा नदीची नोंद होते.या नदीला धार्मिक महत्त्वही आहे. याच नदीवर गुजरातमधील अंकलेश्वर ते भरूच या दरम्यान असलेल्या पुलाची देशातील जुना पूल म्हणून गणना केली जाते. ब्रिटिशांनी भारतावर राज्य करण्यास सुरुवात केल्यानंतर गुजरातमधून मुंबईला येण्यासाठी सोईस्कर व्हावे,यासाठी या पुलाची उभारणी करण्यात आली.
या पुलाच्या बांधकामाला 7 डिसेंबर1877 मध्ये सुरुवात करण्यात आली. प्रत्यक्षात तो 16 मे 1881 रोजी वाहतुकीसाठी खुला झाला.

Thursday 23 April 2020

सचिन तेंडुलकर

सचिन रमेश तेंडुलकर हा क्रिकेटविश्‍वात डॉन ब्रॅडमन याच्यानंतर जागतिक स्तरावर सर्वोत्तम मानला जाणारा माजी भारतीय क्रिकेटपटू आहे. २00२ मध्ये विस्डेनने डॉन ब्रॅडमन याच्यानंतर सार्वकालिक दुसरा सर्वोत्तम कसोटी फलंदाज म्हणून तर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील व्हिव रिचर्डस याच्यानंतरचा दुसरा सार्वकालिक सर्वोत्तम फलंदाज म्हणून सचिन तेंडुलकरची निवड केली होती. २0११ च्या विश्‍वचषकविजेत्या भारतीय संघात तेंडुलकरचा समावेश होता.

Wednesday 22 April 2020

वाढवा आपले सामान्य ज्ञान

१) नांदेड हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलं आहे?
२) हरितद्रव्य नसणारी वनस्पती कोणती?
३) भारतातील उदारमतवादाचे आणि जहाल राजकारणाचेप्रणेते कोणाला म्हणतात?
४) देशात किती गिरिजन जमाती आहेत?
५) महाराष्ट्रातील एकूण वनक्षेत्रापैक किती टक्के जंगलं सरकारीवनखात्याच्या ताब्यात आहेत? 
उत्तर : १) गोदावरी २) अळिंबी ३) दादाभाई नौरोजी ४) ५0 पेक्षा अधिक ५) ८0 टक्के

शमशाद बेगम

शमशाद बेगम या भारतीय गायिका होत्या. त्या हिंदी चित्रपट सृष्टीतील पहिल्या पार्श्‍वगायिकांपैकी एक होत्या ज्यांनी आपल्या करिअरमध्ये विविध भाषांमध्ये सहा हजारांहून अधिक गाणी गायली. त्यांनी ५७७पेक्षा जास्त चित्रपटांत गाणी गायली आहेत. शमशाद बेगम यांचा जन्म अमृतसर, पंजाब येथे झाला. २00९ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला. त्याच वर्षी त्यांना पुण्यातील ओ.पी. नय्यर फाउंडेशनचा ओ.पी. नय्यर पुरस्कार प्रदान झाला. शमशाद बेगम दिसायला अतिशय देखण्या होत्या.

अंदमान-निकोबार सहल

अंदमानची सहल सुरू होते ती पोर्टब्लेअर शहर दर्शनापासून. या सफरीतील प्रमुख आकर्षण म्हणजे स्वातंत्र्यवीर सावकरकरांसह देशातल्या अनेक क्रांतिकारकांच्या स्मृती जागवणारा सेल्युलर जेल. हा तुरुंग दोनदा पाहावा लागतो. एकदा दिवसाउजेडी तेथील सावकारांची कोठडी, फाशीवर,ऐतिहासिक छायाचित्रांची दालने, वस्तुसंग्रहालय . तुरुंगाची रचना अचंबित करणारी आहे. सायंकाळी साडेपाच वाजता सुरू होणारा लाइट अँड साऊंड शोचा अदभूत अनुभव पाहायला मिळतो. या स्मारकाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्यात आला आहे. सावकारांच्या जाज्ज्वल्य देशभक्तीची गाथा ऐकताना प्रत्येक मराठी माणूस

श्री आर्यादुर्गा मंदिर

कारवार उत्तर कर्नाटकचे प्रवेशद्वार. निसर्गरम्य समुद्र किनारे, माडपोफळीच्या दाट वाड्यांतील घरे आणि अनेकविध शैलींची श्रद्धास्थाने आजही येथील वैभवशाली परंपरेचा, संस्कृतीचा वारसा जपत आपल्या स्थानाची महती व दर्शनाचा लाभ भक्तगणांना देतात. सुप्रसिद्ध'गोकर्ण महाबळेश्वर' क्षेत्राच्या अलीकडे वसलेलं 'अंकोला' येथील श्री आर्यादुर्गा देवस्थान हे एक पुण्यक्षेत्र आहे. हे देवस्थान अतिप्राचीन असून पूर्वी कारवार नजीकच्या समुद्रात आर्याद्विपावर होते. परंतु परकीय आक्रमणाच्या संभाव्य धोक्यापासून वाचवण्यासाठी भाविकांनी त्याचे स्थलांतर करून  'अंकोला' गावी वसवले.

मलेशियातील 'बाबा संस्कृती'

15 व्या शतकात दक्षिण-पूर्व आशियात ,मुख्यत्वे मलेशियन द्वीप समुहात चिनी पुरुष आणि मुस्लिमेतर मलायी महिला तसेच दक्षिण भारतीय हिंदू पुरुष आणि मलायी महिला यांच्यात आंतरवंशीय विवाह व्यवस्था प्रस्थापित झाली होती. ज्यातून एक सर्वस्वी भिन्न अशी मिश्र संस्कृती उदयास आली. अशा विवाह संबंधातून स्थानिक भूमीवर जन्माला आलेल्या मुलांना व त्यांच्या पुढील पिढयांना 'प्रणाकान' (peranakan) म्हणून संबोधले जाते. 'प्रणाकान' हा मलायी भाषेतील शब्द असून त्याचा अर्थ 'स्थानिक भूमीवर जन्मलेला' असा आहे.

Tuesday 21 April 2020

जगातील नैसर्गिक आश्चर्ये

या पृथ्वीतलावर नैसर्गिकरीत्याच तयार झालेल्या
काही आश्चर्यकारक रचना पाहायला मिळतात.
अशाच काही आश्चर्याची ही माहिती...
• आव ऑफ सहारा : जगातील सर्वात मोठे वाळवंट
असलेल्या सहारामध्ये मॉरिटानियाच्या पश्चिमेला आय ऑफ सारा' नावाची अनोखी रचना आहे. काही वैज्ञानिकांचे म्हणणे होते की ही रचना एखाद्या लघुग्रहाच्या घडकेने बनली असावी. मात्र, आता संशोधकर म्हणत आहेत की ही नैसर्गिकरीत्याच तयार झालेली रचना आहे. ती तव्याल ४० किलोमीटरच्या क्षेत्रात पसरलेली आहे.

सामान्य ज्ञान

▪ ‘NSG प्रादेशिक केंद्रस्थळ’ याच्या परिसराचे उद्घाटन कुठे झाले?
उत्तर : कोलकाता
▪ भारताने कोणत्या देशासोबत 40 दशलक्ष डॉलर एवढ्या रकमेचा संरक्षण करार केला?
उत्तर : अर्मेनिया
▪ कोरोना विषाणूला रोखण्यासाठी आशियाई विकास बँकेनी सदस्यांसाठी किती कर्ज मंजूर केले?
उत्तर : 4 दशलक्ष डॉलर

Monday 20 April 2020

कमलाताई ओगले

दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणार्‍या कमलाबाई ओगले यांचा जन्म १६ सप्टेंबर १९१३ रोजी झाला.कमलाबाई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या 'रुचिरा' हे पुस्तक १९७0 च्या सुमारास आले. हे पुस्तक किर्लोस्करांनी प्रकाशित केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली.

Sunday 19 April 2020

देशातील पहिले राज्य

1) प्लास्टिक बंदी - लागू करणारे पहिले राज्य - हिमाचल प्रदेश
2)  माहितीचा अधिकार लागू करणारे पहिले राज्य - तामिळनाडू
3)  सेवेचा अधिकार लागू करणारे पहिले राज्य - राजस्थान
4)  पंचायत राज ची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य -राजस्थान
5)  'संस्कृत'ला  राजकीय भाषेचा दर्जा देणारे पहिले राज्य - उत्तराखंड 6) मूल्यवर्धित करप्रणाली लागू करणारे पहिले राज्य - हरियाणा 

हे तुम्हाला ठाऊक आहे का?

1) अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांची कोणत्या संस्थेच्या मुख्य
अर्थतज्ज्ञपदी निवड झाली ? - आयएमएफ ( IMF )
2) 21व्या हवामान परिषदेमध्ये किती देशांनी एकत्र येऊन पॅरिस करार मान्य केला ?  - 196 देश
3) मोरोस्कोमधील माराकेश या शहरात कितवी हवामान परिषद आयोजित करण्यात आली ? - 22वी
4)  76वा गोल्डन ग्लोब 2019 अवार्ड सेरेमनी कोठे संपन्न झाला ?
बेवली हिवस ( कॉलिफोनिया )

अक्षय्य तृतीया

वैशाख शुद्ध   तृतीयेला अक्षय्य तृतीया म्हणतात. या दिवशी जे जे पुण्य करावे ते अक्षय्य-चिरकाल टिकणारे होते असे म्हणतात.  साडेतीन मुहूर्त आपल्याला माहीत आहेत,त्यातला हा अर्धा मुहूर्त आहे. या दिवशी स्त्रिया जलकुंभाची पूजा करून तो दान देतात , तसे पाहिले तर आल्या - गेल्याला , तहानेलेल्याला पाणी द्यावे त्याचे हे प्रतीक ! अक्षव्यतृतीया वैशाखात येते . त्या वेळी उन्हाची तीव्रता वाढलेली असते .

