Sunday 25 December 2022

जाणून घ्या सामान्य ज्ञान

1) आयोडिनच्या कमतरतेमुळे होणारा रोग कोणता? : गलगंड 

2) युनिव्हर्सल डोनर म्हणजे रक्‍तदाता होय? : ओ 

3) बटाटा काय आहे? : मूळ 

4) कोवळ्या उन्हामुळे मनुष्यास कोणते जीवनसत्व मिळते ? : ड 

5) कोणत्या प्राण्यापासून हत्तीरोगाचा प्रसार होतो? : डास 

6) वातावरणात ऑक्सिजन वायूचे प्रमाण किती टक्के आहे? २१ टक्के 

7) वि. वा. शिरवाडकर यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते? : कुसुमाग्रज 

8) मीनांबकम आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? : चेन्नई 

9) जनगणना दर किती वर्षांनी केली जाते? : 10 वर्षांनी 

10) लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? : दुसरा 

11) भारतीय दूधक्रांतीचे जनक कोण आहेत? : डॉ. वर्गीस कुरियन 

12) महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली? : १९९४ 

13) भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण : सुचेता कृपलानी (1963 ते 1967, उत्तरप्रदेश) 

14) भारतातील सर्वात उंच इमारतीचे नाव काय : वर्ल्ड वन (मुंबई) 

15) सर्वात जास्त भूकंप खालीलपैकी कोणत्या देशात होतात? : जपान 

16) एड्स रोगाचे विषाणू शरीरातील कोणत्या घटकावर परिणाम करतात : चेतापेशी 

17) कोणत्या देशात फक्त ८२५ छोकच राहतात?! वेटिकन सिटी 

18) तंब्राखूमध्ये असणारे विषारी द्रव्य कोणता? : निकोटीन 

19) कोरोना आजारात कोणत्या asst 'आपत्कालीन कर्ज सुविधा' सुरू केली : स्टेट बंक ऑफ इंडिया 

20) कोरोना विषाणू २०१९ चे पहिले प्रकरण कुठे समोर आले : चीनमधील ATTRA हुआनमध्ये 

21) कोरोनाच्या नवीन विषाणूला तात्पुरते नाव काय : 2019-nCov 


Tuesday 20 December 2022

नामशेष होण्याच्या मार्गावर असलेला सारस पक्षी


करकोचा व करकरा यांच्याबरोबरच सारसाचा गुइडी या पक्षिकुलात समावेश केलेला आहे. याचे शास्त्रीय नाव ग्रुस अँटिगोन असे आहे. ग्रुस या प्रजातीत दहा व इतर चार अशा एकूण 14 जाती आहेत. सायबेरियन क्रेन (ग्रुस ल्यूकोगेरॅनस) हे मध्य सायबेरियात आढळणारे पक्षी हिवाळ्यात भारतातील लडाख, अरुणाचल प्रदेशातील सांगती खोरे, भूतान, म्यानमार इ. ठिकाणी कळपाने येतात. ते वास्तव्यासाठी रुंद व प्रशस्त नद्यांची खोरी निवडतात. भारतीय उपखंडात सारस उत्तर आणि मध्य भारत, तराई नेपाळ आणि पाकिस्तान, थायलंड, म्यानमार इ. प्रदेशांत हा आढळतो. मैदानी प्रदेशांत पाण्याच्या आसपास, तलाव व तळी यांच्या काठावर, दलदलीच्या जागी किंवा शेतात हा राहतो. या पक्ष्यांची जोडपी असतात कधीकधी एक-दोन पिले त्यांच्यासोबत असतात.  महाराष्ट्रात सारस पक्षी केवळ गोंदिया-भंडारा जिल्ह्यात शिल्लक आहे. भारतातही हा पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. जगभरात केवळ 25 ते 37 हजारच सारस शिल्लक आहेत.  2018 च्या सर्वेक्षणानुसार, पश्चिम बंगाल, आसाम, गुजरात, पंजाब, उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेशात मिळून 14 हजार 938 सारस शिल्लक आहेत. यापैकी बहुतांश सारस उत्तर प्रदेशात असून या राज्याचा तो राज्यपक्षी आहे.  महाराष्ट्रात देखील 50 च्या आसपास सारस शिल्लक आहेत. यातील सर्वाधिक सारस गोंदिया, त्यानंतर भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यात केवळ एक सारस आहे.महाराष्ट्रात सारस पक्ष्याच्या बाबतीत उच्च न्यायालयाने स्वत:हून घेतलेल्या भूमिकेनंतर महाराष्ट्रातील तीनपैकी  दोन जिल्ह्यात सारस संवर्धन समिती गठीत झाली असून एका जिल्ह्यात अजूनही समितीचे गठन व्हायचे आहे. 

कधीकाळी याच महाराष्ट्रात सुमारे शंभर सारस होते. निसर्ग संवर्धनासाठी कार्यरत ‘आययूसीएन’च्या यादीत या पक्षाची नोंद संकटग्रस्त अशी आहे. सारस हा उडू शकणारा जगातील सर्वात मोठा पक्षी आहे, पण गेल्या काही दशकात पाच फूट उंच, आठ फूट लांब पंख आणि सात किलो वजनाच्या या पक्ष्याची संख्या उच्चदाब वीजवाहिन्या, रायासानिक खते आणि कीटकनाशके आदींमुळे झपाटय़ाने कमी होत आहे. महाराष्ट्रात या पक्ष्यांचा अधिवास टिकवून ठेवण्याचा मान गोंदिया जिल्ह्यातील ‘सेवा’ या संस्थेला जात आहे. या संस्थेचे अध्यक्ष व मानद वन्यजीव रक्षक सावन बाहेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शेतकऱ्यांना सोबत घेऊन सारस संवर्धनाची धुरा गोंदिया व भंडारा जिल्ह्यात सांभाळली आहे. वनखाते आणि स्थानिक प्रशासनाकडून दुर्लक्षित झालेल्या या पक्ष्याची दखल नागपूर उच्च न्यायालयाने घेतल्यानंतर वनखाते आणि स्थानिक प्रशासन जागे झाले. नामशेषाच्या मार्गावरील या पक्ष्याच्या संवर्धनासाठी सध्यातरी सर्व एकत्र आल्याचे दिसून येत आहे.

सारस हा गिधाडापेक्षा मोठा असून 120–152 सेंमी. उंच असतो. मान व पाय बरेच लांब डोके आणि मानेचा वरचा भाग लालभडक डोक्याचा माथा राखी मान पांढरी संपूर्ण शरीर निळसर-करड्या रंगाचे डोळे नारिंगी चोच टोकदार व हिरवट रंगाची, पाय लाल व पिसेविरहित असतात. मादी नरापेक्षा लहान असते. सारस पक्षी झाडावर बसत नाहीत. ते नेहमी जमिनीवरच भटकत असतात. झाडाझुडपांचे कोवळे धुमारे, वनस्पतिज पदार्थ, किडे, सरडे, गोगलगायी इ. यांचे भक्ष्य आहेत. या पक्ष्यांचा जोडा जन्मभर टिकतो. एकमेकांच्या सान्निध्यात राहूनच ते भक्ष्य टिपीत असतात व उडून दुसरीकडे जाताना देखील ते बरोबरच जातात. सारस गुपचुप भक्ष्य टिपीत असतात, त्यांना कोणी त्रास दिला किंवा हुसकले, तर ते कर्ण्याच्या आवाजासारखा मोठा आवाज काढतात. उडतानादेखील ते असाच आवाज करतात. उडत असताना मान पुढच्या बाजूला लांब, ताठ केलेली असते व पाय मागे लोंबत असतात. ते जमिनीपासून जास्त उंचीवरून उडू शकत नाहीत परंतु त्यांचा वेग जास्त असतो.

जुलै–सप्टेंबर यांचा विणीचा हंगाम असतो. घरटे बरेच मोठे बोरू, वेत, लव्हाळी व गवत यांचे बनविलेले असते सामान्यतः ते दलदलीच्या जागेवर किंवा पाणी साठलेल्या भाताच्या खाचराच्या मध्यभागी असते. मादी फिकट हिरव्या किंवा गुलाबी-पांढऱ्या रंगाची दोन अंडी घालते कधीकधी त्यांच्यावर तपकिरी किंवा जांभळ्या रंगाचे ठिपके असतात. नर-मादी घरट्यातील अंड्यांचे अतिशय जागरूकतेने रानमांजर, मुंगूस व कुत्री यांपासून संरक्षण करीत असतात. पिलू अंड्यातून बाहेर पडल्यावर लगेचच हिंडू-फिरू लागते. ते नर-मादीच्या संरक्षणाखाली वाढते.

सारस अधिवास संरक्षणावर लक्ष केंद्रित करायला हवे.विजेच्या धक्क्यांपासून सारस पक्ष्यांना वाचवण्यासाठी महागडे उपाय योजण्यापेक्षा कमी खर्चातील उपाययोजनादेखील परिणामकारक ठरू शकतात. साध्या ‘पीव्हीसी पाइप’ने उच्चदाब वीजवाहिन्या झाकल्या तरीही त्यातून अपेक्षित परिणाम साधला जाईल.  नदीतील अवैध वाळू उत्खननामुळेही सारसांचा अधिवास धोक्यात आला आहे. ओलसर जमिनीच्या पर्यावरणावर म्हणजेच ‘वेटलॅण्ड इकॉलॉजी’ या महत्त्वाच्या मुद्दय़ाकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

Monday 19 December 2022

वाढवा तुमचे सामान्य ज्ञान

@ जांभा खडक कोणत्या जिल्ह्यात सापडतो? : रत्नागिरी 

@ मराठी वृत्तपत्राचे जनक कोण? : आचार्य बाळशास्त्री जांभेकर 

@ तांब्याच्या पत्र्यावर कोरलेलं लेख म्हणजे काय असते? : ताम्रपट

@ होमो सेपियन म्हणजे काय? : बुद्धिमान माणूस 

@ हडप्पा कोणत्या नदीच्या काठावर वसली आहे? : रावी नदी 

@ आयुर्वेदाची माहिती कोणत्या वेदात आहे? : अथर्ववेद 

@ तागाच्या उत्पादनात भारतात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे?: पश्‍चिम बंगाल 

@ भारतातील सर्वाधिक उष्ण ठिकाण कोणते? : गंगानगर (राजस्थान) 

@ तेलंगणा प्रदेशात दगडी कोळशाच्या खाणी कुठे आहे? : सिंगारेनी 

@ कोणत्या प्राण्याला 'वाळवंटातील जहाज' म्हणतात? : उंट 

@ महाराष्ट्र विधानसभेतील सदस्यांची संख्या किती आहे? : 288 

@ कोणत्या शास्त्रज्ञाला भारताचा मिसाईल मॅन म्हटले जाते? : डॉ. एपीजे अब्दुल कलाम 

@ रायगड जिल्ह्यात भात संशोधन केंद्र कुठे आहे ? : कर्जत 

@ हळदीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध जिल्हा कोणता? : सांगली 

@ महाराष्ट्रात हत्ती संशोधन केंद्र कुठे आहे? : वर्धा 

@ पोलाद तयार करण्यासाठी कोणता धातू वापरला जातो? : लोह 

@ कोरोना विषाणूला 'आंतरराष्ट्रीय आणीबाणी' कोणी घोषित केले : जागतिक आरोग्य संघटना (WHO) 

@ WHO ने कोरोना विषाणूला काय नाव दिले आहे? : कोविड-19 

@ मानवामध्ये कोरोना विषाणू कोणत्या संसर्गामुळे होतो? : श्‍वसन 

@ भारतातील कोणत्या राज्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला? : केरळ 

@ कोरोना विषाणू लशीची पहिली मानवी चाचणी कोणत्या देशात सुरू झाली? : अमेरिका 

@ पेंच नदीवरील तोतलाडोह जलाशयास कोणत्या नावाने ओळखले जाते ? : मेघदूत जलाशय 

@ भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर कोणते? : मुंबई 



मागील आठवड्यातील ठळक घडामोडी राष्ट्रीय (18 डिसेंबर 2022 अखेर)

@ काँग्रेस नेते सुखविंदर सिंग सुखू यांनी हिमाचल प्रदेशचे नवे मुख्यपंत्री म्हणून १९ डिसेंबर रोजी शपथ घेतली. 

@ गोव्यातील मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाला माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे नाव देण्यात आले. 

@१८ डिसेंबर रोजी दीपिका पदुकोणने फिफा विश्‍वचषक २०२२ च्या ट्रॉफीचे अनावरण केले. 

@ न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांनी १२ डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. 

@ आठवा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव २०२२ भोपाळ येथे २१ ते २४ जानेवारीदरम्यान होणार आहे. 

@ पटेल यांची दुसऱ्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ. 

@ पहिल्या कार्बन न्यूट्रल फार्मचे केरळमध्ये उद्घाटन. 

@ स्किल इंडिया मिशनअंतर्गत कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने (MSDE) १२ डिसेंबर रोजी प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ मेळा (पौ एमएनएएम) आयोजित केला होता. ९७ जिल्ह्यांचा समावेश असलेल्या २५ राज्यांमध्ये मेळावा संपन्न.

@ केंद्रीय जलशक्‍ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी १५ डिसेंबर रोजी जलशक्‍ती राज्यमंत्री बिश्‍वेश्वर तुडू यांच्या उपस्थितीत सातव्या भारत जल प्रभाव शिखर परिषदेचे (आयडब्हूआयएस 2022) उद्‌घाटन केले. 

@ तामिळनाडू स्वतःचे हवामान बदल मिशन सुरू करणारे पहिले राज्य. गेल्या सप्टेंबरमध्ये हरित तमिळनाडू मिशन आणि या आगस्टमध्ये तामिळनाडू वेटलँड मिशन सुरू केले होते.

@ बांगलादेश मुक्तिसंग्रामाच्या विजयाची आठवण म्हणून १६ डिसेंबरला भारतात विजय दिवस साजरा केला जातो. 

@ गामोसा, तंदूर , रेडग्राम आणि लडाख जर्दाळूंना आसाममधून जीआय टग मिळाला. 

@ यूएन कमिशन ऑन द स्टेटस आफ वुमनमधून इराणची हकालपट्टी करण्यात आली. 

@ महाराष्ट्र, गुजरात, गोवा एरियल आर्मी यॉचिंग नोड यांनी 'ऑप्टिमिस्ट आशियाई आणि ओशनियन चॅम्पियनशिप'चे १३ ते २० डिसेंबरला गिरगाव चौपाटी येथे आयोजन. 

@ कार्डिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ डॉ. पीसी रथ यांची निवड करण्यात आली. 

@ डॉ. बिरेंद्र सराफ महाराष्ट्राचे महाधिवक्ता म्हणून नियुक्‍त. 

अर्थजगत

@जगातील १०० सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत अर्थमंत्री निर्मला सोतारामन, बायोकॉनच्या कार्यकारी अध्यक्षा किरण मुझुमदार-शॉ आणि Nykaa च्या संस्थापक फाल्गुनी नायर या सहा भारतीय महिलांचा समावेश. ३६ व्या क्रमांकावर असलेल्या निर्मला सीतारामन यांनी सलग चौथ्यांदा या यादीत.

@ फर्स्ट-एव्हझ बोएमडब्ल्यू एक्सएमचे अनावरण. यात आकर्षक डिझाइन, शक्तिशाली स्टान्स, तेवीस इंचपर्यंतचे व्हील्स, शक्तिशाली इंजिन्स, जवळपास ८८ km (डब्ल्यूएलटीपी) पर्यंतच्या ऑल इलेक्ट्रिक रेंजसह पहिले इलेक्ट्रिफाईड हाय-परफार्मन्स मॉडेल. 

@ कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळावर देशातील सर्वात मोठे व्यावसायिक जेट टर्मिनल सुरू झाले. 

@ एचडीएफसी बँकेने भारत सरकारच्या 'स्टार्टअप इंडिया' या प्रमुख उपक्रमाच्या भागीदारीत सामाजिक स्टार्टअप्ससाठी सहाव्या वार्षिक अनुदान कार्यक्रमाची घोषणा केली. 

@ अक्सिस बँकेची टाटा एआयजी जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (टाटा एआयजी) सोबत भागीदारी. टाटा एआयजीच्या ग्रुप मेडिकेअर उत्पादनांतर्गत समलेंगिक जोडीदारांनाही पंधरा लाखांच्या विम्याच्या रकमेसाठी संरक्षण. 

@ नियामक पर्यवेक्षण सुधारण्यासाठी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता वापरण्यासाठी आरबीआयच्या ७ ग्लोबल कन्सल्टन्सी फर्म्स

@ एसबीआयने गेल्या चार आर्थिक वर्षात १.६५ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले. 

@ यूएनच्या अहवालानुसार, जागतिक व्यापाराचे मूल्य १२ टक्क्यांनी वाढून अंदाजे $३२ ट्रिलियन झाले. 

@ पी. टी. उषा भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्षा बनल्या. 

@  सिंडी हुक यांची २०३२ ऑलिम्पिक आयोजन समितीच्या सोईओ म्हणून नियुक्‍ती करण्यात आली. 

