Saturday 24 November 2018

मेरी कोमला सहाव्यांदा विश्‍वविजेतेपद


नवी दिल्लीत सुरु असलेल्या जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या मेरी कोमने ऐतिहासीक कामगिरीची नोंद केली आहे. 48 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत खेळत असताना मेरी कोमने युक्रेनच्या एच.ओखोटोचा पराभव करत सहाव्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. या कामगिरीसह मेरी कोमने आयर्लंडच्या केटी टेलरचा 5 विजेतेपदांचा विक्रम मोडीत काढला आहे. या विजेतेपदासह मेरी कोमने क्युबाचा बॉक्सर फेलिक्स सेव्हॉनच्या 6 विजेतेपदांच्या कामगिरीशी बरोबरी केली आहे. जागतिक महिला बॉक्सिंग स्पर्धेत युक्रेनच्या हॅना ओखोता हिला नमवित सहाव्यांदा विश्वविजेतेपद पटकावणार्या मेरी कोमवर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे. विश्वविजेतेपद पटकावल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, क्रीडामंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांच्यासह अनेकांनी मेरी कोमचे सोशल मीडियावरून अभिनंदन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करीत मेरी कोमचे अभिनंदन केले आहे. भारतीय खेळांसाठी आजचा दिवस अभिमानास्पद आहे. जागतिक महिला बॉक्सिंग स्पर्धेत चॅम्पियन बनलेल्या मेरी कोमला खूप सार्या शुभेच्छा. तिनं ज्या कठीण प्रसंगातून हा विजय मिळवला आहे. तो खरोखरच प्रेरणादायक आहे. तिचा हा विजय खास आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ट्विटला मेरी कोमने उत्तर देत पंतप्रधानांचे आभार मानले. पंतप्रधानांसह क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनीही मेरी कोमचे कौतुक केले आहे. पहिल्या सत्रात मेरी कोमने संपूर्णपणे वर्चस्व गाजवत ओखोटोला पुनरागमन करण्याची संधीच दिली नाही. दुसर्या फेरीत ओखोटोने मेरी कोमला चांगली झुंज देण्याचा प्रयत्न केला. दुसर्या फेरीदरम्यान ओखोटोने मेरीला खालीही पाडलं, मात्र यामधून सावरत मेरीने पुन्हा एकदा दमदार पुनरागमन केलं. तिसर्या सत्रामध्ये ओखोटोने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत मेरी कोमला चांगलचं जेरीस आणलं. मात्र मेरीने सामन्यावरचं आपलं नियंत्रण कायम ठेवलं.

नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रेमानंद गज्वी


99व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नाटककार आणि लेखक प्रेमानंद गज्वी यांची निवड करण्यात आली आहे. 98 व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या मावळत्या अध्यक्षा कीर्ती शिलेदार यांच्याकडून गज्वी पदभार स्वीकारतील. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या बैठकीत हा निर्णय शुक्रवारी घेण्यात आला. संमेलनाध्यक्ष पदासाठी श्रीनिवास भणगे, अशोक समेळ, सुनील साकोळकर ही नावं चर्चेत होती. मात्र प्रेमानंद गज्वी यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. यंदाच्या नाट्य संमेलनाचे ठिकाण अजून जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र लवकरच ठिकाणाची घोषणा केली जाणार आहे. नागपूर, लातूर, पिंपरी चिंचवड या ठिकाणांपैकी एक नाव जाहीर होण्याची शक्यता आहे. नाट्य संमेलन समिती या ठिकाणांचा दौरा करून संमेलनाचे अंतिम ठिकाण लवकरच जाहीर करेल. किरवंत, देवनगरी, तन-माजोरी, गांधी-आंबेडकर, व्याकरण, पांढरा बुधवार, काळोखाची लेक, अभिजात जंतू, छावणी अशी 14 नाटके, घोटभर पाणी, बेरीज वजाबाकी, हे राम!, कृष्णविवर अशा 4 एकांकिका संग्रहासह 12 एकांकिका गज्वी यांच्या नावावर आहेत. एकतारी कवितासंग्रह, लागण, ढीवर डोंगा हे कथासंग्रह, जागर, हवे पंख नवे या दोन कांदबर्या, सगुण नगुण, बोधी कला संस्कृती आदी ललित ग्रंथांचे गज्वी यांनी लिखाण केले आहे.