Saturday 18 April 2020

मुकेश अंबानी

मुकेश धीरूभाई अंबानी यांचा जन्म १९ एप्रिल १९५७ रोजी झाला आहे .भारतीय उद्योगपती, अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे सर्वात मोठे भागधारक, फॉच्यरुन ग्लोबल ५00 कंपनी आणि त्याच्या बाजार मूल्याद्वारे भारतातील सर्वात मूल्यवान कंपनी आहे. फोर्ब्स मॅगझिनच्या मते, मार्च २0१९ पर्यंत तो जगातील सर्वात श्रीमंत आशियाई आणि १३ व्या क्रमांकाचा सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे.

भोपळ्याची शेती आणि सतार,तंबोरा वाद्य

सतार व तंबो‍ऱ्याची निर्मिती करण्यासाठी विशिष्ट प्रकारचे भोपळे लागतात.‘ही दोन्ही वाद्ये तयार करण्यासाठी वापरला जाणारा भोपळा दर्जेदार असतो. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, मंगळवेढा तालुक्यात भीमा, चंद्रभागेच्या तीरावरच्या वाळवंटी जमिनीत पिकवले जातात. हे भोपळे चवीला अत्यंत कडू असतात. नदीच्या काठावर काही मोजक्या गावांमध्ये या भोपळ्याचे पीक घेतले जाते. तेथील विशिष्ट हवामान, माती यामुळे हे भोपळे वजनाने हलके आणि बाहेरून टणक तयार होतात. त्यामुळे त्यातून मधुर सूर निर्माण होतो.
 भोपळ्याच्या एका बीपासून सतारीपर्यंतचा प्रवास खूपच दिलचस्प असाच म्हणावा लागेल. सतारीसाठी जो भोपळा वापरला जातो तो मूळचा आफ्रिकेतला. आफ्रिकेतल्या आदिवासी जमाती याचा वापर मध, दारू, पाणी साठवून ठेवण्यासाठी करत. कालांतरानं इतर गोष्टींसारखाच तो भारतात पोहोचला. पंढरपूर जिल्हामध्ये याचं उत्पन्न घेतलं जातं. हा भोपळा वाढण्यासाठी आणि चांगला वाळण्यासाठी कोरडी जमीन आणि उष्ण वातावरण लागतं. चंद्रभागेच्या काठावरच्या बेगमपूर, सिद्धापूर या खेड्यांमध्ये याची पैदास होते.
शेतकरी साधारण श्रावणात किंवा दसरा झाल्यानंतर आपल्या शेतात भोपळ्याच्या बियांची लागवड करतात. हे भोपळे खासकरून वाद्य तयार करण्यासाठीच पिकविले जातात. याची पूर्ण वाढ होण्यासाठी आठ-नऊ महिन्यांचा काळ जातो. या कालावधीत मिरजेतले सतार बनवणारे व्यावसायिक पंढरपूर, सोलापूरला जाऊन भोपळ्याची खरेदी करून, ते तिथेच वाळण्यासाठी ठेवतात. हा भोपळा वेलीवरच वाळलेला चांगला.
       शेतकरी याची विशेष काळजी घेतात जेणेकरून यांचा आकार बिघडता कामा नये. मार्च महिन्यात वाढ पूर्ण होताच हे भोपळे देठापासून कापून शेतातच वाळविण्यासाठी ठेवले जातात. पंढरपूरच्या उष्णतेत होरपळून निघालेले अद्वितीय असे हे भोपळे न आक्रसता आपला आकार तसूभरही बदलत नाहीत. ही पंढरपूर भागातल्या भोपळ्यांची खासियतच म्हणावी लागेल. हे भोपळे पूर्णपणे सुकल्यानंतर ते विक्रीसाठी ठेवले जातात आणि त्यांना चांगला भावही मिळतो.
वेलीवर चार-पाच भोपळे लागले की शेतकरी ती वेल खुडून, वेलीची वाढ थांबवतात. त्यामुळे वेलीला तोवर लागलेले भोपळे चांगले पोसले जातात आणि त्यांचा आकार मोठा होतो. हा भोपळा चवीला कडू असतो. त्यामुळे माणसं किंवा जनावरं तो खात नाहीत. भोपळ्याचा देठ चांगला वाळला की तो तोडला जातो. साधारण मेपर्यंत भोपळा कडक उन्हामध्ये चांगला वाळला की व्यापारी टेंपोत भरून तो मिरजेला घेऊन येतात. मिरजेत दाखल झाल्यानंतर व्यापारी त्यांना पोटमाळ्यावर टांगून ठेवतात. पुढची किमान ५० वर्षं या भोपळ्यांना काहीही होत नाही. पोटमाळ्यावर ठेवण्यापूर्वी खोलीच्या छताखाली ते कोणती जागा पटकावणार हे त्या भोपळ्याचा घेरच ठरवितो. त्यावर त्याची शाईने तशी नोंद केली जाते. जेव्हा सतार किंवा तंबोरा तयार करण्याची ऑर्डर मिळते त्यावेळी प्रत्येकाच्या सोयीनुसारच तो तयार केला जातो, मग तो वापरणारा पुरूष किंवा स्त्री कोणीही असो, त्याला जो योग्य, सोयीचा वाटेल तोच भोपळा त्याच्यासाठी निवडला जातो. पुरुषांसाठी असणा-या भोपळ्याचा आकार तुलनेने मोठा असतो. चांगल्या वाळलेल्या भोपळ्याला कीड लागत नाही व तो वजनानेही हलका होतो. भोपळा ओला असेल तर कालांतरानं तो किडू शकतो आणि आकसतो. त्यामुळे वाद्य बनवताना अडचण येते. भोपळा दुकानात दाखल झाल्यापासून वापरात येईपर्यंत आणखी दोन-चार वर्षं निघून जातात. एखाद्या वर्षी जर दुष्काळ पडला तर भोपळ्यांची किंमत भरमसाठ वाढते. मिरजेला दरवर्षी विविध आकाराच्या साधारण दोन हजार भोपळ्यांची आयात होते. हा पुरवठा करून जर भोपळा शिल्लक राहिला तर तो कलकत्त्याला पाठवला जातो. मिरजेशिवाय ही वाद्यं कलकत्ता आणि लखनौलाही बनतात.
अशी बनते सतार व तंबोरा

