Sunday 6 January 2019

'भाईजान' सलमान खान


सलमानचे संपूर्ण नाव अब्दुल रशिद सलीम सलमान खान आहे. २७ डिसेंबर १९६५ रोजी मध्यप्रदेशातील इंदोर येथे त्याचा जन्म झाला. वडील सलीम खान यांनी अनेक चित्रपटात संवाद लेखक म्हणून आपली कारकिर्द गाजविली होती. त्यांनी व जावेद अख्तर यांनी मिळून लिहिलेल्या 'शोले' या चित्रपटातील संवादाला आजही तोड नाही. सलमानच्या आईचे माहेरचे नाव सुशिला चरक. त्या हिंदू असून लग्नानंतर त्यांनी आपले नाव बदलवून सलमा ठेवले. भावांमध्ये सलमान सर्वात मोठा. त्यानंतर अरबाज, सोहेल, बहीण अल्विरा व दत्तक पुत्री अर्पिता. अरबाजचा मलाईका अरोरा- खान सोबत विवाह झाला तर अल्विराने अभिनेता-दिग्दर्शक अतून अग्रिहोत्री सोबत विवाह केला. अर्पिताही नुकताच विवाह झाला असून सलमान मात्र अद्यापही विवाहाच्या प्रतीक्षेत आहे.

