Wednesday 9 January 2019

भारतात २४ तासांत २६ विद्यार्थी करतात आत्महत्या

भारतात विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे समोर आले आहे. भारतात २४ तासांत २६ विद्याथ्र्यी आत्महत्या करतात. गंभीर बाब म्हणजे महाराष्ट्रात सर्वाधिक विद्यार्थ्यांच्या आत्महत्या झाल्याचे या माहितीमधून स्पष्ट होते.

गृह मंत्रालयाने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिलेल्या आकडेवारीनुसार, २0१६ मध्ये सुमारे ९४७४ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या असल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्र आणि प. बंगाल या दोन राज्यांत आत्महत्येचे प्रमाण सर्वाधिक असून महाराष्ट्रात २0१६ या वर्षात १३५0 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, याउलट लक्षद्वीपमध्ये विद्यार्थी आत्महत्येचे एकही प्रकरण समोर आले नाही. मध्य प्रदेशमध्ये १४ मे या दिवशी १२ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली होती. आत्महत्या केलेले सर्व विद्यार्थी १0वी आणि १२वीचे होते. परीक्षेच्या तणावामुळे या आत्महत्या केल्या असल्याचे पोलिसांनी सांगितले होते.
मनोवैज्ञानिकांनी आत्महत्येच्या कारणांमध्ये नशेच्या आहारी गेल्यामुळे किंवा मानसिक समस्या असल्यामुळे या आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. विशेषत: १0 वर्षांपुढील मुलांना त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी संधी मिळत नाही, विद्यार्थ्यांना भविष्याविषयी असुरक्षित वाटते.


No comments:

Post a Comment