Tuesday 31 March 2020

माहीत आहे का? (भाग2)

1) वीज ज्या ठिकाणी पडते , नेमक्या त्याच ठिकाणी पुन्हा पुन्हा का पडते ?वीज सर्वसाधारणपणे उंच ठिकाणी किंवा उंच इमारतीवर पडते . काही उंच इमारतींवर सुरक्षा उपाय म्हणून विद्युतवाहक बसवले असतात . त्यामुळे वीज त्यांच्याकडे पुन्हा पुन्हा आकर्षित होते .
2)तेल जगातील ऊर्जेचे मुख्य उगमस्थान आहे . दुसरे कोणते ?

Sunday 29 March 2020

माहीत आहे का? (भाग 1)

1)' बदाम ' हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे ?
पर्शियन ,
2)  ' हारा - किरी ' या जपानी शब्दाचा शब्दशः अर्थ काय ?
पोट कापणे , जपानी पद्धतीची आत्महत्या .
3) ' एस्कीमो ' म्हणजे काय ?
कच्चे मांस खाणारा .
4) कलकत्ता हे नाव इंग्रजांनी दिले . या शहराचे मूळ बंगाली नाव कोणते ?
कालीकट्टा किंवा कालीघाट .

इंग्रजी शब्द वाचा,लिहा आणि आत्मसात करा (भाग1)

tailor ( टेलर् ) - शिंपी .
potter ( पॉटर् ) - कुंभार .
watchman ( वॉचमन् ) - पहारेकरी . )
farmer ( फार्मर् ) - शेतकरी .
milkman ( मिल्क्म न् ) - गवळी .
 teacher ( टीचर् ) - शिक्षक , शिक्षिका .
sailor ( सेलर् ) - खलाशी .
 soldier ( सोल्जर् ) - सैनिक .
 chemist ( केमिस्ट् ) - औषधविक्रेता .
gardener ( गार्डनर् ) - माळी .
 hunter ( हण्टर् ) - शिकारी .
blacksmith ( ब्लॅक्स्मिथ् ) - लोहार .
actor ( अॅक्टर् ) - अभिनेता , नट .
 lawyer ( लॉयर् ) - वकील .
nurse ( नर्स् ) - नर्स , परिचारिका .

किरणोत्सर्ग म्हणजे काय ?

फुकुशिमा येथील अणुभट्टय़ांमधील दुर्घटनेनंतर ज्या काही संज्ञा तुमच्या आमच्या चर्चेत येऊ लागल्या आहेत, त्यातलीच एक आहे किरणोत्सर्ग. निसर्गात १ अणुभाराच्या हायड्रोजनपासून ते ९२ अणुभाराच्या युरेनियम पर्यंत एकूण ९२ मुलद्रव्य आहेत. प्रत्येक मुलद्रव्याची थोडाफार वेगवेगळा अनुभव असलेली रूप म्हणजेच त्यांचे आयसोटोप्सही अस्तित्वात आहेत. यापैकी काहींच्या अणुगर्भातून नैसर्गिकरित्याच काही ऊर्जाधारी किरण उत्सर्जित होत असतात. या नैसर्गिक आविष्काराला किरणोत्सर्ग असं म्हणतात. एकोणीसावं शतक सरता सरता फ्रेंच वैज्ञानिक हेन्री बेकरेल याने किरणोत्सर्गाचा शोध लावला.

ढेकर का येते?

आपण जेव्हा जेवत असतो, तेव्हा अन्नासोबत थोडी हवा देखील आपल्या पोटामध्ये जात असते. आपल्या शरीरातील अन्ननलिका आणि पोटाच्या मध्ये एक लहानशी झडप असते. ही झडप आपण अन्न ग्रहण करीत असताना उघडते. अन्न पोटामध्ये गेल्यानंतर ही झडप आपोआप बंद होते. अन्नासोबत थोडी हवा देखील त्या झडपेमध्ये शिरते. यालाच एरोफेजिया असे म्हणतात. जेव्हा आपण खूप घाई-घाईत जेवतो, तेव्हा अन्न व्यवस्थित न चावता घाईघाईने गिळतो. अश्या वेळी पोटामध्ये अन्नासोबत जास्त हवा शिरते. जेव्हा पोटामध्ये प्रमाणापेक्षा अधिक हवा शिरते, तेव्हा ती हवा शरीराबाहेर टाकली जावी असा निर्देश मेंदूद्वारे पचनसंस्थेला दिला जातो.

Saturday 28 March 2020

वसंत गोवारीकर: ज्येष्ठ शास्त्रज्ञ

(जन्मदिन - २५ मार्च १९३३)
अवकाश संशोधन, हवामान शास्त्र आणि लोकसंख्या क्षेत्रातील त्यांचे संशोधन अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते. डॉ. वसंत रणछोडदास गोवारीकर यांचा जन्म १९३३ साली कोल्हापूरला झाला. कोल्हापूरला एमएस्सी करून त्यांनी लंडनच्या बìमगहॅम विद्यापीठातून पीएचडीची पदवी प्राप्त करून घेतली. त्यानंतर त्यांनी ब्रिटनच्या एटॉमिक एनर्जी व एव्हिएशनमध्ये काम केले. या वेळी भारताच्या अवकाश संशोधनशास्त्राचे प्रमुख डॉ. विक्रम साराभाई यांनी त्यांना भारतीय अवकाश संशोधन कार्यक्रमासाठी भारतात बोलावून घेतले. १९६७ साली ते थुम्बा येथे रुजू झाले.

स्मॉग आणि वायू म्हणजे काय?


