Thursday 16 February 2023

विक्टोरिया क्राउन्ड


कबूतर या पक्ष्याला सगळेच ओळखतात, परंतु व्हिक्टोरिया क्राउन्ड कबूतर, ज्याला गौरा व्हिक्टोरिया असेही म्हटले जाते त्याबद्दल मात्र फारच कमी लोकांना माहिती आहे.  पोत, रंग आणि दिसण्यात ते इतर कबूतरांपेक्षा खूप वेगळे आहे. हे खोल शाई निळ्या रंगाचे असतात. व्हिक्टोरिया क्राउन्ड कबूतराचे पंख निळे असतात, तोंडाजवळील भाग काळा आणि गडद जांभळा व भुऱ्या रंगाचा असतो. त्याच्या रचनेतील सर्वात खास भाग म्हणजे डोक्यावरचा सुंदर मुकुट. फिकट पांढरा आणि निळा मुकुट त्याचा चेहरा व्यापून टाकतो. सेहरानुमा मुकुट त्यांच्या सौंदर्यातच भर घालतो. इतर कबुतरांप्रमाणे, विक्टोरिया क्राउन्ड देखील खूप मिलनसार आहेत म्हणजेच त्यांच्या समूहात राहतात.कधी कधी झाडांच्या फांद्यावर एकमेकांशी भांडतानाही दिसतात. जेव्हा ते अन्नाच्या शोधात बाहेर पडतात तेव्हा ते समूहाने जातात. अनेकदा ते जोड्यांमध्ये दिसतात.  त्यांचे अन्न झाडांवरून पडलेल्या फळांवर आणि बियांवर अवलंबून असते. याशिवाय छोटे सूक्ष्म जीवदेखील त्यांचा आहार बनतात. व्हिक्टोरिया कबूतर पाण्याने भरलेल्या मैदानात म्हणजे नदी आणि समुद्र किनार्‍याजवळील भागात देखील आढळतात.अशा भागात ते समुद्रातून झाडांच्या खोडांपर्यंत दररोज उड्डाण करतात. ते जंगलात आणि 1000 फूट उंचीच्या पहाडी भागातदेखील घरटी बांधताना दिसले आहेत.

No comments:

Post a Comment