Sunday 12 February 2023

सिद्धार्थ मल्होत्राला बालपणापासूनच नाटकात रस

सिद्धार्थ मल्होत्रा याचा जन्म16 जानेवारी 1985 रोजी  दिल्ली शहीद भगतसिंग कॉलेज नवी दिल्लीतून बीकॉम ऑनर्स झाला आहे. वडिलांचे नाव सुनील मल्होत्रा तर आईचे नाव रिमा आहे. विविध मीडिया रिपोर्टनुसार त्याची संपत्ती सुमारे 75 कोटी रु. आहे. 'शेरशाह' चा स्टार सिद्धार्थ मल्होत्रासाठी बॉलीवूडचा प्रवास सोपा नव्हता. टीव्हीपासून मॉडेलिंगपर्यंत त्याला ५ वर्षे संघर्ष करावा लागला. सिद्धार्थ सांगतो, पालकांना त्याला इंजिनिअर करायचे होते, मात्र त्याला शिकण्यात रस नव्हता. कलाकार व्हायचे होते. यासाठी त्याने चित्रपटाच्या सेटवर क्लॅप बॉय म्हणूनही काम केले. सिद्धार्थ प्रसिद्ध ग्लॅडरॅग्स मॅनहंट आणि मेगामॉडल प्लेजेट स्पर्धेत उपविजेता ठरला. तो सर्टिफाइड स्कूबा ड्रायव्हर आहे. 

 सिद्धार्थचे वडिल सुनील मल्होत्रा मर्चंट नेव्हीत कॅप्टन होते तर आई रिमा गृहिणी होती. वडिलांनुसार सिद्धार्थला बालपणापासूनच नाटकात रस होता. तो नेहमीच शाळा व स्थानिक कार्यक्रमांत नृत्य व नाटकांमध्ये भाग घ्यायचा. त्याच्या या हौसेमुळे तो अभ्यासात इतका कच्चा झाला की त्यामुळे नववीत अनुत्तीर्ण झाला. सिद्धार्थ रग्बीचा मोठा फॅन आहे. तो दिल्ली हेरिकेन रग्बी संघाकडून खेळला आहे. सिद्धार्थचे मोठे भाऊ हर्षद मल्होत्रा इन्व्हेस्टमेंट बँकर आहेत. 

सिद्धार्थ मालिका, मॉडेलिंग नंतर चित्रपटाकडे वळला.  सिद्धार्थने टीव्ही मालिका धरती का योद्धा पृथ्वीराज चोहान'मध्ये जयचंदच्या भूमिकेतून अभियानात प्रवेश केला होता. मात्र समाधान न झाल्याने  मॉडलिंग सोडले. 2010 मध्ये दिग्दर्शक करण जोहर यांना सहाय्य करू लागला. चित्रपट 'स्टुडंट ऑफ द इयर'मधून त्याने चित्रपट करिअर सुरू केले. सिद्धार्थने आतापर्यंत 15 चित्रपट केले आहेत. 2021 मध्ये प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित शेरशाहमध्ये कॅप्टन विक्रम बत्राच्या भूमिकेत ओळख मिळाली. हा त्या काळी सर्वाधिक पाहिला गेलेला चित्रपट होता. अलीकडेच तो कियारा आडवाणीच्या लग्नबेडीत अडकला आहे. 


No comments:

Post a Comment