Friday 1 February 2019

राज्यात १७ शहरांत तीव्र वायू प्रदूषण

राज्यातील १७ शहरांची हवा प्रदूषित झाली आहे. यात कोल्हापूर, सांगली, सोलापूर, मुंबई, पुणे, तसेच मराठवाड्यातील औरंगाबाद, लातूर आणि जालना या तीन शहरांचा समावेश आहे. जालना आणि उल्हासनगर ही दोन शहरे राज्यातील सर्वाधिक प्रदूषित शहरे आहेत. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचा, नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम रिपोर्ट नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे. प्रदूषित हवा असलेल्या देशातील शहरांच्या यादीत झाशी, जयपूर, खुर्जा, दिल्ली, नोएडा, बरेली आणि प्रयागराज यासह ३२ शहरांचा समावेश करण्यात आला आहे.
अहवालानुसार देशातील २३ राज्यांतील १0२ शहरांनी प्रदूषणाची र्मयादा ओलांडली असून, यात प्रामुख्याने विशाखापट्टणम, गुवाहाटी, चंदिगड, रायपूर, अहमदाबाद, सुंदरनगर, श्रीनगर, धनबाद, बंगळूर, इंदूर, मुंबई, कोहिमा, भुवनेश्‍वर, लुधियाना, जोधपूर, तुतीकोरिन, हैदराबाद, लखनौ, वाराणसी, आगरा, ऋषिकेश, कोलकाता, गया आदी शहरांचा समावेश आहे. प्रदूषण नियंत्रण बोर्डाने निश्‍चित केलेल्या मापदंडाचे परिमाण या शहरांनी ओलांडलेले आहेत.प्रदूषित शहरांत महाराष्ट्र (१७) अव्वल, उत्तर प्रदेश (१५) दुसर्‍या, तर पंजाब राज्य (९) तिसर्‍या स्थानावर आहे. महाराष्ट्रातील अकोला, अमरावती, औरंगाबाद, बदलापूर, चंद्रपूर, जालना, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, पुणे, सांगली, सोलापूर आणि उल्हासनगर या शहरांचा प्रदूषित शहरांत समावेश झाला आहे. ६१ मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटर पासून ते २६0 मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटरपर्यंत जाडी असलेले धुलिकण प्रदूषित शहरांतील हवेत आढळून येतात. भारत आणि जागतिक आरोग्य संघटनेची मानांकने तसेच अहवालांच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आलेला आहे.

No comments:

Post a Comment