सुविचार संग्रह भाग 2


1)   मनापासून प्रयत्न करणार्याला सर्व साध्य आहे.-यदुनाथ थत्ते
2)   करंट्यास आळस आवडे। यत्न कदापि नावडे। त्याची वासना वावरे। अधर्मी सदा।- समर्थ रामदास
3)   भावनेच्या रंगाने रंगलेली बुद्धी म्हणजेच काव्य होय.-प्रो.विल्सन
4)   अनिवार्य भावनेचा सहजस्फूर्त उद्रेक म्हणजे कविता होय.- वर्डस्वर्थ
5)   नास्तिकांच्या मते ईश्वर म्हणजे शून्य आहे व आस्तिकांच्या मते पूर्णविराम आहे.- स्वामी रामतीर्थ
6)   मुंगीपाशी जा. तिच्यापासून उद्योग शिका व शहाणे व्हा.- ओल्ड टेस्टामेंट
7)   क्रोधी बनून पापाचे भागीदार बनण्यापेक्षा, पापाविषयी राग येऊ द्या.- जॉन वेबस्टर
8)   कला ही भूतकाळाची कन्या. वर्तमानकाळाची पत्नी व भविष्यकाळाची माता असते.-वि..खांडेकर
9)   आळस ही मी एकप्रकारची आत्महत्याच समजतो.- सिसेरी
10) कोणताही भार आनंदाने उचलला की तो हलका होतो.- ओविद
11) प्रसन्नता हे परमेश्वराने दिलेले औषध आहे.- स्वेट मॉर्डन
12) सतत परिश्रम केल्यानेच मनुष्याचे जीवन सुखी बनते.-एअस्किन बॉन्ड
13) असत्य कितीही ठासून सांगितले तरी ते कधीही सत्य बनू शकत नाही.-भर्तृहरी
14) ईश्वर निराकार आहे;परंतु तो भक्तांच्या आर्त प्रार्थनेनुसार स्वत:च्या शक्तीने वेगवेगळी रूपे धारण करतो.-दयानंद सरस्वती
15) एक सत्य लपवण्यासाठी हजारदा खोटे बोलावे लागते.- आर्य चाणक्य
16) असत्याची अनेक रूपे असतात,तर सत्याचे फक्त एकच रूप असते.-रुसो
17) अहंभाव करील सम। तेणे पावसी विश्राम रे।- संत ज्ञानेश्वर
18) तुमचा अहंकार दुसर्यांना कदाचित डंख करेल; परंतु तुमचे मात्र अध:पतनच करेल. कन्फ्युशियस
19) ऊृक्ष फार कवति फळभारे, लोंबती जलद घेऊनि नीरे, थोर गर्व न धरी विभवाचा, हा स्वभाव उपकार परांचा।-वामन पंडित
20) अहंकार माणसाला फुलवतो; परंतु त्याला कधीही आधार देत नाही.-रस्किन बॉन्ड
21) असत्य बोलणे तलवारीच्या जखमेप्रमाणे असून जखम भरली तरी त्याची खूण कायम राहते.-शेख सादी
22) आनंदाचा स्त्रोत तुमच्याजवळ आहे, त्याचा इतरत्र शोध घेऊ नका.-स्वामी रामतीर्थ (मच्छिंद्र ऐनापुरे यांच्या संग्रहातून)



Wednesday 21 November 2018

जलजन्य आजाराने राज्यात 49 जणांचा बळी

२०१५ सालापासून साडेतीन वर्षांत पावसाळ्याच्या काळात डोके वर काढणाऱ्या जलजन्य आजारांची संख्या वाढल्याचे दिसून आले आहे. मात्र तरीदेखील या आजारांवर नियंत्रण आणल्याचा दावा आरोग्य सेवा संचालनालयातर्फे करण्यात आला आहे. २०१५ पासून साडेतीन वर्षांत कॉलरा, गॅस्ट्रो, अतिसार, काविळ, विषमज्वर यासारख्या आजारांमुळे राज्यात ४९ बळी गेले. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत आरोग्य सेवा संचालनालयाकडे विचारणा केली होती. २०१५ ते जुलै २०१८ या कालावधीत कॉलरा, गॅस्ट्रो, अतिसार, काविळ, विषमज्वर यासारख्या आजारांची किती जणांना लागण झाली, या आजारांमुळे किती रुग्णांचा मृत्यू झाला, आजारांवर नियंत्रणासाठी किती औषधांची खरेदी झाली इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार साडेतीन वर्षांच्या कालावधीत राज्यात २१ हजार १४० नागरिकांना जलजन्य आजारांची लागण झाली. यातील ४९ जणांचा मृत्यू झाला. २०१५ मध्ये लागण झालेल्यांची संख्या ५ हजार १७५ इतकी होती. २०१६ मध्ये हा आकडा ६ हजार १२ वर पोहोचला तर तर २०१७ मध्ये ८ हजार ५४९ जणांना लागण झाली. २०१८ मध्ये जुलै महिन्यापर्यंत १ हजार ४०४ जणांना हे आजार झाले आहेत.
२०१५ पासून दरवर्षी सातत्याने संख्या वाढल्याचे दिसून आले. तर २०१८ मधील पावसाळ््यातील आकडेवारी देण्यात आलेली नाही. अशा स्थितीत सर्वच आजारांवर नियंत्रण आल्याचा आरोग्य सेवा संचालनालयाचा दावा विरोधाभासी असल्याचे दिसून येत आहे.

