Monday 3 May 2021

सर्वात आनंदी प्राणी : क्वॉका


मुलांनो, आज आम्ही तुम्हाला क्वॉका नावाच्या एका अनोख्या प्राण्याबद्दल सांगत आहोत.  याला जगातील सर्वात आनंदी प्राणी असे म्हणतात, याचं कारण आहे त्याचा  हसरा चेहरा. त्याला समोरून पाहिलं तर असं वाटतं की तो हसत आहे. क्वॉकाबद्दल अधिक माहिती सांगायची तर हा क्वॉका मांजराच्या आकाराचा सस्तन प्राणी आहे.हा प्राणी मॅक्रोपॉड कुटुंबातील एक सदस्य आहे.याच कुटुंबात वॅल्बी आणि कांगारू देखील आहेत.  पश्चिम ऑस्ट्रेलियाचा रोटेनेस्ट आयलँड हे क्वॉकाचे मूळ निवासस्थान आहे.  रोटेनेस्ट बेटावर जमिनीवर राहणारा एकमेव सस्तन प्राणी आहे.  1696 मध्ये युरोपियन डच कॅप्टन विल्हेल्म डी ब्लेमिंग यांनी क्वॉकाविषयी माहिती सर्वप्रथम सांगितली होती.  मात्र त्यांनी चुकून त्याचे वर्णन मांजरीच्या आकाराचे उंदीर केले, असे केले होते.  क्वॉकाच्या शारीरिक संरचनेबद्दल सांगायचे तर त्याच्या शरीराची लांबी 21 इंचपर्यंत आहे. शेपटीची वेगळी अशी लांबी 12 इंच आहे.

एका पूर्ण वाढलेल्या क्वॉकाचे  वजन सुमारे 11 पौंड असते. ते त्यांच्या सहकाऱ्यांशी कधीही अन्नासाठी भांडत नाहीत. सामान्यपणे ते त्यांच्या समूहात शांततेने राहतात. क्वॉका झाडाची साल, गवत आणि झाडाची पाने अन्न म्हणून खातात.  हे झाडावर रांगत आणि  उड्या मारत फिरतात. त्याचे सरासरी आयुष्य 10 वर्षे आहे.  क्वॉकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जगण्यासाठी त्याला जास्त पाण्याची आवश्यकता नसते. मादी वर्षातून फक्त दोन पिलांना जन्म देते.  त्यांच्या पिलांना जॉय म्हणतात.  कारण तो माणसाला घाबरत नाही.  परंतु जर याला भीती वाटली, कोणी हल्ला केला किंवा उकसवलं तर तो जोराने ओरडतो.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:

Post a Comment