Saturday 4 July 2020

सुनीता देशपांडे

सुनिता देशपांडे ह्यांनी पु. ल. देशपांडेंच्या जीवनपटलावरती धावती नजर फिरवणारे, व त्यांच्या व्यक्तीमत्त्वातील विविध पैलूंवर प्रकाश टाकणारे आहे मनोहर तरी या नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे. या आत्मचरित्राची तमाम मराठी साहित्यप्रेमींकडून दाद मिळाली. १२ जुन १९४६ साली पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे अर्थात पुलं सोबत विवाहबध्द होऊन पुढे संसाराची धुरा आनंदाने व यशस्वीरित्या पेलली सोयरे सकाळ, प्रिय जी.ए., समांतर जीवन, मण्यांची माळ, याशिवाय मनातलं अवकाश हा सुनिता देशपांडे यांचा लेखसंग्रह, २00४ ते २00६ दरम्यान विविध वर्तमान पत्र तसेच दिवाळी अंकांमधुन प्रसिध्द झालेल्या लेखाचं पुस्तकही वाचकांच्या पसंतीस उतरले.
यासोबतच अनेक विषयावरील दर्जेदार पुस्तके व कादंबर्‍या लिहून सुनिता देशपांडे यांनी चौकस व प्रतिभावंत लेखिका म्हणुन स्वत:ची ओळख मिळविली आहे . ७ नोव्हेंबर २00९ रोजी सुनिता देशपांडे यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. एखादं व्यक्तिमत्व हे सर्वसामान्य माणसांपेक्षा खूप काहीतरी वेगळं असतं. लेखक, लेखिका अनेक असतात. विद्वान व्यक्तिही आपण बर्‍याच पाहतो. त्यांना मानतो. त्यांचा आदरही करतो. पण या सगळयातही काहीतरी वेगळं आणि स्वत:च तत्व आणि स्वाभीमान सांभाळणारे आणि प्रत्येक वेळा काहीतरी नावीन्य घेऊन समाजासमोर येणार्‍या ज्या व्यक्ती त्यांच्या कर्तृत्वाने आपल्या मनात भरतात असच एक अभिमानाने घ्यावसं नाव म्हणजे सुनीता पुरुषोत्तम देशपांडे, महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु. लं. देशपांडे. हयांच्या त्या पत्नी एवढी ओळख सुनीता बाईंच्या बाबतीत पुरेशी नाही. पु. लं. ची पत्नी इतक्या पारंपारिक ओळखीत गुंफलं जाणारं सुनीता देशपांडे नावाचे स्त्रीत्व नाही. सुनीता बाईंचा जन्म ३ जुलै १९२६ ला र%ागिरी येथे झाला. त्यानंतर त्यांचं पुढील शिक्षण मुंबईच्या बालमोहन विद्यालयात व त्यानंतरचे शालेय शिक्षण र%ागिरीच्या गव्हर्मेट हायस्कूलमध्ये झाले. र%ागिरीच्याच पटवर्धन प्रशालेतून त्या मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्या. उच्च शिक्षणासाठी त्यांनी मुंबईच्या खालसा महाविद्यालयात प्रवेश घेतला. विवाहानंतर त्यांनी नागपूर विद्यापीठातून बहिस्थ विद्यार्थिनी म्हणून बी.ए.ची पदवी मिळवली. त्यानंतर नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठातून त्यांनी बी. एड. आणि एम.एड. या पदव्या मिळवल्या. ओरिएंट हायस्कूल व पारले टिळक विद्यालय या मुंबई येथील आणि पुणे विद्यार्थिगृह या शाळातून त्यांनी अध्यापन केलं. मालेगाव येथील महात्मा गांधी विद्यामंदिरात त्या काही वर्षे शैक्षणिक व प्रशासकीय अधीक्षक या पदावर होत्या. पु. ल. देशपांडे प्रतिष्ठानच्या त्या संस्थापक व प्रमुख विश्‍वस्त होत्या. सुनीताबाईंचे लेखन हे अतिशय दर्जेदार, भारदस्त आणि उत्कृष्ठ वैचारिक बैठक असलेले असे आहे. वृत्तपत्रातील त्यांचे ललित लेख हे आशयगर्भ तसेच आदर्श आकृतीबंधाचा वस्तूपाठच होता. त्यांच्या लेखनातील शब्दांतूनही त्यांच्या व्यक्तीमत्वातील शिस्तीचे दर्शन घडते. कुमारगंधर्व, माधव आचवल, मल्लिकार्जून मन्सूर, वसंतराव देशपांडे इत्यादींची व्यक्तीचित्रे असलेलं सोयरे सकळै हे ललित लेखनाचे पुस्तकही प्रकाशित झाले आहे. प्रसिध्द लेखक जी.ए. कुलकर्णी आणि सुनीताबाई देशपांडे यांच्यातील पत्र संवादही पुस्तकरुपाने प्रकाशित झालेला आहे.

No comments:

Post a Comment