Monday 4 February 2019

तोंडाचा आणि स्तनाचा कँसर

पुरुषांमध्ये मौखिक आणि फुप्फुसांच्या कर्करोगामुळे आणि स्त्रियांमध्ये गर्भाशय आणि स्तनांच्या कर्करोगामुळे मृत्यूमुखी पडण्याचे प्रमाण जास्त आहे. भारतात कर्करोगामुळे जितके लोक मृत्यूमुखी पडतात त्यापैकी ५0 टक्के मृत्यू वरील कारणांमुळे होत आहे.

आजच्या घडीला भारतात तब्बल ३ दशलक्ष लोक कर्करोगाने ग्रासलेली आहेत. ६ ते ७ लाख रुग्णांचा कर्करोगामुळे मृत्यू होतो. २0२0 पर्यंत कर्करोगाच्या रुग्णांची संख्या तब्बल १७.३ लाखांपर्यंत वाढेल, तर कर्करोगामुळे मृत्यूमुखी पडणार्‍यांची संख्या ८.८ लाख इतकी झालेली असेल, असा अंदाजही व्यक्त केला जात आहे. भारतात गेल्या पाच वर्षांमध्ये कर्करोगाचे निदान झाल्यानंतर एक तृतीयांश रुग्ण बरे झाले आहेत, तर ७१ टक्के रुग्णांना त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या वर्षांमध्ये जग सोडून जावं लागलं आहे, प्रशिक्षित कर्करोगतज्ज्ञांचा अभाव हेही यामागील मुख्य कारण आहे. नव्याने निदान झालेल्या ५ हजार रुग्णांमागे एक अँकोलॉजिस्ट अशी सध्याची विदारक परिस्थिती आहे. भारत देशात स्तनांचा कर्करोग स्त्रियांमध्ये फारच मोठय़ा प्रमाणात आढळून येतो आणि इतर सर्व प्रकारांमधील कर्करोग स्त्रियांना होण्याचे प्रमाण २७ टक्के आहे. यामुळे ७0 हजार २१८ मृत्यू झाल्याची नोंद आहे. भारतात लोकांनी मृत्यूमुखी पडण्याच्या कारणांपैकी कर्करोग हे सर्वात मोठे आणि दुसर्‍या क्रमांकावरील कारण आहे. गेल्या वर्षी भारतात १७.३ लाख नवीन कर्करुग्णांची नोंद झालेली आहे.

No comments:

Post a Comment