@  इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूट हा कसोटी क्रिकेटमध्ये १० हजार धावा करणारा आणि ५० बळो घेणारा तिसरा क्रिकेटपटू. 

७ इंग्लंडचा टी-२० विश्‍वचषक विजेता कर्णधार जोस बटलर आणि सिद्रा अमीन यांची नोव्हेंबर २०२२ साठी आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ म्हणून निवड. 

@ दिव्या टीएसने महिला एअर पिस्तुल राष्ट्रीय नेमबाजी चॅम्पियनशिप २०२२ मध्ये सुवर्णपदक जिंकले. 

@  फिना वर्ल्ड स्वीमिंग चॅम्पियनशिप २०२२ मध्ये चाहत अरोराने १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये राष्ट्रीय विक्रम केला. 

@ सुप्रसिद्ध मराठी लावणी गायिका सुलोचना चव्हाण यांचे १० डिसेंबर रोजी वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. 

@ पोलंडचे एकमेव अंतराळवीर जनरल मिरोस्लाव हर्माझेव्स्की यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी नुकतेच निधन झाले. 




Sunday 11 December 2022

माहीत आहे का तुम्हाला?

@ कॅनडामधीत्न दहा वर्षांचा मुलगा ल्यूक बोल्टनने “सर्वात लांब तुटलेला दुधाचा दात’ (२.६ सेंटीमीटर) या श्रेणीत गिनिज नुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवले आहे. हा दात २०१९  मध्ये एका डेंटिस्टने काढत्ला होता. 

@ गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या इन्स्टाग्राम हँडलने “जगातील सर्वात लांब लग्नाचा ड्रेस (६,९६२.६ मीटर) हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा ड्रेस सायप्रसची मारिया पारस्केवा नावाच्या  महिलेने घातला होता. 

@ 'ब्रिटनमधील जेड मर्फी या युवकाने आपला चेहरा इन्स्टाग्राम फिल्टरसारख्या बनवण्यासाठी प्लास्टिक सर्जरी वर ३० लाख रुपये खर्च केले 

@ पृथ्वीवर सर्वात जास्त दिवस जगणारा प्राणी म्हणजे कासव. त्याचे वय साधारणता १५० ते २००  वर्षे असते. 

@ 'हवेत उड्डाण घेताना आपण आपल्या शरीरातील सुमारे ८ टक्के पाणी गमावतो. खाचे कारण हवामान-नियंत्रित  वातावरणातीत्न अर्द्रता १० ते १५ . टक्क्यांपर्यंत कमी असू शकते. 

@ शालेय बसेसचा रंग पिवळा असतो  कारण इतर रंगांच्या तुलनेत मानवी डोळ्यांना पिवळा रंग अधिक उठून दिसतो. हा रंग रात्री आणि धुक्यात देखील अगदी सहज दिसून येतो, जो अपघातांपासून बचाव करतो. 

@ नेपाळ हा एकमेव देश असा आहे, ज्याचा राष्ट्रीय ध्वज आयताकृती नाही. 

@ एका सर्व्हेनुसार, जगातील सर्वात सुशिक्षित देशांच्या यादीत कॅनडा देश  पहिल्या क्रमांकावर येतो. 

@ वायव्य थायलंडच्या पाडांग जमातीतील स्त्रियांची मान ७.७ इंच लांबींपर्यंत आहे. हे मानवी मानांच्या सरासरीच्या लांबीच्या दुप्पट आहे. 

@ आपल्याला झोपेत पडलेले स्वप्न हे आपणास जाग आल्यानंतर १० मिनिटांच्या आत आपण ९० टक्के स्वप्न विसरून जातो. 

@ जगभरात मधमाश्यांच्या एकूण २० हजार जाती आहेत. मात्र, त्यापैकी केवळ ४ टक्के मधमाश्या मध बनवू शकतात.

@ जगातील ९० टक्के शुद्ध पाणी हे एकट्या अंटार्क्टिकामध्ये आहे. 

@ 'टॉम अँड जेरी' मालिका १९४०  मध्ये विल्यम आणि जोसेफ बारबेरा यांनी बनवली. 

@ जपानमधील लोक सहीऐबजी स्वतः  च्या स्टॅम्पचा वापर करतात. या स्टॅम्पला जपानी भाषेत 'हंको' असे म्हणतात. 

@ जगातील सर्वात उंच आणि जास्त रुंदीची अशी दोन्ही प्रकारची झाडे ही अमेरिकेतील कॅलिफोर्नियात आहेत. 

@ शुद्ध सोने इतके मऊ असते की ते हातांनी देखील मोडले जाऊ शकते. 

@ भारतातील पहिला सूर्योदय अरुणाचल प्रदेशच्या डोंग जिल्ह्यात होतो. डोंग जिल्हा हे भारतातील सर्वात पूर्वेकडील ठिकाण आहे, म्हणूनच येथे सूर्योदय सर्वात आधी अनुभवला जातो. 


Wednesday 9 November 2022

बालदिन : मुलांना त्यांच्या हक्कांचे ज्ञान देण्यासाठी सुरू केलेला दिवस

'मुले म्हणजे देवाघरची फुले' असे मानणाऱ्या जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीदिवशी आपल्या देशात 'बालदिन' साजरा करण्यात येतो. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची १४ नोव्हेंबर रोजी जयंती असते. संयुक्त राष्ट्रसंघाने २० नोव्हेंबर १९५४ रोजी 'बालदिवस' साजरा करण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून भारतात देखील २० नोव्हेंबर याच दिवशी 'बालदिन' साजरा करण्यात येत होता. परंतु २७ मे १९६४ रोजी नेहरूंचे निधन झाले. नेहरूजींना लहान फारच प्रिय होती. त्यांचे बालकांवर खूपच प्रेम फारच प्रिय होती. त्यांचे बालकांवर खूपच प्रेम होते. मुलेही त्यांना प्रेमाने 'चाचा' म्हणत. म्हणूनच चाचा नेहरू यांच्या जन्मदिवशी (१४ नोव्हेंबर) बालदिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. तेव्हापासून दरवर्षी १४ नोव्हेंबर याच दिवशी भारतात बालदिन साजरा करण्यास प्रारंभ झाला. भारतात जरी बालदिन १४ नोव्हेंबर रोजी साजरा होत असला, तरी आंतरराष्ट्रीय बालदिवस हा २० नोव्हेंबर या दिवशी साजरा करण्यात येतो. १९५९ साली झालेल्या संयुक्‍त राष्ट्रसंघाच्या महासभेत बाल हक्कांची घोषणा सुद्धा करण्यात आली होती. हे बालहक्क चार वेगवेगळ्या भागांत विभागलेले असून त्यामध्ये जीवनाचा हक्‍क, संरक्षणाचा हक्‍क, सहभागाचा हक्क आणि विकासाचा  हक्‍क यांचा समावेश आहे. असे बरेच देश आहेत, जेथे वेगवेगळ्या दिवशी बालदिन साजरा करण्यात येतो. काही देशांमध्ये एक जून, चीनमध्ये ४ एप्रिल, पाकिस्तान १ जुलै तर अमेरिकेत जून महिन्याच्या दुसर्‍या रविवारी बालदिन साजरा करण्यात येतो. याशिवाय ग्रेट ब्रिटन मध्ये २० ऑगस्ट, जपानमध्ये ५  मे या दिवशी बालदिन साजरा होतो. 

मुलांचे काळजीपूर्वक आणि प्रेमाने पालन पोषण केले पाहिजे, कारण ही लहान मुलेच देशाचे भविष्य आणि उद्याचे नागरिक होणार आहेत, तीच देशाचे सामर्थ्य आणि समाजाचा पाया आहेत, असे नेहरू  यांचे म्हणणे होते. त्यांचा जन्म १४ नोव्हेंबर १८८९ रोजी अलाहाबाद येथे झाला होता. लहानपणापासूनच त्यांना छोट्या मुलांबद्दल खूप प्रेम वाटत असे. मोठेपणी त्यांच्या कोटाच्या पहिल्या बटनावर एक गुलाबाचे सुंदर फूल विराजमान झालेले दिसे. 'फूल व मूल' हीच त्यांची मोठी आवड होती. लहान मुले म्हणजे नेहरूंच्या हृदयातील अमूल्य ठेवा होता. मुले हीच खरी राष्ट्रीय संपत्ती आहे, या दृष्टीकोनातून नेहरुंनी आपल्या विकास कार्यक्रमात बाल कल्याणाच्या उपक्रमांना नेहमीच अग्रक्रम दिला होता. मुले काय शिकतात यापेक्षा त्यांच्यावर कोणते संस्कार होतात हे पालक आणि शिक्षकांनी पाहिले पाहिजे याबाबत ते सदैव आग्रही असत. 'मुले व फुले' याबद्दलचा जिव्हाळा नेहरूंच्या रोमारोमात भिनलेला होता. एकदा तर होळीच्या दिवशी त्यांच्या निवासस्थानी शाळकरी मुले आली आहेत हे कळताच मंत्रिमंडळाच्या बैठकीतून उठून ते तडक घरी गेले आणि मुलांवर रंग उधळण्यासाठी त्यांच्या दिशेने धावले. मुठी भरभरून त्यांनी त्या आलेल्या मुलांवर रंग उधळला. परंतु आपल्यावर रंग उधळण्यास मुले संकोच करत असल्याचे त्यांना जाणवले. म्हणून ते खाली बसले व म्हणाले, सांगा बघू. आता, कुठे आहे मी मोठा? झालो की नाही लहान आता तुमच्या एवढा छोटा ! चला आता उडवा पाहू माझ्यावर रंग!” असे होते हे चाचा नेहरू ! आपले वय, पद सर्वकाही विसरून ते लहान मुलांमध्ये त्यांच्यासारखे लहान होऊन मिसळत व त्यांच्यात रमून जात. 

भारतातील प्रत्येक शाळेमध्ये व अन्य शैक्षणिक संस्थांमध्ये बालदिन मोठ्या उत्साहात आणि वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. या  दिवशी प्रत्येक शाळेतील शिक्षक व विद्यार्थी त्यांच्या नेहमीच्या दिनचर्येतून बाहेर पडून हा दिवस साजरा करतात. मुले ही भविष्यातील नागरिक आहेत. म्हणूनच शाळा या दिवशी विविध प्रश्नमंजुषा, वादविवाद, नृत्य, नाट्य व संगीत या प्रत्येकावर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतात. या दिवशी विविध  प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात, ज्यात मुलांच्या कला गुणांचे व विविध कौशल्यांचे दर्शन घडते. अनेक शाळांमध्ये क्रीडा स्पर्धा आयोजित करून बालदिन साजरा केला जातो. काही शाळांमधील शिक्षक अनेकदा आसपासच्या अनाथाश्रमातील, आधारगृहांतील तसेच व आदिवासी पाड्यांमधील  मुलांना शाळेतील विद्यार्थ्यासह बालदिनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करतात. अनेक स्वयंसेवी संस्था या दिवशी गरीब मुलांसाठी अनेक  कार्यक्रम करतात. अनेक मोठे दानशूर लोक या दिवशी मुलांना पुस्तके, खाऊ, चॉकलेट, बिस्किटे, खेळणी, शालोपयोगी साहित्य वगैरेंचे वाटप करतात. लहान मुलांना त्यांची कर्तव्ये व त्यांचे हक्क याबद्दल जाणीव  करून देण्याच्या हेतूने विविध शाळांमध्ये या विषयावर दृक-श्राव्य माध्यमांतून कार्यक्रम सादर करतात. बालदिन हा देशाच्या भावी पिढ्यांना त्यांच्या हक्कांचे ज्ञान देण्यासाठी सुरू केलेला विशेष दिवस आहे. 


Friday 4 November 2022

जीके क्विझ - 1

जीके क्विझ - 1

1. कोणते राज्य पाचव्या खेलो इंडिया युथ गेम्सचे आयोजन करणार आहे?

 उत्तर - मध्य प्रदेश

2.भारतातील पहिला वर्टिकल लिफ्ट सी ब्रिज कोणत्या राज्यात बांधला जात आहे?

 उत्तर - तामिळनाडू

3. देशातील कोणते शहर 'अंतराळाचे शहर' म्हणूनही ओळखले जाते?

उत्तर- बंगळुरू

4. लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाच्या राजधानीचे नाव सांगा?

 उत्तर - कवरत्ती

5. वातावरणातील सर्वात खालच्या पृष्ठभागाला काय म्हणतात?

 उत्तर- तपांबर

6. कार्तिक पौर्णिमेला कोणत्या शीख गुरूची जयंती साजरी केली जाते?

 उत्तर - गुरु नानक

7. स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते?

 उत्तर - डॉ. राजेंद्र प्रसाद

8. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय कोठे आहे?

 उत्तर - मुंबई

9. हिरव्या वनस्पतींद्वारे अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात?

 उत्तर - प्रकाश संश्लेषण

10. मासे कोणत्या अवयवाच्या मदतीने श्वास घेतात?

 उत्तर -  कल्ले (गिल्स) 

11. कोणत्या राज्याला फलोद्यानाचे नंदनवन म्हणतात?

 उत्तर - सिक्कीम

12. अलीकडे भारताचे कोणते दोन केंद्रशासित प्रदेश म्हणून  घोषित केले गेले?

 उत्तर- जम्मू-काश्मीर आणि लडाख

13. काळा ध्वज कशाचे प्रतीक आहे?

 उत्तर- विरोध करण्याचे

14. कोणत्या भारतीय पत्रकाराने 2019 चा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जिंकला?

 उत्तर - रवीश कुमार

Sunday 16 October 2022

जगातील वन्यजीवांच्या संख्येत ६९ टक्क्य़ांनी घट

हवामान बदल, नैसर्गिक अधिवासामध्ये घट, अवैध शिकार, बेसुमार वृक्षतोड, वणवे आदी अनेक कारणांमुळे वन्यजीवनाचा र्‍हास होत असतो. वर्ल्ड वाईड फंड (डब्ल्यूडब्ल्यूएफ)च्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या लिव्हिंग प्लॅनेट या अहवालानुसार जगातील वन्यजीवांच्या संख्येत १९७0 ते २0१८ या काळात६९ टक्क्य़ांनी घट झाली आहे.

या जीवांमध्ये सस्तन प्राणी, पक्षी, सरीसृप, मासे आदींचा समावेश आहे. हेच भारतातही दिसून आले आहे. ४८ वर्षांमध्ये मधमाश्यांसह गोड्या पाण्यातील १७ प्रजातींच्या कासवांचे प्रमाण कमी झाले आहे. अहवालानुसार, वन्यजीवांची संख्या झपाट्याने कमी होण्यामागे सहा प्रमुख कारणे आहेत. यामध्ये हवामान बदल, वाढते प्रदूषण, शेती, शिकार, आक्रमक प्रजाती आणि जंगलतोड यांचा समावेश आहे.

दुसर्‍या संशोधनानुसार सध्या मनुष्य दर मिनिटाला २७ फुटबॉल मैदानांइतकी जंगलतोड करीत आहे. या अभ्यासासाठी संशोधकांनी ५२३0प्रजातींची पाहणी केली. अभ्यासानुसार, लॅटिन अमेरिका आणि कॅरेबियन देशांमध्ये ४८ वर्षांमध्ये वन्यजीवांच्या संख्येत सर्वात मोठी म्हणजे ९४ टक्के घट झाली आहे. त्याच वेळी, आफ्रिका आणि आशियामध्ये वन्यजीव अनुक्रमे ६६ टक्के व ५५ टक्के कमी झाले आहेत. जागतिक स्तरावर गोड्या पाण्यातील प्रजातींची संख्या ८३ टक्के कमी झाली आहे.

वेगाने होत असलेल्या शहरीकरणामुळे व लोकसंख्या वाढीमुळे प्राण्यासाठी असणारी वन्य जमिनीचे क्षेत्र कमी कमी होत चालले आहे व प्राण्यांना स्वताचे अस्तित्व टिकवणे अवघड झाले आहे व काही प्राण्याचा प्रजाती नामशेष होण्याचा मार्गावर आहेत. या गंभीर परिस्थितीकडे लक्ष देवून नामशेष होवू घातलेल्या प्राणी व पक्षी यांच्या संरक्षणासाठी व संवर्धनासाठी सरकारतर्फे प्राणी व पक्ष्यांसाठी अभयारण्ये घोषित केली गेली आहेत.

माळढोक पक्षी हा असाच एक नामशेष होण्याच्या मार्गावर असलेला दुर्मिळ पक्षी आहे. हा पक्षी गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, कर्नाटका, आंध्र प्रदेश व मध्य प्रदेश ह्या राज्यातील काही भागात आढळतो. संबधित राज्य सरकारांनी माळढोक पक्ष्यासाठी अभयारण्ये घोषित केली आहेत. ह्या दुर्मिळ व नामशेष होण्याचा मार्गावर असलेल्या माळढोक पक्ष्याचा संरक्षणासाठी व संवर्धनासाठी महाराष्ट्र शासनाने १९७९ मध्य माळढोक अभयारण्याची घोषणा केली.