स्मॉग म्हणजे काय ?
' स्मॉग ' हा इंग्रजी शब्द ' स्मोक ' व ' फॉंग ' या दोन शब्दांपासून निर्माण झाला आहे . त्याला मराठीत ' धुकेमिश्रित धूर ' हा प्रतिशब्द आहे . कारखान्यांच्या चिमण्यांमधून वातावरणात धुराचे लोट ओकले जातात . अशा वेळी थंडीच्या दिवसांत वातावरणात धुके असेल तर त्या धुक्यात धूर मिसळला जातो . त्यामुळे वातावरण दाट बनते .

हिमनग आणि धूर (माहिती आहे का?)

हिमनग कसे निर्माण होतात ?
हिमनदीपासून एक मोठा बर्फखंड तुटतो तेव्हा त्याचा हिमनग बनतो . दऱ्याखोयांमधून हिमनद्या वाहात आहात समुद्रापर्यंत जातात . हिमनदीचा शेवटचा भाग तुटतो व सागरात हिमनग तरंगू लागतो . सागरगामी आगबोटींना हे हिननग खूप धोक्याचे असतात . हिमनगांचे आकार वेगवेगळे असतात .
हिमनगाचा बर्फ सागरी पाण्याच्या तुलनेने फक्त आठ - नवमांश जङ असतो .

पर्वतप्राय लाटा म्हणजे काय ?

पर्वतप्राय लाटा म्हणजे पर्वताएवढ्या उंचीच्या महासागराच्या लाटा . अशा लाटा महाप्रचंड उंच उसळतात , समुद्रकिनारपट्टीलगतच्या प्रदेशाचा विध्वंस करतात , महासागरगामी बोटींचा नाश करतात , महासागरी प्राणिजीवनाला विस्कळित करतात . महासागराच्या तळाशी मोठे भूकंप होतात . त्यांच्यामुळे पर्वतप्राय लाटा उसळतात . ज्वालामुखीच्या उद्रेकांमुळे अशाच लाटा उठतात . डच इस्ट इंडीजमधील क्राकातोआ बेटावर २७ ऑगस्ट १८८३ रोजी ज्वालामुखीचा महाप्रचंड स्फोट झाला .

ग्रहणे क्वचित का घडतात ?

चंद्र भ्रमण करीत असताना कधी कधी तो पृथ्वी व सूर्य यांच्यामध्ये थेटपणे आडवा येतो . त्या वेळी पृथ्वीच्या पृष्ठभागावर त्याची सावली पडते आणि सूर्यग्रहण घड़ते ! चंद्र जेव्हा नवा असतो तेव्हा सूर्यग्रहण होते , तर मग प्रत्येक पौर्णिमेनंतर चंद्र जेव्हा नवा बनतो तेव्हा दर वेळी सूर्यग्रहण का घडत नाही ? कारण दर वेळी चंद्र थेट आडवा येत नाही . त्याचे भ्रमण पृथ्वीच्या कक्षेच्या थोडेसे वर - खाली होते . सूर्यग्रहण पूर्णत : म्हणजे खग्रास असू शकते किंवा अंशतः असू शकते . चंद्राचे अंतर पृथ्वीपासून नेहमी सारखे नसते .

Tuesday 24 March 2020

थोरामोठ्यांचे सुविचार भाग1


1)   ज्याचे मन मजबूत नाही, त्याचे शरीर कितीही धिप्पाड असले तरी त्याचा उपयोग नाही.-लोकमान्य टिळक
2)   माझा सर्वात चांगला मित्र तोच जो मला मी न वाचलेले एक पुस्तक भेट देईल.- अब्राहम लिंकन
3)   एक वेळ सर्वस्व गमावले तरी चालेल,पण आपली बुद्धी गमावू नका.- आर्य चाणक्य
4)   वैफल्य वणवणू शकते. ते वाट शोधू शकत नाही.- बाबा आमटे
5)   मी कोणालाही काही शिकवू शकत नाही. मी फक्त त्यांना विचार करायला लावू शकतो.- सॉक्रेटिस
6)   होणार ते होय. न होणार ते न होय। सुखदु:ख पाहे कर्माधीन॥- संत चोखामेळा
7)   दुसर्यापेक्षा अधिक सुखी होण्याची इच्छा बाळगली नाही तर प्रत्येक माणूस सुखी होईल.-गौतम बुद्ध
8)   ज्ञानावर आधारलेला संयम, अज्ञानावर आधारलेल्या भोळेपणापेक्षा अधिक चांगला.- डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
9)   वीराची योग्यता त्याच्या मरणावर अवलंबून नसून तो लढतो कसा यावर आहे.- स्वातंत्र्यवीर सावरकर

फळांचा राजा आंबा

आंबा हे भारताचे राष्ट्रीय फळ असून जागतिक स्तरावर भारत हा प्रमुख आंबा उत्पादक देश आहे. उत्तर प्रदेश, बिहार, आंध्रप्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र इत्यादी प्रमुख आंबा उत्पादक राज्ये आहेत. महाराष्ट्रातील कोकणात हापूस आंबा हे पारंपारिक फळ असून स्वाद, रंग, चव, टिकाऊपणा यामुळे निर्यातीसाठी मोठी मागणी आहे. महाराष्ट्रातील हापूस व केशर या पारंपारिक जाती आहेत. याशिवाय दापोली येथील बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने रत्ना, सिंधू, कोकण रुची, कोकण राजा, सुवर्णा, सम्राट यासारख्या संकरित आंबा जातींची निर्मिती करून कोकणासह महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये लागवडीसाठी प्रसारित केल्या. निर्यातीसाठी आवश्यक असलेली फळे मिळवण्यासाठी विद्यापीठाने क्ष किरण प्रतिमांकन यंत्र (x- ray imagination technique) विकसित केले असून या यंत्राच्या साहाय्याने इतर कारणांनी बाधित फळे वेगळी करता येतात. मात्र अद्याप हे यंत्र शेतकरी वापरासाठी उपलब्ध झालेले नाही. बिगर हंगामी पाऊस, उशिरापर्यंत असणारी थंडी, तापमानामध्ये अचानक होणारी वाढ, गारपीट यांसारख्या व्याधी आंबा उत्पादनास घातक ठरतात.

