Wednesday 15 February 2023

देशभरातील 311 नद्यांचे पट्टे प्रदूषित

देशभरातील ३११ नद्यांचे पट्टे प्रदूषित आढळले आहेत. विशेष बाब म्हणजे सर्वाधिक प्रदूषित नदी पट्टे महाराष्ट्रातील असून त्यांची संख्या ५५ इतकी आहे. तर मध्य प्रदेश दुसऱ्या, बिहार व केरळ तिसऱ्या तर कर्नाटक व उत्तर प्रदेश ही राज्ये चौथ्या स्थानी आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) जल गुणवत्ता व्यवस्थापन विभागाचा 'पोल्युटेड रिव्हर स्ट्रेचेस फॉर रिस्टोरेशन ऑफ वॉटर क्‍्वालिटी' अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. यातून या धक्कादायक नोंदी समोर आल्या आहेत. शहरांतील घाण सांडपाणी, औद्योगिक वसाहतींमधील रसायने मिश्रित सांडपाणी नद्यांमध्ये किंवा नाल्यांद्वारे सोडले जाते. परिणामी नद्या प्रदूषित होतात, हे प्रदूषित पाणी पिण्याने विविध विकार जडतात. सिंचनासाठी असे पाणी वापरल्यास पिकांवर आणि मृदेवरही याचे हानिकारक परिणाम होतात. परिणामी 'पाण्याची गुणवत्ता' ही पर्यावरणाच्या प्रमुख चिंतांपेकी एक आहे. परिणामी जलप्रदूषणास कारणीभूत घटक नियंत्रित करण्यासाठी प्रभावी कृती कार्यक्रम सीपीसीबीकडून राबविले जातात. त्याची अंमलबजावणी संबंधित यंत्रणांच्या माध्यमातून सामुदायिक योगदानातून केली जाते. सीपीसीबीकडून २०१९ आणि २०२१ मध्ये देशभरातील ६०३ नद्यांचे मूल्यांकन करण्यात आले. यासाठी १ हजार ९२० ठिकाणांचे नमुने घेतले, यासाठी पाण्यात असलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण गृहीत धरले. 

महाराष्ट्रातील प्रदूषित नद्या

 भीमा, मिठी, मुठा, सावित्री, गोदावरी, कन्हान, मुळा, मुळा-मुठा आणि पवना या नऊ नद्यांची पात्रे सर्वाधिक प्रदूषित (प्रायॉरीटी १ व २ मध्ये सामील) पट्ट्यांत सामील आहेत.अंबा, अमरावती, बोरी, बुराई, भातसा, बिंदुसरा, चंद्रभागा, दारणा, घोड, गोमाई, गिरणा, हिवरा, इंद्रायणी, कळू, कन, कोलार, कोयना, कृष्णा, कुंडलिका, मंजिरा, मोर, मोरणा, मूचकुंडी, मोरणा, नीरा, पांझरा, पाताळगंगा, पैनगंगा, पेढी, पेहलर, पूर्णा, रंगावली, सीना, सूर्या, तानसा, तापी, तितूर, उल्हास, उरमोडी, वैतरणा, वशिष्टी, वेण्णा, वाघूर, वैनगंगा, वर्धा, वेणा या नद्यांचे पट्टे प्रदूषित आढळून आलेली आहेत.  

No comments:

Post a Comment