‘गॅस्ट्रो’चा ज्वर ठरतोय धोकादायक
२०१५ सालापासून ‘कॉलरा’, अतिसार, विषमज्वर यांची लागण झालेल्या रुग्णांची संख्या घटली आहे. मात्र ‘गॅस्ट्रो’ हा सर्वाधिक धोकादायक ठरतो आहे. साडेतीन वर्षांत ९ हजार ८२२ नागरिकांना याची लागण झाली व २६ नागरिकांचा बळी गेला. ९ हजार ४० नागरिकांना अतिसाराची लागण झाली व १० जणांचा जीव गेला.

Thursday 15 November 2018

लग्नानंतर ईशा अंबानी राहणार 452 कोटींच्या बंगल्यात


अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी लग्नानंतर पती आनंद पिरामलसोबत वरळी सी-फेस येथील आलिशान बंगल्यात राहणार आहे. या पाच मजली बंगल्याची किंमत 452 कोटी एवढी आहे. सहा वर्षापूर्वी आनंद पिरामल यांचे वडील अजय पिरामल यांनी हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेडकडून या बंगल्याची खरेदी केली होती. वरळी सी-फेसजवळ असलेला हा बंगला 50 हजार चौरस फूट परिसरात बांधण्यात आला आहे. आनंद आणि ईशा यांना लग्नाची भेट म्हणून हा बंगला देण्यात येणार आहे. त्यासाठी 19 सप्टेंबर रोजीच त्यांनी पालिकेकडून कागदपत्रेही मिळविली आहेत. या पाच मजली बंगल्यात बेसमेंटला 3 मजले वेगळे आहेत. त्यात दुसरा आणि तिसरा मजला सर्व्हिस आणि पार्किंगसाठी आहे. लेव्हल-1 बेसमेंटमध्ये एक लॉन, ओपन एअर वॉटर बॉडी आणि एक डबल हाइट मल्टिपर्पज रूम आहे. ग्राऊंड फ्लोअरला एक प्रवेशद्वार आहे. वरच्या मजल्यावर राहण्याच्या रूम असून डायनिंग हॉल तसेच ट्रिपल हाइट मल्टिपर्पज रूम, बेडरूम आणि स्टडी रूम आहे. या बंगल्याचं वैशिष्ट्ये म्हणजे त्यात लाऊंज एरियाही आहे. त्याशिवाय ड्रेसिंग रूम आणि नोकरांसाठी रूमही बनविण्यात आले आहेत. हा बंगला हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेडच्या ट्रेनिंग सेंटरच्या एका प्लॉटवर बांधण्यात आला आहे. पिरामल यांनी 2012मध्ये हा बंगला 452 कोटींना विकत घेतला होता. त्यानंतर या बंगल्यातील बांधकामावरून काही वाद निर्माण झाला होता. मात्र हा वाद मिटल्याने 2015 मध्ये या बंगल्याच्या बांधकामास पुन्हा सुरुवात झाली होती. सध्या हा बंगला बांधून पूर्ण झाला असून इंटिरियर फिनिशिंगचे काम सुरू आहे. 1 डिसेंबरपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आलं आहे. त्याच दिवशी या बंगल्यात पूजा आयोजित करण्यात आली आहे. तर आनंद आणि ईशा यांचा विवाह 12 डिसेंबर रोजी होणार असल्याचं सूत्रांनी सांगितले.

Tuesday 6 November 2018

रोहित शर्माचे विक्रम

सलामीवीर रोहित शर्मा भारतीय फलंदाज बनला आहे,  ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट ट्वेंटी -20 मध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. रोहितने भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर वेस्टइंडीजसोबत खेळलेल्या दुसऱ्या टी -20 सामन्यात ही कामगिरी केली.याव्यतिरिक्त रोहित शर्मा टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतासाठी सर्वाधिक शतके  झळकावणारा फलंदाज बनला आहे. टी -20 सामन्यांत त्याने चार शतके काढली आहेत. रोहितने 86 सामन्यांत 2203 धावा केल्या आहेत. रोहितच्या आधी भारतीय क्रिकेट संघाचा  कर्णधार विराट कोहली भारतीय फलंदाज होता. त्याने टी -20 मध्ये सर्वाधिक धावा केल्या या काळात त्याने चार शतके आणि 15 अर्धशतक झळकावले आहेत. विराट (2102), सुरेश रैना (1605), महेंद्रसिंग धोनी (1487) आणि युवराज सिंग (1177) यांनी टी -20 मध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत. शिखर धवननेही भारताकडून 1000 धावा केल्या आहेत, त्यानेही  फलंदाजांच्या यादीत आपले स्थान पटकावले आहे.

