Saturday 11 February 2023

बालपणीची स्मरणगाथा 'कुणब्याची पोरं'


नामवंत लेखक व कथालेखक आप्पासाहेब खोत यांचे नुकतेच प्रकाशित झालेले हे पुस्तक वाचनात आले.खेडेगावातील बालपणीच्या आठवनीचे ललित लेख.आपल्या बालपणीच्या गमती जमती, घडण, अडचणी ,आणि नष्टप्राय होत असलेल्या सांस्कृतिक खाणाखुणा या ललित लेखातून अत्यंत लालित्य पूर्ण अन् तळमळीने व्यक्त केल्या आहेत. 'कूणब्याची पोरं' या पहिल्याच ललित लेखातून शेतकऱ्याचे पोरांचं मातीशी नातं हे तो जन्माला येण्या अगोदर पासून असते हे आप्पासाहेब यांनी समर्पक शब्दातून व्यक्त केले आहे.या पोरांच्या जीवनात " माती" ही " माती " न राहता त्यांच्या जीविताचा अबीर बनते.मातीशी एकरूप झालेली,तिच्या स्पर्श व गंधाने पोसलेल्या पोरांचं बळविश्र्व ह्या मातीनं व्यापून टाकलं आहे.खेळ मातीत आणि खेळणी मातीची.चिखलात उमललेली ही मातीची फुलं.पावसात भिजने, झाडावर सुर पारंबी, झोपाळे, बैलं आणि गाडी,हिरवा निसर्ग,हे त्यांच्या जीवनाचा अविभाज्य अंग.निसर्गाशी एकरूप होऊन, असंख्य अडचणींवर मात करून जगत असतात ही पोरं. या आठवणी चित्रमय पद्धतीने खोत यांनी शब्द बद्ध केल्या आहेत.पण काळा  बरोबर हे चित्र बदलून गेलं, मुलं आधुनिकतेच्या प्रवाहात गटांगळ्या खाऊ  लागली आहेत याची सल लेखकाला सतत बोचते आहे.उध्वस्त होत चाललेलं समृद्ध ग्रामजीवन, बेभान होऊन जगत असलेली पोरं,याची चिंता लेखकाला सतत बोचते आहे.

बालपणीची असंख्य स्मरणे लेखकांनी चित्रित केली आहेत.ह्या मुलांचे जीवन खूप संकटांचा मुकाबला करतच घडत असते.आई वडीलांच्या निर्व्याज प्रेमाशिवाय काहीच स्व स्त नसते. अडचणी आणि अभाव यांची रेलचेल झालेली असते यांच्या जीवनात.एक लाकडाची खुर्ची मिळवण्यासाठी काय धडपड केली लेखकाने? पण बरीच यातायात करून प्राप्त झालेल्या खुर्ची साठी लेखक फारच भा वुक झाले आहेत. आप्पासाहेब यांच्या या ललित लेखातून समग्र ग्राम जीवन वाचकाच्या डोळ्या समोर उभे राहून जाते, आणि हीच खोतांच्या लेखणीची ताकद आहे.' माय' या ललित लेखातून शेतकरी बायकांची जगत असताना कशी शारीरिक,मानसिक आणि भावनिक कुतरओढ होते याची विलक्षण आठवण शब्द बद्ध केली आहे.या कुण ब्याच्या बायकांच्या नशिबी केवळ काम,घाम, आणि अपमान सहन करत जगणं असते.केवळ सोसत राहणं,व्यक्त होणं नाही. अन् कोणा जवळ व्यक्त होणार,? कोण ऐकणार?   

