Sunday 18 August 2019

संस्कृत रेडिओ


संस्कृत भाषा संवर्धन व प्रचार-प्रसारणार्थ, खांडबहाले.कॉम निर्मित जगातील सर्वप्रथम संस्कृत-इंटेरनेट-रेड.िओ जागतिक-संस्कृत-दिनी ऑनलाईन प्रसारित करण्यात आला.
र्शवण हे भाषा शिकण्याचे प्रथम आणि अत्यंत प्रभावी माध्यम आहे. कोणतीही भाषा सतत कानावर पडल्याने त्या भाषेचे शब्द, उच्चार, उच्चारणपद्धति, व्याकरण याचे नकळत आकलन होते आणि हळुहळू ती भाषा आपसुकच ओठावर येते. मग याला संस्कृत भाषा कशी अपवाद असेल? संस्कृत अर्थात देववाणी शिकण्याची इच्छा अनेकांना असते परंतु सोयीनुसार व पूर्णवेळ संस्कृत र्शवण करता येऊ शकेल असे इंटरनेट जगतात एकही व्यासपीठ उपलब्ध नाही असे लक्षात आल्यावर नाशिकस्थित खांडबहाले डॉट कॉम या भारतीय भाषा व तंत्रज्ञान-विकास संस्थेने संस्कृत भाषा संवर्धन व प्रचार-प्रसारणार्थ, २४ तास व सातही दिवस (२४बाय ७) अव्याहतपणे सुरू राहिल असा संस्कृत-इंटेरनेट-रेड.िओ जागतिक-संस्कृत-दिनाच्या औचित्याने संस्कृतप्रेमींसाठी ऑनलाईन प्रसारित केला.

याविषयी संस्थेचे संचालक सुनील खांडबहाले यांनी सांगीतले कि, मी संस्कृतभारतीचा विद्यार्थी आहे. संस्कृत भाषेचे अध्ययन करत असताना संस्कृत भाषा कानावर पडत होती परंतु एकदा वर्गाबहेर पडले की संस्कृत-र्शवण दुर्मिळ होते. संस्कृत स्तोत्र, ोक, गीतं अनेक वेबसाइट्स वर अस्ताव्यस्त स्वरूपात उपलब्ध आहेत. परंतु व्यवहारिक जीवनाशी सबंध सांगता येईल असे संवादात्मक संस्कृत अध्ययनपूरक साहित्य संपादन-संकलित करणे आणि २४ तास अव्याहत र्शवण करता येऊ शकेल इतके सुसहय करणे गरजेचे असल्याचे प्रकर्षाने जाणवले. त्यामुळे खरं तर स्वत:साठी संस्कृत-संभाषण शिकण्याचे साधन म्हणुन मी इंटरनेट रेडिओ डिजाइन केला. पुढे अनेकांच्या अग्रहास्तव आणि सहभागातून संस्कृत इंटेरनेट रेडिओला मूर्त रूप देण्यात आले.
यामध्ये विविध प्रसंगानुरूप संस्कृत भाषेतून संवाद-संभाषणं (जसे शिक्षक-विद्यार्थी संवाद, पालक-पाल्य संवाद, मित्र-संवाद, शाळा, कार्यालय, दवाखाना आदी प्रसंग-संवाद), विषयवार धडे, व्याकरण पाठ, शब्दसंग्रह, दैनंदिन जीवनातील वस्तु-संबंध, लघुकथा-बोधकथा, गीतं, कविता, सुभाषितं असा मनोरंजनात्मक अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. जगभरातिल व्यापक लोकसहभागातून प्रसारित केला जाणारा इंटेरनेटवर हा सर्वप्रथम कम्युनिटी रेडिओ आहे. डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू खांडेबहाले डॉट कॉम / संस्कृत , एचटीटीपीपीएस:// टीन्यरल डॉट कॉम / संस्कृत रेडिओ या संकेतस्थळावर संस्कृत रेड.िओ ऐकण्यासाठी विनाशुल्क उपलब्ध आहे. यासाठी कोणतेही सॉफ्टवेअर अथवा अँप डाउनलोड किंवा इंस्टॉल करावे लागत नाही. आपले दैनंदिन काम करता-करता स्मार्टफोन, टॅबलेट तसेच संगणकावर संस्कृत इंटेरनेट रेड.िओ र्शवणाची सुविधा असल्याने र्शोत्यांसाठी अधिक सोयीचे आहे. नजिकच्या काळात सर्वसमावेशक व दर्जे.दार कार्यक्रम निर्मितीसाठी जगभरातील संस्कृतप्रेमी आपले योगदान देऊ शकतील व अभिव्यक्त होऊ शकतील अशी योजना असल्याचे सुनील खांडबहाले यांनी सांगीतले. त्यासाठी विषयतज्ञ आणि संस्कृतप्रेमींच्या सूचना प्रार्थनिय असल्याचे त्यांनी आवाहन केले.

No comments:

Post a Comment