Thursday 13 October 2022

आसामची आयर्न लेडी: संजूक्ता पराशर


हातात एके 47 घेऊन घनदाट जंगलात शिरल्यावर तब्बल 16 अतिरेक्यांना एक हाती यम सदनाला पाठवून आणखी 64 अतिरेक्यांना अटक करणाऱ्या संजूक्ता पराशरची कहाणी स्वतःला अबला समजणाऱ्या देशातील प्रत्येक स्त्रीला माहिती व्हायला पाहिजे. दिसायला गोरीपान आणि सुंदर अशी संजूक्ता जर कधी आपल्या समोरून गेली तर तिच्या अफाट कर्तृत्वाची आपण कल्पनाही करू शकणार नाही. एक सामान्य स्त्री लाखो सामान्य पुरुषांनाही जमणार नाही असं काम करते तेव्हा तिच्या कर्तृत्वाचे पोवाडे सोशल मीडियावर गायले जायला हवेत, पण आम्हाला राजकारण आणि जात, धर्मापलीकडेहि आणखी दुनिया आहे हेच मान्य नसतं. त्यामुळे संजूक्ता पराशरच्या फेसबुक पेजला लाखभरहि लाईक मिळत नाहीत आणि राजकारणी, सिनेनट मात्र करोडोंनी लाईक मिळवतात.

वरिष्ठ आयपीएस अधिकारी संजुक्ता पराशर यांना केंद्रीय गृहमंत्री पदक देऊन सन्मानित करण्यात आले आहे. पोलीस तपास करणार्‍यांना प्रशिक्षण देण्यात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे.  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याहस्ते त्यांना हे पदक देऊन सन्मानित केले. त्यांनी 2011 ते 2016 दरम्यान आसाममधील जोरहाट आणि सोनितपूर जिल्ह्यांमध्ये ULFA आणि NDFB अतिरेक्यांच्या विरोधात कारवाईचे नेतृत्व करण्यासाठी एसपी म्हणून काम केले.
संजुक्ता पराशर यांचा जन्म 3 ऑक्टोबर 1979 रोजी आसाममध्ये झाला.  त्यांनी दिल्लीच्या इंद्रप्रस्थ कॉलेजमधून राज्यशास्त्रात पदवी संपादन केली आहे.  त्यांनी जेएनयूमधून आंतरराष्ट्रीय संबंधात पदव्युत्तर पदवी घेतली आहे.  त्यांनी यूएस फॉरेन पॉलिसीमध्ये एमफिल आणि पीएचडी पदवी देखील घेतली आहे.
आसाम सारख्या मागासलेल्या राज्यात शाळेत शिकून नंतर दिल्लीच्या जेएनयु मधून डिग्री घेणारी संजूक्ता 2006 मध्ये आयपीएस देशात 85 क्रमांक घेऊन उत्तीर्ण झाली। युएस फॉरेन पॉलिसी विषयात तीने पीएचडी केल्यामुळे ती डॉक्टर संजूक्ता पराशर म्हणून ओळखली जाते. तिचं लग्न झालं तेही आयएएस अधिकारी पुरू गुप्तांशी. त्यांना 6 वर्षाचा मुलगा आहे. संजूक्ताची आई त्याला सांभाळते. संजूक्ताची पोस्टिंग 2014 मध्ये आसाम मधील सोनीतपुर जिल्ह्यात सुप्रिंटेंडंट ऑफ पोलीस म्हणून झाली आणि अग्निदिव्य म्हणजे काय ह्याची प्रचिती तिला रोजच घ्यावी लागली. बोडो अतिरेक्यांनी जिल्ह्यात धुमाकूळ घातला होता. शेकडो लोकांचे बळी गेले होते. आसामच्या घनदाट जंगलात शिरून त्यांच्याशी मुकाबला करणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण. हातात एके 47 घेऊन संजूक्ता सीआरपीएफ च्या जवानांना घेऊन जेव्हा घनदाट जंगलात शिरायची तेव्हा जवानानाही दहा हत्तीचं बळ मिळायचं. अनेक मोहिमा यशस्वी झाल्यामुळे अतिरिकेही संजूक्ताच्या नावाने कापू लागले होते. तिला पत्राद्वारे आणि फोनद्वारे धमक्या येऊ लागल्या होत्या. परंतु शिर तळ हातावर घेऊन फिरणाऱ्या संजूक्तावर कसलाच परिणाम झाला नाही. तब्बल 16 अतिरेकी मारले गेले आणि 64 अटक झाले, तेही तिच्या अवघ्या 18 महिन्यांच्या कारकीर्दीमध्ये. आसामची आयर्न लेडी म्हणून प्रसिद्ध आहे.
संजुक्ता पराशर यांना विभागात लेडी सिंघम म्हणूनही ओळखले जाते.  बोडो अतिरेक्यांविरुद्धच्या कारवाईत संजुक्ताचा मोठा वाटा होता.  आसामच्या जंगलात त्यांनी सीआरपीएफचे जवान आणि एके-47 वाहून नेणाऱ्या कमांडोचे नेतृत्व केले. पराशर सध्या दिल्लीतील नॅशनल इन्व्हेस्टिंग एजन्सीमध्ये उपमहानिरीक्षक (डीआयजी) म्हणून कार्यरत आहेत.  यापूर्वी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.  एनआयएमध्ये दहशतवादासह अनेक संवेदनशील प्रकरणे ती पाहते.  एनआयएमधील त्यांच्या कामाचे कौतुक होत आहे. आज संजूक्ता पराशर दिल्ली मध्ये कार्यरत आहे. देशातील दहशतवाद पूर्णपणे निपटून काढणं हेच तिचं ध्येय आहे.

Wednesday 28 September 2022

पाचवीच्या मुलांनी विरुद्धार्थी शब्द लिहा


इयत्ता- पाचवी विषय - मराठी

प्रश्न- विरुद्धार्थीशब्द लिहा

1) वरतीx खालती 2) लहान x मोठा 3) नंतर x आधी 4) पुढे x मागे 5) गार x गरम 6) काळा x पांढरा 7) कोरडे x ओले 8) प्रकाश x अंधार 9)ऊन x सावली 10) जवळ x दूर 11)आठवण x विस्मरण 12) आवडणे x नावडणे 13) बाहेर x आत 14) आता x नंतर 15) मोठा x छोटा 16) भरपूर x कमी 17) आनंद x दुःख 18) स्पष्ट x अस्पष्ट 19) मागचा x पुढचा 20) कमी x जास्त 21)ओले x कोरडे 22) फरक x साम्य 23) लांबी x रुंदी 24) सुंदर x कुरूप 25) ताजे x शिळे 26) डावा x उजवा 27) ये x जा 28) चांगला x वाईट 29) माहेर x सासर 30) राजा x रंक 31) उद्योगी x आळशी 32) सजीव x निर्जीव 33) शत्रू x मित्र 34) यशस्वी x अयशस्वी 35) हुशार x मठ्ठ 36) सावध x बेसावध 37) विष x अमृत 38) प्रश्न x उत्तर 39) प्रिय x अप्रिय 40) अधिक x उणे 41) कळत x नकळत 

Monday 26 September 2022

इयत्ता- पाचवी विषय -मराठी समानार्थी शब्द


इयत्ता- पाचवी विषय -मराठी

समानार्थी शब्द आपल्या वहीत लिहून काढा.

1)माय-आई 2) गहिरे -खोल 3) लेक-मुलगी 4)क्रीडा -खेळ 5) बळ-शक्ती 6) वडील-बाप 7)अरण्य-जंगल 8)नदी- सरिता 9)सुबक-सुंदर 10)आभाळ- आकाश 11) राघू -पोपट 12) निर्झर- झरा 13) घर - गृह 14) वेल- लता 15) सण -उत्सव 16) दिन - दिवस 17) ऐना -आरसा 18) पुस्तक -ग्रंथ 19) गोष्ट- कथा 20) पाखरू- पक्षी 21) जग -दुनिया, विश्व 22) विज्ञान - शास्त्र 23) संतोष - आनंद 24) सौदामिनी- वीज 25) पंकज - सरोज, कमळ 26) रजनी- यामिनी, निशा, रात्र 27) संग्राम- समर, युद्ध 28) सुमन - कुमुद, कुसुम, फुल 29) रवी - भास्कर, सूर्य 30) पाणी- जल, नीर  31) भूमी- धरती, भू 32) शेत - शिवार, वावर 33) रस्ता - वाट, मार्ग 34 ) तलाव - तळे, सरोवर 35) विसावा -निवारा, विश्रांती 36) गंध - सुवास 37) तन-शरीर 38) नाव- होडी, नौका 39) भार-वजन 40) वीर-शूर, पराक्रमी 41) दौलत -संपत्ती 42) आस, इच्छा 43) ध्यास- जिद्द 44) मोकाट- मोकळा 45) धीर -धैर्य 46) भटकंती- प्रवास, भ्रमंती 47) दबदबा -दरारा 48) सत्कार -सन्मान 49) कसूर- चूक 50) काठ - किनारा 51) समय- काळ, वेळ 52) वाहतूक- दळणवळण 53) बंधारा - बांध 54) तुफान - वादळ 55) वेदना- कळ, यातना 56) कर्ज -ऋण 57) थेट- सरळ 58) समर्थन - पाठींबा 59) प्रेरणा - स्फूर्ति 60) अनुयायी- शिष्य 61) तुरुंगवास - कैद 62) कार्य- काम 63) कवन- गाणे, गीत 64) भरारी- झेप, उड्डाण 65) कटुता - कडवटपणा, वैषम्य 66) स्वर- सूर 67) नाद - आवाज, ध्वनी 68) चाल -लय क्षुल्लक- मामुली 69) गाडणे -पुरणे 70) बेधुंद- बेभान 

Friday 23 September 2022

मध आवडीने खाणारा हनी बियर


 हा शांत आणि सुंदर दिसणारा प्राणी स्वभावाने खूप खेळकर आणि सतत उड्या मारणारा आहे. हनी बीअर्स आणि नाईट वॉकर म्हणून प्रसिद्ध असलेला किंकाजो हा सस्तन प्राणी आहे. किंकाजो हा ओलिंगो, कोटिस, रॅकून, रिंगटेल आणि कॅकोमिस्टल यांच्याशी संबंधित प्रोसीओनिडे कुटुंबातील उष्णकटिबंधीय रेनफॉरेस्ट प्राणी आहे. पोटोस वंशातील हा एकमेव सदस्य आहे आणि त्याला "मध अस्वल" म्हणून देखील ओळखले जाते.  त्यांच्या अनेक प्रजाती आहेत.  यापैकी काही पाळीव प्राणी आहेत.

यांचे शरीर साधारणपणे 16-25 इंच आणि शेपटी 15-20 इंच लांब असते.  वजन सुमारे 8 त्यांचे शरीर साधारणपणे 16-25 इंच आणि शेपटी 15-20 इंच लांब असते.  वजन सुमारे 8 पौंड असते.  डोळे आणि कान मोठे असतात.  त्यांच्या लहान पायांमध्ये पाच बोटे आहेत, ज्याला अणकुचीदार नखे असतात. अंग केसाळ असते.  वरच्या पृष्ठभागावर केस सोनेरी आणि आतील बाजूस तपकिरी असते.  ते समूहात राहण्यापेक्षा एकटे राहणे पसंत करतात.

हे प्रामुख्याने मध्य अमेरिका, मेक्सिको, दक्षिणपूर्व ब्राझीलमध्ये आढळतात.  हा निशाचर आहे आणि बहुतेक आपला वेळ दाट झाडांच्या सावलीत घालवतो.  त्याची शेपटी त्याला झाडावर चढण्यास मदत करते.  ते त्याच्या तिसऱ्या हातासारखे काम करते. हनी बियर संध्याकाळी दिवस मावळल्यानंतर ते मध्यरात्रीपर्यंत सर्वाधिक सक्रिय असतात.

हनी बियर सर्वभक्षी आहेत.  त्यांना फळे आणि मकरंद खायला खूप आवडतात.  मध आणि मकरंद यांच्या आवडीमुळे त्यांना हनी बियर म्हणतात.  गरज पडेल तेव्हा मुंग्या, अंडी आणि बेडूकही खातात.  असे म्हटले जाते की त्यांना स्ट्रॉबेरीची ऍलर्जी आहे, त्यांचे कमाल वय 20-25 वर्षे आहे.  हेएका वेळी एकाच पिलाला जन्म देतात.  यांचा गर्भधारणा कालावधी 12 ते 18 दिवसांचा असतो.यांची जीभ खूप लांब असते. जी सुमारे पाच इंच आहे.  या जिभेच्या मदतीने ही फळे आणि परागकण मोठ्या आवडीने खातात. अमेरिकेतील होनोलुलु प्राणीसंग्रहालयात राहणारी हनी बीयर सुमारे 40 वर्षे जगली असल्याचे सांगण्यात येते.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

Tuesday 23 August 2022

साखरेला पर्याय 'झायलीटॉल'


भारतातील गुवाहाटीतील आयआयटीतील संशोधकांनी साखरेला पर्याय शोधून काढला आहे. ऊस गाळपानंतर शिल्लक राहिलेल्या उसाच्या ‘बगॅस’पासून साखरेला ‘झायलीटॉल’ हा सुरक्षित पर्याय शोधला आहे. हा पदार्थ तयार करण्यासाठी संशोधकांनी अल्ट्रासाउंडच्या मदतीने किण्वन पद्धत विकसित केली आहे. हे संशोधन ‘बायोरिसोर्स टेक्नॉलॉजी’ आणि ‘अल्ट्रासोनिक्स सोनाकेमिस्ट्री’ या नियतकालिकांमध्ये प्रकाशित झाले आहे. यामुळे केवळ मधुमेहाच्या रुग्णांवरच नव्हे तर एकूणच आरोग्यावर होणाऱ्या साखरेच्या दुष्परिणामांबद्दल जागरूक असलेल्या लोकांनासुद्धा याचा फायदा होईल. 

संशोधक व्ही. एस.मोहोलकर म्हणतात की, नैसर्गिक पदार्थांपासून ‘झायलीटॉल’ हा साखरेला पर्याय ठरू शकणारा पदार्थ तयार केला आहे. या पदार्थामध्ये मधुमेहविरोधी, लठ्ठपणाविरोधी जीवाणू आहेत. त्याचप्रमाणे, पदार्थांत चांगल्या जीवाणूंचेही प्रमाण आहे. तो दातांचे झीज होण्यापासून रक्षण करतो. किण्वनाच्या पारंपरिक प्रक्रियेसाठी 48 तासांचा वेळ लागतो. मात्र, पदार्थाच्या निर्मितीवेळी किण्वन प्रक्रियेत अल्ट्रासाऊंडचा वापर केल्याने हा वेळ 15 तासांपर्यंत कमी झाला आहे. त्याचप्रमाणे, ‘झायलीटॉल’च्या उत्पादनातही 20 टक्के वाढ झाली आहे. संशोधकांनी किण्वन प्रक्रियेत अल्ट्रासाऊंडचा वापर केवळ दीड तासच केला. या प्रक्रियेत अल्ट्रासाऊंडचा फारसा वापर न केल्याने उसाच्या बगॅसपासून उत्पादन होणाऱ्या या पदार्थामुळे भारतातील उस उद्योगापुढे एकीकरणाची संधीही निर्माण होऊ शकते, असेही ते म्हणाले. मात्र, सध्या हे संशोधन प्रयोगशाळेपुरते मर्यादित असून या पदार्थाचे व्यावसायिक स्तरावर उत्पादन करताना आव्हानांचा सामना करावा लागू शकतो, असेही संशोधकांचे म्हणणे आहे.

रासायनिक प्रक्रियेद्वारे झायलीटॉल औद्योगिकरित्या तयार केले जाते. या प्रक्रियेत लाकडापासून मिळविलेले ‘डी झायलोज’ या रसायनाची उच्च तापमानाला निकेल या संप्रेरकाबरोबर उच्च तापमान व दाबाला प्रक्रिया केली. या प्रक्रियेत अधिक ऊर्जा लागते. त्यामुळे, केवळ ८ ते १५ टक्के डी झायलोजचे रुपांतर झायलिटॉलमध्ये झाले. त्याचप्रमाणे, झायलिटॉल स्वतंत्र करण्यासाठी ही प्रक्रिया किचकट असल्याने या पदार्थाची किंमत मात्र अधिक असणार आहे.

