Friday 28 February 2020

मोरारजी देसाई

मोरारजी रणछोडजी देसाई हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीत एक कार्यकर्ते होते. ते १९७७ ते १९७९ दरम्यान जनता पार्टीने तयार केलेल्या सरकारमध्ये भारताचे ४थे पंतप्रधान बनले. राजकारणाच्या प्रदीर्घ कारकीर्दीत त्यांनी मुंबई राज्याचे मुख्यमंत्री, भारताचे गृहमंत्री व अर्थमंत्री आणि भारताचे दुसरे उपपंतप्रधान अशी अनेक महत्वाची पदे भूषविली.पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे निधन झाल्यानंतर देसाई हे १९६६ मध्ये पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार होते. १९६९ पयर्ंत इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात त्यांची उपपंतप्रधान आणि अर्थमंत्री म्हणून नियुक्ती झाली. १९६९ च्या काँग्रेसच्या फाळणीच्या वेळी त्यांनी राजीनामा दिला आणि भारतीय राष्ट्रीय कांग्रेस (संगटन)(कांग्रेस)(ओ) मध्ये सामील झाले.
१९७७ मध्ये वादग्रस्त आणीबाणी उठवल्यानंतर, विरोधी पक्षांनी जनता पक्षाच्या छायेत असलेल्या काँग्रेसविरुद्ध एकत्र लढा दिला आणि १९७७ ची निवडणूक जिंकली. देसाई पंतप्रधान म्हणून निवडले गेले आणि ते भारताचे पहिले गैर-काँग्रेस पंतप्रधान झाले. १९७४ मध्ये भारताच्या पहिल्या अणुचाचणीनंतर देसाई यांनी चीन आणि पाकिस्तानशी मैत्रीपूर्ण संबंध परत आणण्यास मदत केली आणि १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धासारख्या सशस्त्र संघर्ष टाळण्याचा संकल्प केला. १९ मे १९९0 रोजीत्यांना पाकिस्तानचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार, निशान-ए-पाकिस्तानने गौरविण्यात आले. भारतीय राजकारणाच्या इतिहासामध्ये वयाच्या ८४ व्या वर्षी पंतप्रधानपदाची सूत्रे सांभाळणारे ते सर्वात वयस्कर व्यक्ती आहेत. त्यानंतर त्यांनी सर्व राजकीय पदांवरुन सेवानवृत्ती घेतली, परंतु १९८0 मध्ये जनता पक्षासाठी प्रचार करत राहिले. त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतर% देण्यात आला. वयाच्या ९९ व्या वर्षी १९९५ मध्ये त्यांचे निधन झाले.

No comments:

Post a Comment