असे घुसमटलेल्या अवस्थेत, सोसत सोसत,अन् पुन्हा हसत जगायचं.गरोदरपण असो वा बाळंतपण, सारखेच हाल. काळच असा होता की कौतुक करायला ना वेळ/ ना पैसा.या आईच्या व्य थेने लेखक फारच अस्वस्थ व हळवा झालेला दिसतो.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही मुलांच्या स्वप्नांना आणि पंखांना बळ देणारी " माय" वाचकाला ही कासावीस करते. आणि तिच्यातील देवत्व अधिकच अधोरेखित होते. आप्पासाहेब खोत यांचा पिंडच मुळी शेतात आणि मातीत वाढलेला..शेळ्या, मेंढ्या,वासरे,रेडक आणि ही कुण ब्याची पोरं एकच परिस्थीत वाढत असतात. फक्त मुलं घरात व ती गोठ्यात एव ढाच फरक.त्या मुळे लेखकाचे मनोगत अस्सल,खरे,आणि मातीशी नाळ जुळलेले आहेत.साधारणतः ५०ते ६५  काळात जन्मलेल्या प्रत्येकाला याचा सचित्र अनुभव येईल.त्याला हे स्वतः चे अनुभव वाटतील.हे लेखन हस्तिदंती मनोऱ्यातील नाहीत,बिया बरोबर मातीत रुजलेले व अपार भोग भोगलेले  त्यांचे अनुभव आहेत. त्यांच्या लेखनाला करकरीत मातीचा वास आहे.आताच्या पिढीला हे रुचणारे व पचणारे हे अनुभव नाहीत कदाचित.आजच्या मोबाईल फोन ने  एका पिढीचे भवितव्य आणि भावविश्व च खणून टाकले आहे. नात्यातील संवेदन हीनता,निती मूल्यांची झालेली पडझड ," असण्यापेक्षा दिसण्याला आलेले महत्व, विवेका शी झालेलं वैर अन् भौतिक सुखाशी झालेलं मैत्र हे सर्व लेखकाला बोचत आहे.सामाजिक  स्थिती अशी असली तरीही लेखकाने आपली लेखणी ताजी ठेवली आहे. खेड्यातील शेतकऱ्याचे अपार कष्ट,मुलांच्या स्वप्नां साठी दरिद्र्याशी दोन हात करत मुलांनी शहाणं व्हावं म्हणून ढोर मेहनत करणारे आई वडील साक्षात परब्रम्ह वाटतात.गरिबी होती पण दारिद्र्य नव्हतं.हे सर्व लेखकाने समर्थ लेखणी जिवंत केले आहे.

" फरारी" लेखात एकाध्या अफवेने साऱ्या गावातील स्त्रिया आणि मुलं अनामिक भीतीने थरथरत असत.व ती माणसे आपलीच आहेत कळल्यावर कसा श्वास मोकळा होतो याची अनुभूती एका पिढीने घेतली आहे. रान पाखरं या ललित लेखातून पक्षी विश्वाचे अनोखे दर्शन आप्पासाहेब यांनी घडविले आहे.चिमण्या, कावळे, पोप ट, बगळे, होले,वेगवेगळ्या ऋतूत येऊन शेतातील कष्टात आपला सुर मिसळून कष्ट कऱ्याचे श्रम कसे हलके करत याचे मनो ज्ञ वर्णन लेखकांनी चित्रित केले आहे.निरनिराळ्या ऋतूत येणाऱ्या रंगी बेरंगी पक्षांनी लेखकाचे जीवन ही समृद्ध केले आहे. पक्षांचे अखंड विश्व शेतातील झाडावर अवतरत असे,पक्षी आणि शेतकरी यांचे अतूट नातं लेखकांनी उलघडले आहे.शेतात कुण ब्याचा कष्टाला पाखरांच्या संगीताचा कसा साज असतो याची अनुभूती लेख वाचत असताना येते. 

जीवनाच्या अंगाला सुरांचा रंग भरणारे हे पक्षी    कुठे  परागंदा झाले? या विचाराने खोत कासावीस होतात. अति लोभा पायी झाडांची केलेली कत्तल, विषारी फवारणी, खते,यांनी पाखरांचे थवे नाहीसे झाले. मातीच्या घरात त्यांची घरटी असायची,ती घरीच नाहीत.माणसाच्या रा क्षशी भुकेने सर्व स्वाहा केलं याची चिंता लेखकाला सतत बोचते आहे.पाखरांच्या अभावाने सारे शिवार ओक ओक वाटू लागलं आहे.कुण ब्याच्यां पोरांना घरात आणि शेतात नानाविध प्रकार ची कामं करावी लागतात अन् ती करत असताना असंख्य घाव, व्रण,जखमा,होत असतात.पायात काटा घुसने हे नेहमीचेच.त्या वेळी खूप असह्य वेदना होत होत्या, जीव नकोसा होई, त्याच शिदोरीवर भविष्य प्रकाशमान झाले, अन् आज तेच व्रण लेखकाला पारितोषिक वाटते,कारण त्याच जखमांनी आयुष्याचे धडे दिले.ते व्रण पाहून आज लेखक रम्य भूतकाळात हरवून जातो. बैलं आणि बैलगाडी हा कुण ब्याचा श्वास,ते त्याच्या जवळ असणं मोठेपणा चं. बैलं आणि बैलगाडी मुळेच त्याच्या संसाराची गाडी सुखनैव चालत असे.शेतकऱ्याचे जीवन चालवणारे इंजिन ते, पण जी गाडी घराची वैभव होती,ती काळाच्या ओघात तीही पडद्या आड गेली,. शेत कामापासून माघारीन आणण्याचा  काय थाट असाय चा!. काळा बरोबर तिनेही आपलं अस्तित्व हरवलं,सगळं मागं पडलं, गाडी, चाक, सा टा रा, सगळं वळचणीला पडलं,ज्या गाडी ने संसाराला गति दिली, तीच आता गतीहिन बनून मरणाची वाट पाहत बसली आहे.अडगळ झाली.

