Thursday 9 July 2020

जगदीप

अभिनय आणि विनोदी भूमिकांसाठी प्रसिद्ध असणार्‍या जगदीप (सैयद इश्तियाक अहमद जाफरी) यांचे बुधवारी मुंबईत निधन झाले. ८१ वर्षीय जगदीप यांना कॅन्सर आणि वृद्धत्वाच्या व्याधींनी ग्रासले होते. १९५१ मध्ये बी. आर. चोप्रांच्या ह्यअफसाना या सिनेमापासून जगदीप यांनी त्यांच्या फिल्म करियला सुरुवात केली. या सिनेमात जगदीप एक बाल कलाकार होते. यानंतर अब दिल्ली दूर नहीं, मुन्ना, आर पार, दो बीघा जमीन आणि हम पंछी एक डाल के या सिनेमांतही त्यांनी भूमिका केल्या. १९५३ मध्ये बिमल रॉय यांचा - दो बिघा जमीन या चित्रपटातील त्यांची भूमिका त्यांना यश देऊन गेली. बलराज सहानी आणि निरुपा रॉय यांच्यासारखे दिग्गज कलाकार सिनेमात होते.
बलराज सहानींनी आपल्या अभिनयाने हा सिनेमा गाजवला होता. पण या सगळ्या दिग्गजांसोबतच एका बालकलाकाराने आपल्या अभिनयाने सगळ्यांचे लक्ष स्वत:कडे वेधून घेतले. हा होता लालू उस्ताद नावाचा बूट पॉलिश करणारा एक लहान मुलगा. हाच लालू उस्ताद पुढे जाऊन जगदीप म्हणून ओळखला जाऊ लागला आणि विनोदी भूमिकांसाठी ओळखला जाऊ लागला. १९७५ मध्ये आलेल्या ह्यशोलेमधल्या सूरमा भोपालीच्या भूमिकेसाठी जगदीप यांना बहुतेकजण ओळखतात.सूरमा भोपालीचे पात्र जगदीप यांना यश आणि प्रसिद्धी देऊन गेले आणि त्यांच्या कारकीर्दीतला अडथळाही ठरलं. अंदाज अपना अपना सिनेमात त्यांनी सलमान खानच्या वडिलांची भूमिका केली. यातही त्यांचे नाव भोपाली होते - बांकेलाल भोपाली. जगदीप, महमूद आणि देवेन वर्मा या तीन दिग्गजांना एकत्र पाहण्याची संधी या सिनेमाने रसिकांना दिली. पण त्यांची कारकीर्द लहान वयातच सुरू झाली होती. बालकलाकार म्हणून त्यांनी गुरुदत्तच्या आर-पार सारख्या सिनेमात काम केले होते. विनोदी भूमिकांवरून ओळखल्या जाणार्‍या जगदीप यांनी कधी काळी सिनेमांत मुख्य हिरोची भूमिकाही केली होती. १९५७ मध्ये आलेल्या भाभी सिनेमात जगदीप आणि तेव्हा नवख्या असणार्‍या नंदावर चित्रित करण्यात आलेलं ह्यचली चली रे पतंग मेरी चली रे गाणे तेव्हा गाजले होते. तर पुनर्मिलन सिनेमात रफीजींनी गायलेल्या ह्यपास आओ तबीयत बहल जाएगी या गाण्यात पडद्यावर जगदीप यांचा रोमँटिक अंदाजही पहायला मिळाला होता. जगदीप यांना खरी ओळख मिळवून दिली ती १९६0च्या दशकात आलेल्या ह्यब्रह्मचारी सारख्या सिनेमांतल्या भूमिकांनी. या सिनेमातली त्यांची मुरली मनोहरची भूमिका वाखाणण्यात आली होती.

No comments:

Post a Comment