साखरेमुळे उष्मांकाचे अधिक सेवन झाल्याने वजन वाढते. यकृताचे आरोग्य बिघडू शकते. शरीरात साखरेची पातळी वाढल्याने मेंदूला पुरेसे ग्लुकोज मिळत नाही. त्यामुळे स्मरणशक्ती कमी होऊ शकते.साखरेमुळे युरिक ॲसिड वाढून संधिवाताचा त्रास उद्‌भवतो. 'उदरभरण नोहे, जाणिजे यज्ञकर्म' असे म्हटले जाते. भारतीय संस्कृतीत आहाराला यज्ञाची उपमा दिली आहे. जगण्यासाठी खा, खाण्यासाठी जगू नका, असेही आपल्या पूर्वजांनी सांगितले होते. मात्र, सध्याच्या युगात खा, प्या, मजा करा हाच मंत्र जपला जातो. साखर शरीराला आवश्‍यक असते, परंतु त्याचे अतिरिक्त सेवन केल्याने आरोग्याच्या अनेक समस्यांचा उद्‌भवू शकतात. त्यामुळे, केवळ गोड खाण्यावर भर देण्यापेक्षा पौष्टिक, संतुलित आहार घ्यावा. आहारात पालेभाज्या, कोशिंबिर, डाळी आदींचा समावेश असावा.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

Monday 15 August 2022

'विचारांच्या प्रदेशात' पुस्तकाला पत्रकार शिवराज काटकर यांची प्रस्तावना




जत तालुक्यातील मुक्त पत्रकार आणि शिक्षक श्री मच्छिंद्र ऐनापुरे यांचे 'विचारांच्या प्रदेशात' हे दहावे पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे. महाराष्ट्रातील विविध वृत्तपत्रांमध्ये प्रसंगानुरूप लेखन करण्याचा त्यांचा छंद ग्रंथरूप होऊन वाचकांच्यापर्यंत पोहोचतोय याचा आनंद आहे. सर्वसामान्य, तळागाळातील विद्यार्थ्यांपासून शिक्षक, पत्रकार, स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी, वक्तृत्व आणि निबंध स्पर्धांचे स्पर्धक, ख्यातकीर्त वक्ते, राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी अशा विविध स्तरातील आणि घटकातील लोक ऐनापुरे सरांच्या माहितीचा वापर आपली कामगिरी चांगली घडावी यासाठी करत आहेत यातच त्यांचे यश सामावलेले आहे. तरुण भारत, सकाळ, लोकमत, पुढारी, संचार, केसरी, महासत्ता, ललकार, संकेत टाइम्स या आपल्या भागातील वृत्तपत्रांच्या बरोबरच देशोन्नती, लोकशाही वार्ता, गावकरी या दूरच्या प्रदेशांबरोबरच लोकसत्ता, सामना या राज्यस्तरीय प्रमुख वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेख सातत्याने प्रसिद्ध होत असतात. ते लेख आवडल्याची वाचकांची पत्रे हे वृत्तपत्रातून अधून मधून वाचायला मिळतात. ऐनापुरे सर हे पत्रकार आणि शिक्षक अशी आपली दुहेरी भूमिका बजावत असल्याने त्यांना समाजाला नेमके काय हवे आहे याची चांगली जाण आहे. त्यामुळेच केवळ वृत्तपत्रांमध्ये लिहून आपल्या इच्छित वर्गापर्यंत पोहोचता येणार नाही याची त्यांना जाणीव आहे. त्यामुळेच छावा, छोट्यांचा छोटू, किशोर, मुलांचे मासिक,मार्मिक या नियतकालिकांमधून त्यांच्या बालकथा, शेती, सिनेमा, शिक्षण सामाजिक विषयावरील लेखन प्रकाशित होत असते. सुमारे दशक भरापूर्वी त्यांनी स्वतःचा ब्लॉग लिहिण्यास सुरुवात केली आणि आपले क्षेत्र अधिक व्यापक केले. 'विचारांच्या प्रदेशात' पूर्वी प्रकाशित झालेले त्यांचे नवे प्रकाशन 'सामान्यातील असामान्य' हे मला विशेष भावलेले पुस्तक आहे. या पुस्तकातून त्यांनी ज्या व्यक्तिरेखांची ओळख करून दिली ते जितके महत्त्वाचे कार्य करतात तेवढेच महत्त्वाचे कार्य मच्छिंद्र ऐनापुरे सर आपल्या लेखनातून करत आले आहेत. 'विचारांच्या प्रदेशात' या ग्रंथाची प्रेस कॉपी वाचताना माझ्या लक्षात आले की ऐनापुरे सरांनी अनेक महत्त्वाच्या विषयांना हात घातला आहे. पत्रकार म्हणून अशा वैविध्यपूर्ण विषयावर लेखन आणि चिंतन करण्याची गरज प्रत्येक पत्रकाराला भासत असते. वेगवेगळ्या क्षेत्रातील वाचकाला आपल्या मनातील विचार वृत्तपत्राच्या पानात शोधायचे असतात किंवा आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे तो वृत्तपत्रातील विविध स्तंभातून शोधत असतो. गोंधळलेल्या स्थितीतील समाजाला योग्य वेळी योग्य विचार आणि माहिती पोहोचवणे, त्यांची भूमिका स्पष्ट होण्यासाठी सहाय्यक ठरणे वृत्तपत्राचे काम असते. या कार्याद्वारे पत्रकार लोकशिक्षकाची भूमिका पार पाडत असतो. मच्छिंद्र ऐनापुरे हे या व्याख्येत बसणारे लोकशिक्षक आहेत. त्यांच्या लेखनातून समाजाविषयी तळमळ आणि लोकजागृतीची प्रेरणा नेहमीच दिसून आलेली आहे. आजच्या समाजासमोर असलेल्या अनेक प्रश्नांचा वापर त्यांनी 'विचारांच्या प्रदेशात' मध्ये केलेला आहे. जीवन जगण्याचा मार्ग, हिरोशिमाच्या इतिहासातील काळा दिवस, विभक्त कुटुंब संस्कृतीच्या निमित्ताने, डिजिटल अर्थव्यवस्था आणि पायाभूत सुविधा, महिलांवर होणारे सोशल मीडियावरील आभासी अत्याचार, गुन्हेगारीचा फास आपल्याला कुठे नेणार, विज्ञान क्षेत्रात भारत मागे का, दुरावत चाललेली नाती आणि बाजारीकरण, यापुढील काळात रोबोट जगात धुमाकूळ घालणार, भ्रष्टाचारात भारताचा संपूर्ण आशियामध्ये डंका, शैक्षणिक तंत्रज्ञान क्षेत्रात ग्रामीण भाग मागेच, लैंगिक असमानतेचे समांतर प्रश्न, यापुढे बसणार वारंवार चक्रीवादळाचा तडाखा, प्रदूषणामुळे भारतीयांच्या आयुष्यात घट हे यातील लेख मला विशेष करून आवडले. सध्याचे युग हे माहितीचे युग आहे असे म्हटले जाते आणि इंटरनेटवर माहितीचा कचरा प्रचंड प्रमाणात उपलब्ध आहे. एखाद्या विषयावर इंटरनेटवर माहिती घ्यायची ठरवले तर ती माहिती घेता घेता भलत्याच ठिकाणी जाऊन वाचक गुरफटून पडतो. आपल्याला नेमकी माहिती काय हवी होती हेच आणि आपण काय शोधत आहोत आपला वेळ किती वाया गेला? याचा विचार करून अनेकांना पश्चातापाची वेळ येते. त्यामुळे या माहितीच्या महाजालाचे जंजाळात रूपांतर होण्यापूर्वी सुयोग्य माहिती मिळवायचे असेल तर ऐनापुरे यांच्यासारख्या व्यक्तींनी जमा केलेली माहिती आपल्या कार्यासाठी उपयोगात आणणे आवश्यक ठरते. वाचकाला कोठेही न भरकटू देता त्या त्या विषयातील सखोल माहिती आणि आटोपशीर शब्दात देण्याचे काम ऐनापुरे सरांचे लेख करतात. एखादा विषय समजून सांगायचं असेल तर फार पल्हाळीक लिहिण्यापेक्षा परिपूर्ण माहिती सुयोग्य शब्दात जर उपलब्ध झाली तर वाचकांचा केवळ वेळच वाचतो असे नव्हे तर तो विषय समजावून घेणे आणि लक्षात ठेवणे त्यांच्यासाठी सोपे जाते. त्यामुळेच 'विचारांच्या प्रदेशात' कोठेही वाचकाला भरकटू न देता त्याला पोहोचायच्या ठिकाणी ऐनापुरे सर व्यवस्थित पोहोचवतात, याची अनुभूती वाचकांना आल्याशिवाय राहत नाही. या ग्रंथाचे कौतुक करतानाच आता ऐनापुरे यांच्याबाबतीत समाजाच्या आणि माझ्यासारख्या माहिती संकलित करून ठेवणाऱ्या एका पत्रकाराच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. आतापर्यंत सरांनी संकीर्ण स्वरूपात विपुल लेखन केलेले आहे. त्यांचे जवळपास 2000 हून अधिक लेख इंटरनेटवर उपलब्ध आहेत. मात्र आता अशा संकीर्ण कार्यातून सरांनी स्वतःला बाजूला केले पाहिजे. यापेक्षा व्यापक क्षेत्र त्यांची वाट पाहत आहे. एखाद्या विषयावर पुरेपूर माहिती देणारे आणि त्या विषयाचे सखोल ज्ञान उपलब्ध करून देणारे पुस्तक त्यांच्याकडून या पुढच्या काळात अपेक्षित आहे. सांगली जिल्ह्यातील अनेक शिक्षकांनी आपल्या व्यासंगातून अशा पद्धतीचे ग्रंथ मराठी सारस्वताला दिले आहेत. ती काळाची गरज आहे. वृत्तपत्रीय लिखाणाला एक मर्यादा असते त्या मर्यादांना पार करून कधी ना कधी समाजाची खरी गरज लक्षात घेऊन परिपूर्ण माहिती देणारे ग्रंथ वाचकांपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता आहे. तळागाळात काम करणाऱ्या शिक्षकांना, पत्रकारांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक अशा सर्वच प्रश्नांचे प्रत्यक्ष जनमानसावर काय परिणाम होत असतात याची जितकी माहिती असते तेवढी माहिती आकडेवारी आणि दुसऱ्याचा अनुभव ऐकून आपले मत ठरवणाऱ्या व्यक्तींकडे नसते. त्यामुळे मोठ्या मोठ्या व्यक्तींच्या विचारांना आणि ते सुचवत असलेल्या उपायांनाही मर्यादा पडतात. एखाद्या योजनेतील फोलपणा त्याच्या अंमलबजावणीतील त्रुटी किंवा समाजातील एखाद्या प्रथेची मूळ कारणे ती न हटण्यामागची सामाजिक स्थिती आणि प्रत्यक्ष कार्य करताना कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे याबाबतचे ज्ञान जितके 'ग्रास रूट'वर काम करणाऱ्या व्यक्तीला असते तितके समाजातील धुरिणांना सुद्धा असणे मुश्किल अर्थात त्याला काही मान्यवर अपवाद आहेतच. मात्र तरीही आपल्या ज्ञान आणि अनुभवाचा लाभ ऐनापुरे सरांच्या सारख्या विचारी व्यक्तिमत्त्वांनी समाजाला करून द्यायचा असेल तर एखाद्या विषयाला समोर ठेवून एक ग्रंथ अशा पद्धतीचे कार्य त्यांनी यापुढे करावे. त्यांना वाचक मान्यता तर मिळालेली आहेच, समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रातील वर्ग त्यांच्या विचारांकडे आस्थेने आणि उत्सुकतेने लक्ष देत असतो याचा विचार करून पुढचा ग्रंथ विचारांच्या प्रदेशाच्या पलीकडे अजून भरभरून देणारा होवो याच शुभेच्छा!

- शिवराज काटकर

विशेष प्रतिनिधी, तरुण भारत

Saturday 23 July 2022

आधुनिक बासरीचे जनक पन्नालाल घोष


पन्नालाल घोष यांना आधुनिक बासरीचे जनक मानले जाते.  बासरीसारखे लोकवाद्य त्यांनी शास्त्रीय वाद्य म्हणून प्रस्थापित केले.  त्यांच्या या प्रयत्नांमुळे आजच्या फ्युजन संगीतातही बासरीला महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे.  पन्नालाल घोष यांनीही अनेक चित्रपटांमध्ये बासरी वाजवली, जी आजही अद्वितीय मानली जाते.  'मुगल-ए- आझम', 'बसंत बहार', 'बसंत', 'दुहाई', 'अंजान', 'आंदोलन' अशा अनेक प्रसिद्ध चित्रपटांना त्यांनी संगीत दिले.त्यांचा जन्म 24 जुलै 1911 रोजी बांगलादेशातील बारिसाल येथे झाला.  त्यांचे खरे नाव अमल ज्योती घोष होते.  त्यांचे आजोबा हरिकुमार घोष आणि वडील अक्षयकुमार घोष हे कुशल संगीतकार होते.  त्यांची आई सुकुमारी या प्रसिद्ध गायिका होत्या.  त्यांचे प्रारंभिक शिक्षण त्यांचे वडील अक्षय कुमार घोष, एक प्रसिद्ध सितार वादक यांच्या देखरेखीखाली झाले.  पन्नालाल घोष यांनीही संगीताचे शिक्षण सतार वादनाने सुरू केले.  नंतर ते बासरीकडे आकर्षित झाले आणि त्यांनी उस्ताद अलाउद्दीन खान यांच्याकडून बासरीचे शिक्षण घेतले.  त्यांनी प्रख्यात हार्मोनियम वादक उस्ताद खुशी मोहम्मद खान यांच्याकडून दोन वर्षे संगीताचे प्रशिक्षण घेतले.

आपल्या कारकिर्दीत पन्नालाल घोष हे त्या काळातील गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर आणि काझी नजरुल इस्लाम या दोन महापुरुषांच्या प्रभावाखाली आले.  त्या वेळी, स्वातंत्र्य चळवळीत योगदान देण्याव्यतिरिक्त, त्यांनी बंगालमधील समकालीन संगीत आणि काव्यात पुनर्जागरण घडवण्याचे काम केले.त्यांनी बासरीमध्ये बदल करून ते लोक ते शास्त्रीय संगीताला साजेसे केले, त्याची लांबी आणि आकार (7 छिद्रांसह 32 इंच) यावर विशेष लक्ष दिले.  पन्नालाल घोष यांनी चंद्रमौली, दीपावली, जयंत, कुमारी, नुपूर-ध्वनी, पंचवटी, रत्न-पुष्पिका, शुक्लपलासी इत्यादी काही नवीन रागांची रचनाही केली होती.त्यांच्या प्रमुख शिष्यांमध्ये हरिप्रसाद चौरसिया, अमिनुर रहमान, फकीरचंद्र सामंत, सुधांशू चौधरी, पंडित रासबिहारी देसाई, बीजी कर्नाड, चंद्रकांत जोशी, मोहन नाडकर्णी, निरंजन हळदीपूर इत्यादींची नावे ठळकपणे पुढे येतात. कलकत्त्यात न्यू थिएटर्स लिमिटेडमध्ये काम करत असताना संगीत निर्मितीमध्ये सहाय्य केल्यानंतर ते 1940 मध्ये त्यांची संगीत कारकीर्द पुढे नेण्यासाठी मुंबईत आले.  'स्नेह बंधन' (1940) चित्रपटात स्वतंत्र संगीतकार म्हणून योगदान दिले.

खान मस्तान आणि बिब्बो यांनी गायलेली 'आबरू के काम में' आणि 'स्नेह बंधन में बांधी' ही चित्रपटातील लोकप्रिय गाणी त्यांनी संगीतबद्ध केली होती.  पन्नालाल घोष यांनी 1952 मध्ये उस्ताद अली अकबर खान आणि पंडित रविशंकर यांच्यासोबत संयुक्तपणे 'आंधियां' चित्रपटाची पार्श्वभूमी तयार केली.  सात छिद्रे असलेली बासरी त्यांनी सर्वप्रथम सादर केली.  तीक्ष्ण-मध्यम छिद्र म्हणून ओळखले जाणारे हे नवीन छिद्र बासरीच्या तळाशी, बोटाच्या छिद्राच्या मध्य रेषेपासून दूर ठेवलेले आहे.  करंगळीला या छिद्रापर्यंत पोहोचता यावे यासाठी पकड देखील बदलण्यात आली.दरबारी सारख्या रागांसाठी जेथे खालच्या सप्तकांचा (मंद्र सप्तक) तपशीलवार शोध घेतला जातो.  पन्नालाल घोष यांनी आणखी एका बांबूच्या बासरीचा शोध लावला, ज्याची लांबी 40-42 इंच होती.  या अतिरिक्त छिद्रामुळे भारतीय बासरी जवळजवळ पाश्चात्य रेकॉर्डर्सप्रमाणे वाजवता येते, फक्त एक अतिरिक्त मागील छिद्र, मुखपत्राच्या दिशेने वर ठेवले जाते, जे डाव्या अंगठ्याजवळ असते.  त्यांनी डिझाइन केलेली लांब बांबूची बासरी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतासाठी नंतरच्या बासरीवादकांनी लोकप्रिय केली आहे. त्यांचा मृत्यू  20 एप्रिल 1960 रोजी नवी दिल्ली येथे झाला.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

Monday 18 July 2022

चलन आणि धरण

 


1. अमेरिकेचे चलन कोणते?

उत्तर-यूएस डॉलर

2. उरुग्वेचे चलन कोणते? 