मूलभूत गरजांची गरज दाखवणारी गुढी

 आकाशाच्या दिशेने उभारली जाणारी गुढी स्वप्ने गगनाइतकी विस्तीर्ण असण्याचा संदेश देणारी दिसते, तर सोबत जरतारी वस्त्र, कडुनिंब व साखरेच्या माळ, त्यावर तांब्याचा उपडा गडू ठेवत सजलेली गुढी मानवाच्या मूलभूत गरजांना जपण्याची ग्वाही देते. साहस, मांगल्य, नवचैतन्याचे प्रतीक असणारी श्रीरामाच्या विजयाची, शालिवाहन शकाच्या प्रारंभाची गुढी या पौराणिक कथांच्या पार्श्‍वभूमीसोबत वसंत ऋतूला सुरुवात करून देणारी असल्याने ही गुढी पर्यावरण रक्षणाचे आवाहन देखील करते. रांगोळीच्या सडा घालून घराच्या अंगणात उभारली जाणारी गुढी हळूहळू फ्लॅटच्या खिडकीत डोकावू लागली व आता, कुठेही सहज ठेवता येईल अशी बोनसाय गुढी आली.

२४ मार्च: *जागतिक क्षयरोग दिन

जगभरात सोन्याचा जो साठा आहे, त्यातील 20 टक्के भारतीयांकडे आहे.अमेरिकेतील आयबीएम तसेच मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपनीच्या स्टाफमध्ये 28 ते 34 टक्के भारतीय आहेत.तसेच अमेरिकन स्पेस एजन्सी नासामधील तीन कर्मचाऱ्यांपैकी एक कर्मचारी भारतीय आहे.अमेरिकेत प्रॅक्टीस करणारे 100 पैकी 38 डॉक्टर आपले भारतीयच आहेत. तसेच विश्वाची निर्मिती कशी झाली या विषयीचा बिग बॅंग संशोधन प्रकल्पात भारतीय शास्त्रज्ञ आहेत व्वा!
पण आता पुढील आकडेवारीवरही एक नजर टाकूया.आज आपल्या देशामध्ये दररोज 40 हजारहुन अधिक लोकांना क्षयरोगाचा संसर्ग होतो.यापैकी पाच हजारांहून अधिक लोकांनी क्षयाची लागण होते. या पैकी एक हजाराहून अधिक रूग्ण क्षयरोगाने मरण पावतात.म्हणजेच दर दीड मिनिटाला एक रूग्ण क्षयरोगाने मरण पावतो.

ज्येष्ठ अभिनेते कुलदीप पवार

कुलदीप पवार हे मराठी चित्रपट व नाट्य क्षेत्रांतील अभिनेते होते. अरे संसार संसार, शापित, मदार्नी, बिनकामाचा नवरा, गुपचूप, वजीर, जावयाची जात या चित्रपटांमधील, तसेच इथे ओशाळला मृत्यू, निष्कलंक, अर्शूंची झाली फुले, वीज म्हणाली धरतीला या नाटकांमधील यांच्या भूमिका विशेष गाजल्या. परमवीर या दूरदर्शनावरील मालिकेमुळे यांना भरपूर लोकप्रियता लाभली. कुलदीप पवार मूळचे कोल्हापूरचे. त्यांचे वडील बाळ पवार हे मराठी चित्रपटांत छोट्या छोट्या भूमिका करावयाचे. ते पाहून कुलदीप पवार यांच्यामध्ये लहानपणापासून अभिनयाची आवड निर्माण झाली होती. त्याचा उपयोग करण्यासाठी ते कोल्हापूर सोडून मुंबईस गेले.

Sunday 22 March 2020

देशभक्तीने झपाटलेले शहीद हेमू कालानी

माझ्या मनात अजूनही सिंध घुमतो आहे. जिथल्या हेमू नामक २0 वर्षीय युवकाला मार्शल कोर्टाने रेल्वे रूळ उखाडण्याच्या गुन्ह्याखाली फाशीची शिक्षा सुनावली आहे. मला असे वाटते की, त्याच्या या देशभक्तीने प्रेरित कामगिरी येणार्‍या भारतीय पिढीवर फार मोठा प्रभाव पडेल. हेमू आणि अन्य शहिदांच्या देशप्रेमाची इतिहास आठवण ठेवेल! हे बोल आहेत स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे आणि ज्या महान देशभक्तासाठी २६ जानेवारी १९४३ रोजी हे उच्चारल्या गेले होते, त्याचे नाव आहे वीर शहीद हेमू कालानी.

२१ मार्च:दिवस व रात्र समान

खगोलशास्त्राशी निगडित घडणाऱ्या विविध बाबी खगोलप्रेमींबरोबरच सामान्य माणसांनाही आपल्याकडे आकर्षित करीत असतात. दिवस मोठा, रात्र लहान किंवा रात्र मोठी दिवस लहान, दक्षिणायन, उत्तरायण, सुपरमून यांचे दर्शन, खगोलशास्त्राशी निगडित घडणाऱ्या विविध बाबी खगोलप्रेमींबरोबरच सामान्य माणसांनाही आपल्याकडे आकर्षित करीत असतात. दिवस मोठा, रात्र लहान किंवा रात्र मोठी दिवस लहान, दक्षिणायन, उत्तरायण, सुपरमून यांचे दर्शन, अशा काही ठराविक दिवशी घडणाऱ्या दिवसांचे, घटनांचे विशेष अप्रूप सामान्यांना असते. आजचा (२१ मार्च) दिवसही विशेष असून, हा दिवस आणि रात्र आज समान असणार आहे. बारा तासांचा दिवस व बारा तासांची रात्र आज अनुभवण्यास मिळणार आहे.

