Tuesday 31 March 2020

माहीत आहे का? (भाग2)

1) वीज ज्या ठिकाणी पडते , नेमक्या त्याच ठिकाणी पुन्हा पुन्हा का पडते ?वीज सर्वसाधारणपणे उंच ठिकाणी किंवा उंच इमारतीवर पडते . काही उंच इमारतींवर सुरक्षा उपाय म्हणून विद्युतवाहक बसवले असतात . त्यामुळे वीज त्यांच्याकडे पुन्हा पुन्हा आकर्षित होते .
2)तेल जगातील ऊर्जेचे मुख्य उगमस्थान आहे . दुसरे कोणते ?

नैसर्गिक वायू .
3) जगातील सर्वांत मोठा उपसागर कोणता ?
कॅनडातील हडसन उपसागर . त्याचा किनारा १२ , २६८ कि . मी . आहे . त्याचे क्षेत्रफळ ८२२ , ३०० कि . मी . आहे . बंगालच्या उपसागराचा किनारा ३६२१ कि . मी . आहे .
4)जगातील सर्वांत मोठे वाळवंट सहारा आहे . त्याच्या खालोखाल कोणत्या वाळवंटाचा क्रमांक लागतो ?
ऑस्ट्रेलियाचे वाळवंट ,
5)माऊंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखर आहे . पृथ्वीवर सर्वांत सखल ठिकाण कोणते ?
मृत समुद्राचा किनारा . समुद्रसपाटीखाली अंदाजे १३०० फूट .
6) ( १ ) मॉरिशस ( २ ) मालदीव ( ३ ) माली ( ४ ) मोझांबिक या देशांच्या राजधान्या कोणत्या ?
( १ ) पोर्ट लुई ( २ ) माले ( ३ ) बामाको ( ४ ) मापुटो .
7) कैरो शहराचे मूळ अरबी नाव कोणते ?
अलू - काहिरा . म्हणजे ' विजयी ' . इजिप्तला जिंकणाऱ्या फतिमिद जनरल गौहरने कैरोची स्थापना इ . स . ९६९ साली केली .
कैरो हे आफ्रिकेतील एक सर्वांत मोठे शहर आहे . इजिप्तचे म्हणजे संयुक्त अरब प्रजासत्ताकाचे राजधानीचे शहर आहे .

No comments:

Post a Comment