उत्तर-उरुग्वे पेसो

3. उझबेकीस्तान चलन कोणते? 

उत्तर-उझबिकिस्थानी  सम

4. व्हेनेझुएलाचे चलन कोणते? 

उत्तर-बोलिवार

5. येमेनचे चलन कोणते? 

उत्तर-रियाल 

6. झांबियाचे चलन कोणते? 

उत्तर-क्वाचा

7. व्हिएतनामचे चलन कोणते? 

उत्तर-डाँग 

8. कोसोबोचे चलन कोणते? 

उत्तर-युरो

वाढवा सामान्य ज्ञान

1. मोरोक्कोचे चलन कोणते?

उत्तर-दिराम

2. नायजेरियाचे चलन कोणते? 

उत्तर-नैरा

3. नॉर्वचे चलन कोणते?

उत्तर-क्रोन 

4. फिलिपिन्सचे चलन कोणते? 

उत्तर-पेसो

5. पोलंडचे चलन कोणते?

उत्तर-झ्लोटी

6. कतारचे चळन कोणते?

उत्तर-कतारी रियाल

7. रशियाचे चलन कोणते?

उत्तर-रुबल

8. सौदी अरेबियाचे चलन कोणते? 

उत्तर-रियाल

1.भंडारदरा धरण कोणत्या नदीवर आहे? ते कोणत्या जिल्ह्यात आहे? 

उत्तर- प्रवरा (नगर)

2. जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? ते कोणत्या जिल्ह्यात आहे? 

उत्तर-गोदावरी (औरंगाबाद)

3. सिद्धेश्वर धरण कोणत्या नदीवर आहे? ते कोणत्या जिल्ह्यात आहे?

उत्तर-दक्षिणपूर्णा (हिंगोली)

4. भाटघर धरण कोणत्या नदीवर आहे? ते कोणत्या जिल्ह्यात आहे?

उत्तर-येळवंडी (पुणे)

5. मोडकसागर धरण कोणत्या नदीवर आहे? ते कोणत्या जिल्ह्यात आहे? 

उत्तर-वैतरणा (ठाणे)

6. मुळशी धरण कोणत्या नदीवर आहे? ते कोणत्या जिल्ह्यात आहे?

उत्तर-मुळा (पुणे)

7. तोतलाडोह धरण कोणत्या नदीवर आहे? ते कोणत्या जिल्ह्यात आहे? 

उत्तर-पेंच (नागपूर(

8. वीर धरण कोणत्या नदीवर आहे? ते कोणत्या जिल्ह्यात आहे? 

उत्तर-नीरा (पुणे)


Thursday 14 July 2022

कोणत्या देशाचे कोणते चलन वापरात आहे?


वाढवा सामान्य ज्ञान

1. अफगाणिस्तानचे चलन कोणते?

उत्तर-अफगाणी

2. अर्जेटिनाचे चलन कोणते? 

उत्तर-पेसो

3. बांगलादेशचे चलन कोणते?

उत्तर-टका

4. चीनचे चलन कोणते?

उत्तर-युआन

5. हंगेरीचे चलन कोणते?

उत्तर-फॉरींट

6. इराणचे चलन कोणते? 

उत्तर-रियाल

7. लिथुआनियाचे चलन कोणते?

उत्तर-लिटास

8. स्वीडनचे चलन कोणते? 

उत्तर-क्रोना 

9. अल्बानियाचे चलन कोणते?

उत्तर-लेक

10. अल्जेरियाचे चलन कोणते?

उत्तर-दिनार

11. भूतानचे चलन कोणते? 

उत्तर-गुलट्रम

12. ब्राझिलचे चलन कोणते? 

उत्तर-रिअल

13. कंबोडियाचे चलन कोणते?

उत्तर-रिएल

14. झिंबाब्वेचे चलन कोणते?

उत्तर-अमेरिकी डॉलर

15. इजिप्तचे चलन कोणते? 

उत्तर-इजिप्शियन पौंड

16. जॉर्जियाचे चलन कोणते? 

उत्तर-लारी

17.घानाचे चलन कोणते? 

उत्तर-सेडी

18.इराकचे चलन कोणते? 

उत्तर-इराकी दिनार

19. इस्त्राईलचे चलन कोणते?

उत्तर-शेकेल

20. जपानचे चलन कोणते? 

उत्तर-येन

21. कझाकिस्तानचे चलन कोणते? 

उत्तर-टेंगे

22. मेसेडोनियाचे चळन कोणते?

उत्तर-दिनार

23. मलेशियाचे चलन कोणते? 

उत्तर- रिंगिट

24. मंगोलियाचे चलन कोणते? 

उत्तर-टोग्रोन


Monday 11 July 2022

धार्मिक समन्वय: इयत्ता सहावी व स्पर्धा स्पर्धेसाठी उपयुक्त

 


1.भारतीय समाजाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य कोणते?

उत्तर- भाषा आणि धर्म यांची विविधता हे भारतीय समाजाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.

2.भारतीय संविधानाने कोणते तत्त्व स्वीकारले आहे?

उत्तर- भारतीय संविधानाने सर्वधर्मसमभावाचे तत्त्व स्वीकारले आहे?

3.दक्षिण भारतात कोणत्या भक्ती चळवळी उदयास आल्या?

उत्तर- दक्षिण भारतात नायनार आणि अळवार या  भक्ती चळवळी उदयास आल्या.

4.दक्षिण भारतात कोणी भक्ती चळवळीचा पाया भक्कम केला?

उत्तर- दक्षिण भारतात रामानुज यांनी भक्ती चळवळीचा पाया भक्कम केला?

5.उत्तर भारतात कोणत्या संताने भक्तीचे महत्त्व सांगितले?

उत्तर- उत्तर भारतात संत रामानंद यांनी भक्तीचे महत्त्व सांगितले.

6.भक्ती चळवळीतील एक विख्यात संत कोण?

उत्तर- संत कबीर हे भक्ती चळवळीतील एक विख्यात संत होत.

7.सर्व मानव एक आहेत, अशी शिकवण कोणत्या संताने दिली?

उत्तर- सर्व मानव एक आहेत, अशी शिकवण संत कबीर यांनी दिली.

8.बंगालमध्ये कोणत्या संताने कृष्णभक्तीचे महत्त्व सांगितले?

उत्तर- बंगालमध्ये चैतन्य महाप्रभू यांनी कृष्णभक्तीचे महत्त्व सांगितले?

9.आसाममध्ये कृष्णा भक्तीचा प्रसार कोणी केला?

उत्तर- आसाममध्ये संत शंकरदेव यांनी कृष्णभक्तीचा प्रसार केला.

10. गुजरातमध्ये कोणते प्रसिध्द वैष्णव संत होऊन गेले?

उत्तर-गुजरातमध्ये संत नरसी मेहता हे प्रसिध्द वैष्णव संत होऊन गेले.

11.संत मीराबाईंनी कोणाचा महिमा सांगितला?

उत्तर- संत मीराबाईंनी कृष्णभक्तीचा महिमा सांगितला.

12.राजघराण्यातील सुखांचा त्याग करून कृष्णभक्तीत तल्लीन झालेल्या संत कोणत्या?

उत्तर- राजघराण्यातील सुखांचा त्याग करून कृष्णभक्तीत तल्लीन झालेल्या संत मीराबाई होत.

13.मीराबाई यांची भक्तिगीते कोणकोणता संदेश देणारी आहेत?

उत्तर- मीराबाई यांची भक्तिगीते भक्ती, सहिष्णुता व मानवता यांचा संदेश देणारी आहेत.

14. संत रोहिदास यांनी कोणता संदेश दिला?

उत्तर-संत रोहिदास यांनी समतेचा आणि मानवतेचा संदेश दिला.

15.हिंदी साहित्यातील महाकवी सूरदास यांनी कोणते काव्य लिहिले?

उत्तर- हिंदी साहित्यातील महाकवी सूरदास यांनी सुरसागर हे काव्य लिहिले.

16. कोणी लिहिलेली कृष्णभक्तीची गीते रसाळ आहेत?

उत्तर- मुस्लिम संत रसखान यांनी लिहिलेली कृष्णभक्तीची गीते रसाळ आहेत.

17. संत तुलसीदासांच्या कोणत्या ग्रंथात रामभक्तीचा सुंदर आविष्कार झालेला आढळतो?

उत्तर- संत तुलसीदासांच्या रामचरितमानस या ग्रंथात रामभक्तीचा सुंदर आविष्कार झालेला आढळतो.

18. कर्नाटकात महात्मा बसवेश्वरांनी कोणत्या विचारधारेचा प्रसार केला?

उत्तर- कर्नाटकात महात्मा बसवेश्वरांनी लिंगायत विचारधारेचा प्रसार केला.

19.संत बसवेश्वर यांचे कोणते वचन प्रसिद्ध आहे?

उत्तर- संत बसवेश्वर यांचे 'कायकवे कैलास'  हे वचन प्रसिद्ध आहे?

20.तेराव्या शतकात चक्रधरस्वामींनी महाराष्ट्रात कोणता पंथ प्रवर्तित केला?

उत्तर-तेराव्या शतकात चक्रधरस्वामींनी महाराष्ट्रात 'महानुभाव' पंथ प्रवर्तित केला?

21.चक्रधरस्वामी यांचे गुरू कोण?

उत्तर- श्रीगोविंदप्रभू हे चक्रधरस्वामी यांचे गुरू होत.

22.महानुभाव पंथाचा प्रसार प्रामुख्याने कोणत्या भागात झाला?

उत्तर-महानुभाव पंथाचा प्रसार प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाडा या भागात झाला.

23.म्हाइंभट यांनी संपादित केलेला चक्रधरांच्या लिळांचे वर्णन करणारा ग्रंथ कोणता?

उत्तर-म्हाइंभट यांनी संपादित केलेला चक्रधरांच्या लिळांचे वर्णन करणारा ग्रंथ लीळाचरित्र.

24.शीख धर्माचे संस्थापक आणि पाहिले गुरू कोण?

उत्तर-शीख धर्माचे संस्थापक आणि पाहिले गुरू गुरुनानक होत.

25.गुरुनानक यांची शिकवण कोणती होती?

उत्तर- सर्वांशी सारखेपणाने वागावे,अशी गुरुनानक यांची शिकवण होती.

26.शिखांचा पवित्र ग्रंथ कोणता?

उत्तर- 'गुरुग्रंथसाहिब' हा शिखांचा पवित्र ग्रंथ होय.

27.गुरुग्रंथसाहिब' या ग्रंथामध्ये कोणकोणत्या संतांच्या रचनांचा समावेश आहे?

उत्तर-गुरुग्रंथसाहिब' या ग्रंथामध्ये गुरुनानक, संत नामदेव, संत कबीर इत्यादी संतांच्या रचनांचा समावेश आहे.

28.शिखांचे दहावे गुरू कोण?

उत्तर- गुरू गोविंद सिंग हे शिखांचे दहावे गुरू होत.

29.परमेश्वर प्रेममय आहे.प्रेम व भक्ती या मार्गांनीच परमेश्वरापर्यंत पोहचता येते अशी कोणत्या साधूंची श्रद्धा होती?

उत्तर-परमेश्वर प्रेममय आहे.प्रेम व भक्ती या मार्गांनीच परमेश्वरापर्यंत पोहचता येते अशी सुफी साधूंची श्रद्धा होती.

30.भारतीय संगीतात कोणत्या संगीत परंपरेने मोलाची भर घातली आहे?

उत्तर-भारतीय संगीतात सुफी संगीत परंपरेने मोलाची भर घातली आहे?

(इयत्ता सहावी आणि स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त: इयत्ता सहावी इतिहास व नागरिकशास्त्र-3 धार्मिक समन्वय पाठ)

Sunday 10 July 2022

दुधवा धरण कोणत्या नदीवर आहे आणि ते कोणत्या राज्यात आहे?


1. उडुक्की धरण कोणत्या नदीवर आहे? ते कोणत्या राज्यात आहे?

उत्तर-पेरियार(केरळ)

2. तेनुधाट धरण कोणत्या नदीवर आहे? ते कोणत्या राज्यात आहे?

उत्तर-दामोदर (झारखंड)

3. कृष्णार्जुनसागर धरण कोणत्या नदीवर आहे? ते कोणत्या राज्यात आहे?

उत्तर-कावेरी (कर्नाटक)

4. गांधीसागर धरण कोणत्या नदीवर आहे? ते कोणत्या राज्यात आहे? चंबळ (मध्य प्रदेश)

5. सिंगूर धरण कोणत्या नदीवर आहे? ते कोणत्या राज्यात आहे? 

उत्तर- मंजिरा (तेलंगणा)

6. ओंकारेश्वर धरण कोणत्या नदीवर आहे? ते कोणत्या राज्यात आहे? 

उत्तर- नर्मदा (मध्य प्रदेश)

7. दुधवा धरण कोणत्या नदीवर आहे आणि ते कोणत्या राज्यात आहे? 

उत्तर-महानदी (छत्तीसगड)

8. सुपा धरण कोणत्या नदीवर आहे आणि ते कोणत्या राज्यात आहे? 

उत्तर-कालीनदी (कर्नाटक)

9. रेंगाली धरण कोणत्या नदीवर आहे आणि ते कोणत्या राज्यात आहे? 

उत्तर-ब्राह्मणी (ओडिशा)

10. पिल्लूर धरण कोणत्या नदीवर आहे आणि ते कोणत्या राज्यात आहे? 

उत्तर-भवानी (तामिळनाडू)

11. श्रीरामसागर धरण कोणत्या नदीवर आहे आणि ते कोणत्या राज्यात आहे? 

उत्तर-गोदावरी (तेलंगण)

12. लखवार धरण कोणत्या नदीवर आहे आणि ते कोणत्या राज्यात आहे? 

उत्तर-यमुना (उत्तराखंड)

13.मानवातील संभाषण कला कशामुळे विकसित झाली?

उत्तर-स्वरयंत्र

14. जागतिक पातळीवर सर्वाधिक तांदूळ उत्पादन करणारा देश कोणता ?

उत्तर- चीन

15. 2011 चा 'साहित्य अकादमी पुरस्कार' कोणाला देण्यात आला ?

उत्तर-कवि ग्रेस

16. सध्या मालमत्तेचा हक्क हा कोणता अधिकार आहे?

उत्तर- कायदेशीर अधिकार

17.लोकसभेवर व राज्यसभेवर महाराष्ट्रातून अनुक्रमे किती प्रतिनिधी निवडले जातात?

उत्तर- 48 व 19

18. 'श्यामची आई' नंतरचा राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त मराठी चित्रपट कोणता?

उत्तर- श्वास

19. महाराष्ट्रातील सर्वांत मोठी नदी कोणती?

उत्तर- गोदावरी

20. महाभारतातील युद्ध कोठे लढले गेले?

उत्तर- कुरुक्षेत्र

21. जर पंचायत विसर्जित झाली तर निवडणुका किती महिन्याच्या आत झाल्या पाहिजेत?

उत्तर- 6 महिन्यात

22. संयुक्त अरब अमिरातीच्या राजधानीचे नाव काय?

उत्तर-अबू धाबी

23. तुर्कस्तानच्या राजधानीचे नाव काय?

उत्तर- अंकारा

24. व्हिएतनामच्या राजधानीचे नाव काय? 

उत्तर-हनोई

25. इथिओपियाच्या राजधानीचे नाव काय?

उत्तर-अदिस अबाबा

26. भूतानच्या राजधानीचे नाव काय? 

उत्तर-थिंफू

27. ऑस्ट्रियाच्या राजधानीचे नाव काय? 

उत्तर-व्हिएन्ना 


Saturday 9 July 2022

वेदनांचा चित्रकार गुरुदत्त


त्यांचे खरे नाव वसंत कुमार शिवशंकर पदुकोण.  त्यांचा जन्म 9 जुलै 1925 रोजी बंगळुरूमध्ये झाला, पण बंगाली संस्कृतीशी ते इतके जोडले गेले की त्यांनी आपले नाव बदलून गुरुदत्त ठेवले. पन्नासच्या दशकातील लोकप्रिय सिनेमांच्या संदर्भात सांगायचं म्हटल्यास गुरुदत्त यांनी या काळात काव्यात्मक आणि कलात्मक चित्रपटांचा व्यावसायिक ट्रेंड विकसित केला होता.  2010 मध्ये त्यांचे नाव सीएनएनच्या पंचवीस आशियाई अभिनेत्यांच्या यादीत समाविष्ट झाले.गुरुदत्त यांचे बालपण कोलकाता येथील भवानीपूर भागात गेले, ज्याचा त्यांच्यावर बौद्धिक आणि सांस्कृतिक प्रभाव पडला.  त्यांचे बालपण आर्थिक अडचणीत गेले.  गुरुदत्त सोळा वर्षांचे असताना 1941 मध्ये पाच वर्षांसाठी पंच्याहत्तर रुपयांच्या वार्षिक शिष्यवृत्तीवर अल्मोडा येथे गेले आणि तिथे  त्यांनी नृत्य, नाटक आणि संगीताचे धडे घेण्यास सुरुवात केली.