कोरोनाविषयी माहिती

जगभरात कोरोना व्हायरसमुळे तीन हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. या व्हायरसचा सगळ्यात जास्त फटका चीनला बसला असे म्हटले जात असले तरी आता सर्वाधिक दणका इटलीला बदला आहे. इथल्या लोकांनी वेळीच काळजी न घेतल्याने त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. आपल्या देशातही वेगाने याचा प्रसार होत असला तरी खबरदारीचा उपाय योजले जात आहे. आपली इटली होऊ नये म्हणून लोकांनी सरकारने सांगितलेल्या गोष्टींचे पालन करायला हवे.

ज्येष्ठ साहित्यिक श्री. ना.पेंडसे


श्री. ना. पेंडसेंचा जन्म ५ जानेवारी १९१९ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील मुर्डी या गावी झाला. १९२४ मध्ये पेंडसे मुंबईला स्थायिक झाले ते कायमचे. वयाच्या ११ व्या वर्षांपयर्ंत त्यांनी जो कोकण पाहिला होता, आपल्या मनात साठवला होता, त्यावर ते आयुष्यभर लिहीत राहिले. मग तो साकव असेल, व्याघ्रेश्‍वराचे देऊळ असेल, किंवा नारळी-पोफळीच्या बागा असतील. त्या त्यांच्या भावविश्‍वाचा अतूट भाग झालेल्या होत्या. श्री. ना. पेंडसेंना खाजगीत शिरूभाऊ म्हणत.

Friday 20 March 2020

जागतिक आनंद निर्देशांक 2020

शीर्ष 5 हप्पीस्ट देश- 1. फिनलँड 2. डेन्मार्क 3. स्वित्झर्लंड  4. आईसलँड 5. नॉर्वे
5 तळ दु: खी देश- 1. अफगाणिस्तान 2. दक्षिणसुदान  3. झिम्बाब्वे 4. रवांडा 5. मध्यवर्ती आफ्रिकन रिपब्लिक
 153 राष्ट्रांपैकी 144 व्या स्थानावर भारताचा क्रमांक लागतो.

जागतिक जल दिन

प्रतिवर्षी २२ मार्च हा संयुक्त राष्ट्रांतर्फे ‘जागतिक जल दिन’ म्हणून साजरा केला जातो. २२ मार्च १९९३ रोजी झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत हा निर्णय घेण्यात आला. स्वच्छ व ताज्या पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांची योग्य काळजी घेणे आणि त्यांच्या शाश्वत संरक्षणासाठी कार्यरत राहणे, या मुख्य उद्देशाने हा दिवस सुरू करण्यात आला. पाण्याच्या अनेक स्रोतांपैकी केवळ स्वच्छ व ताज्या पाण्याच्या (फ्रेश वॉटर; ‘गोडे पाणी’ नव्हे!) संदर्भातच हा दिन साजरा केला जातो, हे महत्त्वाचे आहे.

'ओयो'चा रितेश अग्रवाल ठरला जगातील दुसरा सेल्फ मेड बिलेनिअर

ओयो हॉटेल्सचा 24 वर्षीय संस्थापक रितेश अग्रवाल जगातील दुसरा सर्वात तरूण अब्जाधीश ठरला आहे.
हुरून ग्लोबर रिच 2020 च्या यादीनुसार, वयाच्या 24 व्या वर्षी रितेशची संपत्ती तब्बल 7,800 कोटी रुपये आहे. अग्रवालच्या आधी 22 वर्षीय कॉस्मेटिक क्वीन कायली जेनेर असून, तिची संपत्ती 1.1 मिलियन डॉलर एवढी आहे.
2013 साली सुरू झालेली ओयो हॉटेल्स हे भारतातील सर्वात मोठी हॉटेल चेन नेटवर्क आहे. या कंपनीचे मूल्य तब्बल 10 मिलियन डॉलर आहे. ओयो हॉटेल्सचे नेटवर्क यूएस आणि यूरोपमध्ये देखील आहे. याशिवाय ओयो हॉटेल्स चीनमधील दुसरे सर्वात मोठी हॉटेल चेन आहे.

ई. के. जानकी अम्मल राष्ट्रीय पुरस्कार

(इ.स. १८९७ ते १९८४)
वनस्पतिशास्त्र संशोधनातील उत्कृष्ट कार्यास प्रोत्साहन मिळावे आणि तरुण विद्यार्थ्यांना या क्षेत्रात कार्य करण्याची ऊर्जा मिळावी, या उद्देशाने भारत सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामानबदल मंत्रालयाने ‘ई. के. जानकी अम्मल राष्ट्रीय पुरस्कार’ १९९९ पासून सुरू केला. प्रा. ई. के. जानकी अम्मल यांनी ‘सायटोटॅक्सोनॉमी’ (जीवांच्या वर्गीकरणाचे पद्धतिशास्त्र) या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन हा पुरस्कार सुरू करण्यात आला.

Saturday 14 March 2020

शर्विका म्हात्रे: इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये

 भारतातील सर्वात लहान गिर्यारोहक म्हणून नोंद करण्यात आली. अलिबागच्वया शर्विका म्हात्रेची भारतातील सर्वात लहान गिर्यारोहक म्हणून इंडीया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. अलिबाग तालुक्यातील लोणेरे येथे राहणारी शर्विका ही दीड वर्षांपासून गिर्यारोहण करत आहे. तिने अतिशय दुर्गम किल्ले पायी चढून सर केले आहेत. जितेन म्हात्रे यांनी इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसाठी कार्यालयाकडे शर्विकाचे गड किल्ल्यावर पायी चढतानाचे व्हिडीओ आणि कागदपत्रे पाठवली होती. ती तपासल्यानंतर शर्विकाची भारतातील सर्वात लहान गिर्यारोहक म्हणून नोंद करण्यात आली. इंडिया रेकॉर्ड ऑफ बुककडून शर्विकाला मेडल, प्रमाणपत्र, बुक देण्यात आले.

