Sunday 18 August 2019

संस्कृत रेडिओ


संस्कृत भाषा संवर्धन व प्रचार-प्रसारणार्थ, खांडबहाले.कॉम निर्मित जगातील सर्वप्रथम संस्कृत-इंटेरनेट-रेड.िओ जागतिक-संस्कृत-दिनी ऑनलाईन प्रसारित करण्यात आला.
र्शवण हे भाषा शिकण्याचे प्रथम आणि अत्यंत प्रभावी माध्यम आहे. कोणतीही भाषा सतत कानावर पडल्याने त्या भाषेचे शब्द, उच्चार, उच्चारणपद्धति, व्याकरण याचे नकळत आकलन होते आणि हळुहळू ती भाषा आपसुकच ओठावर येते. मग याला संस्कृत भाषा कशी अपवाद असेल? संस्कृत अर्थात देववाणी शिकण्याची इच्छा अनेकांना असते परंतु सोयीनुसार व पूर्णवेळ संस्कृत र्शवण करता येऊ शकेल असे इंटरनेट जगतात एकही व्यासपीठ उपलब्ध नाही असे लक्षात आल्यावर नाशिकस्थित खांडबहाले डॉट कॉम या भारतीय भाषा व तंत्रज्ञान-विकास संस्थेने संस्कृत भाषा संवर्धन व प्रचार-प्रसारणार्थ, २४ तास व सातही दिवस (२४बाय ७) अव्याहतपणे सुरू राहिल असा संस्कृत-इंटेरनेट-रेड.िओ जागतिक-संस्कृत-दिनाच्या औचित्याने संस्कृतप्रेमींसाठी ऑनलाईन प्रसारित केला.

भारताकडे अमेरिकेचे रोखे

भारताकडे या वर्षीच्या जूनअखेर अमेरिकन सरकारचे रोखे (सिक्युरिटीज) सहा अब्ज डॉलर्सने वाढून ते १६२.७ अब्ज डॉलर्स झाले आहेत. किमान एका वर्षात भारताने ही सर्वात मोठी पातळी गाठली आहे. अमेरिकेच्या कोषागार विभागाने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार जून, २०१९ अखेर हे रोखे (१.१२२ ट्रिलियन डॉलर्स) जास्त जपानकडे तर १.११२ ट्रिलियन डॉलर्सचे रोखे चीनकडे आहेत. ज्या प्रमुख देशांनी अमेरिकन सरकारचे हे रोखे बाळगले आहेत, त्यात भारताचा क्रमांक १३वा (१६२.७ ट्रिलियन डॉलर्स) आहे. गेल्या मे महिन्यात हे रोखे १५६.९ अब्ज डॉलर्स तर एप्रिल महिन्यात १५५.३ अब्ज डॉलर्सचे होते. जून महिन्यात भारताकडे असलेले हे रोखे एका वर्षातील सर्वात जास्त होते. जून, २०१८मध्ये ते १४७.३ अब्ज डॉलर्स होते.
जागतिक अर्थव्यवस्था व्यापार युद्ध, काही आश्वासक बाजारपेठांच्या घसरणींसह सध्या अनेक अडचणींना तोंड देत आहे, त्या पार्श्वभूमीवर भारताने लक्षणीय म्हणता येईल अशी रोख्यांत वाढ केली आहे.

Monday 12 August 2019

राज्यात दोन लाखांवर नागरिक बेपत्ता

दिवसेंदिवस अपहरण, बेपत्ता आदी घटना कानावर पडतात. देशातील अनेक लहान बालके, मुली, महिला, पुरुष आदींच्या हरविलेल्यांची संख्या दिवसागणिक वृद्धांगत आहे. राज्यातही हा आकडा मोठा आहे. देश, राज्यपातळीवर अनेक मागण्यांसाठी आंदोलने केली जाते. परंतु, बेपत्ता झाल्यांचा तुर्तास तरी विचार होताना दिसत नाही. पोलिस प्रशासनाकडून याबाबतचा तपास सुरू असेलही परंतु, किती बेपत्ता सापडलेत असाही प्रश्न आहे. राज्यात गेल्या दोन दशकात दोन लाखावर नागरिक बेपत्ता आहेत. ही बाब चिंताजनक आहे.

Saturday 10 August 2019

भारतीय अर्थव्यवस्था पिछाडीवर


अर्थव्यवस्थेच्या जागतिक क्रमवारीत अमेरिकेची अर्थव्यवस्था 20.49 ट्रिलियन डॉलर्ससह पहिल्या क्रमांकावर आहे. तर 13.61 डॉलर्ससह चीनची अर्थव्यवस्था दुसऱ्या क्रमांकावर आहे. 4.97 ट्रिलियन डॉलर्स आकारमान असलेली जपानची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर जर्मनी 3.99 ट्रिलियन डॉलर्ससह चौथ्या क्रमांकावर आहे. जागतिक अर्थव्यवस्थेच्या क्रमवारीत ब्रिटन आणि फ्रान्सने भारताला सातव्या क्रमांकावर ढकलले. 2018 मध्ये ब्रिटनची अर्थव्यवस्था 2.64 ट्रिलियन डॉलर्सवरून 2.84 ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचली तर फ्रान्सची अर्थव्यवस्था 2.59 ट्रिलियन डॉलर्सवरून 2.78 ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचली आहे.

भारतात सर्पदंशाने होणारे मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक

जगभरात दरवर्षी 5.4 दशलक्ष सर्पदंशाच्या घटना घडत असून त्यातील सुमारे 2.8 दशलक्ष सर्पदंशाच्या एकट्या भारतात घडत असून त्यामुळे भारताचा उल्लेख सर्पदंशाची राजधानी असा केला जात आहे. भारतीय संस्कृतीने जरी सापांना देवता रूपात पूजलेले असले तरी सापांसंदर्भात मोठय़ा प्रमाणात असलेले अज्ञान आणि प्रचलित अंधश्रद्धा यामुळे सर्पदंशाने होणाऱ्या  मृत्यूचे प्रमाण लक्षणीय आहे. आज सापांचा नैसर्गिक अधिवास आणि त्यांच्या अन्नाच्या घटकांबाबत संकटांची व्याप्ती वाढलेली असल्याने, सापांनी आपला मोर्चा लोकवस्तीच्या त्याचप्रमाणे शेती, बागायतींच्या आसपास वळविलेला आहे आणि त्यामुळेच सर्पदंशाची प्रकरणे वाढून त्यात मृत्यूमुखी पडणाऱयांचे प्रमाण वाढत चालले आहे ही चिंतेची बाब आहे. पावसाळी मोसमात बहुतांश साप आपल्या भक्ष्याच्या, पाण्याच्या किंवा जोडीदाराच्या शोधार्थ बाहेर पडतात. सापांना कमी अन्न लागत असले तरी पाणी मात्र भरपूर लागते.