Wednesday 26 February 2020

मराठी साहित्यात अमूल्य योगदान देणारे कुसुमाग्रज

मराठी साहित्यात अमूल्य योगदान देऊन चार दशकांपेक्षा जास्त काळ प्रभाव गाजविणारे प्रतिभावंत कवी, लेखक, नाटककार, लघुनिबंधकार, कादंबरीकार, समीक्षक, कविश्रेष्ठ कुसुमाग्रज म्हणजेच वि. वा. शिरवाडकर हे होत. कलात्मक लिखाण करून त्यांनी मराठी साहित्यात विशेष ठसा उमटवला. वि. स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते. मराठीची दैन्यावस्था पाहून आपल्या माय मराठीत सकस आणि दमदार अशी साहित्य निर्मिती करून त्यांनी मराठी भाषेला एक वेगळेच वैभव प्राप्त करून दिले.या युगातही जगातील सर्वाधिक बोलल्या जाणार्‍या १0 भाषात स्थान पटकवणारी मराठी. या मराठीला कुसुमाग्रजांनी आपल्या स्वप्रतिभेच्या बळावर उत्तुंग शिखरावर नेऊन पोहचवले म्हणूनच त्यांचा जन्म दिन २७ फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो.

कुसुमाग्रज यांचा जन्म २७ फेब्रुवारी १९१२ रोजी पुण्यात झाला. त्यांचे मूळ नाव गजानन रंगराव शिरवाडकर असे होते. पण त्यांच्या काकांनी त्यांना दत्तक घेतल्याने त्यांचे नाव विष्णु वामन शिरवाडकर असे बदलले. वि वा शिरवाडकर यांना कुटुंबातील सर्वजण तात्या म्हणून संबोधायचे.कुसुमाग्रज यांना सहा भाऊ व एक कुसूम नावाची लहान बहीण होती.ती एकुलती एक सर्वांची लाडकी म्हणून कुसूमचे अग्रज म्हणजेच कुसुमाग्रज असे नाव त्यांनी धारण केले. त्यांनी कुसुमाग्रज या टोपण नावाने कवितालेखन केले. कुसुमाग्रज यांना नाटक आणि क्रिकेट याचे अतिशय वेड होते. त्यांनी शाळेत असतानाच कविता लिखाणास सुरुवात केली होती.१९२९ ला बालबोधमेवा या मासिकात त्यांची कविता प्रसिद्ध झाली.त्यानंतर र%ाकर या मासिकात त्यांच्या कविता प्रसिद्ध झाल्या.१९३२ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या काळाराम मंदिर सत्याग्रहात कुसुमाग्रज यांचा सहभाग होता.त्यांचे शिक्षण नाशिक येथे झाले. त्यांचे बी.ए. चे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी काही काळ चित्रपट क्षेत्रात पटकथा लिहिण्याचे काम केले.तसेच चित्रपटामध्ये छोट्या छोट्या भूमिका करने अशी कामे केली. पण यामध्ये त्यांना म्हणावे तसे यश मिळाले नाही. यानंतर त्यांनी स्वराज्य,सारथी,धनुधर्ाी,प्रभात,नवयुग या वर्तमानपत्रात आठ वर्षे काम केले. काही दिवस स्वदेश साप्ताहिकाचे काम करून त्यांनी मग आपल्या लिखाणावर लक्ष केंद्रित केले.
कॉलेजमध्ये असताना ते र%ाकर या मासिकात लिहीत होते. समाजातील अन्याय,अत्याचार व असमानता यावर त्यांनी कविता लिहायला सुरुवात केली.१९३३ मध्ये त्यांनी नवा मनु नावाच्या वर्तमानपत्रात लिहिण्यास सुरुवात केली. याच वर्षी त्यांनी ध्रुव मंडळाची स्थापना केली.१९३४ मध्ये याच ध्रुव मंडळातर्फे त्यांचा जीवनलहरी हा कवितासंग्रह प्रकाशित झाला. तसेच त्यांचा विशाखा हा काव्यसंग्रह वि.स.खांडेकर यांनी छापून घेतला यानंतर त्यांनी सर्व साहित्यात लिखाण सुरू केले. इंग्लिश भाषेला लोकमान्य टिळकांनी वाघिणीचे दूध म्हटले होते आणि युवकांना आवाहन केले होते की इंग्लिश शिकून इंग्रजांना हकलवा. इंग्रजांच्या विरोधात आणि स्वातंत्र्य लढय़ातील अनेक प्रसंग, लढा हे आपल्या नाटकातून, कथा, कादंबरीतून, कवितेतून कुसुमाग्रज यांनी वर्णन केले. स्वातंत्र्य लढयासाठी जनतेला प्रेरणा देऊ लागले. कुसुमाग्रज यांनी इंग्लिश कादंबर्‍या, नाटक यावरून नाटके लिहिली. मोलीरी, शेक्सपिअर ऑस्कर वाईल्ड इत्यादी लेखकांच्या नाटकांचे अनुवाद केले आणि नवीन नाटके सुद्धा लिहिलीत. नटसम्राट हे त्यांचे अत्यंत गाजलेले असे नाटक आहे. ते किंग लेयर या नाटकावरून घेतले होते पण याला कुसुमाग्रज यांनी इतका सुंदर साज चढवला की ते नाटक व त्यावर काढलेला सिनेमा आजही गाजतोय. नटसम्राट या महान नाट्यकृतीसाठी त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला.

No comments:

Post a Comment