लेखक तिच्या आठवणीने व्याकुळ होतोच, पण गाडीच्या अनुषंगाने येणारे ग्रामीण अस्सल मराठी शब्द(   उदा.आरा, पु ट्टा,वंगण,साप ती,चाबूक असे) ही लयास गेले याची चिंता लेखकाला सतत चिंतन करायला भाग पाडते. विज्ञानाने सुखं दाराशी आणली पण बदल्यात आमचं ग्राम संस्कृतीच शब्द वैभव हिरावून घेतल्याचं शल्य लेखकाला भाव विवश करते. गावाला तळे अन् मळ्यात खळ हे दोन अलांकरच. सुगीत खळे म्हणजे कुण ब्याला तीर्थ स्थान असते.वर्षाच्या मेहनतीचे देवाने दिलेले दान आणि धन  खळ्यातून च घरी येत असते पण ते खळे ही आज डांबरी रस्त्यावर आले. खळ्याचे पावित्र्य हे असे रस्त्यावर आल्याचे दुःख आप्पासाहेब खोत यांना खूप सतावते आहे. खरं हे पुस्तक म्हणजे लेखकाच्या बालपणीची स्मरण गाथा आहे.आज आर्थिक समृध्दी लाभली आहे,पण जीवनात एक रिते पण जा नऊ लागले आहे.

कारण ज्या वातावरणात वाढलो ते सोनेरी दिवस केव्हा अन् कसे नाहीसे झाले ते कळलेच नाही. या ललित लेखातून लेखकाने पुन्हा एकदा ग्राम संस्कृती जागी केली आहे.काळानुरूप बदल ही काळाची  असतेच,पण या ओघात कधीही न विसरता येणारे आमचे संपूर्ण भाव विश्व ही वाहून गेल्याचे अपरंपार दुःख लेख काला आहे. बदला बरोबर आलेली " बला" लेखकास हैराण करून सोडते. ५०/६० वर्षा पूर्वी चा एक काल पट या ललित लेखातून उभा राहिला आहे.त्या काळात जन्मलेल्या प्रत्येकाला ही त्याचीच कहाणी वाटेल. अत्यंत बारकाईने निरीक्षण, स्मरण, करून,नेमकी शब्द कळा वापरून केलेले लेखन काळजाला जाऊन भिडते.हे पुस्तक वाच ताना वाचक आपल्या बाल विश्वात हरवल्या शिवाय राहणार नाही.  एकाधी पक्षिजात नामशेष होण्याची  कारणे जशी पर्यावरणातील बि घा डा त  सापडतात तशी संवेदशील लेखकाची कमी होण्याची कारणे सामाजिक अस्वस्थ तेत सापडतात.पण आप्पासाहेब यांनी आपली सृजन शिलता , संवेदशीलता ताजी ठेऊन अखंड लेखन कार्य करण्याचा जणू वसा घेतला आहे, असे त्यांचे लेखन वाचून  लक्षात येते .एकाध्या चित्रकारांचा कुंचला  जसा  सफाईदार चालावा अन् अलगत चित्र उभे रहा वे, तद्वत संस्कृतीचे ( ग्राम) शब्द चित्र आप्पासाहेब यांनी उभे केले आहे.

कुणब्याची पोरं.

लेखक -आप्पासाहेब खोत.

संस्कृती प्रकाशन पुणे.

पृष्ठे १४८.

मूल्य ३०० रू.

(आप्पासाहेब पाटील)

No comments:

Post a Comment