Friday 27 November 2020

माउंट एव्हरेस्टची उंची 0.86 मीटरने वाढली


नेपाळमध्ये 2015 साली झालेल्या भूकंपानंतर जगातील सर्वात उंच शिखर असलेल्या माउंट एव्हरेस्टची उंची घटल्याचा दावा केला जात होता. या दाव्यातीळ तथ्य पडताळून पाहण्यासाठी चीन आणि नेपाळ याांनी जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्टची उंची नव्याने मोजणी  मोजणी करण्याचे काम हाती घेतले होते.त्यानुसार माऊंट एव्हरेस्टची 0.86 मीटरने वाढली आहे. नेपाळ आणि चीनच्या सीमेवर आहे. त्याची अधिकृत उंची  48.886  मीटर (29 हजार 29 फूट) इतकी आहे. 1954 मध्ये भारतीय सर्वेक्षण विभागाने पहिल्यांदा या शिखराची उंची मोजली होती. अनेकांनी शिखराची उंची मोजली होती. मात्र, 1954 साली केलेली मोजणी अधिकृतरित्या स्वीकारण्यात आली. 1975 मध्ये चिनी सर्वेक्षकांनी माउंट एव्हरेस्टची उंची मोजली होती. त्यावेळी एव्हरेस्टची उंची  8848.13  मीटर इतकी उंची नोंदवण्यात आली होती. माउंट एव्हरेस्ट जगातील सर्वात उंच पर्वतशिखर आहे. एका माहितीनुसार नेपाळमध्ये याला सागरमाथा म्हणून ओळखले जाते तर तिबेटमध्ये चोमो लुंग्मा म्हणतात. 1856 मध्ये ब्रिटिश राजवटीमधील भारतीय सर्वेक्षण विभागाने घेतलेल्या त्रिमितीय सर्वेक्षणामध्ये या शिखराची उंची 29 हजार 29 फूट इतकी निश्चित करण्यात आली. या अगोदर हे शिखर 'पीक XV' या नावाने ओळखले जात होते. त्या वेळचे भारतीय सर्वेक्षण खात्याचे प्रमुख(सर्व्हेयर जनरल) ॲन्ड्‌र्‍यू वॉ होते. त्यांनी आपल्या 1843 मध्ये निवृत्त झालेल्या अधिकाऱ्याचे म्हणजे कर्नल सर जॉर्ज एव्हरेस्ट यांचे नाव त्या शिखराला दिले. म्हणून त्या शिखराला इ.स.1865 पासून माउंट एव्हरेस्ट म्हणून ओळखले जाऊ लागले.

माउंट एव्हरेस्ट हा जगातील सर्वात उंच पर्वत असल्याने जगातील सर्वच गिर्यारोहकांचे याला सर करण्याचे स्वप्न असते. अनेक गिर्यारोहक भरमसाठ किंमत मोजून हे शिखर सर करण्याचा प्रयत्‍न करतात. माउंट एव्हरेस्ट हे अतिउंच शिखर असले तरी के२ अथवा कांचनगंगा या इतर शिखरांच्या तुलनेत कमी अवघड आहे. इतर कोणत्याही 8 हजार मीटरपेक्षा जास्त उंचीच्या शिखरांपेक्षा एव्हरेस्टवर सर्वाधिक गिर्यारोहण चढाया झाल्या आहेत, तरीही अतिउंची व खराब हवामानामुळे अनेक गिर्यारोहक मृत्युमुखी पडतात. या शिखरावर पहिली चढाई 1953 मध्ये ब्रिटिश मोहिमेतील न्यूझीलंडचे एडमंड हिलरी व भारतीय-नेपाळी नागरिक शेर्पा तेनसिंग नोर्गे यांनी केली. त्यानंतर आजवर 2 हजार 436 गिर्यारोहकांकडून 3 हजार 679  चढाया झाल्या आहेत.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

2 comments:

  1. माऊंट एव्हरेस्टची उंची 0.८६ मीटरने वाढली
    जगातील सर्वात उंच शिखर अशी ओळख असलेल्या माऊंट एव्हरेस्टची नवी उंची मंगळवारी (8 डिसेंबर 2020) नेपाळकडून जाहीर करण्यात आली. एव्हरेस्टची नवी उंची ही ८,८४८.८६ मीटर असल्याची माहिती नेपाळचे परराष्ट्र मंत्री प्रदीप कुमार ग्यावली यांनी दिली. माऊंट एव्हरेस्टची उंची ही आधीपेक्षा 0.८६ मीटर एवढी वाढली असल्याचीही माहिती ग्यावली यांनी दिली. जवळपास वर्षभर या शिखराची उंचीच्या मोजमापावर काम सुरू होते. त्यानंतर अखेर मंगळवारी नेपाळकडून एव्हरेस्टची नवी उंची अधिकृतपणे जाहीर करण्यात आली.
    २0१५ मध्ये नेपाळमध्ये झालेल्या भूकंपामध्ये एव्हरेस्टचा काही भाग खचला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. त्यानंतर नेपाळ सरकारने ही उंची पुन्हा एकदा मोजण्यासाठी काही वर्षांचा कालावधी लागेल, असे स्पष्ट केले होते. भूकंपानंतर हे शिखर काहीसे खचले असल्याची शक्यता असल्याने पुनर्मोजणीचा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारकडून सांगण्यात आले. भूकंपाच्या घटनेनंतर चीनमधील आणि इतर काही संस्थांनी माऊंट एव्हरेस्टची उंची मोजण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यातच नेपाळ सरकारने स्वत: यासाठी पुढाकार घेत चीनसोबत संयुक्तपणे मोजणी करत ही नवी उंची जाहीर केली.

    ReplyDelete
  2. मानवजातीच्या इतिहासातील अभूतपूर्व अशी घटना २९ मे १९५३, बरोबर ६९ वर्षांपूर्वी घडली. याच दिवशी सर एडमंड हिलरी व शेर्पा तेनसिंग नोर्गे यांच्या रूपाने मानवाचं पहिलं पाऊल ‘माउंट एव्हरेस्ट’ या जगातील सर्वोच्च शिखरावर पडलं. एव्हरेस्ट म्हणजे खरं तर पृथ्वीचा तिसरा ध्रुवच. या एव्हरेस्टचं वलय हे सर्वश्रुत आहे. जगातील असंख्य लोकांना एकदा तरी या माउंट एव्हरेस्टचं ‘याचि देही याचि डोळा’ दर्शन घ्यायचं असतं. अनेकांना माउंट एव्हरेस्टच्या शिखरमाथ्याचं, जगातील सर्वोच्च शिखरावरून दिसणाऱ्या दृश्याबद्दल कुतूहल असतं, तर अनेक ध्येयवेड्या गिर्यारोहकांना एव्हरेस्ट शिखर चढाई करण्याचा ध्यास असतो. हा ध्यास गेल्या शंभर वर्षांत अनेकांनी घेतला, त्यांतील काही हजार लोकांचं स्वप्न पूर्णदेखील झालं. काहींना अर्ध्यातून परतावं लागलं, तर काही जणांनी एव्हरेस्टच्या कुशीतच चिरनिद्रा घेतली. गेल्या सात दशकांत एव्हरेस्टने अनेक स्थित्यंतरं पाहिली. एका मोसमात बोटांवर मोजण्याइतक्या गिर्यारोहकांनी शिखरमाथा गाठला, तर तीन वर्षांपूर्वी शिखरमाथ्याच्या खाली चक्क गिर्यारोहकांची लांबच लांब रांग पाहायला मिळाली. आजपर्यंत अंदाजे ७ ते ८ हजार गिर्यारोहकांनी किमान एकदा एव्हरेस्ट शिखरमाथा गाठला आहे. जगाच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत हा आकडा अतिशय कमी आहे. मात्र, यात दरवर्षी १० टक्क्यांनी भर पडतेय. नेपाळ सरकार सुमारे ३०० ते ४०० गिर्यारोहकांना एव्हरेस्ट चढाईचा परवाना देतं. या गिर्यारोहकांसोबत किमान एक शेर्पा गिर्यारोहक एव्हरेस्ट शिखरमाथा गाठतो. म्हणजे अंदाजे ७०० गिर्यारोहक एव्हरेस्ट शिखर चढाई करतात. दरवर्षी १० टक्क्यांची भर हा आकडा तसा मोठाच आहे.

    ReplyDelete