Tuesday 18 February 2020

आंग सान स्यूची: लोकशाहीसाठीचा संघर्ष

ब्राह्मी जनतेच्या न्याय हक्कासाठी लढा देत, ब्रह्मदेशाचा इतिहास नव्यानं लिहू पाहणाऱ्या आंग सान स्यू या रणरागिणीची संघर्षकथा नव्या पिढीला प्रेरक आहे. ब्रह्मदेश हा आपला अगदी शेजारी देश. मंडालेच्या तुरुंगात लोकमान्य टिळकांनी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला म्हणून आणि हा पॅगोडांचा देश आहे. एवढीच आपल्याला या देशाची ओळख आहे. पण, हा देश जगात सर्वाधिक काळ हुकूमशाही असलेला आणि सर्वाधिक काळ संपूर्ण लोकशाहीसाठी लढा देणारा देश आहे. आणि या आपल्या मातृभूमीसाठी इंग्लंडमधली नोकरी, घर, संसार, पती आणि दोन मुलं सगळं सोडून आंग सान स्यू ची ही ब्रह्मदेशी स्त्री, राजकारणात उतरते. सरकारच्या जुलमी राजवटीविरुद्ध अहिंसक मार्गानं लढा देण्यासाठी स्वत: समवेत सगळ्या देशाला उद्यक्त करते, वाटेल त्या हालअपेष्टा सोसत, हकूमशाही विरुद्ध निर्भयपणे उभी राहण्याची शिक्षा म्हणून वर्षानुवर्षे स्थानबद्ध राहते, आपला संसार, हसरं सुखी कुटुंब कायमचं सोडून द्यायला
तयार होते. हे सारं निव्वळ अचंबित करणारं आहे. एवढ्याशा
कुडीतली जिद्द, संयम, प्रखर देशाभिमान सहनशीलता आपल्याला निःशब्द करते. ब्रह्मदेशातल्या समस्त जनतेचं लाडकं व्यक्तिमत्त्व म्हणजे थोर सेनानी ब्रह्मदेशाचे राष्ट्रपुरुष अशी ज्यांची ओळख आहे ते आंग सान. लढवय्या. क्रांतिकारक आंग सान यांनी विवाह केला तो खिनची या वैद्यकीय क्षेत्रातल्या तरुणीशी. याच दाम्पत्याच्या पोटी आँग सान स्यू ची हिचा जन्म झाला. बाळाच्या नावाआधी वडिलाचं नाव लावायच्या ब्राह्मी प्रथेनुसार स्यूची हिचं नाव झालं. आंग सान स्यूची बालवयातच पित्याचं छत्र हरपलं. राजकीय पटलावर स्वत:ची मुद्रा उमटवणाऱ्या आंग सान यांची त्यांच्या हितशत्रूनी निर्घृण हत्या केली. मात्र, स्य च्या आईनं मात्र आपल्या मुलांना हिमतीनं वाढवलं. देश प्रेमाचा वारसा पित्याकडून लाभला होताच. आईनंही राष्ट्र भक्तीचं बाळकडू पाजून, बौद्ध धर्माच्या संस्कारात कठोर शिस्तीत स्यू चीला वाढवलं. स्यूची या आईची खिनची ची नेमणूक भारतात, ब्रह्मदेशाची राजदूत
म्हणून झाली. त्यामुळे स्यू ची चं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण दिल्लीमध्ये झालं. पुढे उच्च शिक्षणासाठी तिनं ऑक्सफर्डला प्रयाण केलं. पण, भारतातल्या वास्तव्यात तिनं महात्मा गांधीवरची अनेक पुस्तक वाचली. इतिहास वाचला आणि सत्य आणि अहिंसेवर तिचा विश्वास बसला तो कायमचा. ऑक्सफर्डमधलं शिक्षण पूर्ण करून स्यू ची नं अमेरिकेत न्यूयॉर्क इथं काही काळ संयुक्त राष्ट्रसंघात नोकरीही केली. आईचं स्यू च्या प्रगतीकडे लक्ष होतं. मुलीच्या यशातच तिचा आनंद होता. परंतु, स्यूला मात्र इंग्लंडमधल्या वास्तव्यातच भावी सहचर लाभला होता.
मायलेक रीस या उमद्या ब्रिटिश तरुणानं तिचं हृदय काबीज केलं होतं. खिनचीला म्हणजे स्यूची च्या आईला मात्र हा विवाह मान्य नव्हता. बऱ्याच विरोधानंतर अखेर १ जानेवारी १९७२ ला स्यूची आणि मायकेलचं लग्न झालं. घर संसार नोकरी हे चक्र सुरू होतं यथावकाश त्यांना दोन मुलं झाली अलेक्झांडर आणि किम. खिनचीचा विरोध आता मावळला होता. नातवंडांवर तिची विलक्षण माया होती. अचानक खिनचीला हृदयविकाराचा झटका आला आणि स्यू ची ला नवरा मुलं मागे ठेवून ब्रह्मदेशात यावं लागलं. विवाहानंतर ती राहत होती इंग्लंडमध्ये पण मनाने ती मायदेशातच होती. आँगसान या थोर राष्ट्रपुरुषाची आपण कन्या आहोत याचा तिला कधीही विसर पडला.
नव्हता. तिचं जाणं आता बहुधा कायमच हे मायकेल ओळखून होता. पण, स्यू ची आपल्या पती आणि मुलांमध्येही तितकीच गुंतली होती. इथून सुरू होतो आँग सान स्यू ची या तेजस्वी स्त्रीचा विलक्षण लढा आपल्या देशात लोकशाही यायला हवी. प्रत्येकाला शिक्षणाची संधी मिळायला हवी, स्वतःच्या मनाप्रमाणे नोकरी धंदा व्यवसाय करता यावा, अभिव्यक्ती स्वातंत्र्य हवं स्वतःच्या देशात कुठेही संसाराची मोकळीक हवी, सरकारला जाब विचारण्याचा हक्क हवा अशा अनेक मूलभूत मागण्यांसाठी तिचा लढा सुरू झाला. आजारी आईची शुश्रूषा इंग्लंडमधल्या कुटुंबाची सतत काळजी आणि ब्रह्मदेशातल्या वाढत्या जुलमी दडपशाही
विरुद्ध शांततापूर्ण निदर्शनं. तिच्या दुबळ्या देहात सामर्थ्य मात्र विलक्षण होतं लष्करी राजवटीनं तिचा मनोनिग्रह मोडण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. तिच्या कुटुंबापासून तिला दूर ठेवलं मुलांना भेटायला येऊ दिलं नाही. मायकेलच्या अखेरच्या आजारपणात तिला इंग्लंडला जाता आलं नाही अशातच तिच्या या अथक परिश्रमाची सत्य आणि अहिंसा या महात्मा गांधीच्या तत्त्वावर विश्वास ठेवून सुरू असलेल्या लढ्याची दखल घेऊन तिला १९९१ साली नोबल पुरस्काराने गौरविण्यात करण्यात आलं. त्या सोहळ्यात तिच्या वतीने पुरस्कार स्वीकारला तिच्या थोरल्या मुलानं अलेक्झांडरनं. स्थानबद्धता ही तर स्यू च्या नशिबीच लिहिली होती. पण, तिचा संघर्ष मात्र सुरू होता. हळूहळू सरकारच्या मानसिकतेत बदल होत होता. अन्यायाचा अत्याचाराचा शेवट जरी झाला नाही तरी स्यू ची सुटका मात्र झाली. ब्रह्मदेशातली तरुण पिढी वुई लव्ह स्यूची वुई स्टँड फार स्यूची अशा घोषणा देत होती.

No comments:

Post a Comment