Friday 1 February 2019

कल्पना चावला

अमेरिकन अंतराळवीर होती. ती भारतीय वंशाची अंतराळात जाणारी प्रथम महिला होती.कल्पना चावला यांचे शालेय शिक्षण गावातील टागोर बाल निकेतन विद्यालयात झाले. कल्पना चावला हुशार असल्याने त्या नेहमी त्या पहिल्या पाच नंबरात असत. त्यांचा स्वभाव अतिशय साहसी होता. त्या कराटे शिकल्या. भरतनाट्यम या कला प्रकारातही त्यांनी नैपुण्य प्राप्त केले.
संजय हा त्यांचा भाऊ कर्नालच्या फ्लाईंग क्लबमध्ये जात होता. तेव्हा कल्पना यांनाही तेथे जावे असे वाटत. पण जेव्हा वडिलांनी नोंदणी अर्ज दिला तेव्हा अधिकार्‍यांनी कल्पना महिला आहे, ती वैमानिक होणे योग्य वाटत नाही असे सांगितले. तसेच त्यांनी कल्पना यांना या वेडापासून परावृत्त करण्यास सांगितले. पंजाब विद्यापीठातून त्यांनी १९८२ साली एरोनॉटिकल अभियांत्रिकी पदवी घेतली. पुढे १९८४मध्ये अलिर्ंगटन टेक्सास विद्यापीठातून एरोनॉटिकल उच्च अभियांत्रिकी शिक्षण घेऊन,त्यांनी कॉलोरॅडो विद्यापीठांतून एरोस्पेस अभियांत्रिकी विभागातून १९८८मध्ये डॉक्टरेट मिळवली. लहानपणापासून विमान शिकण्याचे स्वप्न अमेरिकेत काही दिवसातच पूर्ण झाले. डिसेंबर १९९४ साली चावला यांची अमेरिकेतील नासामध्ये १५व्या अंतराळवीर समूहात निवड झाली. मिशन विशेषज्ञ म्हणून त्यांनी एसटीएस-८७ वर काम केले. अवकाशात त्यांनी ३७६ तास व ३४ मिनिटे प्रवास केला.

No comments:

Post a Comment