रोहित शर्मा के शतक
टीम                रन      साल
साउथ अफ्रीका- 106    2015
श्रीलंका            118- 2017
इंग्लैंड-           100*  2018
वेस्टइंडीज-     111*  2018
टी-20 में सबसे ज्यादा रन
मार्टिन गुप्टिल- 2271
रोहित शर्मा- 2203
शोएब मलिक- 2190
ब्रैंडन मैकुलम-2140
विराट कोहली-2102

Thursday 1 November 2018

समानार्थी,विरुद्धार्थी शब्द, निबंध


                                                          (संकलन-मच्छिंद्र ऐनापुरे,जि..शाळा,एकुंडी ता.जत)
इयत्ता-सातवी        विषय-मराठी
प्रश् 1. पुढील शब्दांचे प्रत्येकी दोन भिन्न अर्थ लिहा.
)  अभंग-1) न भंगणारे 2) ओव्या असलेला एक मराठी छंदप्रकार
)   बोट-1) हाताचे बोट 2) जहाज
)   हार-1)माळ, 2) पराभव ऊ) नाव-1) होडी,2) नाम ए)कपात-1) चहाच्या प्याल्यात 2) कमी करणे
) 
प्रश् 2.समानार्थी शब्द लिहा.
1)   कंठा-माळ, हार 2) अपमान-1) अनादर 2) अवमान 3) पहाट-झुंजूमुंजू, उष:काल 4) जीभ- जिव्हा,रसना 5) किर्र- गर्द,दाट 6)काव्य-कविता 7) काळजी-चिंता 8) दिवा-दीप 9) बाग-उद्यान 10) तोंड-मुख 11) पाऊस-वर्षा12) अंबर- आकाश 13)
प्रश् 3. विरुद्धार्थी शब्द लिहा.
1)   अपमान x सन्मान 2) दुष्ट x सुष्ट 3) लवकर x उशिरा 4) अंधुक x स्पष्ट 5) बाहेर x आत 6) स्वप्न x अ असत्य 7) चांगला x वाईट 8) निष्पाप x पापी 9)अज्ञात x ज्ञात 10) खरेदी x विक्री 11) जास्त x कमी 12) जमा x खर्च 13) सधन x निर्धन 14)श्रीमंत x गरीब 15) डावा x उजवा 16) सोपे x कठीण 17) सुरुवात x शेवट 18) राग x प्रेम 19) रात्र x दिवस 20) नवीन x जुने 21) होकार x नकार 22) फरक x साम्य 23) गुळगुळीत x खरखरीत 24) अंधूक x स्पष्ट 25) पूर्वी x हल्ली 26) कडक x नरम 27) सजीव x निर्जीव
प्रश् 4. लिंग बदला.
1)   तरुण-तरुणी 2) पक्षी-पक्षिणी 3) वृद्ध-वृद्धा 4) जावई-सून 5) चिमुकला-चिमुकली 6) मामा-मामी 7) भाचा-भाची 8) वडील- आई 9) विधुर-विधवा 10) मुलगा-मुलगी 11) भाऊ-बहीण
प्रश् 5. पुढील इंग्रजी शब्दांसाठी वापरले जाणारे मराठी भाषेतील शब्द लिहा.
1)   ऑफिस-कार्यालय 2) चेक-धनादेश 3)हॉस्पिटल-इस्पितळ (दवाखाना) 4) ॅडव्हान्स- आगाऊ रक्कम 5) ऑपरेशन-शस्त्रक्रिया 6) कॅन्सर-कर्करोग
प्रश् 6-एकवचन, अनेकवचन लिहा.
1)   मिठाई-मिठाया 2) बटण-बटणे 3) कुंडी-कुंड्या 4) दागिना-दागिने 5) रक्कम-रकमा 6) खाण-खाणी 7) काठी-काठ्या 8) रुमाल-रुमाल 9)चप्पल-चपला 10) दात-दात 11) भाजी-भाज्या 12) चपाती-चपात्या  13)शब्द- शब्द 14) अर्थ- अर्थ 15) थेंब-थेंब 16) प्रश्- प्रश् 17) मोती-मोती 18) घोट-घोट 19) विषय-विषय 20) बालक-बालके 21) बातमी-बातम्या 22) कचोरी-कचोर्या 23) वर्ग-वर्ग 24) पान-पाने 25) घास-घास
प्रश् 7. लिंग ओळखा.
1)   ज्वाला-स्त्रीलिंग 2) संसार-पुल्लिंग 3) बलिदान- नपुंसकलिंग 4)रेषा-स्त्रीलिंग 5) स्वप्न-नपुंसकलिंग 6) तारा-पुल्लिंग 7)इच्छा-स्त्रीलिंग 8)अत्तर- नपुंसकलिंग 9) स्वर-पुल्लिंग


