Wednesday 26 February 2020

पाण्याखालून धावणारी भारतातील पहिली मेट्रो

देशात सर्वात पहिल्यांदा मेट्रो सेवा सुरु करुन इतिहास रचणारे कोलकाता शहर आता पुन्हा एकदा इतिहास रचणार आहे. कारण, पाण्याखालून धावणारी देशातील पहिली मेट्रोही आता कोलकाता शहरातून धावणार आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते या मेट्रोचं उद्घाटन होणार आहे. तर कोलकात्यात पहिली मेट्रो सेवा 1984 मध्ये  सुरु झाली होती. त्याची घौडदौड आज एकविसाव्या शतकातही सुरुच आहे. रेल्वे मंत्री पीयूष गोयल बुधवारी कोलकाता ईस्ट-वेस्ट मेट्रो सेवेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.

तसेच त्यानंतर शुक्रवारी 14 फेब्रुवारी रोजी सर्वसामान्य जनतेसाठी ही सेवा खुली होईल. या मेट्रोची सर्वात खास बाब म्हणजे ही मेट्रो पाण्यात बनवण्यात आलेल्या बोगद्यातून धावणार आहे. त्याचबरोबर ही देशातील सर्वात स्वस्त मेट्रो असणार आहे. एकूण 15 किमीची ही मेट्रो लाईन असणार आहे. तर या मेट्रोनं एका स्टेशनहून दुसऱ्या स्टेशनला जाण्याचं तिकीट केवळ पाच रुपये असणार आहे. दरपत्रकानुसार, दोन किमीसाठी पाच रुपये, पाच किमीसाठी 10 रुपये, दहा किमीसाठी 20 रुपये  त्यानंतर शेवटच्या स्टेशनपर्यंत 30 रुपये इतकं भाडं आकारण्यात येणार आहे.
त्याचबरोबर या मेट्रोमध्ये प्रवाशांना अनेक सुविधांचा लाभही मिळणार आहे. यामध्ये प्लॅटफॉर्म स्क्रीन डोअर, डिटेक्शन सिस्टीमसारखी आधुनिक सुविधा असणार आहे.

No comments:

Post a Comment