1944 मध्ये दुसऱ्या महायुद्धामुळे उदय शंकर इंडिया कल्चर सेंटर  बंद झाले तेव्हा गुरुदत्त घरी परतले.  आर्थिक अडचणींमुळे त्यांना शालेय शिक्षण घेता आले नसले तरी रविशंकर यांचे थोरले बंधू उदय शंकर यांच्या सहवासात राहून त्यांनी कला आणि संगीताचे अनेक धडे आत्मसात केले.  हे धडे नंतर त्यांना कलात्मक चित्रपटांच्या निर्मितीसाठी उपयुक्त ठरले. त्यांच्या काकांनी त्यांना प्रभात फिल्म कंपनी, पुणे येथे चित्रपटात काम करण्यासाठी तीन वर्षांच्या करारावर पाठवले.  त्याच वेळी प्रसिद्ध चित्रपट निर्माते व्ही. शांताराम यांनी त्यांचा कला मंदिर नावाचा स्टुडिओ उभा केला होता.  पुण्यामध्ये पहिल्यांदा त्यांना 1944 मध्ये 'चांद' नावाच्या चित्रपटात श्रीकृष्णाची छोटीशी भूमिका मिळाली.  1945 मध्ये अभिनयासोबतच त्यांनी चित्रपट दिग्दर्शक विश्राम बेडेकर यांच्याकडे सहाय्यक म्हणूनही काम पाहिले.

1946 मध्ये त्यांनी आणखी एक सहाय्यक दिग्दर्शक पीएल संतोषी यांच्या 'हम एक हैं' या चित्रपटासाठी नृत्य दिग्दर्शनाचे काम केले. तो करार 1947 मध्ये संपला.  सुमारे दहा महिने गुरूदत्त त्यांच्या कुटुंबासह मुंबईतील माटुंगा येथे बेरोजगारीच्या अवस्थेत राहत होते.  या काळात त्यांनी इंग्रजीमध्ये लिहिण्याचा सराव केला आणि 'इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया' या स्थानिक इंग्रजी साप्ताहिक नियतकालिकेसाठी लघुकथा लिहिण्यास सुरुवात केली. संघर्षाच्या त्या दिवसांतच त्यांनी 'प्यासा' चित्रपटाची पटकथा जवळजवळ आत्मचरित्रात्मक शैलीत लिहिली.  मुळात पटकथा 'कशमकश' नावाने लिहिली गेली होती.  गुरुदत्त यांना प्रभात फिल्म कंपनीने कोरिओग्राफर म्हणून नियुक्त केले होते, परंतु लवकरच त्यांना अभिनेता म्हणून काम करण्यास भाग पाडले गेले. त्यांना सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही घेतले होते.  प्रभातमध्ये काम करत असताना त्यांची देव आनंद आणि रहमान यांच्याशी घट्ट मैत्री झाली, जे नंतर चांगले स्टार म्हणून प्रसिद्ध झाले.  त्यांच्या मैत्रीमुळे गुरू दत्त यांना चित्रपट जगतात आपले स्थान निर्माण करण्यात खूप मदत झाली.  1947 मध्ये प्रभात अयशस्वी झाल्यानंतर गुरुदत्त मुंबईत आले.

तेथे त्यांनी अमिया चक्रवर्ती आणि ज्ञान मुखर्जी या त्यांच्या काळातील दोन प्रसिद्ध दिग्दर्शकांसोबत काम केले.  अमिया चक्रवर्तीच्या 'गर्ल्स स्कूल' चित्रपटात आणि बॉम्बे टॉकीजच्या 'संग्राम' चित्रपटात ज्ञान मुखर्जीसोबत काम केले.  त्यानंतर देव आनंद यांनी त्यांना त्यांच्या नवीन कंपनी नवकेतनमध्ये दिग्दर्शक म्हणून संधी दिली, पण दुर्दैवाने हा चित्रपट अयशस्वी झाला.अशाप्रकारे गुरु दत्त दिग्दर्शित पहिला चित्रपट नवकेतनच्या बॅनरखालील 1951 मध्ये प्रदर्शित झालेला 'बाजी' होता.  1957 मध्ये त्यांचा 'प्यासा' चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्यांनी निर्माता,दिग्दर्शक आणि अभिनेता अशी तिहेरी कामगिरी  प्रभावीपणे पार पाडली होती. मात्र यश एकट्या गुरुदत्तचं नव्हतं. सुहागन, भरोसा, साहिब बीवी और गुलाम, चौदहवीं का चांद, काला बाजार, कागज के फूल, प्यासा, मिस्टर अँड मिसेस 55, आरपार, हम एक हैं हे त्यांचे प्रमुख चित्रपट आहेत.  त्यांचा 'प्यासा' चित्रपटाने टाईम मासिकाच्या जगातील 100 सर्वोत्कृष्ट सार्वकालिक चित्रपटांमध्ये स्थान मिळवले आहे. गुरुदत्त यांनी 10 ऑक्टोबर 1964 रोजी या जगाचा निरोप घेतला.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


Thursday 7 July 2022

कोणत्या नदीवर कोणते धरण बांधण्यात आले आहे?


वाढवा सामान्य ज्ञान

1. हिरकुड धरण कोणत्या नदीवर आहे? आणि ते कोणत्या राज्यात आहे? 

उत्तर- महानदी (ओडिशा)

2. भाकरानांगळ धरण कोणत्या नदीवर आहे? आणि ते कोणत्या राज्यात आहे? 

उत्तर- सतलज (हिमाचल प्रदेश)

३. टेहरी धरण कोणत्या नदीवर आहे? आणि ते कोणत्या राज्यात आहे?

उत्तर- भागीरथी (उत्तराखंड)

4. नागार्जुन सागर धरण कोणत्या नदीवर आहे? आणि ते कोणत्या राज्यात आहे? 

उत्तर- कृष्णा (आंध्रप्रदेश)

5. पोलावरम धरण कोणत्या नदीवर आहे? आणि ते कोणत्या राज्यात आहे? 

उत्तर- गोदावरी (आंध्रप्रदेश)

6. आलमट्टी धरण कोणत्या नदीवर आहे? आणि ते कोणत्या राज्यात आहे? 

उत्तर- कृष्णा (कर्नाटक)

7. भवानीसागर धरण कोणत्या नदीवर आहे आणि ते कोणत्या राज्यात आहे ? 

उत्तर- भवानी (तामिळनाडू)

8.. बिसलपूर धरण कोणत्या नदीवर आहे आणि ते कोणत्या राज्यात आहे ? 

उत्तर- बनास (राजस्थान)

9.मेटटूर धरण कोणत्या नदीवर आहे आणि ते कोणत्या राज्यात आहे ?

उत्तर- कावेरी (तामिळनाडू)

10. इंदिरासागर धरण कोणत्या नदीवर आहे आणि ते कोणत्या राज्यात आहे ? 

उत्तर- नर्मदा (मध्यप्रदेश)

11.चेरूथोनी धरण कोणत्या नदीवर आहे आणि ते कोणत्या राज्यात आहे ? 

उत्तर- चेरुथोनी (केरळ)

12.सरदार सरोवर धरण कोणत्या नदीवर आहे आणि ते कोणत्या राज्यात आहे ? 

उत्तर- नर्मदा (गुजरात)

13. तुंगभद्रा धरण कोणत्या नदीवर आहे? आणि ते कोणत्या राज्यात आहे?

उत्तर-तुंगभद्रा (कर्नाटक)

 14. चमेरा धरण कोणत्या नदीवर आहे? आणि ते कोणत्या राज्यात आहे? 

उत्तर-रावी (हिमाचल प्रदेश)

15. मुल्लापेरियार धरण कोणत्या नदीवर आहे? आणि ते कोणत्या राज्यात आहे? 

उत्तर-पेरियार (केरळ)

16. राणाप्रताप सागर धरण कोणत्या नदीवर आहे? आणि ते कोणत्या राज्यात आहे? 

उत्तर-चंबळ (राजस्थान)

17. कोटेश्वर धरण कोणत्या नदीवर आहे? आणि ते कोणत्या राज्यात आहे? 

उत्तर- भागीरथी (उत्तराखंड)

18. हिडकल धरण कोणत्या नदीवर आहे? आणि ते कोणत्या राज्यात आहे? 

उत्तर- घटप्रभा (कर्नाटक)

19. 1819 मध्ये सत्यशोधक समाजाच्या सासवड येथील परिषदेच्या अध्यक्षपदी कोण होतं?

उत्तर : नारायण मेघाजी लोखंडे

20. जिल्हा परिषदेकडे कामाचे एकूण किती विषय आहेत?

उत्तर- 128

21. भारताच्या चौथ्या औद्योगिक धोरणात कशाला प्राधान्य होतं?

उत्तर- रोजगार निर्मितीला

22. रायगड जिल्ह्यातील पक्षी अभयारण्याचं नाव काय?

उत्तर-कर्नाळा

     

Wednesday 6 July 2022

कसदार अभिनेता : संजीव कुमार


त्यांचे मूळ नाव हरिभाई जरीवाला होते.  चित्रपट जगताच्या आकाशगंगेतील असा एक ध्रुव तारा म्हणून त्यांची आठवण काढली जाते, ज्यांच्या अतुलनीय अभिनयाने बॉलिवूडला त्यांच्या चित्रपटांच्या प्रकाशाने सदैव चमकवत राहते.  लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती.  याच छंदाने त्यांना त्यांच्या वडिलोपार्जित राहत्या सुरत येथून मायानगरी मुंबईत ओढले. चित्रपटसृष्टीत आल्यावर ते संजीव कुमार झाले.  आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात ते प्रथम थिएटरमध्ये सामील झाले, नंतर ते फिल्मालयाच्या अभिनय शाळेत दाखल झाले.  याच दरम्यान 1960 मध्ये त्यांना  फिल्मालय बॅनरच्या ‘हम हिंदुस्तानी’ या चित्रपटात छोटी भूमिका साकारण्याची संधी मिळाली.  त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.  एकापाठोपाठ एक चित्रपटांमधील आपल्या उत्कृष्ट अभिनयाने ते प्रसिद्ध चित्रपट अभिनेता बनले.

संजीव कुमार यांनी वयाच्या विसाव्या वर्षी एका म्हातार्‍याचा इतका जीवंत अभिनय केला की पृथ्वीराज कपूरही ते पाहून थक्क झाले.  'संघर्ष' चित्रपटातील दिलीप कुमार यांच्या मृत्यूचे दृश्य इतके नेत्रदीपक होते की खुद्द दिलीप कुमार यांनाही धक्का बसला. दिलीपकुमारबरोबर काम करताना संजीवकुमार यांनी दडपण न घेता केलेल्या अभिनयाचा ठसा उमटला; त्यामुळे दिलीपकुमारपासून बलराज सहानींपर्यंत अनेकांच्या कौतुकाचा ते धनी झाले. स्टार कलाकार झाल्यानंतरही त्यांनी कधीच नखरे केले नाहीत. जेव्हा लेखक सलीम खान यांनी त्यांना 'त्रिशूल'मध्ये त्यांचे समकालीन अमिताभ बच्चन आणि शशी कपूर यांच्या वडिलांची भूमिका करण्याची विनंती केली, तेव्हा त्यांनी ती सहज स्वीकारली आणि ही भूमिका इतकी चमकदारपणे साकारली की त्यांनाच मध्यवर्ती पात्र म्हणून स्वीकारले गेले.

1960 ते 1968 पर्यंत संजीव कुमार यांनी चित्रपटसृष्टीत आपले स्थान निर्माण करण्यासाठी संघर्ष केला.  त्यानंतर 1968 मध्ये आलेल्या 'शिकार' चित्रपटात ते पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसले.  हा चित्रपट पूर्णपणे अभिनेता धर्मेंद्रवर केंद्रित होता, तरीही संजीव कुमार यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडण्यात यशस्वी झाले.या चित्रपटातील दमदार अभिनयासाठी त्यांना सहाय्यक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला.  त्याच वर्षी प्रदर्शित झालेल्या 'संघर्ष' या चित्रपटात ते हिंदी चित्रपट जगतातील अभिनय सम्राट दिलीप कुमार यांच्या समोर होते, पण संजीव कुमार यांनी छोट्या भूमिकेतही प्रेक्षकांच्या टाळ्या लुटल्या.  यानंतर संजीव कुमार यांनी 'आशीर्वाद', 'राजा और रँक', 'सत्यम' आणि 'अनोखी रात' यांसारख्या चित्रपटांमध्ये मिळालेल्या यशाने प्रेक्षकांना प्रभावित केले.

1970 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'खिलौना' चित्रपटाच्या जबरदस्त यशानंतर संजीव कुमार यांनी अभिनेता म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली.  त्याच वर्षी प्रदर्शित झालेल्या 'दस्तक' चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.  1972 साली प्रदर्शित झालेल्या ‘कोशिश’ या चित्रपटात त्यांच्या अभिनयाचा नवा आयाम प्रेक्षकांना पाहायला मिळाला.  त्यात त्यांनी मुक्या व्यक्तीची भूमिका साकारली होती. संवाद न बोलता नुसत्या डोळ्यांनी आणि चेहऱ्यावरच्या हावभावांनी प्रेक्षकांना सर्व काही सांगणे हे संजीव कुमार यांच्या अभिनय प्रतिभेचे असे उदाहरण होते, जे क्वचितच कोणी करू शकले असते.  सत्तरच्या दशकात त्यांनी गुलजार यांच्यासोबत काम केले.  त्यांच्यासोबत एकूण नऊ चित्रपट केले, ज्यात 'आंधी', 'मौसम', 'अंगूर', 'नमकीन' प्रमुख आहेत.  'शोले' चित्रपटातील ठाकूरची भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. त्या काळात राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, शम्मी कपूर, दिलीप कुमार या कलाकारांचा दबदबा होता, तरीही आपल्या दमदार अभिनयाने या सर्वांमध्ये वावरत असताना संजीव कुमार यांनी चित्रपटविश्वात आपले  स्वतंत्र स्थान निर्माण केले. 9 जुलै 1938 रोजी जन्मलेल्या संजीव कुमार यांना अवघं 47 वर्षांचं आयुष्य मिळालं. हृदयविकाराने 6 नोव्हेंबर 1985 रोजी  त्यांचं मुंबईत निधन झालं. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

Monday 4 July 2022

देशोदेशीच्या राजधान्या कोणत्या?


वाढवा सामान्य ज्ञान

1.म्यानमारच्या राजधानीचे नाव काय?

उत्तर-नेप्यिडाव

2. उत्तर कोरियाच्या राजधानीचे नाव काय? 

उत्तर-प्याँग्यांग

3. ओमानच्या राजधानीचे नाव काय? 

उत्तर-मस्कत

4. फिलिपिन्सच्या राजधानीचे नाव काय?

उत्तर-मनिला

5. कतारच्या राजधानीचे नाव काय?

उत्तर-दोहा

6. रशियाच्या राजधानीचे नाव काय? 

उत्तर-मॉस्को

7. इराणच्या राजधानीचे नाव काय? 

उत्तर-तेहरान

8. इराकच्या राजधानीचे नाव काय? 

उत्तर-बगदाद

9. इस्राईलच्या राजधानीचे नाव काय? 

उत्तर-जेरुसलेम

10. मलेशियाच्या राजधानीचे नाव काय?

उत्तर-क्वालालंपूर

11. मालदीवच्या राजधानीचे नाव काय?

उत्तर-माले

12. नेपाळच्या राजधानीचे नाव काय? 

उत्तर-काठमांडू

13.लोकसभेसाठी महाराष्ट्रातून निवडल्या जाणाऱ्या सदस्यांची एकूण संख्या किती?

उत्तर- 48

14. ग्रामपंचायतींना आर्थिक स्वायत्तता मिळावी म्हणून कोणती समिती नेमण्यात आली होती?

उत्तर : भूषण गगराणी समिती

15.चुआर जमातीचा उठाव कुठे झाला?

उत्तर : मिदनापूर, बंगाल

16. निर्यात क्षेत्रास हुंडी बाजार योजना कधीपासून लागू केली गेली?

उत्तर : 1958

17. राष्ट्रीय विकास योजनेचे अध्यक्ष कोण असतात?

उत्तर : पंतप्रधान

18. राष्ट्रपतींची निवडणूक कोणत्या पद्धतीने होते?

उत्तर : एकल संक्रमणीय पद्धतीने

19. सौदी अरेबियाच्या राजधानीचे नाव काय? 

उत्तर- रियाध

20. सिंगापूरच्या राजधानीचे नाव काय? 

उत्तर- सिंगापूर

21. दक्षिण कोरियाच्या राजधानीचे नाव काय? 

उत्तर- सेऊल

22. सीरियाच्या राजधानीचे नाव काय? 

उत्तर- दमास्कस

23. तैवानच्या राजधानीचे नाव काय?

उत्तर- तैपेई

24.थायलंडच्या राजधानीचे नाव काय? 

उत्तर- बँकॉक


Friday 1 July 2022

वाढवा सामान्य ज्ञान


वाढवा सामान्य ज्ञान

1.अंदमान निकोबारच्या राजधानीचे नाव काय?

