Monday 18 February 2019

सुविचार संग्रह


1) सुखी आयुष्य जगायचे असेल तर आपल्या गरजा मर्यादित ठेवाव्या लागतील.
2)इतरांचा द्वेष करणे म्हणजे दुःखाला निमंत्रण देणे होय.
3) प्रत्येक पदार्थाची चव अवश्य बघावी;पण खाताना मात्र काय पचेल याचा विचार करावा.
4) देव आहे आणि तो आपल्याला मदतही करतो;आपले सगळेच काम तो करत नाही.
5) मराठी आमुची मायबोली तिचिये साऊली आम्ही असू।
6) बलवान माणसाला नशीब साथ देते.

7) लढणाऱ्याला तलवारीचे ओझे होत नाही.
8)आपल्याला नीट पोहता येत नसेल तर दुसऱ्याला वाचवायला जाऊ नये.
9)दृष्टीकोन सकारात्मक असणे म्हणजे यशाची दिशा सापडल्याचे लक्षण होय.
10) विचार चांगले असून पुरत नाही, ते यशस्वीपणे राबवण्यासाठी परिस्थितीचे नेमके भान असावे लागते.
11) निरपेक्ष मदत केली तर आनंद मिळतो.
12) जिच्यामुळे भय निर्माण होते,ती विपत्ती आणि जिच्यामुळे अभय मिळते,ती संपत्ती.
13) एकमेकांना पूर्ण ,संपन्न करण्याची तळमळ म्हणजे प्रेम.
14) जो सुरेल जगण्याची इच्छा करतो,त्याला गीत मिळते.
15)आयुष्यात जसजसे मोठे होत जातो,तसतशा आपल्या मर्यादा आपल्याला उमगत जातात.
16) श्रम न करता जगणे हा गुन्हा आहे.
17)आपण काय करू शकतो यावर आपण आपली कुवत ठरवतो. लोक ती आपल्या कृतीवर ठरवतात.
18) एकवेळचा उपास एकवेळच्या अतिखाण्यापेक्षा कमी अपायकारक असतो.
19)माणसाचा आहार त्याची वृत्ती आणि प्रकृती ठरवतो.
20) काही वेळा ऐकण्यामुळं शहाणपण येतं आणि बोलण्यानं पश्चाताप होतो.
21) नद्या आपल्या ठरलेल्या मार्गाने वाहतात म्हणूनच त्यांचा उपयोग जास्तीत जास्त लोकांना होतो.
22) वाईट हेतूने सांगितलेले सत्य हे अनेक असत्यांपेक्षा भयानक असते.
23)कोणताही माणूस एका वेळी एकच पाऊल टाकू शकतो; पण ते टाकण्यासाठी काही वेळा खूप धैर्य लागते.
24)नवीन कल्पना सुरुवातीला बहुतांश विचित्र वाटतात.
25)स्वतः चे दोष ओळखून ते मान्य करणे हा एका प्रकारे पुरुषार्थाच आहे.
26) थोडं ज्ञान मिळालं की,सगळं समजलं असा भ्रम घात करतो.
27) भाग्य आपल्या हातात नसते, प्रामाणिकपणे काम केल्यास यश मात्र हाती लागते.
28)महान सत्ये आणि थोर माणसे अगदी साधीसुधी असतात.
29)सुखात सहज सोबत मिळते. दुःखात मात्र एकाकीच वाटचाल करावी लागते.
30) शुद्ध मनाचा माणूस दुसऱ्यातील गुण शोधतो. दृष्ट माणूस नेहमी दोषच शोधतो.
31)निष्ठेने काम केले की कीर्ती मागे धावत येते.
32)युद्धाने प्रश्न सुटत नाहीत हे खरे आहे;पण युद्ध न केल्याने अनेक नवीन प्रश्न निर्माण होतात.
33) सचोटीचा माणूस ही परमेश्वराची उदात्त कलाकृती असते.
34)द्वेषभावना सुडाने नाहीशी होत नाही.ती प्रेमानेच नष्ट होते.
35) दुसऱ्याला क्षमा करणे चांगले आणि केलेली क्षमा विसरणे हे त्याहून उत्तम.
36)भाजलेल्या बियांना मुळे फुटत नाहीत.
37) थोड्यांसाठी असलेली संस्कृती टिकाऊ नसते.
38)विवेकी मित्र मिळवणे हे जीवनातील एक श्रेष्ठ वरदान आहे.
39) अहंकार आणि लोभ ही माणसाच्या दुःखाची मूळ आणि मुख्य कारणे आहेत.(संकलन-मच्छिंद्र ऐनापुरे)

No comments:

Post a Comment