Monday 4 February 2019

बाबामहाराज सातारकर

नीळकंठ ज्ञानेश्‍वर गोरे सातारकर यांचा जन्म ५ फेब्रुवारी, इ.स. १९३६ रोजी सातार्‍याच्या नामवंत गोरे सातारकर घराण्यात झाला. त्यांनी वकिलीचे पदवीपयर्ंतचे शिक्षण घेतले आहे. त्यांच्या घराण्यात गेल्या तीन पिढय़ांपासून कीर्तनाची व प्रवचनाची परंपरा चालत आली होती. वारकरी संप्रदायातील प्रमुख फड म्हणून त्यांच्या घराण्याच्या सातारकर फडाचे नाव घेतले जात असे. प्रवचनकार दादा महाराज सातारकर यांनी या फडाची सुरुवात केली.
हरिविजय, भक्तिविजय या ग्रंथांवर ते प्रवचने करत असत. त्यांच्यानंतर त्यांचे दुसरे पुत्र आप्पामहाराज सातारकर यांनी फडाची धुरा सांभाळली. इ.स. १९६२ साली अप्पामहाराजांचे निधन झाल्यावर आप्पामहाराजांचे पुतणे-नीळकंठ ज्ञानेश्‍वरांनी, अर्थात बाबामहाराज सातारकरांनी फडाची परंपरा सांभाळली. पुत्र, पिता, पती, बंधु, सखा, मित्र, सद्गुरु या सर्वच भूमिका, आपल्या जीवनात महाराज अगदी सहज लीलया पेलत असतात. परिवाराला फडाला, समाजाला त्यांच्या प्रेमाने बांधून ठेवले आहे. कीर्तनकलेचा परिपूर्ण अविष्कार म्हणजे बाबामहराज हे खरेच आहे. याबरोबरच महाराजांच्या व्यक्तिमत्वाचे अनेकही अनोखे पैलू आहेत. बालपणी त्यांना घोडेस्वारी, क्रिकेट, बोटिंग, ट्रेकिंग, शुटिंग, स्वीमिंग या सर्वात अभ्यासाबरोबरच रस होता. फोटोग्राफी त्यांचा आवडता छंद आहे. कलाकुसर, अनोख्या रचनांची त्यांची आवड, लाकूड, दगड, चित्रे, इमारती उठून दिसते. एक अत्यंत उत्कृष्ट गायक एक महान कीर्तनकार, एक कसलेला शेतकरी,उत्तम फर्निचर व्यावसायिक, वारकरी विश्‍वाची बाजू सर्मथपणे मांडणारा स्वयंभू पदवी असलेला वकील,शब्दाच्या खेळाने तथा कोटीने मजा उडवून देत अंर्तमुख करणयास लावणारा एक कोटयाधीश, फडावरील सकळा आधार देणारा सर्मथ सदगुरु, समाजाला देवदत्त स्वर्गिय सुस्वरां च्या स्वशक्तिपाताने सन्मार्गा नेणारा महामानव, परिवारातील स्वजनांना आपली थोरीव विसरुन आपला जिवलग, सखा वाटणारा मायबाप अशा अनेकविध पैलूनीं प्रकाशणारे महाराजांचे व्यक्तिमत्व बहुआयामी आहे. निर्सग, प्राणी, माणसे, कला, संगीत, भजनकीर्तन, परमेश्‍वर, जीवनावर भरभरुन मनस्वी प्रेम करणारे कलंदर दिलखुलास, गंगेच्या जलासम पावन आणि पारदश्री तरीही अतिपरखड, सर्मथ, राजस, लोभस असे त्यांचे व्यक्तिमत्व सर्वांना खिळवून ठेवते, हे मात्र वास्तव सत्य आहे.

No comments:

Post a Comment