Sunday 9 December 2018

सुविचार संग्रह भाग 3


1)   अहिंसेत भित्रेपणा किंवा दुबळेपणला मुळीसुद्धा स्थान नाही.-महात्मा गांधी
2)   अपयशाची भीती ही सर्वात मोठी भीती होय.-कौटिल्य
3)   अज्ञानी व्यक्ती आत्मप्रशंसेसाठी नेहमीच तयार असतात.-निकोलस बोईलो
4)   अनेकदा छोट्या संधीच मोठ्या धाडसाच्या प्रारंभ ठरतात.-डेमोस्थेनिस
5)   अहिंसेचा अर्थ प्राणिमात्रांवर प्रेम करणे होय.- ओशो रजनीश
6)   संकटकाळच सर्वात जास्त चांगला शिक्षक असतो.- बेंजामिन डिझरायली
7)   माणसाची वर्तणूक म्हणजे तो माणूस कसा आहे हे स्पष्टपणे दाखवणारा आरसाच असतो.-जर्मन कवी गटे
8)   तुम्ही आपल्या कर्माचा पडदा काचेसारखा स्वच्छ करातल तर त्यातून तुम्हाला परमेश्वर दिसेल.-लोकमान्य टिळक

9)   दयापूर्ण कृत्य अविरत करत राहा, त्यायोक्षे तुम्ही अमरत्व प्राप्त कराल.-भगवान बुद्ध
10) ऐक्य हेच बख हे केवळ सुवचन नसून तो जीवनधर्म आहे.-महात्मा गांधी
11) प्राप्तीच्या आनंदापेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक आहे.- विनोबा भावे
12) मनुष्य स्वत:च स्वत:च्या नशिबाचा शिल्पकार असतो.- स्वामी रामतीर्थ
13) नम्रतेमुळे आपण महानतेच्या निकट जातो.-रवींद्रनाथ टागोर
14) चारित्र्याचा विकास हाच शिक्षणाचा खरा पाया आहे.-स्वामी विवेकानंद
15) सर्वार्थाने श्रेष्ठ असलेल्या माणसात आवश्यक असलेला गुण म्हणजे नम्रता.-जॉन रस्किन
16) अक्षरे गाळून वाची। काही घाली पदरींची। निगा न राखी पुस्तकांची। तो एक मूर्ख॥- समर्थ रामदास
17) दुबळेपणा, भीती, एकाकीपणा व अज्ञान ही अंधश्रद्धेची कारणे आहेत.-डेव्हिड ह्यूम
18) आईच्या डोळ्यांतील रागाच्या पाठीमागे वात्सल्याचे सागर उचंबळत असतात.-वि..खांडेकर
19) तुझ्या दु:खाचे कारण काहीही असो, दुसर्याला इजा करू नको.-भगवान बुद्ध
20) पुस्तकप्रेमी मनुष्य अत्यंत श्रीमंत व सुखी असतो.-हेन्री थोरो
21) घाम गाळल्याशिवाय मिळालेली सुखशांती टिकाऊ नसते.-रिचर्ड ग्रेविल
22) सत्य हाच वाणीतील मध व धर्मातील प्राण आहे.-भगवान बुद्ध
(मच्छिंद्र ऐनापुरे यांच्या संग्रहातून)

1 comment: