Monday 12 August 2019

राज्यात दोन लाखांवर नागरिक बेपत्ता

दिवसेंदिवस अपहरण, बेपत्ता आदी घटना कानावर पडतात. देशातील अनेक लहान बालके, मुली, महिला, पुरुष आदींच्या हरविलेल्यांची संख्या दिवसागणिक वृद्धांगत आहे. राज्यातही हा आकडा मोठा आहे. देश, राज्यपातळीवर अनेक मागण्यांसाठी आंदोलने केली जाते. परंतु, बेपत्ता झाल्यांचा तुर्तास तरी विचार होताना दिसत नाही. पोलिस प्रशासनाकडून याबाबतचा तपास सुरू असेलही परंतु, किती बेपत्ता सापडलेत असाही प्रश्न आहे. राज्यात गेल्या दोन दशकात दोन लाखावर नागरिक बेपत्ता आहेत. ही बाब चिंताजनक आहे.

राज्यात दररोज मिसींगच्या घटना घडत आहेत. यात बरेचदा बेपत्ता झालेल्या नागरिकांचा शोध लागत नाही. मुलींना देहव्यापारात ढकलून त्यांचे शारीरिक शेषण करणे तसेच त्यांना परप्रांतात विकण्यात आले किंवा मारुन त्यांच्या शरीरातील महत्त्वाची अंग काढून ती विकण्याचा धंदा करणारे रॅकेट आंतरराष्ट्रीय पातळीवर सक्रीय असल्याचे वारंवार सांगितले जाते. यावर वचक बसावा यादृष्टीने पाऊल उचलण्याची गरज आहे. माहिती अधिकार कार्यकर्त्या डॉ. वैशाली कडूकर यांनी मागितलेल्या माहितीच्या लेखी उत्तरातून ही धक्कादायक बाब पुढे आली आहे.
२0११ ते नोव्हेंबर २0१८ पर्यंत राज्यात ५ ते १५ वर्ष वयाची ३ हजार ८६४ मुले, ३ हजार २७२ मुली, तसेच वयस्कर ७८ हजार ६१७ पुरुष बेपत्ता आहेत. हा आकडा १ लाख ८0 हजार १३४ इतका आहे. यासंदर्भात शासनाने काय पाऊले उचलली हा देखील महत्त्वपूर्णप्रश्न आहे. बेपत्ता नागरिकांची माहिती प्रकाशात आल्यानंतर सबब घटनांवर हळहळ व्यक्त करण्यात आली.

No comments:

Post a Comment