उत्तर- *पोर्ट ब्लेअर*

2. लक्षद्वीपच्या राजधानीचे नाव काय?

उत्तर- *कावराट्टी*

3. दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीवच्या राजधानीचे नाव काय? 

उत्तर- *दमण*

4. लडाखच्या राजधानीचे नाव काय? 

उत्तर- *लेह*

5. महाराष्ट्राच्या राजधानीचे नाव काय?

उत्तर- *मुंबई*

6.पृथ्वीच्या पृष्ठभागावरील पाण्याची टक्केवारी किती आहे?

उत्तर- *71 टक्के*

7.अफगाणिस्तानची राजधानी कोणती? 

उत्तर- *काबूल*

8, बांगलादेशची राजधानी कोणती? 

उत्तर- *ढाका*

9. भुतानची राजधानी कोणती? 

उत्तर- *थिंफू*

10. चीनची राजधानी कोणती? 

उत्तर- *बीजिंग*

11. इंडोनेशियाची राजधानी कोणती? 

उत्तर- *जकार्ता*

12.जगातील खंडांची एकूण संख्या किती?

उत्तर- *सात*

13. आंध्र प्रदेशच्या राजधानीचे नाव काय?

उत्तर- *अमरावती*

14.अरुणाचल प्रदेशच्या राजधानीचे नाव काय?

उत्तर- *इटानगर*

15. आसामच्या राजधानीचे  नाव काय?

उत्तर- *दिसपूर*

16. छत्तीसगडच्या राजधानीचे नाव काय?

उत्तर- *रायपूर*

17. तेलंगणच्या राजधानीचे नाव काय?

उत्तर- *हैदराबाद*

18.भारतातील राज्यांची एकूण संख्या-

उत्तर- *28* 

19.प्रौढ मानवाच्या हारीरातील हाडांची एकूण संख्या किती?

उत्तर- *206*

20.केरळच्या राजधानीचे नाव काय?

उत्तर- *तिरुअनंतपुरम*

21. मिझोरामच्या राजधानीचे नाव काय? 

उत्तर- *ऐजॉल*

22. त्रिपुराच्या राजधानीचे नावकाय?

उत्तर- *आगरताळा*

23. ओडिशाच्या राजधानीचे नाव काय?

उत्तर- *भुवनेश्वर*

24.पंजाबच्या राजधानीचे नाव काय ?

उत्तर- *चंदीगड*


Wednesday 29 June 2022

आपले सामान्य ज्ञान वाढवा


वाढवा सामान्य ज्ञान

१) चित्रसृष्टीत दिला जाणारा सर्वोच्च भारतीय पुरस्कार कोणता?
२) 'भारताचे शेक्सपीअर' म्हणून कोणाचा उल्लेख होतो?
३) 'आराम हराम हैं' हा नारा कोणी दिला?
४) राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना कधी करण्यात आली?
५) घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला असतात?
उत्तर : १) दादासाहेब फाळके पुरस्कार २) महाकवी कालिदास ३) पं. जवाहरलाल नेहरु ४) १९५२ ५) कायदे मंडळाला
वाढवा सामान्य ज्ञान
१) सायमन कमिशनने भारताला कधी भेट दिली होती?
२) हॉकी या खेळाची सुरूवात कोठे झाली?
३) चहाचा सर्वाधिक निर्यातदार देश कोणता?
४) भारताचा पहिलामिस्टर युनिव्हर्स हा मान कोणाला मिळाला?
५) विश्‍वाचा अभ्यास करणारे शास्त्र कोणते?
उत्तर : १) १९२६ २) तुर्कस्थान ३) श्रीलंका ४) मनोहर एैच ५) कॉस्मॉलॉजी
वाढवा सामान्य ज्ञान
१) काही वर्षांपूर्वी कोणत्या राज्यात महिलांच्या सुरक्षेसाठी 'पिंक सारथी' वाहन व्यवस्था सुरू झाली आहे?
२) पूर्व भारतातील कोणता पक्ष राष्ट्रीय पक्षाचा दर्जा प्राप्त करणारा पहिला पक्ष ठरला?
३) कोणत्या देशाने २0२१ पासून यूज अँड प्लस्टीकवर बंदी घातली आहे?
४) देशातील लिपो हे स्थान कुठे आहे?
उत्तर : १) कर्नाटक २) नॅशनल पीपल्स पार्टा ३) कॅनडा ४) अरुणाचल प्रदेश
वाढवा सामान्य ज्ञान
१) विजयघाट हे सुप्रसिद्ध स्थळ कोठे आहे?
२) राष्ट्रा-राष्ट्रांतील नागरिकांचेआरोग्यवर्धन व्हावे म्हणून कोणत्या
संस्थेची स्थापना करण्यात आली?
३) सुवेझ कालव्यावरील इजिप्तच्या किनारपट्टीवरील
महत्त्वाचेआंतरराष्ट्रीय बंदर कोणते?
४) स्वतंर्त्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री कोण होते?
५) युनोची घटना कुठल्या संमेलनात मंजूर झाली?
उत्तर : १) दिल्ली २) जागतिक आरोग्य संघटना ३) अलेक्झांड्रिया ४) मौलाना अब्दुल कलाम आझाद ५) सॅनफ्रान्सिको
वाढवा सामान्य ज्ञान
१) विश्‍व बाल श्रम निषेध दिवस कधी पाळला जातो?
२) अमासेबायलू ही कर्नाटकातील पहिली सौर ऊर्जाचलित ग्रामपंचायत कोणत्या जिल्ह्यात आहे?
३) फ्रेंच ओपन २0१९ (सिंगल, पुरुष) स्पर्धा कोणी जिंकली?
४) भारतातील पहिले डायनासोर संग्रहालय कुठे आहे?
५) सनाबुन्ग ज्वालामुखी कोणत्या देशात आहे?
उत्तर: १) १२ जून २) उद्दपी ३) राफेल नदाल ४) रैयोली,  गुजरात ५) इंडोनेशिया

Wednesday 22 June 2022

भारतीय चित्रपटसृष्टीचा आश्चर्यकारक पसारा; दरवर्षी बनतात 1800 चित्रपट


भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास 100 वर्षांहून अधिक जुना आहे.  या प्रदीर्घ काळात सिनेमाने काळासोबत स्वतःला बदलले आहे आणि आज वीएफएक्सपासून ते मोठमोठ्या स्टंट्सपर्यंत ते सामान्य झाले आहे.  दादासाहेब फाळके आणि अर्देशीर इराणी यांना या सिनेमाचे जनक म्हटल्यास वावगे ठरणार नाही.  1913 मध्ये दादासाहेब फाळके यांचा 'राजा हरिश्चंद्र' हा चित्रपट प्रदर्शित झाला, जो एक मूक आणि कृष्णधवल चित्रपट होता.  त्याच वेळी, 1931 मध्ये पहिला बोलका चित्रपट 'आलम आरा' प्रदर्शित झाला, ज्याचे दिग्दर्शन अर्देशीर इराणी यांनी केले होते.अर्देशीर इराणी यांनीही भारतीय चित्रपटसृष्टीत रंग भरण्याचे काम केले आणि 1937 मध्ये पहिला रंगीत चित्रपट 'किसान कन्या' भारतीय चित्रपटसृष्टीत प्रदर्शित झाला.  1913 ते 2022 पर्यंत भारतीय सिनेमा खूप बदलला आहे.  आता वेगवेगळ्या भाषेतील सिनेमांना वेगवेगळी नावे देण्यात आली आहेत, आता सिनेमांची कमाई 1000 कोटींहून अधिक आहे.  त्याच वेळी, आता प्रत्येक भाषिक सिनेमाचे स्वतःचे सुपरस्टार आहेत.  या स्पेशल रिपोर्टमध्ये तुम्हाला बदलत्या भारतीय सिनेमांविषयी काही गोष्टी सांगत आहे.

भारतीय सिनेमा 25 भाषांचा

 भारतीय चित्रपटसृष्टी स्वतःच खूप मोठी आहे.  बहुतेक लोक यामध्ये फक्त बॉलीवूड, साऊथ आणि बिहारी सिनेमाच मोजतात, पण तुम्हाला माहित आहे का की भारतीय सिनेमा जवळपास 25 भाषांच्या सिनेमातून बनवला गेला आहे.  हे सगळे भाषिक सिनेमे मोठे आहेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही, काहींची आताच कुठे सुरुवात झाली आहे, तर काही चित्रपट परदेशातही आपली छाप सोडत आहेत.  ज्याप्रमाणे हिंदी सिनेमाला बॉलीवूड म्हणतात, त्याचप्रमाणे बाकीच्या भाषिक सिनेमांनाही स्वतःची नावे आहेत. पाहा काही नामवंतांची नावे...

 बॉलिवूड (हिंदी)

 मॉलिवुड (मल्याळम)

 टॉलिवुड (तेलुगु)

 कॉलिवुड (तमिळ)

 सॅंडलवूड (कन्नड)

 पॉलिवुड (पंजाबी)

 बिरहावूड (भोजपुरी)

 ढोलीवुड (गुजराती)

 मराठी सिनेमा (मराठी)

 बंगाली सिनेमा (बंगाली)

दरवर्षी प्रदर्शित होतात सुमारे 1800 चित्रपट 

 तुम्हाला हे जाणून अभिमान वाटेल की भारतीय चित्रपट उद्योगात दरवर्षी सुमारे 1800 चित्रपट प्रदर्शित होतात.  एकीकडे कोविडच्या काळात हा आकडा रखडला असताना दुसरीकडे ओटीटी प्लॅटफॉर्मने त्याला पुन्हा बळ दिले आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, आपला भारतीय सिनेमा हा चित्रपटांच्या रिलीजच्या प्रमाणात जगातील सर्वात मोठा सिनेमा आहे.  परदेशातही बॉलीवूड चित्रपट आणि सेलिब्रिटींना पसंती दिली जात असताना, गेल्या काही वर्षांत साऊथ सिनेसृष्टीही या शर्यतीत पुढे जात आहे.  दैनिक भास्करच्या अहवालानुसार, भारतीय सिनेमाच्या एकूण कमाईत दक्षिणेकडील सिनेमांचा वाटा चाळीस टक्के आहे. जाणून घ्या कोणत्या प्रादेशिक सिनेमात, एका वर्षात किती सिनेमे बनतात...

 "हिंदी : 495 चित्रपट

 कन्नड: 336 चित्रपट

 तेलुगु : 281 चित्रपट

 तमिळ : 254 चित्रपट

 मल्याळम: 219 चित्रपट

 बंगाली : 193 चित्रपट

 मराठी:164 चित्रपट

 भोजपुरी : 101 चित्रपट

वर्ल्डवाइड धमाकेदार 5 चित्रपट

 भारतीय चित्रपटसृष्टीतील चित्रपट आता केवळ भारतातच नाही तर इतर देशांमध्येही पसंत केले जातात.  यूएईपासून ते अमेरिका आणि चीनपर्यंत, आता भारतीय चित्रपट जगातील विविध देशांमध्ये प्रदर्शित होतात आणि प्रेक्षकांनाही ते आवडतात.  जगभरात काही चित्रपटांनी बऱ्यापैकी कमाई केली आहे आणि 1000 कोटींच्या क्लबमध्येही प्रवेश केला आहे.  टॉप 5 कमाई करणारे भारतीय चित्रपट

 दंगल (हिंदी): 1968 कोटी रुपये

 बाहुबली 2 (तेलुगु/हिंदी): 1949 कोटी रुपये

केजीएफ 2 (कन्नड/हिंदी): रु. 1228 कोटी

 आरआरआर (तेलुगु/हिंदी): 1131 कोटी

 बजरंगी भाईजान (हिंदी): 918 कोटी रुपये

प्रत्येक सिनेमाकडे आहेत मोठे स्टार्स 

 हे लक्षात घेण्यासारखे आहे की, पूर्वी जिथे फक्त बॉलीवूड स्टार्सनाच मोठ्या प्रमाणात पसंती दिली जात होती, तिथे आता भाषिक सिनेसृष्टीतील स्टार्सही सुपरस्टार बनले आहेत.  आता प्रत्येक भाषिक सिनेमात मोठे स्टार्स आहेत, ज्यांची फॅन फॉलोइंग खूप मजबूत आहे.  शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान, अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, मोहनलाल, विजय थलपथी, यश, प्रभास, अल्लू अर्जुन, राम चरण, चिरंजीवी, खेसारी लाल यादव, पवन सिंग, रजनीकांत, कमल हासन, मामूट्टी, सुदीप किच्चा, विजय सेतुपती, धनुष, विक्रम, आर माधवन, महेश बाबू, रवी तेजा अशी कितीतरी नावे आहेत.  अभिनेत्यांशिवाय आता काही अभिनेत्रीही जागतिक स्तरावर पाहायला मिळू लागल्या आहेत.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

 

Tuesday 31 May 2022

डेझी रॉकवेल: शब्दांसाठी नवीन जगाची निर्माती


माझ्या मनात हिंदी आणि इंग्रजी एकमेकांसोबत वाहत नाहीत.  म्हणूनच जेव्हा मी हिंदीतून इंग्रजीत भाषांतर करत असते, तेव्हा मी प्रत्येक शब्दाला एका नव्या जगात घेऊन जात असते.'' असे अमेरिकेत राहत असलेल्या चित्रकार, लेखिका आणि अनुवादक डेझी रॉकवेल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.  रॉकवेल यांनी लेखिका गीतांजली श्री यांच्या 'रेत समाधी' या कादंबरीचा 'टूम ऑफ सँड' या नावाने इंग्रजीत अनुवाद केला आहे.  या कादंबरीला यंदाचे बुकर पारितोषिक मिळाले आहे.  गीतांजली श्री आणि डेझी रॉकवेल यांनी संयुक्तपणे हा पुरस्कार स्वीकारला.  बक्षिसाची रक्कमही त्या दोघींच्या वाट्याला निम्मी निम्मी गेली.  अमेरिकेत राहणाऱ्या चित्रकार, लेखक आणि अनुवादकाने 'रेत समाधी'चे वर्णन 'हिंदी भाषेचे प्रेमपत्र' असे केले आहे.  ती म्हणते, "माझे हिंदीशी असलेले नाते स्थानिक भाषकापेक्षा पूर्णपणे वेगळे आहे.

मी कोणतीही भाषा पटकन शिकते.  मात्र, मी वयाच्या 19 व्या वर्षापर्यंत हिंदी शिकायला सुरुवात केली नव्हती.  ती म्हणते, “आपल्या मेंदूला नवीन भाषा शिकण्यास चांगला वेळ लागतो.  अस्खलित हिंदी वाचायला किंवा बोलायला मला खूप वेळ लागला.  मी अजूनही अनुवाद करताना हास्यास्पद चुका करते आणि वाक्प्रचाराची वाक्ये आणि शब्दांमध्ये अडकते.’ डेझी रॉकवेल पश्चिम मॅसॅच्युसेट्समधील कलाकारांच्या कुटुंबात वाढली.  आई-वडील दोघेही कलाकार होते.  आजोबा, नॉर्मन रॉकवेल, एक महान चित्रकार आणि लेखक होते ज्यांनी अमेरिकन साहित्य आणि इतिहासावर जवळून काम केले.

डेझीला आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात तिच्या कौटुंबिक वारशाने प्रेरणा मिळाली.  बर्कले विद्यापीठात अनेक वर्षे हिंदी शिकवल्यानंतर तिने कला, अनुवाद आणि लेखनाचा मार्ग निवडला.  तिने दक्षिण आशियाई साहित्यात पीएचडी केली आहे उपेंद्रनाथ अश्क यांची कादंबरी 'गिरती दीवारें' आणि त्यांचे जीवन हा त्यांचा पीएचडीचा विषय होता. डेझीला तिच्या पदवीनंतर अनुवादात रस निर्माण झाला.  ती भाषांतराला सर्जनशील लेखन म्हणते.  तिने हिंदी आणि उर्दूमधील अनेक ग्रंथांचे भाषांतर केले आहे.  हिंदी लेखक उपेंद्रनाथ अश्क यांच्या लघुकथांचा अनुवाद केला आहे.  त्यांच्या 'गिरती दीवारें' या प्रसिद्ध कादंबरीचा 'फॉलिंग वॉल्स' या नावाने अनुवाद झाला आहे.  डेझीने 2004 मध्ये उपेंद्रनाथ अश्क यांचे चरित्रही लिहिले होते.  अश्क व्यतिरिक्त तिने भीष्म साहनी, श्रीलाल शुक्ल, उषा प्रियमवदा यांच्या साहित्याचे भाषांतर केले आहे.

