Monday 6 July 2020

माऊंट अबू

निसर्गरम्य आणि थंड हवेच्या प्रसिध्द ठिकाणांमध्ये माउंट अबूचा समावेश होतो. त्यामुळे या ठिकाणाला आवर्जून भेट द्यायला हवी. माउंट अबू हे राजस्थानमधलं थंड हवेचं ठिकाण. अरवली पर्वतरांगांमध्ये वसलेलं अबू हे पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र आहे. माउंट अबू हे राजस्थानमधलं एकमेव थंड हवेचं ठिकाण. अत्यंत सुंदर आणि मनोहारी अबू आपल्याला ताजंतवानं करून टाकतं. माउंट अबूला पोहोचल्यानंतर नक सरोवराला भेट द्यायला हवी. पर्वतरांगांमध्ये वसलेलं असं हे ठिकाण आहे. चारही बाजूंनी पर्वतरांगा आणि मध्यभागी सुंदर सरोवर असं हे दृश्य डोळ्यांत साठवून घ्यायला हवं. एक हजार मीटर उंचीवरचं अडीच कलोमीटर लांबीचं हे सरोवर म्हणजे एक आश्‍चर्यच आहे. 

माउंट अबू हे हिंदू आणि जैन धर्मियांचं पवित्र तीर्थस्थान आहे. दलवाडाचं जैन मंदिर स्थापत्यकलेचा उत्तम नमुना मानलं जातं. पर्यटक या मंदिरात रमतात. एक वेगळीच शांतता इथे अनुभवता येते. इथलं लून वासा हे जैन मंदिरही खूप सुंदर आहे. 
इथलं सर्वेश्‍वर रघुनाथ मंदिर खूप अनोखं आहे. या मंदिरात फक्त रामाची मूर्ती आहे. सर्वसाधारणपणे रामासोबत सीता आणि लक्ष्मणाच्या मूर्तीही असतात. पण इथे फक्त श्रीरामाची मूर्ती असल्यामुळे भाविक मोठय़ा संख्येने इथे येतात. या मंदिरातली श्रीरामाची मूर्ती खूप प्राचीन आहे. इथे सूर्यास्ताचं मनोहारी दर्शन घडतं. अबूचा सूर्यास्त अनुभवण्यासाठी लोक आवर्जून इथे येतात. उदयपूरपासून माउंट अबू जवळ आहे. अबू रोड या रेल्वेस्थानकावर उतरून तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता. दिल्ली आणि अहमदाबाद मार्गावर हे स्थानिक आहे.

No comments:

Post a Comment