भोपळा देठाच्या बाजूने गोलाकार कापून आतल्या सर्व बाजूंनी साफ केला जातो. त्यानंतर भोपळ्याच्या आतली त्वचा मऊ व्हावी म्हणून त्यात पाणी भरले जाते आणि तो पाण्याने भरलेला भोपळा दोन दिवस त्याच स्थितीत ठेवला जातो. दोन दिवसांनी त्यातील पाणी आणि गर काढून टाकाला जातो. त्यानंतर, त्यात उभ्या आडव्या दिशेने लाकडी काठ्या घट्ट बसविण्यात येतात जेणेकरून त्याला दिलेला आकार हा ‘समाकार’ रहावा हा त्यामागील उद्देश असतो. त्याचवेळी त्याच्या गोलाकार भागाभोवती ‘तून’ किंवा ‘टून’चे लाकूड वापरून त्यापासून त्याचा गळा तयार केला जातो.
शेवटी लाखेचा वापर करून त्या गळ्यावर दांडी बसविली जाते. त्यानंतर भोपळ्यावर लाकडाची एक तबकडी बसविली जाते जेणेकरून भोपळा बंद होतो. यापुढे त्यावर कलाकुसर केली जाते. त्यानंतर चार पाच वेळा पॉलिशचे हात दिले जातात. हे करत असतानाच या वाद्याचा रंग ठरविला जातो. शेवटी त्यावर खुंट्या, तारा आणि वाद्या बसवून हे वाद्य सूर जुळवून वाजविण्यासाठी सज्ज होते. अशा त-हेने सतार किंवा तंबो-याचा जन्म होतो.
       या भोपळ्या बरोबरच लाकूडही आवश्यक असते. पुर्वी हे लाकूड गंध देवदार जातीचं असायच. हे लाकूड वजनाला हलकं व लाल रंगाचं असतं. हे कर्नाटकातील सकलेशपूर जंगलातून येतं. पूर्वी सागवान सुध्दा वापरले जायचे, पण आज तेही महागल्याने ‘तून’ नावाच्या लाकडाचा वापर केला जातो. भोपळा व लाकूड यांचा पोकळ लाकडी साचा बनवून त्यावर नक्षीकाम केले जाते. वाद्यांवरती जे नक्षीकाम केलं जातं त्यासाठी पूर्वी हस्तीदंत, सांबरशिंगाचा वापर केला जायचा. पर्यावरण कायद्यातील अटी कडक झाल्यामुळे आजकाल या प्रकारचा माल वापरला जात नाही. त्याजागी सिंथेटीक मालाचा वापर केला जातो. लाकडाचीही आवक कमी झालीय.
        संगीत वाद्यांपैकी तंतुवाद्यांसाठी प्रसिद्ध असणारे मिरज हे सांगली जवळचे कृष्णाकाठावरचे संगीताची मोठी परंपरा सांभाळणारे शहर. किराणाघराण्याचे जनक अब्दुलकरीम खाँ साहेब यांची कर्मभूमी असणारी ही नगरी. विष्णु दिगंबर पलुसकर, विनायक बुवा पटवर्धन, भानुदास बुवा गुरव, वसंत पवार, राम कदम अशी वैभवशाली संगीत परंपरा असणा‍ऱ्या या गावात संगीतातील तंतुवाद्य निर्मितीची ही मोठीपरंपरा आहे.
        आदिलशाहीत विजापूरच्या बादशहाने अनेक कारागिरांना मिरज येथे पाठवून दिले. त्यापैकी शिकलगार कुटुंबीय मिरजेत स्थायिक झाले. त्यांचा मूळव्यवसाय भाला, बरची, तलवार अशी शस्त्रे बनविण्याचा. कालांतराने लढाया कमी झाल्याने शस्त्रांची मागणी कमी झाली आणि चरितार्था साठी इतर व्यवसायांकडे वळावे लागले. त्यात या कुटुंबातील मोहद्दीन साहेब व फरीद साहेब यांना संगीताची उत्तम जाण होती. मिरजेचे सरकार पटवर्धन यांना ही संगीताची आवड आणि आस्था होती. त्यांनी मोहद्दीन साहेब व फरीद साहेब यांना गणेश कलागृहात पाचारण करून तंतुवाद्य निर्मितीसाठी प्रोत्साहन दिले. फरीद साहेब यांनी आपली कल्पकता पणाला लावून भोपळा, लाकूड आणि तारांनी बनविलेल्या तंतुवाद्यात ध्वनिलहरीतील सप्तक जखडून ठेवले आणि पहिल्या वहिल्या तंबो‍ऱ्याची निर्मिती झाली.

