Wednesday 22 January 2020

वासुदेवाची स्वारी


'सकाळच्या पारी गाव जागवित आली वासुदेवाची स्वारीअसे म्हणत दान मागणार्‍या वासुदेवाची परंपरा आजच्या गतिमान युगात लुप्त झाली आहे. जत तालुक्यात वासुदेवाचे एकही कुटूंब नाही.  सुगीच्या दिवसांत मात्र काही वासुदेव फिरताना दिसतात. नंदीबैलगारुडीदरवेशी यांच्याप्रमाणेच वासुदेवसुद्धा लहान मुलांना पाहायला मिळत नाहीत.जत तालुक्यात  वासुदेवाची परंपरा  टिकवून ठेवण्यासारखे एक गाव अथवा एक कुटूंबसुद्धा नाही. आजच्या पिढीला वासुदेव ठाऊक नाही. यल्लमा यात्रा किंवा सुगीच्या दिवसांत काही वासुदेव दान मागत तालुक्यात काही ठिकानी फिरताना दिसतात. सध्या मात्र कुठेच हा वासुदेव पाहायला मिळत नाही.   
पहाटेच्या वेळी दारात वासुदेव येणे हे शुभ लक्षण असल्याचे जुन्या पिढीतील लोक सांगतात. काळ बदललालोक बदललेजीवनमान गतिमान झाले तसेच विविध दूरचित्रवाणीकेबल वाहिन्यांवरुन प्रसारित होणार्‍या कार्यक्रमातील वासुदेवाची गाणी ग्रामीण भागातील जुन्या पिढीतील लोक आजही तेवढय़ाच आवडीने ऐकतात. आपल्या पूर्वजाच्या उद्धारासाठी वासुदेवांना कपडेभिक्षा तसेच रोख रकमेची दक्षिणाही देण्यात येते. दिवसेंदिवस तरुण मुले पारंपरिक व्यवसायात महत्त्व देत नसली तरी जुनी मंडळी हा वारसा टिकवून धरीत मुलांच्या शिक्षणासाठी दान मागत असतात. व वारसा टिकवून ठेवतात. जतच्या शेगाव रस्त्याला त्यांची पाल पूर्वी हमखास दिसायची. सोलापूर जिल्ह्यातून ही मंडळी यायची. मात्र त्यांच्या पिढीतला तरूण वर्ग अन्य कामांकडे वळल्याने वासुदेवाचे दर्शन दुर्लभ झाले आहे. नव्हे  आता वासुदेव कुठेच पाहायला मिळत नाही. वासुदेव आणि पहाट हे पूर्वीपासूनच ठरलेले आहे. अंगात पांढरा झगाडोक्यावर मोरपंखी टोपीगळ्यात माळारंगबेरंगी पटकाकपाळी हळदी कुंकवाचा मळवट आणि हातात टाळ अशी वेशभूषा करून वासुदेवाची स्वारी गाव जागे होण्याच्या अगोदर घराच्या अंगणात उभी राहते. धनधन पावरेपांडुरंगा धन धन पावरे धर्म करावा पवित्रमाय बहीण ओळखावेधन धान्य पावरेवासुदेव आला हो वासुदेव आलाअसे म्हणत दान देणार्‍यांसाठी आशीर्वाद देण्याचे काम करतानाच या परंपरेतून लोकजागृतीसमाजप्रबोधनही करण्यात येत असे. मात्र जत तालुक्यात तरी हा वासुदेव औषधालासुद्धा पाहायला मिळत नसल्यने आजची पिढी कोण हा 'वासुदेवम्हणताना दिसत आहे.

No comments:

Post a Comment