सर विल्यम हर्षल: 'युरेनस' ग्रहाचा शोध लावला

(मार्च १३ १७८१)
युरेनस सूर्यापासून सातव्या क्रमांकाचा ग्रह आहे. तो बराचसा वायूंचा बनलेला आहे. तो व्यासानुसार तिसरा आणि वस्तुमानानुसार चौथा ग्रह आहे. युरेनस ग्रह पृथ्वीच्या तुलनेत अनेक पटींनी मोठा आहे. पृथ्वीपासून त्याचे अंतर २.८ अब्ज कि.मी. आहे. युरेनसला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पुरी करण्यास ८४ वर्ष लागतात. नासाच्या "व्हॉयेजर २" या यानाने युरेनस ग्रहाला भेट दिली आहे. या ग्रहासाठी सध्या तरी कोणत्याही नव्या मोहिमेचा विचार नाही.

नीता अंबानी जगातील 'टॉप टेन' प्रभावशाली महिला

आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघाच्या मालकीण आणि प्रसिद्ध भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांचा जगातील प्रभावशाली महिलांच्या यादीत समावेश झाला आहे. प्रसिद्ध अमेरिकन टेनिसस्टार सेरेना विल्यम्स आणि जिम्नॅस्टिक सिमोन माईल्स या क्रीडा जगतातील सर्वात प्रभावशाली महिला ठरल्या आहेत.  स्पोर्ट्स बिझनेस नेटवर्क आणि आय. ए. स्पोर्ट कनेक्ट यांच्यावतीने २०२० या वर्षासाठीच्या इन्फ्लुएन्शिअल वूमन इन स्पोर्ट महिलांची यादी जाहीर केली. या यादीत २५ महिलांची निवड करण्यात आली. नीता अंबानी या क्रिकेट आणि फुटबॉल या क्रीडा प्रकारांशी निगडीत असल्याने त्यांचा टॉप टेन यादीत समावेश झाला आहे.

अॅल्बर्ट आइन्स्टाइन:सैद्धान्तिक भौतिकशास्त्रज्ञ

(जन्म - मार्च १४, इ.स. १८७९)
अ‍ॅल्बर्ट आइन्स्टाइन (मराठी लेखन - अल्बर्ट आईन्स्टाईन), (जर्मन: Albert Einstein ;) (मार्च १४, इ.स. १८७९ - एप्रिल १८, इ.स. १९५५) हे एक सैद्धान्तिक भौतिकशास्त्रज्ञ होते आणि सार्वकालिक सर्वश्रेष्ठ वैज्ञानिकांपैकी एक म्हणून ते गणले जातात. सापेक्षतावादाचा सिद्धान्त, (विशेष सिद्धान्त, सामान्य सिद्धान्त), प्रकाशीय विद्युत परिणाम, पुंजभौतिकी, विश्वशास्त्र, विश्वरचनाशास्त्र वगैरे क्षेत्रांमध्ये त्यांचे विशेष योगदान आहे. त्यापैकी प्रकाशीय विद्युत परिणाम या सिद्धान्तासाठी आणि "त्यांच्या सैद्धान्तिक भौतिकशास्त्राच्या सेवेसाठी" इ.स. १९२१ साली त्यांना नोबेल पुरस्कार देऊन "सन्मानित" केले गेले. आइन्स्टाइन यांना त्यांच्या सापेक्षतावादाच्या सिद्धान्तानंतर जगभर अफाट प्रसिद्धी मिळाली आणि ते जगातील प्रसिद्ध चेहर्‍यांपैकी एक बनले.

Tuesday 10 March 2020

ससा या प्राण्याविषयी माहिती

ससा हा गोंडस प्राणी आहे. अनेकांचे लक्ष सशाकडे सहज वेधले जाते. सशाची आकृती चंद्रावर दिसते, असे वर्णन नेहमीच मानव करत आला आहे. अर्थात ते चंद्रावरचे डाग आहेत. सशांची वस्ती जगभर आढळते. खरे म्हणजे त्यांचे दोन प्रकार आढळतात. जाती अनेक आहेत; पण बिळात राहणारे, कळपात वावरणारे हा एक प्रकार, तर उघड्यावर वावरून झुडपाच्या वा जमिनीतील खळग्यांच्या आश्रयाने राहणारे, पण एकेकटे वावरणारे हा दुसरा प्रकार. बिळातल्या प्रकाराला 'रॅबिट' म्हणतात, तर उघड्यावर एकटाच आढळणारा 'हेअर' या नावाने ओळखला जातो.

Saturday 7 March 2020

जागतिक महिला दिन का साजरा करतात?

महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला. संपूर्ण अमेरिका आणि युरोपसहित जवळजवळ जगभरच्या स्त्रियांना विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मतदानाचा हक्क नाकारलेला होता. पुरुषप्रधान व्यवस्थेतील स्त्री-पुरुष विषमतेचे हे एक ढळढळीत उदाहरण. या अन्यायाविरुद्ध स्त्रिया आपापल्या परीने संघर्ष करीत होत्या. १८९० मध्ये अमेरिकेत मतदानाच्या हक्कासंदर्भात `द नॅशनल अमेरिकन सफ्रेजिस्ट असोसिएशन' स्थापन झाली.