प्रश् 8. अचूक शब्द ओळखा आणि लिहा.
1)   निरिक्षण,निरीक्षण,नीरीक्षण- निरीक्षण
2)   पार्श्वभूमी,पार्श्वभुमी, पार्श्वभुमि-पार्श्वभूमी
3)   कालावधि, कलावधी, कालावधी-कालावधी
4)   परीस्थिती,परिस्थिती, परीस्थीती-परिस्थिती
5)   निश्चित,नीश्चित,निश्चीत-निश्चित
प्रश् 9.तुम्हाला पक्षी,प्राणी यांच्या घरांची नावे माहीत असतील तर लिहा.
1)सुगरण-घरटे 2) साप-वारूळ, 3) वाघ-गुहा 4)गाय-गोठा 5) घोडा-तबेला
प्रश् 10. माती-मोती अशा शब्दांच्या अर्थात एका मात्रेमुळे खूप फरक होतो. अशा शब्दांच्या जोड्या शोधा व लिहा.
1)   शस्त्र- शास्त्र 2)माता-मात 3) नार- नारा 4) घार-घोर 5) चार-चारा 6) सार-सारा
प्रश् 11. वाचा,लक्षात ठेवा आणि लिहून काढा.
1)   पाणी फेकून देऊ नका. 2) पाणी हवे तेवढेच वापरा. 3) पाण्याचा पुनर्वापर करा.4) जवळच्या धरणाला भेट देऊन धरणाचा उपयोग समजून घ्या. 5) पाणी घेतल्यानंतर नळ लगेच बंद करा. 6)पाणी अडवा,पाणी जिरवा.7) झाडे लावा,झाडे जगवा.7) पाण्याचा गैरवारप टाळा. 8) परिसर स्वच्छ ठेवा.9)प्रदूषण टाळा.
प्रश् 12) वाचा, लक्षात ठेवा आणि लिहा.
1)   जेवढी भूक आहे तेवढेच खाणे म्हणजे प्रकृती 2) जीवढी भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे म्हणजे विकृती 3) आपल्या जेवणातील दोन घास भुकेलेल्यांना खाऊ घालणे म्हणजे संस्कृती
प्रश् 13. गटात न बसणारा शब्द लिहा.
1)   दगड,धोंडा,खडक, गोटी, गोटा- गोटी
2)   मी, तू, ते, मीना, तो -मीना
3)   सागर, समीर, समुद्र, सिंधू, रत्नाकर-समीर
4)   सूर्य, भास्कर, शशी, रवी, मित्र- शशी
प्रश् 14) निबंध लिहा.                       पाऊस पडलाच नाही तर...
जुलै महिना संपत आला तरी पावसाचा पत्ता नव्हता. पावसाविषयीचे सर्वांचे अंदाज खोटे ठरले होते. सर्वजण पावसाची आतुरतेने वाट पाहत होते. मनात शंका आली,पाऊस पडलाच नाही तर...
हा विचार मनात आला आणि अंगावर शहारा आला. खरेच पाऊस पडला नाही, तर माणसांचे खूप हाल होतील. पावसावरच माणसांचे जीवन अवलंबून आहे. तहान भागवायला पाणी पाहिजे. अंघोळीसाठी, वैयक्तिक स्वच्छतेसाठी पाणी पाहिजे. शेतीसाठी पाणी पाहिजे. पाऊस पडला नाही तर शेते कशी फुलणार? धान्य कसे पिकणार? पाऊस पडला नाही तर आपली भूक भागणार नाही; आपली तहान भागणार नाही.
पाऊस पडला नाही तर नदीनाले कोरडे पडतील. विहिरी आटून जातील. झाडे सुकून जातील. सर्वत्र रोगराई पसरेल. जमिनीला भेगा पडतील,तर पहिल्या पावसात येणारा मातीचा सुगंध येणार नाही. इंद्रधनुष्य दिसणार नाही. हिरवेगार रान दिसणार नाही. पाऊस नसेल तर डोंगरावरून कोसळणारे धबधबे नसतील. सुसाट वाहणारी नदी नसेल. जीवनातील सारे चैतन्यच हरवून जाईल.
छे!छे! पाऊस पडला नाही तर... ही कल्पनाच आपण करता कामा नये. हा विचार मनात आला आणि वातावरण काळोखून आले. थोड्याच वेळात पाऊस पडायला सुरुवात झाली.




