Thursday 13 October 2022

आसामची आयर्न लेडी: संजूक्ता पराशर


हातात एके 47 घेऊन घनदाट जंगलात शिरल्यावर तब्बल 16 अतिरेक्यांना एक हाती यम सदनाला पाठवून आणखी 64 अतिरेक्यांना अटक करणाऱ्या संजूक्ता पराशरची कहाणी स्वतःला अबला समजणाऱ्या देशातील प्रत्येक स्त्रीला माहिती व्हायला पाहिजे. दिसायला गोरीपान आणि सुंदर अशी संजूक्ता जर कधी आपल्या समोरून गेली तर तिच्या अफाट कर्तृत्वाची आपण कल्पनाही करू शकणार नाही. एक सामान्य स्त्री लाखो सामान्य पुरुषांनाही जमणार नाही असं काम करते तेव्हा तिच्या कर्तृत्वाचे पोवाडे सोशल मीडियावर गायले जायला हवेत, पण आम्हाला राजकारण आणि जात, धर्मापलीकडेहि आणखी दुनिया आहे हेच मान्य नसतं. त्यामुळे संजूक्ता पराशरच्या फेसबुक पेजला लाखभरहि लाईक मिळत नाहीत आणि राजकारणी, सिनेनट मात्र करोडोंनी लाईक मिळवतात.

वरिष्ठ आयपीएस अधिकारी संजुक्ता पराशर यांना केंद्रीय गृहमंत्री पदक देऊन सन्मानित करण्यात आले आहे. पोलीस तपास करणार्‍यांना प्रशिक्षण देण्यात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे.  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याहस्ते त्यांना हे पदक देऊन सन्मानित केले. त्यांनी 2011 ते 2016 दरम्यान आसाममधील जोरहाट आणि सोनितपूर जिल्ह्यांमध्ये ULFA आणि NDFB अतिरेक्यांच्या विरोधात कारवाईचे नेतृत्व करण्यासाठी एसपी म्हणून काम केले.
संजुक्ता पराशर यांचा जन्म 3 ऑक्टोबर 1979 रोजी आसाममध्ये झाला.  त्यांनी दिल्लीच्या इंद्रप्रस्थ कॉलेजमधून राज्यशास्त्रात पदवी संपादन केली आहे.  त्यांनी जेएनयूमधून आंतरराष्ट्रीय संबंधात पदव्युत्तर पदवी घेतली आहे.  त्यांनी यूएस फॉरेन पॉलिसीमध्ये एमफिल आणि पीएचडी पदवी देखील घेतली आहे.
आसाम सारख्या मागासलेल्या राज्यात शाळेत शिकून नंतर दिल्लीच्या जेएनयु मधून डिग्री घेणारी संजूक्ता 2006 मध्ये आयपीएस देशात 85 क्रमांक घेऊन उत्तीर्ण झाली। युएस फॉरेन पॉलिसी विषयात तीने पीएचडी केल्यामुळे ती डॉक्टर संजूक्ता पराशर म्हणून ओळखली जाते. तिचं लग्न झालं तेही आयएएस अधिकारी पुरू गुप्तांशी. त्यांना 6 वर्षाचा मुलगा आहे. संजूक्ताची आई त्याला सांभाळते. संजूक्ताची पोस्टिंग 2014 मध्ये आसाम मधील सोनीतपुर जिल्ह्यात सुप्रिंटेंडंट ऑफ पोलीस म्हणून झाली आणि अग्निदिव्य म्हणजे काय ह्याची प्रचिती तिला रोजच घ्यावी लागली. बोडो अतिरेक्यांनी जिल्ह्यात धुमाकूळ घातला होता. शेकडो लोकांचे बळी गेले होते. आसामच्या घनदाट जंगलात शिरून त्यांच्याशी मुकाबला करणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण. हातात एके 47 घेऊन संजूक्ता सीआरपीएफ च्या जवानांना घेऊन जेव्हा घनदाट जंगलात शिरायची तेव्हा जवानानाही दहा हत्तीचं बळ मिळायचं. अनेक मोहिमा यशस्वी झाल्यामुळे अतिरिकेही संजूक्ताच्या नावाने कापू लागले होते. तिला पत्राद्वारे आणि फोनद्वारे धमक्या येऊ लागल्या होत्या. परंतु शिर तळ हातावर घेऊन फिरणाऱ्या संजूक्तावर कसलाच परिणाम झाला नाही. तब्बल 16 अतिरेकी मारले गेले आणि 64 अटक झाले, तेही तिच्या अवघ्या 18 महिन्यांच्या कारकीर्दीमध्ये. आसामची आयर्न लेडी म्हणून प्रसिद्ध आहे.
संजुक्ता पराशर यांना विभागात लेडी सिंघम म्हणूनही ओळखले जाते.  बोडो अतिरेक्यांविरुद्धच्या कारवाईत संजुक्ताचा मोठा वाटा होता.  आसामच्या जंगलात त्यांनी सीआरपीएफचे जवान आणि एके-47 वाहून नेणाऱ्या कमांडोचे नेतृत्व केले. पराशर सध्या दिल्लीतील नॅशनल इन्व्हेस्टिंग एजन्सीमध्ये उपमहानिरीक्षक (डीआयजी) म्हणून कार्यरत आहेत.  यापूर्वी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.  एनआयएमध्ये दहशतवादासह अनेक संवेदनशील प्रकरणे ती पाहते.  एनआयएमधील त्यांच्या कामाचे कौतुक होत आहे. आज संजूक्ता पराशर दिल्ली मध्ये कार्यरत आहे. देशातील दहशतवाद पूर्णपणे निपटून काढणं हेच तिचं ध्येय आहे.

No comments:

Post a Comment