Friday 6 March 2020

कशात किती पाणी

शरीरात पाणी टिकून रहावं यासाठी काही फळं आणि भाज्यांचं सेवन लाभदायक ठरतं. याविषयी सविस्तर माहिती घेऊ या. * सफरचंदात ८४ टक्के पाणी असून 'सॉर्बटोल' नावाचा घटक असतो. यामुळे तहान भागते शिवाय लवकर भूकही लागत नाही. सफरचंदाच्या नित्य सेवनामुळे वजन कमी होण्यास मदत होते. * केळ्यात ७४ टक्के पाणी असतं. यातल्या कॅल्शियम आणि पोटॅशियममुळे सांधेदुखीचा त्रास कमी होतो. * वांग्यात ७२ टक्के पाणी असतं. यातल्या फायबरमुळे पचनसंस्थेचं कार्य सुधारतं आणि बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवत नाही. * काकडीत ९६ टक्के पाणी असतं. तर 'क' जीवनसत्त्व आणि फायबरही असतं. यामुळे त्वचेतला ओलावा टिकून राहतो. पचनसंस्थेचं कार्यही सुरळीत सुरू राहतं.

Wednesday 4 March 2020

पोलीस सहआयुक्त डॉ. शिसवे यांच्या युवकांना काही टिप्स

*पहिल्याच वेळी आपल्याला यश मिळालं की डोक्यात हवा जाण्याची शक्यता अधिक असते. अपयशातून यशाचा मार्ग सापडतो तेव्हाच खऱ्या अर्थाने यशाची किंमत कळते. मात्र त्यावेळी आपल्यासमोर असलेला आदर्शवाद,मूल्यांची कास आयुष्यभर कधीच सोडू नका. कुठल्याही क्षेत्रात करिअर करा,मात्र 'न मुंह छुपा के जियो और न सर झुका के जियो'.
* स्वतःची संवेदनशीलता कधीही कमी होऊ देऊ नका. त्याची स्वतःच वारंवार उजळणी करा.
*आपण पहिल्यांदा गाव सोडतो तेव्हा आई-वडिलांच्या डोळ्यांत आलेले अश्रू प्रत्येक वळणावर आठवा.
*प्रलोभने जरूर येतात, पण स्वतःचा आतला आवाज सतत जिवंत ठेवा.

विसाव्या शतकातील औद्योगिक शोध- व्हेंटिलेटर

(१९४९) 
गंभीर अवस्थेतील रोग्याला श्वासोच्छ्वास घेता येत
नसेल तर त्याला व्हेंटिलेटरवर ठेवले जाते. आधुनिक
व्हेटिलेटरचे पूर्वज होते. लोखंडी फुफ्फुस (Iron Lung). ते १९२८ मध्ये तयार झाले होते. पोलिओ झालेल्या रुग्णाच्या छातीचे स्नायू कमजोर झाल्यास तो श्वास घ्यायच्या अडचणीत येत असे. त्याचा श्वासोच्छवास चालू राहावा यासाठी हे अगडबंब उपकरण प्रामुख्याने तयार झाले होते. त्यात सुधारणा करण्याचे काम १९३१ मध्ये सुरू झाले होते. अमेरिकन जैववैद्यकीय उपकरण शोधक जॉन इमरसन (१९०६-९७) याने त्यात यश मिळवले. त्यात त्याला हार्वर्ड विद्यापीठातील भूलशाख खात्यातील मित्रांची मदत झाली.
१९४० साली पोलिओची मोठी साथ आली होती, तेव्हा अशा यंत्राची गरज वाढली होती, त्याचवेळी शाखक्रिया करताना स्नायू शिथिल करणाऱ्या औषधांचा वापर केला जात असताना रुग्णाची श्वसन यंत्रणा दुर्बळ होत असल्याने, यंत्राची गरज भासत असे.

ज्ञान-किरण

१. 'वर्ल्ड वाईड वेब कॉन्सोर्टीअम' या संस्थेला कोणत्या नावाने ओळखतात?
२. देशात अवयवदानात अग्रेसर असणारं राज्य कोणत?
३. कवी 'बी' हे कोणाचं टोपणनाव आहे?
४. न्यायमूर्ती सरकारिया आयोग कशासाठी स्थापन केला होता?

Tuesday 3 March 2020

पाच वर्षांत सोळ हजार सायबर गुन्हे

सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ३ हजार पोलिसांना प्रशिक्षण दिले जाणार असून आतापर्यंत सहा हजार आरोपींना अटक करण्यात आली आहे. राज्यात मागील पाच वर्षात १६ हजार ५१५ सायबर गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यामध्ये ६०२० आरोपींना अटक करण्यात आली असून वाढत्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी अर्जट फ्रॉड (पेटीएम) नावाचा ग्रुप तयार केला आहे. सायबर गुन्ह्यांचा प्रभावीपणे तपास करण्यासाठी ३ हजार २५३ पोलिस अधिकारी व अंमलदारांना प्रशिक्षण देण्यात येत असल्याची माहिती विधानसभेत देण्यात आली.

सापांविषयी माहिती

जगभरात सापांच्या ३००० जाती आहेत. भारतात त्यापैकी सुमारे २०५ जाती आढळतात. त्यातली ५२ जाती विषारी आहेत. या ५२ पैकी ही जवळ जवळ ४० जाती समुद्रात राहाणाऱ्या आहेत. विषाच्या संदर्भात सापांचे वर्गीकरण तीन प्रकारे केले जाते. बिनविषारी, निमविषारी, आणि विषारी. बिनविषारी सापांना विषग्रंथी नसतात. त्या मुळे ते चावले तरी माणसांना अपाय होत नाही. नानेटी, दिवड, धामण हे साप बिनविषारी आहेत. निमविषारी व विषारी या दोन्ही प्रकारचे साप प्रत्यक्षात विषारीच असतात. पण निमविषारी सापांच्या विषापासून माणसाच्या जिवाला सहसा धोका संभवत नाही. निमविषारी साप त्यांचे विष भक्ष्याला बेशुद्ध करायला किंवा पचवायला वापरतात. मांज-या, हरणटोळ हे निमविषारी साप आहेत. नाग, मण्यार, फुरसे, घोणस हे महाराष्ट्रातील प्रमुख विषारी साप आहेत.

