करकोचा व करकरा यांच्याबरोबरच सारसाचा गुइडी या पक्षिकुलात समावेश केलेला आहे. याचे शास्त्रीय नाव ग्रुस अँटिगोन असे आहे. ग्रुस या प्रजातीत दहा व इतर चार अशा एकूण 14 जाती आहेत. सायबेरियन क्रेन (ग्रुस ल्यूकोगेरॅनस) हे मध्य सायबेरियात आढळणारे पक्षी हिवाळ्यात भारतातील लडाख, अरुणाचल प्रदेशातील सांगती खोरे, भूतान, म्यानमार इ. ठिकाणी कळपाने येतात. ते वास्तव्यासाठी रुंद व प्रशस्त नद्यांची खोरी निवडतात. भारतीय उपखंडात सारस उत्तर आणि मध्य भारत, तराई नेपाळ आणि पाकिस्तान, थायलंड, म्यानमार इ. प्रदेशांत हा आढळतो. मैदानी प्रदेशांत पाण्याच्या आसपास, तलाव व तळी यांच्या काठावर, दलदलीच्या जागी किंवा शेतात हा राहतो. या पक्ष्यांची जोडपी असतात कधीकधी एक-दोन पिले त्यांच्यासोबत असतात. महाराष्ट्रात सारस पक्षी केवळ गोंदिया-भंडारा जिल्ह्यात शिल्लक आहे. भारतातही हा पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. जगभरात केवळ 25 ते 37 हजारच सारस शिल्लक आहेत. 2018 च्या सर्वेक्षणानुसार, पश्चिम बंगाल, आसाम, गुजरात, पंजाब, उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेशात मिळून 14 हजार 938 सारस शिल्लक आहेत. यापैकी बहुतांश सारस उत्तर प्रदेशात असून या राज्याचा तो राज्यपक्षी आहे. महाराष्ट्रात देखील 50 च्या आसपास सारस शिल्लक आहेत. यातील सर्वाधिक सारस गोंदिया, त्यानंतर भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यात केवळ एक सारस आहे.महाराष्ट्रात सारस पक्ष्याच्या बाबतीत उच्च न्यायालयाने स्वत:हून घेतलेल्या भूमिकेनंतर महाराष्ट्रातील तीनपैकी दोन जिल्ह्यात सारस संवर्धन समिती गठीत झाली असून एका जिल्ह्यात अजूनही समितीचे गठन व्हायचे आहे.
कधीकाळी याच महाराष्ट्रात सुमारे शंभर सारस होते. निसर्ग संवर्धनासाठी कार्यरत ‘आययूसीएन’च्या यादीत या पक्षाची नोंद संकटग्रस्त अशी आहे. सारस हा उडू शकणारा जगातील सर्वात मोठा पक्षी आहे, पण गेल्या काही दशकात पाच फूट उंच, आठ फूट लांब पंख आणि सात किलो वजनाच्या या पक्ष्याची संख्या उच्चदाब वीजवाहिन्या, रायासानिक खते आणि कीटकनाशके आदींमुळे झपाटय़ाने कमी होत आहे. महाराष्ट्रात या पक्ष्यांचा अधिवास टिकवून ठेवण्याचा मान गोंदिया जिल्ह्यातील ‘सेवा’ या संस्थेला जात आहे. या संस्थेचे अध्यक्ष व मानद वन्यजीव रक्षक सावन बाहेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शेतकऱ्यांना सोबत घेऊन सारस संवर्धनाची धुरा गोंदिया व भंडारा जिल्ह्यात सांभाळली आहे. वनखाते आणि स्थानिक प्रशासनाकडून दुर्लक्षित झालेल्या या पक्ष्याची दखल नागपूर उच्च न्यायालयाने घेतल्यानंतर वनखाते आणि स्थानिक प्रशासन जागे झाले. नामशेषाच्या मार्गावरील या पक्ष्याच्या संवर्धनासाठी सध्यातरी सर्व एकत्र आल्याचे दिसून येत आहे.
