Friday 23 September 2022

मध आवडीने खाणारा हनी बियर


 हा शांत आणि सुंदर दिसणारा प्राणी स्वभावाने खूप खेळकर आणि सतत उड्या मारणारा आहे. हनी बीअर्स आणि नाईट वॉकर म्हणून प्रसिद्ध असलेला किंकाजो हा सस्तन प्राणी आहे. किंकाजो हा ओलिंगो, कोटिस, रॅकून, रिंगटेल आणि कॅकोमिस्टल यांच्याशी संबंधित प्रोसीओनिडे कुटुंबातील उष्णकटिबंधीय रेनफॉरेस्ट प्राणी आहे. पोटोस वंशातील हा एकमेव सदस्य आहे आणि त्याला "मध अस्वल" म्हणून देखील ओळखले जाते.  त्यांच्या अनेक प्रजाती आहेत.  यापैकी काही पाळीव प्राणी आहेत.

यांचे शरीर साधारणपणे 16-25 इंच आणि शेपटी 15-20 इंच लांब असते.  वजन सुमारे 8 त्यांचे शरीर साधारणपणे 16-25 इंच आणि शेपटी 15-20 इंच लांब असते.  वजन सुमारे 8 पौंड असते.  डोळे आणि कान मोठे असतात.  त्यांच्या लहान पायांमध्ये पाच बोटे आहेत, ज्याला अणकुचीदार नखे असतात. अंग केसाळ असते.  वरच्या पृष्ठभागावर केस सोनेरी आणि आतील बाजूस तपकिरी असते.  ते समूहात राहण्यापेक्षा एकटे राहणे पसंत करतात.

हे प्रामुख्याने मध्य अमेरिका, मेक्सिको, दक्षिणपूर्व ब्राझीलमध्ये आढळतात.  हा निशाचर आहे आणि बहुतेक आपला वेळ दाट झाडांच्या सावलीत घालवतो.  त्याची शेपटी त्याला झाडावर चढण्यास मदत करते.  ते त्याच्या तिसऱ्या हातासारखे काम करते. हनी बियर संध्याकाळी दिवस मावळल्यानंतर ते मध्यरात्रीपर्यंत सर्वाधिक सक्रिय असतात.

हनी बियर सर्वभक्षी आहेत.  त्यांना फळे आणि मकरंद खायला खूप आवडतात.  मध आणि मकरंद यांच्या आवडीमुळे त्यांना हनी बियर म्हणतात.  गरज पडेल तेव्हा मुंग्या, अंडी आणि बेडूकही खातात.  असे म्हटले जाते की त्यांना स्ट्रॉबेरीची ऍलर्जी आहे, त्यांचे कमाल वय 20-25 वर्षे आहे.  हेएका वेळी एकाच पिलाला जन्म देतात.  यांचा गर्भधारणा कालावधी 12 ते 18 दिवसांचा असतो.यांची जीभ खूप लांब असते. जी सुमारे पाच इंच आहे.  या जिभेच्या मदतीने ही फळे आणि परागकण मोठ्या आवडीने खातात. अमेरिकेतील होनोलुलु प्राणीसंग्रहालयात राहणारी हनी बीयर सुमारे 40 वर्षे जगली असल्याचे सांगण्यात येते.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:

Post a Comment