Monday 20 January 2020

भाजपाचे आतापर्यंतचे राष्ट्रीय अध्यक्ष

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी जे.पी.नड्डा यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. चणाक्ष, व्यूहरचनाकार अशी त्यांची ओळख आहे. पाटणा आणि हिमाचल प्रदेश येथून त्यांचे शिक्षण झाले आहे. 2 डिसेंबर1960 मध्ये जन्मलेल्या नड्डा यांनी यापूर्वी मंत्री पद भूषविले आहे. भाजपच्या अनेक महत्त्वपूर्ण निर्णयात त्यांचे योगदान राहिले आहे. नड्डा यांनी एल एल बी संपादन केली आहे. विद्यार्थी दशेतच त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून राजकीय कारकीर्द सुरुवात केली.
1993 मध्ये ते विधानसभेवर निवडले गेले. 1998 मध्ये त्यांची फेरनिवड झाली. त्यावेळी ते आरोग्यमंत्री बनले. 2007 मध्ये ते प्रेमकुमार यांच्या सरकारात मंत्री झाले. नंतर त्यांनी निवडणूक लढवली नाही,पण राज्यसभेवर निवडून गेले.
नड्डा हे भाजपचे अकरावे अध्यक्ष आहेत. यापूर्वी अटलबिहारी वाजपेयी (1980 ते 86),लालकृष्ण अडवाणी (1986 ते 2005), मुरली मनोहर जोशी (1991 ते 93), कुशाभाऊ ठाकरे (1998 ते 2000), बंगारु लक्ष्मण (2000 ते 2001), के.जन. कृष्णमूर्ती (2001 ते 02), एम. व्यंकय्या नायडू (2002 ते 2004) , राजनाथसिंह (2005 ते 2009 आणि 2013 ते 2014) ,नितीन गडकरी (2010 ते 2013), अमित शहा (2014 ते 2020)

No comments:

Post a Comment