वाक्प्रचार,विरुद्धार्थी,समानार्थी शब्द, लिंग


                                                                        (संकलन-मच्छिंद्र ऐनापुरे,एकुंडी ता.जत)
प्रश्-1) विरुद्धार्थी शब्द लिहा.
)1) उजाडेल xमावळेल 2) खिन्न x प्रसन्न 3) आता x नंतर 4) मृदू x राठ 5) आनंद x दु: 6) अंधार x प्रकाश,उजेड 7) पुण्यतिथी x जयंती 8) आवडीचे x नावडीचे 9) पूर्ण x अपूर्ण 10) सोय x गैरसोय 11) विधवा x सधवा, सुहासिनी 12) खरे x खोटे 13)गरमx गार 14) घट्ट x सैल 15) उजवा x डावा 16) दुर्लक्ष x लक्ष 17)नवी x जुनी 18) अलगद x जलद 19) सुंदर x कुरुप 20) उंच x खोल 21) ऊन x सावली  22) आवडता x नावडता 23) नाराज x प्रसन्न 24) शास्त्रीय x अशास्त्रीय 25) सजीव x निर्जीव 26) वाईट x चांगले 27) उजाडतो x मावळतो 28) गच्च x विरळ 29) गाव x शहर 30) आनंदी x दु:खी 31) मूक x बोलका 32) हसरा x रडवा 33) पक्का x कच्चा 34) लवकर x उशिरा 35) उपकार x अपकार 36) र्हास x बृद्धी
प्रश् 2 रा. समानार्थी शब्द लिहा
1)   दहिरव- दव 2) गाणे-गीत 3) लाटा-लहरी 4) गौरव-सन्मान 5)भय-भीती 6)प्राण-जीव 7)वहिनी-भावजय 8) ललाट-कपाळ,भाळ 9)नवल- आश्चर्य 10) कथा-कहाणी, 11) त्रास-हैराण 12) तोरा-ताठा 13) आघात-घाव 14) सकाळ-प्रभात 15) हात-कर 16)लतिका- वेल 17) देह- शरीर 18) धरणी-धरती 19) नभ- आकाश 20) प्रयत्न-यत्न 21) पृथ्वी-धरा,वसुंधरा 22) सकाळ-उषा 23) दगड-शिळा
प्रश् 3- कणाकणाला म्हणजे प्रत्येक कणाला, अशा प्रकारचे इतर शब्द शोधून लिहा
1)   घरोघरी 2) क्षणाक्षणाला 3) दारादाराला 4) गल्लोगल्ली 5) पावलापावला
प्रश् 4- एकवचन- अनेकवचन लिहा.
1)   काटा-काटे, 2) फूल-फुले 3)झाड-झाडे,4) बोट-बोटे 5) संकट-संकटे 6) रंग-रंग
प्रश् 5. लिंग ओळखा.
1)   लाट- स्त्रीलिंग 2) आकाश-नपुंसकलिंग 3)पारिजात-पुल्लिंग 4) गारवा-पुल्लिंग 5) रेडकू- नपुंसकलिंग 6)पिशवी-स्त्रीलिंग 7)किनारा-पुल्लिंग 8) वसुंधरा- स्त्रीलिंग
प्रश् 6. लिंग बदला.
1)   शिक्षक-शिक्षिका 2) मुख्याध्यापक-मुख्याध्यापिका 3) मित्र-मैत्रीण 4) विद्यार्थी-विद्यार्थीनी 5) आजी- आजोबा 6) शिक्षक- शिक्षिका 7) मुलगा-मुलगी 8) पुरुष-बाई 9) बाबा- आई
प्रश् 7- दान- महादान सारखे तुम्हाला माहीत असलेले शब्द लिहा.
1)मानव-महामानव 2) योगी-महायोगी 3) वीर-महावीर 4) रथी-महारथी
प्रश् 8- हाडबिड यासारखे अवयवांवर आधारित जोडशब्द लिहा.
1)   हातपाय 2) पाठपोट 3) केसबिस 4) डोळेबिळे
प्रश् 9- गप्प,हुप्प,टम्म यांसारखी जोडाक्षरे लिहा.
उत्तर-नक्की, अख्खी, गच्च, गट्टी, चिठ्ठी, गुड्डी, अण्णा, गप्प, ढिम्म, ठिय्या, किल्ला, व्वा, ईश्श
प्रश् 10- खाली दिल्याप्रमाणे शेवटचे अक्षर समान असलेले शब्द लिहा.
1)गोळा-तोळा,मोळा, सोळा, घोटाळा, मोकळा, भोपळा, ढोकळा, गोपाळा 2) मात्र-पत्र,मित्र,सत्र,पात्र 3) बत्ता-लत्ता,सत्ता,भत्ता,पत्ता 4) गर्दी- सर्दी,वर्दी,जर्दी,दर्दी 5) साडी- माडी,गाडी,काडी,खाडी 6) पळ-छळ, मळ, फळ,कळ,
