Saturday 24 November 2018

नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रेमानंद गज्वी


99व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नाटककार आणि लेखक प्रेमानंद गज्वी यांची निवड करण्यात आली आहे. 98 व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या मावळत्या अध्यक्षा कीर्ती शिलेदार यांच्याकडून गज्वी पदभार स्वीकारतील. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या बैठकीत हा निर्णय शुक्रवारी घेण्यात आला. संमेलनाध्यक्ष पदासाठी श्रीनिवास भणगे, अशोक समेळ, सुनील साकोळकर ही नावं चर्चेत होती. मात्र प्रेमानंद गज्वी यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. यंदाच्या नाट्य संमेलनाचे ठिकाण अजून जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र लवकरच ठिकाणाची घोषणा केली जाणार आहे. नागपूर, लातूर, पिंपरी चिंचवड या ठिकाणांपैकी एक नाव जाहीर होण्याची शक्यता आहे. नाट्य संमेलन समिती या ठिकाणांचा दौरा करून संमेलनाचे अंतिम ठिकाण लवकरच जाहीर करेल. किरवंत, देवनगरी, तन-माजोरी, गांधी-आंबेडकर, व्याकरण, पांढरा बुधवार, काळोखाची लेक, अभिजात जंतू, छावणी अशी 14 नाटके, घोटभर पाणी, बेरीज वजाबाकी, हे राम!, कृष्णविवर अशा 4 एकांकिका संग्रहासह 12 एकांकिका गज्वी यांच्या नावावर आहेत. एकतारी कवितासंग्रह, लागण, ढीवर डोंगा हे कथासंग्रह, जागर, हवे पंख नवे या दोन कांदबर्या, सगुण नगुण, बोधी कला संस्कृती आदी ललित ग्रंथांचे गज्वी यांनी लिखाण केले आहे.

No comments:

Post a Comment