Friday 17 April 2020

लॅपटॉपवर काम करताना अशी काळजी घ्या

सध्या लॉकडाऊन सुरू असल्याने अनेक कंपन्यांचे कर्मचारी घरातूनच काम करीत आहेत . ' वर्क फ्रॉम होम ' सुरू असताना सतत लॅपटॉपचा वापर केल्यानेही डोळ्यांसाठी काही समस्या निर्माण होऊ शकतात . ते टाळण्यासाठी काय करावे याची ही माहिती . . .

मनमोहक मोरांची वस्ती चिंचोली

नाच रे मोरा आंब्याचा वनात, नाच रे मोरा नाच हे गाण आठवतेय काय?? पावसामध्ये आपला पिसारा फुलवून नाचताना मोर किती मनमोहक वाटतो ना.परंतु आजकाल मोराला पुस्तकात किंवा फोटो मध्येच पाहावे लागते. मात्र महाराष्ट्रात असे एक गाव आहे जे मोरांचे गाव म्हणून ओळखले जाते. शहरातील लोकांना एरवी प्राणिसंग्रहालयात पहावयास मिळणारे मोर या गावात मुक्तपणे वावरताना दिसतात. या गावाचे नाव आहे मोराची चिंचोली.

तात्या टोपे

तात्या टोपे यांचा जन्म १८१४ मध्ये नाशिक जिल्ह्यातील येवल्यात झाला. पांडुरंग टोपे यांच्या आठ अपत्यांपैकी तात्या हे दुसरे अपत्य. त्यांचे मूळ नाव रघुनाथ. त्यांचे नाव रामचंद्र असेही ठेवण्यात आले होते. रघुनाथचे वडील पेशव्यांकडे दानाध्यक्षाचे काम पाहण्यासाठी ब्रह्मवर्तास येऊन राहिले. पयार्याने रघुनाथचे अर्थात तात्यांचे बालपण नानासाहेब पेशवे आणि राणी लक्ष्मीबाई यांच्याबरोबर गेले. पुढे बरीच वर्षे नानांच्या दरबारात तात्या कारकुनी कामांत गुंतलेले होते. १८५७ च्या स्वातंत्र्यसमरात ग्वाल्हेरहून तात्यांनी आणलेल्या सैन्यावर मुख्य सेनापती म्हणून नानासाहेबांनी त्यांचीच निवड केली. त्या वेळी तात्यांच्या कर्तृत्वाचा कस लागला.

Thursday 16 April 2020

ताराबाई मोडक

ताराबाई मोडक ह्या एक मराठीभाषक आणि भारतातील पहिल्या बालशिक्षणतज्ज्ञ होत्या. त्यांना भारताच्या 'मॉन्टेसरी' म्हणतात. ताराबाईंचा जन्म इंदूरचा आणि बालपणही तिथेच गेले. त्यांचे आई आणि वडील प्रार्थना समाजाचे अनुयायी होते. त्यामुळे घरात प्रगत वातावरण होते. त्यांचे वडील सदाशिव पांडुरंग केळकर यांनी १९ व्या शतकात ठरवून विधवेशी पुनर्विवाह केला होता. प्रार्थना समाजाचे बळ त्यांच्या पाठीशी होते. अशा या आधुनिक वातावरणात ताराबाई वाढल्या. केळकर कुटुंब कालांतराने इंदूर सोडून मुंबईला स्थायिक झाले.

