Monday 2 March 2020

यूपीएससीचा नवीन टाय-ब्रेकिंग नियम

केंद्रीय लोकसेवा आयोगाने यूपीएससी परीक्षेसाठी नवीन टाय-ब्रेकिंग नियम जारी केले आहेत. जेव्हा दोन किंवा अधिक उमेदवारांना सारखेच गुण मिळतात त्यावेळी हे नियम लागू होतात. आयोगाने यंदा नागरी सेवा परीक्षेसाठी दोन फिल्टरवाले नियम तयार केले आहेत. यानुसार समान गुण असणाऱ्या दोन उमेदवारांमध्ये व गुणांनुसार किंवा मग वयानुसार रँक ठरवला जाणार आहे.

असा ठरणार रँक ▪नियम १-दोन किंवा त्यापेक्षा अधिक उमेदवारांना समान गुण असल्यास उमेदवारांच्या अनिवार्य पेपर व पर्सनालिटी चाचणीचे गुण एकत्र करून ज्याचे गुण अधिक त्याला जास्त रँक मिळणार.
▪नियम-२ दोन्ही उमेदवारांचे अनिवार्य पेपर व पर्सनालिटी चाचणीचे गुण एकत्र करूनही समान झाल्यास वयाचा निकष लावला जाणार आहे. ज्याचे वय अधिक त्याला दोघांपैकी जास्त रँक मिळणार आहे. हा नियम 28 ऑगस्ट 2019 नंतर ज्या परीक्षांची अधिसूचना जारी झाली आहे, त्यांना हा टायब्रेकिंग रुल लागू होणार आहे. यासंदर्भातली अधिसूचना यूपीएससीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

No comments:

Post a Comment