प्रश्11 - हत्तीच्या पावलांनी येणे, मुंगीच्या पावलांनी जाणे यांसारख्या म्हणी शोधा
1)   आग रामेश्वरी,बंब सोमेश्वरी 2) आगीतून आला, फुफाट्यात पडला 3) इकडे आड, तिकडे विहीर
प्रश् 12- सुखदु:,ऊनसावली, असे विरुद्धार्थी शब्द जोडून आलेले शब्द शोधून लिहा.
1)   उंचसखल 2) लांबरुंद 3) नफातोटा,4) खरेदीविक्री 5) लाभहानी
प्रश् 13- पुढील शब्दांना दायी,शाली,शाली यांपैकी योग्य प्रत्यय लावून नवीन शब्द बनवा.
    1)गौरव-गौरवशाली 2) भाग्य- भाग्यशाली 3) वैभव-वैभवशाली 4) आनंद- आनंददायी 5) सुख-सुखदायी 6) आराम- आरामदायी
प्रश् 14- बिन हा उपसर्ग लावून तयार झालेले शब्द लिहा.
1)   बिनबुडाचा 2)बिनधास्त 3)बिनदिक्कत 4) बिनचूक 5) बिनडोक बिनतक्रार बिनहरकत
प्रश् 15- गैर हा उपसर्ग लावून तयार झालेले शब्द लिहा.
1)   गैरहजर 2) गैरवर्तन 3) गैरसमज 4) गैरप्रकार 5) गैरसोय 6) गैरलागू 7) गैरवाजवी
प्रश् 16-झपझप या शब्दातून चालण्याची रीत समजते. तसे पुढील शब्दांतून कोणत्या क्रियेची रीत समजते ते लिहा.
1)   भरभर- चालणे, खाणे,बोलणे, आवरणे 2) फाडफाड- बोलणे,मारणे, भांडणे 3) धपधप- वाजणे, मारणे 4) पटपट- खाणे, चालणे, बोलणे, करणे 5) धाडधाड-येणे,जाणे,वाजणे
प्रश् 17-पुढील शब्द वाचा आणि पुन्हा लिहा.
1)   चलबिचल 2) कावराबावरा 3) अघळपघळ 4) चटकमटक 5) ओबडधोबड 6) अवतीभोवती 7) शेजारीपाजारी 8) आरडाओरडा 9) मोडतोड 10) जाडाभरडा 11) संगतसोबत 12) इडापिडा 13) टंगळमंगळ 14) अचकटविचकट 15) अदलाबदल 16) जडणघडण 17) अक्राळविक्राळ 18) उपासतापास 19) ठाकठीक 20 शेतीभाती
प्रश्  18. वाक्प्रचार व त्यांचे अर्थ लिहा.
1)संपन्न हाणे- (कार्य) पार पडणे. 2) भूमिका पार पाडणे- दिलेले कार्य व्यवस्थित पार पाडणे. 3)स्थानापन्न होणे- (खुर्चीवर) बसणे. 4) पुष्पहार अर्पण करणे- फुलांचा हार सन्मानाने देणे. 5) न डगमगणे- न घाबरणे 6) अहोरात्र झटणे- रात्रंदिवस कष्ट करणे. 7) स्थापन करणे- निर्माण करणे. 8) संदेश देणे- बहुमोल विचार देणे, शिकवण देणे. 9) दरवाजे खुले करणे- प्रवेश देणे. 10)हातभार लावणे-मदत करणे. 11) अभिवादन करणे-वंदन करणे. 12) आस्था असणे-कळकळ असणे, आवड असणे. 13) प्रोत्साहन देणे-उत्तेजन देणे.14) बारीक लक्ष असणे-नीट बारकाईने न्याहाळणे. 15) धन्यवाद देणे- आभार मानणे. 16) शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवणे- शिक्षणाचा प्रसार सर्वत्र करणे.17) संकल्प करणे- निश्चय करणे, निर्धार करणे. 18) मार्गदर्शन करणे- योग्य माहिती देणे. 19 भर घालणे- आहे त्यात अधिक जड जाणे.  20) भर घाळणे- आहे त्यात अधिक जोडणे.21) झुंबड उडणे-खूप गर्दी होणे 22) मान्यता मिळणे- सिद्ध होणे, परवाना मिळणे.23) धाकधूक होणे- भीती वाटणे, 24) बिघाड होणे- नादुरुस्त होणे. आवर्जून सांगणे-मुद्दामहून सांगणे.25) हैराण करणे-त्रास देणे 26) घाव वर्मी बसणे- केंद्रस्थानी फटका बसणे. 