Wednesday 15 April 2020

वाढवा आपले सामान्य ज्ञान


वाढवा सामान्य ज्ञान
१) डीआरडीओचे पूर्ण रूप काय?
२) 'संतोष ट्रॉफी' कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
३) 'सनरायझर्स हैद्राबाद'चा नवा कर्णधार कोण?
४) भारताने हॉकीतील पहिलं ऑलिंपिक पदक कुठे जिंकलं?
५) योगराज सिंग या खेळाडूने पहिल्या कसोटीत किती बळी घेतले?

Tuesday 14 April 2020

कोरोना व्हायरसचे प्रकार किती आणि कोणते?

सध्या संपूर्ण जगाला हतबल करून लोकांना घरातच कैद होण्यास भाग पाडलेल्या कोरोना व्हायरससंबंधी एक नवी माहिती उघड झाली आहे . अत्यंत धोकादायक ठरत असलेल्या या व्हायरसचे एकूण तीन प्रकार आहेत . यामध्ये टाईप - ए , टाईप - बी आणि टाईप - सी यांचा समावेश आहे .
अमेरिकेतील माऊंट सिनाई हॉस्पिटलच्या जिनोमवर आधारित या संशोधनात अशी माहिती उघड झाली आहे की , अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये हाहाकार माजवत असलेला कोरोना व्हायरस हा युरोपमधून अमेरिकेला आला .

अशी वाढवा स्मरणशक्ती

एकाग्रता आणि स्मरणशक्ती यांच्या सहाय्याने उत्तम यश संपादन करता येते . म्हणूनच स्वामी विवेकानंद एकाग्रता आणि स्मरणशक्तीला " यशाची गुरुकिल्ली " असे म्हणत . एकाग्रता म्हणजे आपल्या ध्येयावर लक्ष पूर्णपणे केंद्रित करणे . आपण निश्चित केलेले लक्ष किंवा साध्य पूर्ण होण्यासाठी झोकून देऊन आणि हाती घेतलेले काम शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे . आपण जागेपणी जे ऐकतो , पाहतो , वाचतो , स्पर्श करतो , गंध घेतो या सर्व गोष्टी आपण झोपेत असताना मेंदूत साठवून ठेवत असतो . मेंदूत साठवून ठेवलेले हवे तेव्हा , हवे ते , हव्या त्या स्वरूपात आठवणे म्हणजे स्मरणशक्ती होय ,

Monday 13 April 2020

हे नेहमी लक्षात ठेवा !

 (१ ) आईचे - बाळ ( २ ) गाईचे - वासरू सीटकशेळीचे . करडू ( ५ ) घोडीचे - शिंगरू
( ६ ) कोंबडीचे - पिल्लू ( ७ ) हरिणीचे - पाडस
 ( ८ ) मेंढीचे - मेंढरू ( ९ ) वाघिणीचा - बच्चा
( १० ) सिहिणीचा - छावा ( ११ ) हत्तिणिचे - पिल्लू

राष्ट्र उद्धारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही केवळ व्यक्ती नसून एक विचार आहे. हा विचार प्रेरणादायी आणि प्रवाही आहे. त्यांचे जीवन आणि कार्य हे तळागाळातील हजारो वर्षाच्या सामाजिक अन्याय आणि आर्थिक शोषनामुळे भरडलेल्या लोकांकरिता प्रेरणा आहे. ही प्रेरणा केवळ वैचारिक पातळीपुरती मर्यादित नाही. तर झोपलेल्या समाजाला जागृत करून त्यांच्यात स्वाभिमान, अस्मिता आणि आर्थिक सबलता निर्माण करण्याची कृती कार्यक्रम आहे.

Sunday 12 April 2020

प्रसिद्ध नट आणि चित्रपट दिग्दर्शक बलराज सहानी

ज्येष्ठ कलाकार बलराज सहानी हे एक श्रेष्ठ चित्रपट अभिनेते म्हणून लोकांना माहित आहेत. पण ते एक थोर तत्त्वचिंतक, समाजसेवक होते ही गोष्ट थोड्यांना ज्ञात आहे. बलराज साहनी डाव्या विचारसरणीचे व्यक्ती होते. ते इंडियन पीपुल्स थिएटरशी जोडलेले होते. बलराज साहनी यांचा जन्म १ मे १९१३ रोजी झाला. बलराज साहनी यांनी लाहोरच्या सरकारी कॉलेजमध्ये प्रोफेसर सोढी आणि प्रोफेसर बुखारी यांच्या मार्गदर्शनात शेक्सपिअर लिखित नाटकात अभिनय केला.

हायड्रोक्सीक्लोरोक्वाइन म्हणजे काय आणि भारतात त्याचे उत्पादन का होते?

