Friday 27 September 2019

28 सप्टेंबर जागतिक रेबीज दिन

रस्त्यावर फिरणारे मोकाट कुत्रे खूप मोठी समस्या बनली आहे. कुत्र्याच्या चावण्यामुळे होणारा 'रॅबीज जितका जीवघेणा असतो, त्यापेक्षाही जीवघेणे असते ते रस्त्यात कुत्रा आडवा आल्याने वाहन घसरून होणारा अपघात. यात अनेकांनी आपला अमूल्य जीव गमाविला आहे. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करणे मनपाचे काम आहे. तो सामान्यांच्या कक्षेबाहेरचा विषय आहे. पण, रॅबीजपासून बचाव हा नक्कीच आपल्या हातात आहे.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर


लता मंगेशकर यांनी केवळ भारतीय पार्श्‍वगायन क्षेत्रातच आपली मोहोर उमटवली नाही तर चाहत्यांच्या हृदयावरदेखील त्यांनी अधिराज्य केलं आहे. लतादीदींना गाण्याचा वारसा त्यांच्या वडिलांकडूनच मिळाला. मास्टर दीनानाथ मंगेशकर म्हणजे मराठी नाट्य-संगीतातील मोठं नाव. लतादीदी सांगतात, घरात संगीताचंच वातावरण असायचं. आई गायची नाही. पण तिला गाणं समजायचं. वडील तर सकाळी साडेपाच वाजल्यापासूनच तानपुरा घेऊन बसायचे. एकदा एका शिष्याला ते गाणं शिकवत होते.

Wednesday 25 September 2019

फ्रान्सिस दिब्रिटो


मराठी साहित्याचा उत्सव असलेल्या उस्मानाबादच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. निमंत्रक संस्था असल्याने मराठवाडा साहित्य परिषदेने एकाही साहित्यिकाचे नाव सुचवले नाही. साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष निवडीबाबत पार पडलेल्या भारतीय साहित्य महामंडळाच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला महाराष्ट्र साहित्य परिषद, मुंबई साहित्य संघ, मराठवाडा साहित्य परिषद, विदर्भ साहित्य संघ या घटक संस्थांसह संलग्नित संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. घटक संस्थांनी वेगवेगळ्या साहित्यिकांची नावे अध्यक्षपदासाठी सुचवण्यात आली होती.

Friday 13 September 2019

ताजे अपडेट्स


असोशिएशन ऑफ वर्ल्ड इलेक्शन (AWEB) च्या 2019-20 या कालवधीसाठी अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? - सुनील आरोरा (मुख्य निवडूक आयुक्त, भारत)
महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी कोणाची नियुक्ती झाली?- यु.पी.एस. मदान
चांद्रयान-2 मोहिमेचा एकूण खर्च किती आहे?-978 कोटी रुपये
सध्या इस्त्रोचे अध्यक्ष कोण आहेत?-कैलाश वादीवू सिवन
पाकिस्तान क्रिकेट संघ्याच्या प्रशिक्षकपदी कोणाची निवड झाली?- मिसबाह उल हक
ग्लोबल टायगर फोरम या आंतरराष्ट्रीय संस्थेचे मुख्यालय कोठे आहे?- नवी दिल्ली
चौथ्या दक्षिण आशियाई स्पीकर समीटचे आयोजन नुकतेच कोणत्या शहरात झाले?- माले (मालदीव)

Sunday 1 September 2019

हिंदी साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान

गीत आणि साहित्य मनोरंजनातून जीवन जगण्याची शिकवण देतात. गीत हे साहित्यातून विकसित होत असल्याने गीतांचा साहित्यरूपी अभ्यास व्हावा, असे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. गीतांचा साहित्यरूपी अभ्यास होऊन तरुणांमध्ये साहित्य गोडी निर्माण होईल, यातून देशाला भावी साहित्यिक लाभतील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीतर्फे हिंदी साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान सोहळा मुंबईच्या चर्चगेट येथील जयहिंद महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीतर्फे हिंदी भाषा व साहित्याच्या? विकासासाठी कार्यरत साहित्यिकांना पुरस्कृत करण्याकरिता दरवर्षी हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात येतो. या पुरस्कार वितरण कार्यक्रमास हिंदी साहित्य अकादमीचे अध्यक्ष डॉ. शीतलाप्रसाद दुबे, फिल्मसिटीचे उपाध्यक्ष, अमरजित मिर्श तसेच विविध क्षेत्रातील साहित्यप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते.