Monday 2 March 2020

असतील शिते तर...

काही प्रदेशांची काही वैशिष्टयं असतात. ती पोषाखाशी, तिथल्या पिकांशी संबंधित असतात. त्याचे परिणाम तिथल्या बोलीवर होत असतात.तिथल्या भाषेवरही होत असतात. घाटमाथ्यावरून खाली समुद्राकडं उतरत चाललो की भुताखेतांच्या गोष्टी लेणं मराठीचं कानावर पडू लागतात. या भुतांचेही अनेक प्रकार. मुंजा, खवीस, समंध, हडळ हे त्यातलेच काही. आता प्रत्यक्षात जरी हे नसले तरी लोकमनात घर करून असतातच. एकदा का हे पाठी लागले की त्यांना शांत करावं लागतंच. जे हाती असेल, उपलब्ध असेल ते द्यावं लागतं. मग हे त्रस्त समंध शांत होतात असा समज. या प्रदेशात भाताचं पीक मुबलक. मग त्यांना भात ठेवला की ते शांत होतात हा समज रूढ झाला.

महिला कमांडर अँनी दिव्या

मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली अँनी दिव्या कधीच विमानात बसलेली नाही, पण आज ती जगातील सर्वात मोठय़ा प्रवासी विमानांपैकी असलेले बोईंग ७७७ हे विमान उडवणारी सर्वात तरुण महिला वैमानिक बनली आहे. ३0 वर्षीय अँनी जगातील सर्वात कमी वयाची एकमेव महिला कमांडर आहे. बोईंग ७७७ विमान इतके मोठे असते की यामध्ये ३५0-४00 प्रवासी एकाच वेळी प्रवास करू शकतात. पंजाबमधील पठाणकोट येथे जन्मलेल्या अँनीचे वडील सैन्यात एक सैनिक होते. ती जेव्हा १0 वर्षांची होती तेव्हा वडिलांचे पोस्टिंग आंध्र प्रदेशच्या विजयवाडा येथे झाले. पायलट बनण्याचे स्वप्न अँनी लहानपणापासून पाहत होती, पण तिचे इतक्या सहजासहजी पूर्ण होणार नव्हते. वडिलांची आर्थिक परिस्थिती ऐवढी चांगली नव्हती की ते तिच्या पायलट अभ्यासासाठी १५ लाख देऊ शकत नव्हते.

देशातील पहिले उद्योगपती जमशेदजी टाटा

भारत हा कृषिप्रधान देश होता. बहुसंख्येने लोक हे शेतीवर अवलंबून होते. शेतकरी, शेतमजूर यांना शेतीच्या कामासाठी लागणारे साहित्य कोण उपलब्ध करून देत होते? वखर,नांगर, खटारा, चाक, कुदळ, फावडे, टिकाव कोण बनवित होते? तर गावातील लोहार, सुतार यांच्याकडे मुबलक प्रमाणात हे साहित्य उपलब्ध होत नव्हते. हे सर्व साहित्य उपलब्ध करून देणारा देशातील पहिला उद्योगपती कोण आहे? असे आजच्या सुशिक्षित पिढीला नाव विचारले तर सांगता येणार नाही. भारत माझा देश आहे. सर्व भारतीय माझे बांधव आहेत. त्यांच्यासाठी लागणारे चांगल्या दर्जाचे साहित्य उपलब्ध करून देणे हे माझ्या कंपनीचे उद्दिष्ट आहे,असा म्हणणारे भारतीय उद्योगपती आपणास माहिती आहे काय? जमशेदजी नसरवानजी टाटा यांचा जन्म ३ मार्च १८३९ रोजी पारशी कुटुंबात झाला.

दूरध्वनीचा शोध लावणारे अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल

अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांचे सगळ्यात महत्त्वाचे संशोधन म्हणजे दूरध्वनी. दूर अंतरावर असलेल्या आपल्या प्रिय व्यक्तीचा आवज काही सेकंदात आपल्यापयर्ंत पोहोचविणारे यंत्र असावे असे वाटत असल्याने बेल यांनी दूरध्वनी यंत्राचा शोध लावला. बेल यांचा जन्म ३ मार्च १८४७ रोजी एडिनबरा, स्कॉटलंड येथे झाला. त्यांचे आजोबा, वडील-अलेक्झांडर मेलव्हिल बेल आणि भाऊ या सगळ्यांचा मूक-बधिरांच्या शिक्षणाशी जवळचा संबंध होता. तर त्यांची आई आणि पत्नी या दोघीही कर्ण बधिर होत्या. लहानपणी अलेक्झांडर हे नाव ठेवण्यात तरी वयाच्या ११ व्या वर्षी स्वत:च्या नावात ग्रॅहॅम नाव टाकून घेऊन मग अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल या नावाने पुढे ते ओळखले जाऊ लागले.

ऑक्सिजनशिवाय जगणाऱ्या सजीवाचा शोध

पृथ्वीवर जगण्यासाठी प्राणवायू ऑक्सिजनची आवश्यकता असते, याची माहिती शालेय अभ्यासक्रमात झाली. प्राणवायूशिवाय जीवसृष्टी तग धरूच शकत नाही, हा सिद्धांतही विज्ञानात मान्य झाला. मात्र, याच सिद्धांताला आव्हान देणारे नवे संशोधन समोर आले आहे. पृथ्वीवर जगण्यासाठी प्राणवायू ऑक्सिजनची आवश्यकता असते, याची माहिती शालेय अभ्यासक्रमात झाली. प्राणवायूशिवाय जीवसृष्टी तग धरूच शकत नाही, हा सिद्धांतही विज्ञानात मान्य झाला. मात्र, याच सिद्धांताला आव्हान देणारे नवे संशोधन समोर आले आहे. प्राणवायूशिवायही जगू शकणारा सजीव शास्त्रज्ञांनी शोधून काढला आहे. हेनेगिया सॅमिनिकला असे या सजीवाचे नाव आहे.