 मलेरियासारख्या धोकादायक आजारांवर लढा देण्यासाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषध खूप प्रभावी आहे.  संशोधनातून असे दिसून आले आहे की हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषध कोरोना विषाणूंविरूद्ध लढायला मदत करते.त्यामुळे जगात त्याची मागणी अचानक वाढली आहे. एक काळ असा होता की ब्रिटन, अमेरिका, इटली आणि इतर देशांतील सरकारे यांनी आंब्यावर कीटकनाशके  वापरली गेली आहेत, म्हणून भारतातून आंब्यांची निर्यात थांबवली होती. त्यामुळे आपण हे आंबे काही देशांना निर्यात करत नव्हतो. त्यावेळी  भारत म्हणजे 'सुई' असायचा आणि विकसित देश 'तलवार' असायचे.

सामान्य ज्ञान ओळखा

१. भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते?
 उत्तरः पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते.
२. भारताने किती क्रिकेट विश्वचषक जिंकले आहेत?
उत्तरः भारताने दोन क्रिकेट विश्वचषक जिंकले आहेत.
3. भाजीपाला म्हणून आपण कोणत्या भाज्यांचे मूळ खातो?
उत्तरः बीट, गाजर आणि मुळा या भाज्यांचे मूळ खातो.
४ कोणता रंग शांततेचे प्रतीक आहे?
उत्तरः पांढरा रंग शांततेचे प्रतीक आहे.

Saturday 11 April 2020

आपल्याला माहीत आहे का?

( १ ) घरे बांधणारा . . . . . . . . . . . ........गवंडी
( २ ) दगड फोडणारा . . . . . . . . . . . . . पाथरूट
( ३ )लाकडी सामान तयार करणारा......... सुतार
( ४ ) मडकी घडविणारा ..................... कुंभार
( ५ ) दागदागिने तयार करणारा...….........सोनार
(६)जोडे शिवणारा . . . . ......... .............चांभार
(७)लोखंडी वस्तू बनविणारा ...................लोहार
( ८ ) कपडे शिवणारा ...................... ...शिंपी (ट्रेलर)
(९)कापड विणणारा................................कोष्टी
(१०) हजामत करणारा . . . . ............. ....न्हावी

वाढवा आपले सामान्य ज्ञान


वाढवा सामान्य ज्ञान
१) आयआयटीमध्ये मुलींच्या राखीव जागांची शिफारस कोणत्या समितीने केली आहे?
२) 'हंग्री स्टोन्स' या पुस्तकाचे लेखक कोण?
३) बिरसा मुंडा विमानतळ कोणत्या शहरात आहे?
४) २0१८ च्या जागतिक हँडवॉशिंग दिनाची संकल्पना
काय होती?

Friday 10 April 2020

गायक कुंदनलाल सैगल

कुंदनलाल सैगल हे भारताच्या स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात भारतीय बोलपटांतील सर्वात लोकप्रिय गायक अभिनेते होते. त्यांच्या आवाजाला इंग्लिश र्शोते गोल्डन व्हॉइस म्हणायचे. सैगल यांची सर्वच गाणी आजही लोकप्रिय आहेत. त्यांच्या गैरफिल्मी गझलासुद्धा फार र्शवणीय आहेत. 'बाबुल मोरा' हे स्ट्रीट सिंगर चित्रपटातील गाणे अजूनही लोकांना फार आवडते. कुंदनलाल सैगल यांचे वडील अमरचंद हे जम्मू-काश्मीर संस्थानात मामलेदार होते.

शेतकर्‍यांचे कैवारी: महात्मा ज्योतिबा फुले

आद्य समाज क्रांतिकारक, बंडखोर युगपुरुष आणि द्रष्टे विचारवंत असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी सातारा जिल्ह्यातील कटगुण या गावी झाला.(मृत्यू २८ नोव्हेंबर १८९१) समाज परिवर्तनाचा ध्यास आणि बहुजनांचा उद्धार व न्याय हक्कासाठी लढा उभारणार्‍या महात्मा फुलेंचे शेतकरी व कृषी क्षेत्रातील योगदानसुद्धा तितकेच महत्त्वपूर्ण आहे. शेतीविषयक त्यांनी दिलेला संदेश आजही तितकाच उपयुक्त आहे. कृषी आणि कृषक हा त्यांच्या लिखाणातील अविभाज्य घटक होता.

Thursday 9 April 2020

ही मुलगी मंगळावर जाणारा 'पहिला मानव' बनण्यास इच्छूक:एलिसा कार्सन

एक सर्वसामान्य चित्र असं आहे की, जेव्हा आपण लहान वयात आमची आवडती व्यंगचित्रं बघायचो तेव्हा आपल्यालाही त्या जगात पोहोचण्यासाठी आणि त्या पात्रांप्रमाणे जगायला खूप उत्सुकता वाटत होती.  कधीकधी अ‍ॅनिमेटेड चित्रपट पाहून आपल्याला दुसर्‍या जगात किंवा ग्रहावर जावसं वाटत होतं. परंतु सहसा आपण हे स्वप्न विसरतो आणि डॉक्टर, अभियंता किंवा शिक्षक होतो.
 पण अमेरिकेच्या 17 वर्षीय अ‍ॅलिसा कार्सनने लहान असताना मंगळावर जाण्याचा निर्णय घेतला होता.

