Wednesday 1 July 2020

वाढवा आपले सामान्य ज्ञान

वाढवा सामान्य ज्ञान
१) कोणत्या देशाला उगवत्या सूर्याची भूमी म्हटलं जातं?
२) फुग्यांमध्ये कोणता वायू भरला जातो?
३) न्युयॉर्क स्टॉक एक्सेंजची पहिली महिला अध्यक्ष कोण आहे?
४) पतंजलीने कोणत्या टेलिकॉम कंपनीसोबत 'स्वदेश समृद्धी' सिम कार्ड सादर केलं आहे?
५) २0२६ च्या फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धा कुठे पार पडणार आहेत?
उत्तर : १) जपान २) हेलियम ३) स्टेसी कनिंगहॅम ४) बीएसएनएल ५) अमेरिका, कॅनडा, मेक्सको

वाढवा सामान्य ज्ञान
१) 'ग्रेट व्हक्टोरिया' वाळवंट कुठे आहे?
२) देशातील पहिली नॅशनल स्पोर्टस युनिव्हर्सिटी कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे?
३) रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून कोणाची नियुक्त झाली आहे?
४) भारतातील सर्वात मोठी मशीद कोणती?
५) मायकल फेल्प्स कोणत्या क्रिडाप्रकाराशी संबंधित आहे?
उत्तर : १) ऑस्ट्रेलिया २) मणिपूर ३) महेशकुमार जैन
४) ताज उल मशीद ५) जलतरण

वाढवा सामान्य ज्ञान
१) साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळविणारी
पहिली कृष्णवर्णीय व्यक्ती कोण?
२) समुद्राच्या पाण्याची क्षारता किती असते?
३) भारतात सर्वात जास्त पावसाची नोंद कुठे केली
जाते?
४) केशराचं उत्पादन कोणत्या राज्यात होतं?
५) 'ए व्हॉईस फॉर फ्रिडम' हे पुस्तक कुणी लिहिलं आहे?
उत्तर : १) टोनी मॉरिसन २) ३ टक्के ३) मौसीनराम ४) जम्मू आणि काश्मीर ५) नयनतारा सहगल
   
  वाढवा सामान्य ज्ञान
१) इंग्रज आणि फ्रेंचांमध्ये भारतात कोणत्या ठिकाणी झालेली लढाई निर्णायक होती?
२) खालसा पंथाची स्थापना कुणी केली होती?
३) शाहजहा निर्मित मोती मशीद कुठे आहे?
४) हिराकुंड धरण कोणत्या नदीवर बांधलं आहे?
५) 'हॅरी पॉटर' या पुस्तक शृंखलेच्या लेखकेचं नाव काय?
उत्तर : १) वांदवॉश २) गुरु गोविंद सिंह ३) आग्रा
४) महानदी ५) जे. के. रोलिंग

वाढवा सामान्य ज्ञान
१) दिल्लीचा लाल किल्ला कोणत्या बादशहाच्या काळात बांधला आहे?
२) लाल सेनाची बांधणी कुणी केली होती?
३) सती प्रथेवर कुणी बंदी घातली?
४) चौरीचौरा घटना कोणत्या चळवळीशी संबंधित आहे?
५) वेदांची संख्या किती आहे?
उत्तरे: १) शहाजहान २) ट्राटस्क ३) लॉर्ड विल्यम बेंटिक ४) असहकार चळवळ ५) चार

No comments:

Post a Comment