 डेझी म्हणते की सध्या तिच्या भाषांतर/प्रकाशन यादीमध्ये पाच पुस्तके आहेत.  एक अश्क यांचे आहे.  त्याच्या 'फॉलिंग वॉल्स' मालिकेचा दुसरा भाग ती लिहिणार आहे.  याशिवाय ती  ‘शहर में घूमता आइना’ या पुस्तकावर  काम करत आहे.  तिच्याकडे उर्दू लेखिका खादिजा मस्तूर यांच्या दोन कादंबऱ्या आहेत - 'द वुमेन्स कोर्टयार्ड' (आंगन), हे या वर्षी सप्टेंबरमध्ये प्रकाशित होणार आहेत आणि  दुसरे पुस्तक 'जमीन' यावर  ती सध्या काम करत आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


Monday 30 May 2022

मराठी हिंदी चित्रपटांवर आधारित चित्रकोडे क्रमांक 2

 


सिनेकूट क्रमांक 2

1) अभिनेत्री काजोलला जेवढी प्रसिद्धी किंवा स्टारडम मिळालं तेवढं तिच्या बहिणीला  मिळालं नाही. तिचे चित्रपट कधी आले आणि गेले ते समजलंच नाही. ती 'बिग बॉस'च्या चौदाव्या सिझनमध्येही होती. त्यानंतरच तिची चर्चा सुरू झाली. 'बिग बॉस'च्या घरात तिच्या आणि अरमान कोहलीच्या नातेसंबंधांची चर्चा जोरात सुरू होती. या अभिनेत्रीचे नाव काय?

उत्तर-तनिष्का मुखर्जी

2) अभिनेत्री काजल अग्रवालने साऊथसह  बॉलीवूडमध्येही आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. 2020 मध्ये तिने एका  उद्योगपतीशी विवाह केला.त्याचे नाव काय?

उत्तर- गौतम किचलू

3) या अभिनेत्याने 'मर्दानी'  चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं; परंतु दिग्दर्शक नीतेश तिवारीच्या “छिछोरे'ने त्याला ओळख दिली. 'छिछोरे'मुळे त्याचं आयुष्यच बदललं... त्याला स्टारडम तर मिळालंच. 2022 या वर्षी त्याचे एकामागोमाग तीन चित्रपट येत आहेत. ‘रंजीश ही सही'मध्ये तो आमला पॉल आणि अमरिता पुरीसोबत काम करतोय. ‘लहू लपेटा'मध्ये तापसी पत्रूसोबत त्याची जोडी आहे.'यह काली काली आखे'मध्ये श्वेता  त्रिपाठीसोबत तो दिसणार आहे. तिन्ही चित्रपट रोमँटिक जॉनरचे आहेत. या अभिनेत्याचे नाव काय?

उत्तर- ताहीर राज

4) 'सच्चाई छुप नही सकती', 'बलमा सिपाईया', 'मैने देखा तूने देखा', 'देखो देखो देखो... बायस्कोप देखो' इत्यादी एकापेक्षा एक सुपरहिट गाण्यांमुळे आजही लोकप्रिय असलेल्या या चित्रपटाच्या प्रदर्शनास जानेवारी 2022 मध्ये 50 वर्ष पूर्ण झाली. 7 जानेवारी 1972 रोजी  प्रदर्शित  या चित्रपटाचे निर्माते प्रेमजी असून दिग्दर्शन दुलाल गुहा यांचं आहे. चित्रपटात मीनाकुमारी, राजेश खन्ना, मुमताज आदी कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली  होती. या चित्रपटाचे नाव काय?

उत्तर-दुश्मन

5)बॉलिवूडची डॅशिंग गर्ल तापसी पन्नू आणि ताहिर राज भसीनचा लूप लपेटा हा चित्रपट कॉमेडी थिल्लर आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आकाडा भाटियाने केले आहे. लूप लपेटा चित्रपट जर्मन फिल्ममेकर टाम टाइक्वेरच्या 1998 च्या  या चित्रपटाचा रिमेक आहे.या मूळ चित्रपटाचे नाव काय?

उत्तर-रन लोला रन

6) आदित्य चोपडा यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाच्या अतिभव्य यशामुळं शाहरुख तेव्हा निर्विवादपणे तरुण कलाकारांत आघाडीवर होता. तेव्हा तरुणांच्या दिलाची धडकन असलेला शाहरुख आणि अमिताभ या चित्रपटात एकत्र आले होते. या चित्रपटाचे नाव काय?

उत्तर-दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे'

7) कोणत्या चित्रपटाद्वारे नवोदित कलाकार जानकी पाठकने रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. आता ती 'माझी माणसं या मालिकेत काम करीत आहे. तिची ही पहिलीच मालिका असून यामध्ये ती गिरिजाच्या मुख्य भूमिकेत आहे. आपल्या वडिलांच्या पश्चात आपल्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी सांभाळणाऱ्या 'गिरिजा'ची ही गोष्ट आहे. तिचा पहिला मराठी चित्रपट कोणता?

उत्तर-झोंबवली

8) या चित्रपटाच्या शेवटी अमिताभ शाहरुखला म्हणतो, ''मैने कहाँ था मिस्टर आर्यन, प्यार और डर की जंग मे जीत हमेशा डर की होती है," ह्यावर शाहरुखच्या “जहाँ से मै देख रहा हूँ, आप आज भी हार गये है मिस्टर नारायण शंकर” याI सुरू होणाऱ्या  संवादाच्या दृश्याला त्या वर्षांचा फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट दृश्याचा पुरस्कार मिळाला होता. हा चित्रपट कोणता?

उत्तर -'मोहब्बते  

9) दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन अक्कीनेनी यांनी अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केलं आहे.  नुकतीच त्याच्या या पहिल्या चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. या  निमित्ताने नागार्जुनच्या चाहत्यांनी चक्क एक मंदिर उभारलं आहे. हे मंदिर आंध्र प्रदेशमधील गुंटूर येथे आहे. १९९७ मध्ये आलेला हा त्याचा पहिला चित्रपट फारच गाजला होता. त्याचे नाव काय?

उत्तर- अन्नमय्या' 

10) अजिंक्य देव, मंगेश देसाई, मनोज जोशी, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, अमोल कागणे, सयाजी शिंदे, उदय नेने, उदय टिकेकर, प्रीतम कागणे, इशा अग्रवाल, अलिशा फरेर, सुप्रिया कर्णिक अशी तगडी स्टारकास्ट असलेला  मराठी चित्रपट कोणता? विनोदाची पुरेपूर मेजवानी असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन मानस कुमार दासने केले आहे.

उत्तर- 'झोलझाल' 


Sunday 29 May 2022

अभिनयाचे मूर्तिमंत उदाहरण :नर्गिस


हिंदी चित्रपटसृष्टीतल्या ज्या अभिनेत्रींनी आपल्या अभिनयाच्या जोरावर चित्रपट केवळ अभिनेत्यांच्या जोरावरच चालतात हा प्रेक्षक आणि निर्माता-दिग्दर्शकांचा समज दूर केला, त्या अभिनेत्रींमध्ये नर्गिस आघाडीवर आहे, 'मदर इंडिया' चित्रपटातील अभिनयाच्या बळावर तिने सिद्ध केले की, अभिनेत्रीच्या बळावरही चित्रपट यशस्वी होऊ शकतात.  पूर्वी चित्रपटांमध्ये अभिनेत्रींना अभिनेत्यांपेक्षा कनिष्ठ समजले जायचे.  पण नर्गिसने हे स्थान बदलून टाकले. 1 जून 1929 रोजी जन्मलेल्या नर्गिसचे खरे नाव फातिमा अब्दुल रशीद होते.  नर्गिसचे वडील उत्तमचंद मूलचंद हे रावळपिंडीचे समृद्ध हिंदू होते आणि आई जद्दनबाई हिंदुस्थानी शास्त्रीय गायिका होत्या.  नर्गिसची आई भारतीय चित्रपटसृष्टीशी सक्रियपणे जोडली गेलेली होती.  ती तिच्या काळात यशस्वी गायिका, नर्तक, दिग्दर्शक, संगीतकार आणि अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध होती.

नर्गिसची चित्रपटांशी ओळख तिच्या आईने करून दिली.  वयाच्या सहाव्या वर्षी नर्गिसने चित्रपटात काम करायला सुरुवात केली.  1935 मध्ये प्रदर्शित झालेला 'तलाश-ए-हक' हा तिचा पहिला चित्रपट होता.  या चित्रपटाच्या निमित्ताने तिचे नाव बेबी नर्गिस ठेवण्यात आले होते.  वयाच्या चौदाव्या वर्षी, दिग्दर्शक मेहबूब खान यांच्या 'तकदीर' या चित्रपटात पहिल्यांदा तिची  नायिका म्हणून निवड झाली. या चित्रपटात तिचा नायक मोतीलाल होता. त्यानंतर तीन दशके तिचा चित्रपट प्रवास अव्याहतपणे सुरू राहिला.  'मदर इंडिया', 'श्री 420', 'बरसात' इत्यादींसह तिचे अनेक चित्रपट खूप लोकप्रिय ठरले.  या चित्रपटांशिवाय अंदाज, अनहोनी, जोगन, आवरा, रात और दिन, अदालत, घर संसार, लाजवंती, परदेशी, चोरी चोरी, जागते रहो, अंगारे, आह, धुन, पापी, शकस्त, अंबर, आशियाना हे चित्रपट केले आहेत. बेवफा, शीशा, दीदार, हलचल, प्यार की बातें, सागर, आधी रात, बाबुल या चित्रपटांतूनही तिने आपली क्षमता सिद्ध केली.

साठच्या दशकात ती सतत आजारी पडू लागली, त्यामुळे तिला चित्रपटांमध्ये फार कमी काम करता आले.  या काळातील तिचा चित्रपट 'रात और दिन' (1967), ज्यासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.  'मदर इंडिया'ला ऑस्करसाठी नामांकन मिळाले होते.'मदर इंडिया'च्या शूटिंगदरम्यान अभिनेता सुनील दत्तने तिच्यापुढे लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता, जो तिने सहज स्वीकारला होता.  मात्र, त्या चित्रपटात सुनील दत्तने नर्गिसच्या मुलाची भूमिका केली होती.  11 मार्च 1958 रोजी नर्गिसने सुनील दत्तसोबत लग्न केले आणि चित्रपटसृष्टीला अलविदा केला.  3 मे 1981 रोजी वयाच्या 51 व्या वर्षी नर्गिसचे स्वादुपिंडाच्या कर्करोगाने निधन झाले. तिच्या स्मरणार्थ नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर फाउंडेशनची स्थापना करण्यात आली

 नर्गिसने अभिनेत्रीपेक्षा एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणून अधिक काम केले.  अंध आणि विशेष मुलांसाठी तिने काम केले.  ती भारतातील पहिल्या 'स्पास्टिक्स सोसायटी'ची संरक्षक बनली. तिने अजिंठा कला सांस्कृतिक दलाची स्थापना केली, ज्यामध्ये तत्कालीन प्रसिद्ध कलाकार-गायक सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांना प्रोत्साहन देत, त्यांचे मनोरंजन करत.  बांगलादेशच्या निर्मितीनंतर, 1971 मध्ये त्यांच्या टीमने तेथे काम केले होते. पद्मश्री पुरस्कार मिळालेली नर्गिस ही पहिली अभिनेत्री होती.  सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळवणारीही ती पहिली अभिनेत्री होती.  मुंबईत वांद्रे येथे त्यांच्या नावावर एक मार्ग (रस्ता) आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाला नर्गिस दत्त या नावाने दरवर्षी पुरस्कार  दिला जातो.  नर्गिस दत्त 1980 मध्ये राज्यसभेच्या सदस्यही होत्या.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

Thursday 26 May 2022

मराठी-हिंदी चित्रपटांवर आधारित कोडे. वाचून मिळावा सिनेमा ज्ञान


सिनेकूट क्रमांक-1

1)  लेखक-अभिनेतादिग्दर्शक दिग्पाल लांजेकरच्या संकल्पनेतून उदयास आलेल्या शिवराज अष्टकातील  2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'पावनखिंड' या तिसऱ्या चित्रपटातील छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका कोणी साकारली आहे? यापूर्वीही या अभिनेत्याने  'फर्जद' आणि 'फत्तेशिकस्त' या दोन चित्रपटांमध्ये शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती.

उत्तर -चिन्मय मांडलेकर

2) 1998 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि गोविंदा यांनी दुहेरी भूमिका साकारली होती. प्रसिध्द अभिनेत्री माधुरी दीक्षित हिचे आटमसॉंग असलेल्या चित्रपटाचे नाव काय?

उत्तर- बडे मियाँ छोटे मियाँ 

3)तुझ्यात जीव रंगला, जय मल्हार, विठूमाऊली अशा अनेक मालिका, 'मुंबई डायरीज' वेब सीरिजद्वारे आपला ठसा उमटवलेला अभिनेता हा अभिनेता 'का रं देवा' या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. सोबत अभिनेत्री मोनालिसा बागल आहे. या अभिनेत्याचे नाव काय?

उत्तर- मयूर लाड

4) 'फुलाखरू' या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे  हृता दुर्गुळे हिने या मालिकेतील तिच्या भूमिकेने अनेकांची मने जिंकली. सध्या तिची झी टीव्हीवरील 'मन उडू उडू झालं' ही मालिकाही प्रचंड गाजते आहे. ती कोणासोबत लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. 

उत्तर- प्रतीक शाह

5)'माझ्यावर प्रेम करतेस तर स्वत:वरही प्रेम करायला शिक.' असं या अभिनेत्रीला सांगून तिच्या वडिलांनी म्हणजेच महेश भट्ट यांनी व्यसनमुक्तीची अट घातली होती. मग 45 व्या वर्षी तिने निर्व्यसनी होण्याचा निर्णय घेतला होता. या अभिनेत्रीचे नाव काय?

उत्तर- पूजा भट्ट

6) देशातील सर्वात आयकॉनिक स्टार म्हणून आपले स्थान निर्माण करणारे, खऱ्या अर्थाने पहिले सुपरस्टार म्हणून ज्यांनी संपूर्ण जगाचे मनोरंजन केले, त्या ज्येष्ठ अभिनेते म्हणजे राजेश खन्ना यांच्यावर दिग्दर्शिका फराह खान हिने  बायोपिकची काढण्याची घोषणा केली आहे.  गौतम चिंतामणी यांच्या पुस्तकावर आधारित हा बायोपिक असणार आहे. या चित्रपटाची निर्मिती करणारे निखिल द्विवेदी यांनी या पुस्तकाचे हक्क विकत घेतले आहेत. या पुस्तकाचे नाव काय?

उत्तर- 'डार्क स्टार : द लोनलीनेस ऑफ बिडंग राजेश खन्ना' 

7) अभिनेता पंकज कपूर आणि नीलिमा अजीम यांचा स्टारपुत्र. 'आपल्याला स्टारकिड्सचा लाभ मिळाला नाही. जे आहे ते मी हळूहळू कमावलंय. मी आज जिथे आहे तिथे पोहोचायला बरीच मेहनत घेतलीय.' असं म्हणणारा अभिनेता कोण?

उत्तर-शाहिद कपूर

8) सांस्कृतिक परंपरेतील महाराष्ट्राची एक प्रमुख ओळख म्हणजे लावणी. लावणीच्या शृंगाराचं सौंदर्य खुलवण्याचं काम शाहीर पठ्ठे बापूराव यांनी केलं. त्यांनी स्वतःचं काव्य आणि पहाडी आवाजाच्या जोरावर लावणी कलेला एक वेगळा आयाम दिला. आपल्या हयातीत दोन लाखांहून अधिक लावण्या त्यांनी लिहिल्या. आता त्यांची सांगीतिक यशोगाथा रुपेरी पडद्यावर येतेय. दिग्दर्शक मिलिंद कृष्णा सकपाळ यांनी चित्रपटाचं ठिवधनुष्य पेललं आहे. प्रा. चंद्रकुमार नलगे यांच्या 'महाराष्ट्राचे शिल्पकार पठ्ठे बापूराव' आणि “पठ्ठे बापूरावांच्या शोधात' पुस्तकांवर आधारित चित्रपटाचे नाव काय?

उत्तर -लोकशाहीर पठ्ठे बापूराव

9)' खिलते हैं गुल यहा..., आज मदहोश हुआ जाए रे..., मेघा छाये आधी रात..., कैसे कहे हम प्यार ने... आदी एकाहून एक लोकप्रिय गाणी असलेला हा चित्रपट प्रदर्शित होऊन तब्बल 50 वर्ष झाली. 31 डिसेंबर 1971 मध्ये तो प्रदर्शित झालेल्या समीर गांगुली दिग्दर्गित चित्रपटात शशी कपूर आणि राखी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. विशेष म्हणजे राखीची चित्रपटात दुहेरी भूमिका आहे.

उत्तर-शर्मिली

10) मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता अंकुडा चौधरी च्या चित्रपटात  सिद्धार्थ जाधव, वैदेही परशुरामी आणि अभिनेते सयाजी शिंदे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहे. चित्रपटाचं संपूर्ण चित्रीकरण लंडनमध्ये झालं आहे. सुरेश जयराम यांच्या नाटकावर आधारित असलेल्या या एक धमाकेदार विनोदी कौटुंबिक चित्रपटाचे नाव काय?

उत्तर- लोच्या झाला रे'

लेखन-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली