Monday 20 January 2020

तरुणांमध्ये पक्षाघातात वाढतोय

भारतातील तरुणांमध्ये सध्या पक्षाघात हा आजार वाढत आहे. लठ्ठपणा, मधुमेह, अतिरिक्त मद्यपान, धूम्रपान ही त्याची प्रमुख कारणे आहेत. याशिवाय ताणतणावाची जीवनशैलीही पक्षाघातासाठी कारणीभूत ठरू शकते. जागतिक आरोग्य संघटनेनुसार भारतात पक्षाघात होणार्‍यांपैकी २0 टक्के रुग्ण चाळिशीखालील वयाचे आहेत. हा आजार झालेल्या रुग्णांपैकी ३0 टक्के रुग्णांचा मृत्यू होतो, तर ३0 टक्के नागरिकांना अपंगत्व येते. मानवी शरीरात एकाच वेळी एक किंवा अनेक स्नायू कार्य करत नसतील तर अशा स्थितीला पक्षाघात म्हणतात.
यात शरीरातील स्नायू लुळे होतात. मेंदूला इजा झाल्यास पक्षाघात होतो. या स्थितीत संवेदी चेतांनाही धक्का पोहोचला तर बाधित भागातील संवेदनाही नाहीशा होतात. बदलत्या जीवनशैलीसह वाईट सवयींमुळे सध्या देशात तरुणांमध्ये पक्षाघाताचे प्रमाण वाढत आहे. मेंदूचे शरीराच्या विविध भागांवर नियंत्रण असते. मेंदूमधील कोणत्या भागात इजा किंवा गाठ झाली त्यावर या व्यक्तीला पक्षाघातामुळे होणारी लक्षणे अवलंबून असतात. पक्षाघातामुळे या व्यक्तीची हालचाल, संवादातील समन्वय, शरीराअंतर्गत अवयवातील समन्वय आदींपैकी एक किंवा अनेक क्रियांवर परिणाम होऊ शकतो. काही वेळा हातपाय लुळे पडणे, बोलताना जीभ अडखळणे, तोल जाणे, चेहर्‍याला वाक येणे आदी अशी लक्षणे दिसू शकतात.उच्च रक्तदाब, धूम्रपान, मद्यपान, लठ्ठपणा, तंबाखूचे व्यसन, व्यायामाचा अभाव यामुळे पक्षाघात होऊ शकतो. हा होतो. रक्तदाब, मधुमेह नियंत्रणात ठेवून या वाईट सवयी सुधारल्यास धोका टळू शकतो

No comments:

Post a Comment