टेनिसपटू मारिया शारापोव्ह

सौंदर्य आणि गुणवत्तेचा मिलाप हा शारापोव्हाकडे होता. टेनिस कोर्टवरील तिचा वावरसुद्धा तितकाच लक्षवेधी होता. वयाच्या १७ व्या वर्षी विम्बल्डनच्या हिरवळीवर ग्रँडस्लॅम जेतेपद आणि मग वर्षभरातच जागतिक टेनिस क्रमवारीतील अग्रस्थान काबीज केल्यानंतर मारिया शारापोव्हाने टेनिसजगताच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. परंतु गुणवत्ता असूनही १७ वर्षांच्याटेनिस कारकीर्दीत तिला अवघ्या पाच ग्रॅँडस्लॅम विजेतेपदांवर समाधान मानावे लागले. दुखापतीमुळे या टेनिससम्राज्ञीची कारकीर्द शापित राहिली.. त्यामुळेच गेल्या काही वर्षांतील खेळ पाहता तिची निवृत्ती धक्कादायक मुळीच नव्हती.

समुद्रपाण्याचा औद्योगिक वापर व लाटांपासून ऊर्जा

समुद्रातून काय मिळते, या प्रश्नाचे खरे उत्तर द्यायचे झाले तर 'काय मिळत नाही ?' असेच द्यावे लागेल. समुद्राच्या पाण्यापासून मीठ बनवता येते व मासेमारी करून मासे मिळवता येतात, याच गोष्टी फक्त आपल्या डोळ्यासमोर येतात. या दोन गोष्टी अन्नपदार्थ म्हणून तितक्याच महत्त्वाच्या आहेत. मिठाशिवाय सारे अन्नच आर्णी बनते, तर मासे हेच अनेकांचे प्रमुख अन्न आहे. तसेच लाटांपासून ऊर्जा सुद्धा मिळवता येते.

चित्ता आयात करून संवर्धन केले जाणार


भक्ष्य म्हणून निवडलेल्या प्राण्याचा प्रचंड वेगाने पाठलाग करणारा, कमनीय बांध्याचा चित्ता आपल्या परिचयाचा आहे. त्याचे शरीर म्हणजे एक अचूकपणे पळणारे यंत्रच! त्याच्या नष्ट होत चाललेल्या अधिवासामुळे विसाव्या शतकातच तो भारतातून नामशेष झाला. सध्या तो आफ्रिका, नामिबिया वगैरे ठिकाणी सापडतो. पिवळ्या रंगाच्या शरीरावर काळे भरीव ठिपके आणि डोळ्यांच्या आतील कोपऱ्यातून खालपर्यंत येणारा काळा ओघळ ही त्याची ओळख. वेगासाठी बनलेले अवघे शरीरच जणू.. चित्ता जमिनीवर सर्वात वेगाने धावणारा प्राणी आहे. तो साधारणत: ताशी ११५-१२० किमी या वेगाने पळू शकतो. त्याच्या शरीररचनेबरोबरच त्याचे अवयवदेखील वेगासाठीच अनुकूल असतात.

यूपीएससीचा नवीन टाय-ब्रेकिंग नियम

केंद्रीय लोकसेवा आयोगाने यूपीएससी परीक्षेसाठी नवीन टाय-ब्रेकिंग नियम जारी केले आहेत. जेव्हा दोन किंवा अधिक उमेदवारांना सारखेच गुण मिळतात त्यावेळी हे नियम लागू होतात. आयोगाने यंदा नागरी सेवा परीक्षेसाठी दोन फिल्टरवाले नियम तयार केले आहेत. यानुसार समान गुण असणाऱ्या दोन उमेदवारांमध्ये व गुणांनुसार किंवा मग वयानुसार रँक ठरवला जाणार आहे.

Sunday 1 March 2020

वाढवा आपले सामान्य ज्ञान1


वाढवा सामान्य ज्ञान
उत्तर : १) सूर्य विषववृत्तावर असताना २) २७ सप्टेंबर ३) कॅनबेरा  ४) किरण देसाई ५) सत्या नाडेला
१) जगभरात दिवस-रात्र कोणत्या स्थितीत एकसमान असतात?
२) जागतिक पर्यटन दन कधी साजरा केला जातो?
३) ऑस्ट्रेलियाची राजधानी कोणती?
४) 'इनहेरिटन्स ऑफ लॉस' ही कादंबरी कोणाची आहे?
५) मायक्रोसॉफ्टचे सीईओ कोण आहेत?

सहकार महर्षी वसंतदादा पाटील

जेष्ठ नेते वसंतदादा पाटील यांचे व्यक्तिमत्त्व सरळमार्गी, सुस्वभावी,अन्यायाविरुध्द पेटून उठणारे ,बंडखोरी करणारे होते. सामान्य माणसांतून ताकद निर्माण करून अफाट कर्तृत्व गाजविणारेही होते. सोप्या, सुंदर भाषेत सहजपणे संवाद साधणाऱ्या वसंतदादा पाटील यांचे राजकीय जीवन प्रचंड बंडखोरीने भरलेले होते. त्यामुळेच राजकीय संघर्षातून मिळविलेले कोणतेही पद संपूर्ण कालावधीसाठी त्यांनी कधीच सांभाळले नाही. सत्तेची खुर्ची फेकून देवून सातत्याने स्वाभिमानाने जगण्याची बंडखोर वृत्ती त्यांच्या कणाकणात भरलेली होती. सत्तेचा मोह कधीच झाला नाही.