Friday 6 March 2020

कशात किती पाणी

शरीरात पाणी टिकून रहावं यासाठी काही फळं आणि भाज्यांचं सेवन लाभदायक ठरतं. याविषयी सविस्तर माहिती घेऊ या. * सफरचंदात ८४ टक्के पाणी असून 'सॉर्बटोल' नावाचा घटक असतो. यामुळे तहान भागते शिवाय लवकर भूकही लागत नाही. सफरचंदाच्या नित्य सेवनामुळे वजन कमी होण्यास मदत होते. * केळ्यात ७४ टक्के पाणी असतं. यातल्या कॅल्शियम आणि पोटॅशियममुळे सांधेदुखीचा त्रास कमी होतो. * वांग्यात ७२ टक्के पाणी असतं. यातल्या फायबरमुळे पचनसंस्थेचं कार्य सुधारतं आणि बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवत नाही. * काकडीत ९६ टक्के पाणी असतं. तर 'क' जीवनसत्त्व आणि फायबरही असतं. यामुळे त्वचेतला ओलावा टिकून राहतो. पचनसंस्थेचं कार्यही सुरळीत सुरू राहतं.
* द्राक्षांमध्ये ९२ टक्के पाणी असतं. यातल्या अँटीऑक्सिडंट्समुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. हृदयविकारापासून बचाव होतो. * खरबुजात ९0 टक्के पाणी असतं. यात कॅलरीही कमी असतात. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. * संत्र्यात ८७ टक्के पाणी असतं. यातल्या फॉलिक अँसिडमुळे मेंदूची क्षमता वाढते. अशक्तपणा दूर होतो. * अननसात ८७ टक्के पाणी असतं. यात दाह कमी करणारे गुणधर्म असतात. * स्ट्रॉबेरीमध्ये ९२ टक्के पाणी असतं. यातल्या 'ब' जीवनसत्त्वामुळे रक्ताभिसरण सुधारतं आणि त्वचा उजळते. * कलिंगडामध्ये ९२ टक्के पाणी असतं. यातल्या पोषक घटकांमुळे शरीरातील विषारी द्रव्यं बाहेर पडतात

No comments:

Post a Comment