सारस हा गिधाडापेक्षा मोठा असून 120–152 सेंमी. उंच असतो. मान व पाय बरेच लांब डोके आणि मानेचा वरचा भाग लालभडक डोक्याचा माथा राखी मान पांढरी संपूर्ण शरीर निळसर-करड्या रंगाचे डोळे नारिंगी चोच टोकदार व हिरवट रंगाची, पाय लाल व पिसेविरहित असतात. मादी नरापेक्षा लहान असते. सारस पक्षी झाडावर बसत नाहीत. ते नेहमी जमिनीवरच भटकत असतात. झाडाझुडपांचे कोवळे धुमारे, वनस्पतिज पदार्थ, किडे, सरडे, गोगलगायी इ. यांचे भक्ष्य आहेत. या पक्ष्यांचा जोडा जन्मभर टिकतो. एकमेकांच्या सान्निध्यात राहूनच ते भक्ष्य टिपीत असतात व उडून दुसरीकडे जाताना देखील ते बरोबरच जातात. सारस गुपचुप भक्ष्य टिपीत असतात, त्यांना कोणी त्रास दिला किंवा हुसकले, तर ते कर्ण्याच्या आवाजासारखा मोठा आवाज काढतात. उडतानादेखील ते असाच आवाज करतात. उडत असताना मान पुढच्या बाजूला लांब, ताठ केलेली असते व पाय मागे लोंबत असतात. ते जमिनीपासून जास्त उंचीवरून उडू शकत नाहीत परंतु त्यांचा वेग जास्त असतो.
जुलै–सप्टेंबर यांचा विणीचा हंगाम असतो. घरटे बरेच मोठे बोरू, वेत, लव्हाळी व गवत यांचे बनविलेले असते सामान्यतः ते दलदलीच्या जागेवर किंवा पाणी साठलेल्या भाताच्या खाचराच्या मध्यभागी असते. मादी फिकट हिरव्या किंवा गुलाबी-पांढऱ्या रंगाची दोन अंडी घालते कधीकधी त्यांच्यावर तपकिरी किंवा जांभळ्या रंगाचे ठिपके असतात. नर-मादी घरट्यातील अंड्यांचे अतिशय जागरूकतेने रानमांजर, मुंगूस व कुत्री यांपासून संरक्षण करीत असतात. पिलू अंड्यातून बाहेर पडल्यावर लगेचच हिंडू-फिरू लागते. ते नर-मादीच्या संरक्षणाखाली वाढते.
सारस अधिवास संरक्षणावर लक्ष केंद्रित करायला हवे.विजेच्या धक्क्यांपासून सारस पक्ष्यांना वाचवण्यासाठी महागडे उपाय योजण्यापेक्षा कमी खर्चातील उपाययोजनादेखील परिणामकारक ठरू शकतात. साध्या ‘पीव्हीसी पाइप’ने उच्चदाब वीजवाहिन्या झाकल्या तरीही त्यातून अपेक्षित परिणाम साधला जाईल. नदीतील अवैध वाळू उत्खननामुळेही सारसांचा अधिवास धोक्यात आला आहे. ओलसर जमिनीच्या पर्यावरणावर म्हणजेच ‘वेटलॅण्ड इकॉलॉजी’ या महत्त्वाच्या मुद्दय़ाकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
उत्तर प्रदेश सरकारच्या अर्थपूर्ण प्रयत्नांमुळे गेल्या दशकात राज्य पक्षी सरसांची संख्या ५७ टक्क्यांनी वाढली आहे. डिसेंबर 2021 च्या गणनेत राज्यात 17,665 सारस आढळले आहेत, तर 2012 मध्ये त्यांची संख्या 11275 होती. इटावा आणि औरैया प्रदेशात सर्वाधिक ३२९३ सारस आढळले आहेत. दुसरा क्रमांक मैनपुरीचा आहे जिथे 2737 सारस सापडले आहेत. यापूर्वी उत्तर प्रदेशात सारसची नियमित मोजणी होत नव्हती.वनविभागाने सन 2012 पासून वर्षातून दोनदा सारसची मोजणी सुरू केली आहे. 2020 मध्ये कोरोनाच्या काळात गणना करता आली नाही. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर 2021 मध्ये सारसांची संख्या पुन्हा सुरू झाली. डिसेंबर 2021 च्या जनगणनेत, उत्तर प्रदेशात 17,665 सारस आढळले होते, तर जून 2021 च्या जनगणनेत त्यांची संख्या 17329 होती. म्हणजे सहा महिन्यांत 336 सारस वाढले. उत्तर प्रदेशातील एकूण 81 वनविभागांपैकी 17 मध्ये क्रेनची संख्या शून्य असल्याचे आढळून आले आहे.20 वनविभाग असून त्यात सारसांची संख्या गेल्या वेळेपेक्षा कमी झाली आहे. एटामध्ये सर्वाधिक घट दिसून आली आहे. मागील गणनेत येथे 1155 सारस आढळले होते तर डिसेंबर 2021 मध्ये फक्त 634 सारस आढळले होते.
ReplyDelete