पाच वर्षात 1लाख 67 हजार शेत तळ्यांची निर्मिती

मागेल त्याला शेततळे' या योजनेंतर्गत गेल्या पाच वर्षात राज्यातील १ लाख ६७ हजार ३११ शेततळ्यांची निर्मिती होऊन ३९ लाख ४५0 एकर क्षेत्रासाठी संरक्षित सिंचन व्यवस्था झाली आहे. ही योजना रोजगार हमी विभागामार्फत राबविली जाते.

साधना

साधना शिवदासानी नय्यर तथा साधना या एक हिंदी चित्रपट अभिनेत्री होत्या. प्रसिद्ध नृत्यांगना साधना बोस यांच्या नाव व रूपावरून त्यांच्या वडिलांनी त्यांचे नाव साधना असे ठेवले होते. त्यांचा जन्म आताच्या पाकिस्तानातील कराची शहरात झाला. फाळणीनंतर त्यांचे कुटुंब भारतात आले. साधना शिवदासानी यांचे पुढील शिक्षण मुंबईतच झाले. चर्चगेट येथील जय हिंद महाविद्यालयात त्या शिकल्या. त्यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. यशस्वी अभिनेत्री बनण्याचे त्यांचे स्वप्न होते. वडिलांनी त्यांचे हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी मेहनत घेतली.

मनोज नरवणे लष्कर उपप्रमुखपदी




लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी आज भारतीय लष्कराच्या उपप्रमुखपदाचा पदभार स्वीकारला. मनोज नरवणे हे आता लेफ्टनंट जनरल डी अंबू यांची जागा घेणार आहेत. लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत हे ३१ डिसेंबर रोजी नवृत्त होत आहेत. त्यानंतर नरवणे हे लष्करप्रमुखपदाच्या शर्यतीतसुद्धा दिसतील.

भगत सिंह कोश्यारी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल

महाराष्ट्राच्या राज्यपालपदी उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी याची नियुक्ती करण्यात आली आहे. सी. विद्यासागर राव यांचा कार्यकाळ संपल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ही नियुक्ती केली आहे.
सी. विद्यासागर राव यांचा कार्यकाळ ३0 ऑगस्ट २0१९ रोजी संपला. त्यांनी ३0 ऑगस्ट २0१४ रोजी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची शपथ घेतली होती. त्यांचा ५ वर्षाचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच राज्यपालपदी कोण येणार याविषयी चर्चा सुरू झाली होती. यात माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांची राज्यपालपदी वर्णी लागणार असल्याचे बोलले जात होते. पण, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगर सिंह कोश्यारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आशा भोसले

आशा भोसले (जन्म ८ सप्टेंबर १९३३) या लोकप्रिय मराठी गायिका आहेत. मराठीसह हिंदी आणि अनेक भाषांतील चित्रपटांत त्यांनी पार्श्‍वगायन केले आहे. महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील व जगभरातील लोकमनावर अधिराज्य गाजवणारा एक आवाज. त्या गळ्याला गाता येत नाही असे कुठलेच गाणे नाही; तो आवाज चैतन्य निर्माण करू शकत नाही अशी कुठलीच मैफिल नाही: त्या गळ्याला त्याज्य आहे असा कुठलाच संगीत-प्रकार नाही. आशा भोसले यांचा जन्म मंगेशकर कुटुंबातला असून त्यांना मास्टर दीनानाथांचा गाण्याचा वारसा मिळाला. लता, हृदयनाथ आदी भावंडांचे मार्गदर्शन व त्यांची साथ या सगळ्यांतून आशाताईंचा गळा घडत गेला.