27) हात कपाळाला लावणे- हताश होणे. 28)ताठा कमी करणे- अहंकार कमी करणे. 29) टम्म होणे-फुगणे, 30) मस्का मारणे-खुशामत करणे,31) शिरोधार्य अग्रक्रम देणे, 32) पोटात गोळा उठणे-घाबरणे, दास्तावणे 33) पळ काढणे- पळून जाणे, 34) मन हलके होणे- हायसे वाटणे, मनावरील ओझे उतरणे,35)भ्रमनिराश होणे- विश्वास उडणे. 36) अंत:करण जड होणे-दु:ख होणे,37) डावे उजवे माणने-भेद करणे, 38) डावा निघणे-कमी प्रतीचा ठरणे,39) हात चोळत गप्प बसणे- नाइलाजाने चूप बसणे,40) कळवळणे-वेदना होणे 41) अवसान गोळा करणे- धीर गोळा करणे. 42) आलबेल असणे- थीकठाक असणे.43) आलबेल असणे- ठीक ठाक निघणे.44) फैर झाडणे-सरबत्ती सुरू होणे,45) बोट ठेवणे-दोष दाखवणे.46) बट्ट्याबोळ होणे-नाश होणे, फसणे. 47) बोटे मोडणे-त्रागा करणे, तक्रार करणे, दोष देणे 48) प्रथा पडणे-रिवाज असणे, रीत लागू असणे. 49) बोट ठेवणे-दोष दाखवणे.50) टस की मस न होणे-काहीही फरक नसणे51) काहीही फरक न पडणे.52) मनासारखे घडणे- हवे ते मिळणे 53) वाट्याला येणे- आपल्याला सहज मिळणे 54) भोगावे लागणे-सहन करावे लागणे 55) दाटून येणे- दाट होणे 56)ध्यानात येणे-लक्षात येणे 57) मरण ओढवणे-मृत्यू येणे 58) आक्रीत घडणे-वाईट होणे 59) उपदेश करणे-शिकवण देणे 60) श्रीगणेशा होणे-सुरुवात होणे, आरंभ होणे. 61) चीत करणे-प्रतिस्पर्ध्याची पाठ जमिनीला टेकवणे 62) पट काढणे- प्रतिस्पर्धी मल्लाची टांग खेचणे 63) तमा न बाळगणे- पर्वा न करणे, न जुमानणे 64) हेरून ठेवणे- नीट पाहून ठेवणे 65) उदरनिर्वाह करणे-पोट भरणे 66) ताब्यात घेणे- सर करणे, अखत्यारीत आणणे 67) माहिती पुरवणे-तपशील देणे 68) विस्तार करणे- (प्रदेश) वाढवणे, विस्तृत करणे 69) निरीक्षण करणे- नीट पाहणी करणे 70) वास्तव्य करणे- एका जागी राहणे 71) तह करणे- समझोता करणे 72)दर्शन घेणे-डोळ्यांनी पाहणे 73) ऊर अभिमानाने भरून येणे-मनात अभिमान दाटणे 74)गुणगुणणे- तोंडातल्या तोंडात हळू गाणे 75) मुकणे-संधी न मिळणे76) जाणीव होणे-मनोमन कळणे 77) अंत:करण भरून येणे- सदगदित होणे 78) स्वत:च्या पायावर उभे राहण-स्वावलंबी होणेे 79) वळण लागणे- वर्तनात अनुकूल बदल होणे 80) थक्क होणे- आश्चर्यचकीत होणे, नवल वाटणे 81) स्वप्नात हरवणे-मनोमन गुंग होणे 82) हळहळणे-वाईट वाटणे 83) धक्का बसणे-(मनाला) हादरा बसणे 84) पक्का निर्धार करणे-ठाम निश्चय करणे 85) मोहात पाडणे-भुरळ पाडणे 86) दिड्.मूढ होणे- चकित होणे 87) पुटपुटणे-स्वत:शी बोलणे 88)खंत करणे-काळजी करणे,विवंचना होणे89) आभाळ गच्च भरणे- आभाळात पावसाचे ढग भरणे 90) तोंडाला पाणी सुटणे- मोह पडणे, हाव सुटणे 91) माफी मागणे- दिलगिरी व्यक्त करणे, क्षमा मागणे 92) खाली मान घालणे- शरम वाटणे 93) संधी हुकणे- मोका निसटणे 94) वादावादी होणे- भांडण होणे, हमरीतुमरी होणे