Monday 13 February 2023

शाहीर अण्णा भाऊ साठे

मुंबई गं नगरी बडी बांका, जशी रावणाची दुसरी लंका वाजतो डंका... किंवा माझी मैना गावावर राहिली... यांसारख्या शाहिरी गाण्यांतून संयुक्‍त महाराष्ट्र चळवळीचा आवाज बुलंद करणारे शाहीर अण्णा भाऊ साठे हे मराठी साहित्यातील एक मानदंड होय. बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्‍त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी त्यांनी स्वत:ला झोकून दिले होते. त्यासाठी जागृती करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रभर “माझी मुंबई' या लोकनाट्याचे प्रयोग केले होते. अण्णांचे मूळ नाव तुकाराम. जन्मस्थळ सांगलीतील वाटेगाव. त्यांना शालेय शिक्षण घेता आले नसले, तरी त्यांनी अनुभवाच्या शाळेत प्रयत्नपूर्वक अक्षरज्ञान मिळवले. १९३२ मध्ये वडिलांसोबत मुंबईत आल्यावर चरितार्थासाठी मिळतील ती कामे त्यांनी केली. शहरातील कामगारांचे कष्टमय, ‘ दुःखाचे जीवन त्यांनी  जवळून पाहिले. त्यामुळेच त्यांच्या एकूण साहित्यात वास्तवाचे चित्रण आलेले पाहायला मिळते. माणुसकीचा विजय हेच त्यात मुख्य सूत्र असल्याचे दिसते. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रात लेखकांची एक प्रतिभावान पिढी निर्माण झाली. त्यांनी पारंपरिक तमाशाला आधुनिक लोकनाट्याचे रूप दिले. कथा, कादंबरीच्या क्षेत्रातही त्यांनी विपुल लेखन केले. त्यांच्या लेखनाला अमाप लोकप्रियता मिळाली. त्यांच्या 'फकिरा' कादंबरीला १९६१ मध्ये महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला. 


No comments:

Post a Comment