लहानपणापासून चित्रपटसृष्टीला अगदी जवळून बघणार्‍या सलमानच्या घरी कायमच निर्माता दिग्दर्शकांचा राबता असायचा. त्यामुळे अभिनयाविषयी सलमानला लहानपणापासूनच कुतूहल होते. या कारणाने शिक्षण व त्याचे कधीच जमले नाही. सलमानला पहिला ब्रेक दिला तो रेखाच्या 'बिबी हो तो ऐसी' या चित्रपटाने. परंतु, नायक म्हणून स्थिरस्थावर केले ते १९८0 मध्ये आलेल्या सुरज बडजात्याच्या 'मैने प्यार किया' या चित्रपटाने. या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात अनेक वर्ष अधिराज्य गाजविले. त्यातील प्रेम व सुमन ही नावेही अजरामर झाली. इतके की त्यानंतर आलेल्या 'हम आपके है कौन', 'हम साथ-ाथ है', 'साजन' व नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'प्रेम रतन धन पायो' या चित्रपटातही सलमानने हेच नाव धरण केले आपल्या दिसते. १९९0 मध्ये प्रदर्शित झालेल्या बागी, बेवफा सनम, कुर्बान व पत्थर के फूल या चित्रपटांनाही बर्‍यापैकी यश मिळाले.
बडजात्यांच्या रार्जशी प्रोडक्शनच्या १९९४ मध्ये आलेल्या 'हम आपके है कौन' हा सलमानच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा व माईलस्टोन म्हणून ओळखता येईल. यातील कथानक, गाणी, संवाद, संगीत व अभिनय यासर्वांनीच एक वेगळी उंची गाठली. यातील माधुरीचा सुरुवातीला अल्लडपणा व त्यानंतर बहिणीच्या आकस्मिक मृत्यूनंतर आलेला पोक्तपणा तिच्या अभिनयाची उंची गाठणारा ठरला. यासाठी तिला फिल्मफेअर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. राष्ट्रीय पुरस्कारानेही या चित्रपटाला नवी उंची प्रदान केली. या काळात सलमानला रोमँटिक हिरो म्हणून ओळख मिळाली होती. या व्यक्तिरेखेला छेद देण्यचा प्रयत्न काही चित्रपटांमधून केला. त्यावेळी त्याने काही गंभीर व अभिनयाचा कस लागेल असे काही चित्रपट जाणूनबुजून स्वीकारल्याचे दिसते. यामध्ये संजय लिला भन्साळीचा 'खामोशी-द म्यूजिकल' या चित्रपटाचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. त्याचप्रमाण्ेा ''मेरीगोल्ड, मै और मिसेस खन्ना, लंडन ड्रिम्स, वीर, जाने-मन, बाबूल, हम तुम्हारे सनम'', यासारख्या चित्रपटांमधून वेगळा सलमान प्रेक्षकांच्या भेटीला आला. परंतु, प्रेक्षकांनी त्याला अशा स्वरूपात बघण्यास साफ नकार दिला. त्यामुळे प्रेक्षकांनी नाडी ओळखून सलमानने पुढच्या चित्रपटांची दिशा ठरविली. यात काही विनोदी तर काही अँक्शन चित्रपटांचा समावेश होता. तसेच कौटुंबिक चित्रपटही १९९४ ते २0१५ या २१ वर्षाच्या कालखंडात त्याने स्वीकारले. कौटुंबिक चित्रपटांचा उल्लेख करता ''जब प्यार किसी से होता है, 'चोरी-चोरी चुपके-चुपके, हम साथ साथ है, हर दिल जो प्यार करेगा, तेरे नाम, हम दिल दे चुके सनम व करण-अर्जून यासारख्या चित्रपटांचा समावेश होतो. सलमानला चांगला विनोदी अंग आहे. त्यामुळे डेव्हिड धवन यासारख्या विनोदी चित्रपटांचा समावेश होतो. सलमानला चांगला विनोदी अंग आहे. त्यामुळे डेव्हिड धवनसारख्या विनोदी चित्रपटांचे मास्टर म्हणून ओळखल्या जाणार्‍या दिग्दर्शकाच्या नजरेतून तो सुटला नाही. ''पार्टनर, जुडवा, रेडी, बीबी नं. १, मुझसे शदी करोगी व नो एन्ट्री'' हे प्रमुख चित्रपट असून समीक्षकांनी या चित्रपटांना फारस महत्त्व दिले नाही. मात्र, प्रेक्षकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला. अँक्शन हा सलमानचा आणखी एक प्लस पॉईंट आहे. प्रेक्षकही त्याला अँक्शनमध्ये पाहण्यासाठी कायमच उत्सूक असतात , हे आतापर्यंत आलेल्या चित्रपटांमधून निदर्शनास आले आहे. याची सुरुवात झाली ती 'जीत' या चित्रपटापासून. हा चित्रपट त्रिकोणी प्रेमावर आधारित असला तरी त्यातील अँक्शन दृश्य प्रेक्षकांना पसंत पडली. त्यानंतर ''दबंग, दबंग २, वॉन्टेड, बजरंगी भाईजान, बॉडीगार्ड, एक था टायगर, किक'' या चित्रपटाने प्रेक्षकांनी अक्षरशा: डोक्यावर घेतले. कमाईमध्ये तर त्याने सर्व रेकॉर्ड मोडले. त्या वर्षीच्या सर्व प्रमुख पुरस्कार या चित्रपटाच्या झोडीत पडले. असे असतानाही सलमानला वेगळय़ा विषयावर चित्रपट करावासा वाटला म्हणून त्याने 'जय हो' सारखा चित्रपट निवडला. या चिपटाने कमाई तर केली परंतु सलमानच्या इतर चित्रपटांप्रमाणे ती नगण्यच ठरली. २0१५ या वर्षी सलमानचा मेंटोर सूरज बडजात्याचा 'प्रेम रतन धन पायो' हा एकच कौटुंबिक चित्रपट प्रदर्शित झाला असून त्यानेही दमदार व्यवसाय केला आहे. २0१६ मध्ये यशराज फिल्म चा 'सुल्तान' हा बहुचर्चित चित्रपट. सलमानसोबत ‘सुलतान’ चित्रपटात स्क्रीन शेअर करणारी ही अभिनेत्री अनुष्काला आता पुन्हा एकदा त्याच्यासोबत झळकणार आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी करणार असून , अद्याप चित्रपटाबद्दलची इतर माहिती आणि अधिकृत घोषणा बाकी आहे. भाईजान आणि अनुष्काची जोडी या चित्रपटातून पुन्हा एकत्र पाहणे चाहत्यांसाठी आनंदाचे असणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने भन्साळी, अनुष्का आणि सलमान खान हे त्रिकूट प्रेक्षकांना पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे.सध्या आपल्या आगामी भारत चित्रपटाच्या चित्रीकरणात सलमान व्यस्त आहे. अनुष्का नुकतीच ‘सुई धागा’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या चित्रपटात तिने वरुण धवनसोबत स्क्रीन शेअर केली होती. चित्रपटाला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली होती.


No comments:

Post a Comment