Thursday 27 February 2020

उद्योगपती लक्ष्मी मित्तल

स्टील किंग लक्ष्मीनिवास मित्तल हे ब्रिटनमधील सर्वात धनाढय़ आणि सार्मथ्यशाली आशियाई व्यक्ती ठरले आहेत. मित्तल हे १५.५ अब्ज पाऊंड (सुमारे १२५४ अब्ज रुपये) संपत्तीचे मालक आहेत. 'ईस्टन आय' या साप्ताहिक वृत्तपत्राने आशियातील १0१ टॉप शक्तिशाली उद्योगपतींची यादी प्रकाशित केली आहे. जगातील अग्रगण्य इस्पात कंपनी आर्सेलर मित्तलचे सीईओ आणि अनिवासी भारतीय (६१) यांना ब्रिटनमधील सर्वांत धनाढय़ आशियाई उद्योगपती म्हणून यादीत उल्लेख करण्यात आला आहे. यादीनुसार मित्तल यांच्याकडे दौलत, प्रतिष्ठा आणि ताकद या सर्वकाही गोष्टी आहेत. केसिंग्जटन पॅलेस गार्डनमध्ये त्यांची मालमत्ता आहे.
खासगी जेट विमानाने ते प्रवास करतात. सरे भागात ३४0 एकरात पसरलेला इको फ्रेंडली बंगला आणि २६.६ कोटी पाऊंडचे (सुमारे) एक आलिशान जहाजदेखील आहे. जागतिक स्तरावर पोलाद निर्मिती क्षेत्रात अग्रणी असलेल्या आर्सेलर मित्तल कंपनीचे सर्वेसर्वा लक्ष्मीनिवास मित्तल यांनी भारताचे पोलादमंत्री धर्मेंद प्रधान यांची नुकतीच भेट घेतली. देशातील पोलादाचा खप वाढवणे आणि पोलाद क्षेत्राला अधिकाधिक स्पर्धात्मक करणे याबाबत तपशीलवार चर्चा या बैठकीत करण्यात आली. धर्मेद्र प्रधान यांनी ट्विटच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, देशातील पोलादाची मागणी आणि भारतीय पोलाद उद्योग भरभराटीस आणण्यासह इतर अनेक मुद्यांवर या बैठकीत चर्चा झाली. आर्सेलर मित्तल कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनिवास मित्तल यांच्या सोबतची बैठक खूपच यशस्वी झाल्याची चर्चा आहे. दोघांनी शाश्‍वत ऊर्जा, देशांतर्गत पोलाद मागणी, पोलाद खपातील वाढ आणि पोलाद व तेल आणि गॅस उद्योगांना भरभराटीस आणून त्यांना जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी सक्षम करण्यावर चर्चा केली. डिसेंबर २0१९ नंतर मित्तल आणि प्रधान यांची ही दुसरी भेट आहे. आर्सेलर मित्तल यांनी डिसेंबर २0१९ मध्ये दिवाळखोर झालेली एस्सार स्टील कंपनी खरेदी केली होती. त्यासाठी त्यांनी निप्पॉन स्टील कॉपोर्रेशन कंपनीसोबत मिळून आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील इंडिया लिमिटेड नामक संयुक्त उपक्रम स्थापन केला होता. नव्या कंपनीची मालकी आणि कारभार एस्सार स्टीलच्या हाती असेल. तसेच या संयुक्त उपक्रमात आर्सेलर मित्तल कंपनीची ६0 टक्के भागीदारी आहे. या कंपनीच्या माध्यमातून आर्सेलर मित्तल कंपनीने भारतीय पोलाद बाजारात प्रवेश केला असल्याने यापुढे पोलाद बाजारात याचा किती सकारात्मक प्रभाव पडतो, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment