Sunday 19 January 2020

खान अब्दुल गफारखान

(१८९0 - १९८८) सरहद्द गांधी व बादशाह खान या नावाने प्रसिद्ध, हे वायव्य सरहद्द प्रांतातील स्वातंत्र्यसेनानी होते. ज्यांनी भारतीय स्वतंत्र्याचा लढय़ामध्ये भाग घेतला होता. भारतर% पुरस्कार मिळालेले हे पहिले अभारतीय होते. गफारखानांनी १९२९ मध्ये खुदाई खिदमतगार नावाची संघटना उभारली होती. ही संघटना सुर्ख पोश या नावाने देखील ओळखली जात होती.अब्दुल गफ्फार खान एक राजनैतिक आणि आध्यात्मिक नेता होते, त्यांना महात्मा गांधी सारखे अहिंसा आंदोलन साठी ओळखले जात होते.
ते महात्मा गांधी यांचे चांगले मित्र होते, ब्रिटिश इंडिया मध्ये त्यांना फ्रंटियर गाँधी चा नावाने संबोधले जायचे. खुदाई खिदमतगारचा यशामुळे ब्रिटिश सरकारने त्यांना आणि त्यांच्या सर्मथकांविरुद्ध कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली, आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील काही या दडपशाहीस बळी पडले. १९८८ मध्ये पेशावर येथे त्यांचे निधन झाले.
खान अब्दुल गफारखान यांचा जन्म ६ फेब्रुवारी १८९0 मध्ये ब्रिटिश इंडिया पेशावर(पाकिस्तान) येथील उत्मान जई येथे झाला. त्यांचे वडील बहराम हे तेथील जमीनदार होते. स्थानीय पठाण लोकांचा विरोध असताना खान अब्दुल गफारखान यांचा वडिलांनी त्यांना व त्यांचा भावाला मिशन स्कूल मध्ये शिकवले. त्यानंतर त्यांनी त्यांचे शिक्षण अलीगढ मुस्लिम महाविद्यालय मध्ये पूर्ण केले. १९१0 मध्ये त्यांनी आपल्या गावामध्ये एक शाळा उघडली. त्यानंतर १९११ साली ते स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभागी झाले. १९१५ साली ब्रिटिश अधिकार्‍याने त्यांचा शाळेवर बंदी घातली.
खान अब्दुल गफारखान यांना आझाद आणि धर्मनिरपेक्ष असा भारत देश पाहिजे होता, हे लक्ष पूर्ण करण्यासाठी त्यांनी १९२९ मध्ये खुदाई खिदमतगार नावाची संघटना उभारली होती. ही संघटना सुर्ख पोश या नावाने देखील ओळखली जात होती. खुदाई खिदमतगारची स्थापना महात्मा गाँधींचा अहिंसा आणि सत्याग्रह सारख्या सिद्धांतावरून प्रेरित होऊन केली गेली होती. ह्या संघटनेमध्ये साधारणत: १,00,000 सदस्य सामील झाले. आणि त्यांनी शांततापूर्वक इंग्रज पुलिसांचा विरोध केला.

No comments:

Post a Comment