Monday 13 February 2023

आधुनिक कवी केशवसुत

कवी केशवसुत यांना  आधुनिक मराठी काव्याचे प्रवर्तक म्हटले जाते. कारण मराठीत सर्वप्रथम  आधुनिक कविता लिहिली. आधुनिक म्हणजे नव्या विषयावरची, नवा आशय सांगणारी. तोपर्यंत काव्य हे देवादिकांवर आणि राजामहाराजांवर लिहिले जात होते. केशवसुतांनी माणसांवर कविता लिहिल्या. केशवसुतांनी काव्याची खरी प्रकती आत्मलेखनाची आहे हे लेखनातून दाखवले. काव्याच्या बाह्यांगातही त्यांनी परिवर्तन घडवून आणले. उत्कट अनुभूती स्फुट स्वरूपाची असते. त्या स्फुट आविष्कारासाठी गणवृत्तांपेक्षा मात्रावृत्तेच अधिक  अनुकूल असतात, हे त्यांनी दाखवून दिले. केशवसुतांचे पूर्ण नाव कृष्णाची केशव दामले. जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील मालगुंड गावी झाला. शिक्षण खेड, बडोदे, वर्धा, नागपूर व पुणे या ठिकाणी झाले. केशवसुतांनी विद्यार्थिदशेतच काव्यलेखनास आरंभ केला असला, तरी त्यांचा मुख्य काव्यरचनाकाल १८८५ ते १९०५ हा होता. या काळातील त्यांच्या १३५ कविता आज ग्रंथरूपात उपलब्ध आहेत. केशवसुतांनी लिहिलेल्या कवितांपैकी, 'स्फूर्ति' (१८९६), 'कवितेचे प्रयोजन' (१८९९), 'आम्ही कोण?' (१९०१), 'तुतारी' (१८९३), ‘नवा शिपाई' (१८९८) आणि “प्रतिभा' (१९०४) या महत्त्वाच्या कविता आहेत. त्यांची 'झपूर्झा' (१८९३) ही कविता विशेष गाजली. 

No comments:

Post a Comment