Monday 6 July 2020

महेंद्र सिंग धोनी

महेंद्र सिंह धोनी ला आज एक चांगला क्रिकेटर म्हणुन सर्वदूर ओळख आहे. एम.एस धोनी या नावाने तो सुपरीचीत आहे. क्रिकेट जगतात त्याने आपल्या भारताचे नाव सर्वदूर चमकविले आहे. लहान गावातून निघुन एक महान क्रिकेटपटु होण्यापयर्ंत धोनी ला अनेक संघर्षामधुन जावे लागले. या संघर्षामधुन निघाल्यानंतर तो आज या ठिकाणी पोहोचलाय. जगापुढे त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सुरूवातीच्या काळात महेंद्र सिंह धोनी करता हा प्रवास एवढा सहज सोपा मुळीच नव्हता पण क्रिकेट विषयी त्याला प्रचंड प्रेम आणि कठोर मेहनत घेण्याची तयारी या त्यांच्या जमेच्या बाजु ठरल्या म्हणुन त्याने आज हे यश मिळविले आहे.

आज धोनी भारतातील दिग्गज क्रिकेट खेळाडुंच्या यादीत पोहोचला आहे एवढेच नाही तर भारतीय क्रिकेट संघात आपल्या कर्णधार पदाने कित्येकांची मने जिंकली शिवाय संघाला चांगले मार्गदर्शन देखील केले. शाळेत असतांनाच धोनीने क्रिकेट खेळायला सुरूवात केली होती परंतु भारतीय क्रिकेट संघाचा हिस्सा होण्यासाठी त्याला अनेक वर्ष लागली. ज्यावेळी त्याला भारताकडुन खेळण्याची संधी मिळाली त्यावेळी त्याने या संधीचे अक्षरश: सोने केले व हळुहळु स्वत:ला सिध्द केले. एवढेच नाही तर आज जगातील सर्वश्रेष्ठ क्रिकेट विरांमधे माहीचे नाव घेतले जाते, त्याने र्मयादित षट्कातही भारतीय संघाचे उत्तम नेर्तृत्व केले. ११ सप्टेंबर २00७ पासून ४ जानेवारी २0१७ पयर्ंत महेन्द्र सिंग धोनी भारतिय क्रिकेट संघाच्या कर्णधार पदावर होता व २00८ ते २८ डिसेंबर २0१४ पयर्ंत कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार होता.
साहसी, रोमांचक व्यक्तिमत्व, व युनिक हेयरस्टाईल ठेवणारा धोनी भारताचा एक लोकप्रीय क्रिकेटर व मार्केटिंग आयकॉन देखील ठरला आहे. धोनी एक यशस्वी, आक्रमक, उजव्या हाताचा फलंदाज व यष्टिरक्षक आहे. माहीला आपल्या प्रतिभेचा थोडा सुध्दा गर्व नाही. तो भारताचा आवडता क्रिकेट खेळाडु आहे. धोनी त्या कर्णधारांपैकी एक आहे ज्यांनी ज्युनियर आणि भारतीय ए क्रिकेट संघाच्या क्रमवारीत राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. माही एक आदर्श आणि पिन अप.स्टार देखील आहे. माही ने भारताच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय संघाला २0११ साली दुसरा विश्‍वकप मिळवुन देण्यात आपले महत्वपुर्ण योगदान दिले आहे या विजयामुळे त्याचे फार कौतुक झाले आणि भारतीय संघातील सर्वात चांगला खेळाडु ठरला. धोनी ने २३ डिसेंबर २00४ ला बांग्लादेश विरूध्द भारताकडुन एकदिवसीय पहिला सामना खेळला. पुढे २00७ ते २0१६ पयर्ंत भारतीय एकदिवसीय संघाच्या कर्णधार पदावर राहिला आणि आपल्या प्रतिभेला सिध्द केले. धोनीने २ डिसेंबर २00५ ला श्रीलंके विरूध्द कसोटी खेळाडु म्हणुन पहिला सामना खेळला होता २00८ ते २0१४ पयर्ंत तो कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार होता.
आपल्या खेळातील आक्रमक शैलीमुळे त्याने विशेष ओळख तयार केली. माही भारताच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे ज्यांनी आपल्या संघाचे चांगले नेर्तृत्व केले आणि अनेक सामन्यांमधे भारताला विजय मिळवुन दिला. या व्यतिरीक्त त्यांच्या नेर्तृत्वात अनेक नोंदी देखील आहे.

No comments:

Post a Comment