Tuesday 28 January 2020

रज्जू भैय्या

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चौथे सरसंघचालक राजेंद्र सिंह ऊर्फ रज्जू भैया १९९४ ते २000 पर्यंत या पदावर होते. खर्‍या अर्थाने ते संघाचे महाराष्ट्राबाहेरचे पहिले सरसंघचालक होते. त्यांचे शिक्षण अलाहाबाद विद्यापीठात झाले आणि नंतर याच विद्यापीठात ते प्राध्यापक तसेच भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख राहिले. त्यांना घरचे लोक रज्जू असे हाक मारत असत. नंतर हेच त्याचे प्रेमाचे नाव सार्वत्रिक झाले. सरसंघचालक म्हणून त्यांचा कार्यकाळ भाजपा आणि आरएसएस दोन्हींच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा होता. अगदी अटलबिहारी वाजपेयी असो किंवा अडवाणीजी किंवा विहिंपचे अशोकजी सिंघल, सारेच त्यांचा अत्यंत आदर करीत असत.
ते सेवा, सर्मपणात आदर्शवादाची जणू साक्षात प्रतिमूर्तीच होते. आणीबाणीनंतर जेव्हा जनता पार्टी सरकारमध्ये नानाजी देशमुख यांना उद्योग मंत्रीपद देण्यात आले तेव्हा रज्जू भैया त्यांना म्हणाले की, जर तुम्ही, अटलजी आणि अडवाणीजी तिघेही सरकारमध्ये जाणार असाल तर संघटनेचे काम कोणी करायचे? नानाजींनी त्यांच्या इच्छेचा आदर करीत क्षणार्धात मंत्रीपद नाकारले. इतका आदर रज्जूभैयांना सारे द्यायचे.

No comments:

Post a Comment