Sunday 16 October 2022

जगातील वन्यजीवांच्या संख्येत ६९ टक्क्य़ांनी घट

हवामान बदल, नैसर्गिक अधिवासामध्ये घट, अवैध शिकार, बेसुमार वृक्षतोड, वणवे आदी अनेक कारणांमुळे वन्यजीवनाचा र्‍हास होत असतो. वर्ल्ड वाईड फंड (डब्ल्यूडब्ल्यूएफ)च्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या लिव्हिंग प्लॅनेट या अहवालानुसार जगातील वन्यजीवांच्या संख्येत १९७0 ते २0१८ या काळात६९ टक्क्य़ांनी घट झाली आहे.

या जीवांमध्ये सस्तन प्राणी, पक्षी, सरीसृप, मासे आदींचा समावेश आहे. हेच भारतातही दिसून आले आहे. ४८ वर्षांमध्ये मधमाश्यांसह गोड्या पाण्यातील १७ प्रजातींच्या कासवांचे प्रमाण कमी झाले आहे. अहवालानुसार, वन्यजीवांची संख्या झपाट्याने कमी होण्यामागे सहा प्रमुख कारणे आहेत. यामध्ये हवामान बदल, वाढते प्रदूषण, शेती, शिकार, आक्रमक प्रजाती आणि जंगलतोड यांचा समावेश आहे.

दुसर्‍या संशोधनानुसार सध्या मनुष्य दर मिनिटाला २७ फुटबॉल मैदानांइतकी जंगलतोड करीत आहे. या अभ्यासासाठी संशोधकांनी ५२३0प्रजातींची पाहणी केली. अभ्यासानुसार, लॅटिन अमेरिका आणि कॅरेबियन देशांमध्ये ४८ वर्षांमध्ये वन्यजीवांच्या संख्येत सर्वात मोठी म्हणजे ९४ टक्के घट झाली आहे. त्याच वेळी, आफ्रिका आणि आशियामध्ये वन्यजीव अनुक्रमे ६६ टक्के व ५५ टक्के कमी झाले आहेत. जागतिक स्तरावर गोड्या पाण्यातील प्रजातींची संख्या ८३ टक्के कमी झाली आहे.

वेगाने होत असलेल्या शहरीकरणामुळे व लोकसंख्या वाढीमुळे प्राण्यासाठी असणारी वन्य जमिनीचे क्षेत्र कमी कमी होत चालले आहे व प्राण्यांना स्वताचे अस्तित्व टिकवणे अवघड झाले आहे व काही प्राण्याचा प्रजाती नामशेष होण्याचा मार्गावर आहेत. या गंभीर परिस्थितीकडे लक्ष देवून नामशेष होवू घातलेल्या प्राणी व पक्षी यांच्या संरक्षणासाठी व संवर्धनासाठी सरकारतर्फे प्राणी व पक्ष्यांसाठी अभयारण्ये घोषित केली गेली आहेत.

माळढोक पक्षी हा असाच एक नामशेष होण्याच्या मार्गावर असलेला दुर्मिळ पक्षी आहे. हा पक्षी गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, कर्नाटका, आंध्र प्रदेश व मध्य प्रदेश ह्या राज्यातील काही भागात आढळतो. संबधित राज्य सरकारांनी माळढोक पक्ष्यासाठी अभयारण्ये घोषित केली आहेत. ह्या दुर्मिळ व नामशेष होण्याचा मार्गावर असलेल्या माळढोक पक्ष्याचा संरक्षणासाठी व संवर्धनासाठी महाराष्ट्र शासनाने १९७९ मध्य माळढोक अभयारण्याची घोषणा केली.

No comments:

Post a Comment