बुध ग्रहाविषयी माहिती

बुध या ग्रहाविषयी आपल्याला आकर्षण असतं. हा आकाराने चंद्रापेक्षा थोडा मोठा ग्रह असून उभयतांच्या पृष्ठांवरील स्वरूपांमध्ये बरंच साम्य असल्याचं आढळलं आहे. वरवर पाहता बुधांचं कवच पृथ्वी, मंगळ आणि चंद्र यांच्या कवचाप्रमाणे असल्याचं समजतं. मरिनर-१0 यानाने अविरक्त प्रारणाच्या साहाय्याने केलेल्या तापमापनाद्वारे हे कवच उष्णतानिरोधक असल्याचं आढळलं. यावरून ते सच्छिद्र मृदेचं अथवा चंद्रावरील आवरणशिलेसारख्या खडकांच्या चुर्‍याचं बनवलेलं असावं असं वाटतं.

किशोरी आमोणकर

किशोरी आमोणकर या हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिका होत्या. त्या जयपूर घराण्याच्या शैलीत गायन करत असत. त्या एक श्रेष्ठ गायिका होत्या व आदराने त्यांना 'गानसरस्वती' असे संबोधले जात असे. किशोरीताईंचा जन्म मुंबई येथे इ.स. १९३१ मध्ये झाला. त्यांच्या आई म्हणजे प्रख्यात गायिका मोगूबाई कुर्डीकर व वडील माधवदास भाटिया. किशोरीताईंनी आपल्या आईकडून संगीताचे ज्ञान तर घेतलेच, शिवाय विविध संगीत घराण्यांच्या गुरूंकडूनही मार्गदर्शन घेतले. त्या मुंबईच्या एलफिन्स्टन कॉलेजमध्ये शिकल्या. त्यांचे पती रवी आमोणकर हे अध्यापन क्षेत्रात होते.

कागदावर लिंबूची जादू

या वेळचा प्रयोग लिंबूशी संबंधित आहे.  आपण या प्रयोगास जादू देखील म्हणू शकता.  चला, यावेळी, यावेळी बनवू या न दिसणारी शाई  मग आपण त्याच्यापासून जादू करूया. आपल्याला हा प्रयोग करण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींमध्ये लिंबू, एक लहान वाडगा (वाटी), पाणी, पेंट ब्रश, एक चमचा आणि पांढरा कागद.

हे तुम्हाला माहीत आहे का?

1. सरडा छोटा वाटू शकतो, परंतु त्याची जीभ खूप लांब आहे.  ही जीभ आपल्या शरीराच्या लांबीच्या तीन पट वाढवू शकतो.
 २. पक्षी अंतराळात जगू शकत नाहीत, कारण त्यांना गुरुत्वाकर्षणाची आवश्यकता असते किंवा तेथे ते त्यांचे भोजन देखील गिळू शकत नाहीत.
 3. गोगलगायचे तोंड सुईच्या टोकापेक्षा जास्त मोठे नसते, परंतु त्याचे दात 25,000 असू शकतात. 

प्राचीन अक्याब बंदर

बंगालच्या उपसागरातील एक महत्त्वाचे बंदर म्हणजे अक्याब होय . म्यानमार ( पूर्वीचा बहादेश ) देशातील आराकान विभागाचेव अक्याब जिल्ह्याचे हे महत्त्वपूर्णव प्रमुख शहर आहे . कलादन , मायूवलेमरो या तीन नद्यांच्या त्रिभूज प्रदेशातील कलदन नदीच्या बेटावर हे शहर वसलेले आहे . हे शहर ब्रिटिशांच्या ताब्यात असताना तेतांदूळ नियांतीचे मुख्य केंद्र होते . नतर दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ते जपानच्या ताब्यात गेले . म्यानमार मधील इतर सर्व प्रमुख शहरांशी हे वायूमार्ग व जलमार्गाने जोडलेले आहे .

कवयित्री डॉ.स्वाती शिंदे-पवार

डॉ .स्वाती शिंदे पवार साहित्य क्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तीमत्व
सांगली जिल्ह्यातील अष्टपैलू साहित्यिका डॉ. स्वाती शिंदे-पवार यांचा आज ८ एप्रिल  हा जन्मदिवस. सांगली जिल्ह्यातल्या तासगाव तालुक्यातील जरंडी हे माहेर तर कडेगाव तालुक्यातील  रामापूर हे सासर असलेल्या डाॅ. स्वाती शिंदे या शैक्षणिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपले योगदान देत  आहेत.  त्यानी आतापर्यंत  तेरा पदव्या मिळवत स्वतःची  एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.  सद्या  मुख्याध्यापिका म्हणून खानापूर तालुक्यातील   जिल्हा परिषद केंद्र शाळा मंगरूळ येथे कार्यरत आहेत.